भाग 12
अथर्व साक्षी च्या इथून तडक निघाला आणि घराच्या परसबागेत आला, आजी आजोबाना समजणार नाही अशा प्रकारे तो शंभू काकाना आवाज देऊ लागला,
(शंभू काका कुठे आहात तुम्ही)
अरे बाळ इथे ये विहिरी पाशी मी इथे आहे.
काका किती आवाज देतो आहे तुम्हाला कुठे गायब होता सारख आणि या एवढ्या मोठ्या परसबागेत कुठे शोधणार तुम्हाला........
अरे इतकी पण मोठी परसबाग नाहीये, यातल्याच भाज्या आपण रोज खातो मग परसबागेत सगळ कस नीट स्वच्छ असल पाहिजे, म्हणजे कस भाज्या पण चवीला छान लागतात.......
काका हे सगळ होत राहत आधी मला तुमच्याशी महत्वाच बोलायचं आहे, आणि मला तुम्ही तुमचा मुलगा मानताना मग तुम्ही मला सगळ खर सांगणार आहात.
काय रे पोरा काय बोलायचं आहे इतक महत्वाच जे अस बोलतोस माझ्याशी ? आणि काय रे मी तुझ्याशी कधी खोट बोलतो सांग मला ?
काका तस काही नाही पण नक्की खर सांगणार ना मी जे विचारणार ते ?
बोल रे बाळ सांगतो मी खर.............
काका मी ज्यावेळेस इथून परत बाबा सोबत घरी गेलो होतो त्यावेळेस काय झाल होत इथे ?
त्याच्या या प्रश्नावर काका थोडावेळ शांत राहिले, कारण त्याच्या या प्रश्नावर काय बोलायचं हे त्यांना समजत नव्हत. अथर्वच्या खूप वेळा आवाज देण्यावर ते भानावर आले.
बाळ हा विषय अचानक का? काही झाल आहे का ? मला आधी ते सांग जर मला तुला काही मदत करायला जमत असेल तर ते आधी करू. आणि मागे काय झाल याचा विचार नको करू...............
काका मला कोणतीच मदत नकोय, मला फक्त तेव्हा काय झाल हेच ऐकायचं. Please मला सांगाना कारण आज जर मला ते नाही कळाल ना तर मी जे करायचा विचार करतोय ते शक्य नाही ये.
अथर्व काय करायचा विचार केला आहेस तू मला सांग, काय करणार आहेस अस जे तुला इतका विचार करायला लागतो एवढा ?
काका सांगा ना मला.................
बर ऐक तुझे वडील इथून जे केले ते इथे परत तेव्हाच यायचे जेव्हा तुझे आजोबा त्याला खूप आग्रह करून बोलवायचे, त्यात पण तू आला सोबत तर, नाहीतर वहिनी कधीच आल्या नाही. जेव्हा तू आणि तुझे वडील शेवटचे आले ते पण त्याची आजी आजारी आहे हे कळल्यावर, पण त्यात हे यालाया उशीर केला, म्हणून तुझे आजोबा खूप चिडले. पण तुझे वडील आणि आजोबा दोघेही तापट स्वभावाचे आम्हाल वाटल सगळ शांत झाल कि ते दोघे हि शांत होतील, तुझे वडील लगेच तुला घेऊन परत जायला निघाले, तुझ्या आजोबांनी थोड शांत घेत बोलायचं आहे जरा २ दिवस थांबशील का? अस विचारल, म्हणून ते थांबले तुझ्या आजोबाना आणि साक्षी च्या आजोबाना प्रश्न होता कस बोलायचं, म्हणून मग आजी म्हणाली तुम्ही दोघेही शांत व्हा, मी बोलते त्याच्याशी माझ बोलन नाही टाळणार तो, मी त्याला व्यवस्तीत समजावते.
अग हो तू समजावशील तो समजेल पण, एवढा मोठा निर्णय सुनबाईला न विचरता तो नाही घेणार. आणि सगळे रितीरिवाज राहिलेत अजून आपले पूर्ण व्हयाचे. सगळ्यात महत्वाच म्हणजे पिंडाला कावळा नाही शिवला तर ?..............................
हे बोलन ऐकून तुझी आजी जाम चिडली, आणि त्यांना मधेच थांबवत अस काही नाही होणार, मी अस काही होऊ पण नाही देणार, शांत व्हा सगळे. आणि मी बोलेल माझ्या लेकाशी माझ ऐकेल तो.
ठीक आहे जा बोल तू आणि जास्त समजाऊ नको त्याला.
तेवढ्यात तुझे वडील तिथे आले आणि, तावातावात बोलू लागले..... मला थांबून ठेवल आहे इथे अस काय काम आहे माझ्या कडे जे माझा वेळ वाया घालवत आहात. लवकर बोला मला लवकर निघायचं आहे आणि आता सगळ झाल आहे तर माझ काय काम आहे इथे.
त्याच अस बोलन ऐकून तुझ्या आजोबाना तर धक्काच बसला.......
अरे बाळ अस का बोलतो आहेस ती तुझी आजी आहे, आणि तुझ्यावर किती जीव होता तिचा....... आणि तू अस बोलतोस. तूच बोल रमा मी आता काहीच बोलू नाही शकणार त्याच्याशी.......
तुझ्या वडिलांचा ताव काही कमी होत नव्हता. आणि यात तुझ्या आजीची खूप ओढाताण होत होती. पण शेवटी त्या मधी पडल्या आणि तुझ्या वडिलांना शांत करत त्यांना त्यच्या आईची शेवटची इच्छा सांगून टाकली.........
आणि ते सगळ ऐकून तुझे वडील तुला ताडकन घेऊन निघून गेले. जे गेले ते परत आलेच नाही. आज हि तुझे आजोबा आणि आजी तीळतीळ तुटतात कारण त्यांच्या आईची ते शेवटची इच्छा पूर्ण नाही करू शकले.........