Mitranche Anathashram - 8 in Marathi Drama by Durgesh Borse books and stories PDF | मित्रांचे अनाथाश्रम - भाग ८

Featured Books
Categories
Share

मित्रांचे अनाथाश्रम - भाग ८


निशाने विवेकला सांगितलेली गोष्ट आता विवेकने मला सांगायला सुरुवात केली.
पहिल्या दिवशी संध्या शाळेत आली नाही, त्याच्या आधीच्या संध्याकाळी संध्या शाळेतून घरी आली. तेव्हा आई कुठेतरी बाहेर चालली होती, "मी बाहेर जाते आहे बाजारात, बाबा जरा उशिरा येतील खुप काम आहे त्यांना आणि तुझ्यासाठी चहा ठेवला आहे."
संध्या, "ठीक आहे लवकर ये"
तयारी करून संध्या कामाला लागली. काम करत असताना तिला समजले नाही वेळ किती निघून गेला. तितक्यात दरवाजा वाजला, बाबा येण्याची वेळ झाली होती म्हणून ती दरवाजा उघडण्यासाठी धावत गेली. दरवाजा उघडला तर समोरचा दादा उभा होता.
संध्या, "दादा, तु कसा इकडे कसा"
दादा, "काही नाही सहज, काकू कुठे आहेत"
संध्या, "आई बाहेर गेली आहे, काही काम आहे का ?"
दादा, "तुझ्या बाबांकडे होत"
संध्या, "ते आज जरा उशीरा येतील"
तो आत येण्यासाठी पुढे सरसावला, संध्याला दारूचा वास आला. तिने पटकन दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला.
संध्या, "तु, बाबा आल्यावर ये मग"
तो दरवाज्याला धक्का देऊन आत शिरला आणि दरवाजा आतून लावून घेतला. आतापर्यंत संध्या ने त्याचा येण्याचा हेतू ओळखला होता. ती किचन च्या दिशेने धावणार तितक्यात त्याने हात पकडून खाली पडण्याचा प्रयत्न केला. पण ती हात सोडवून किचन मध्ये जाण्यात यशस्वी झाली. तिने चाकू घेतला आणि त्याच्या दिशेने धरला. तो चाकू पाहून घाबरला पण तिच्या हातातून पटकन चाकू घेतला. या गडबडीत किचन मध्ये सर्व तेल पडले होते. त्याने तिचे हात पाय आणि तोंड ओढणीने बांधले आणि खेचत खेचत सोफ्याजवल घेऊन आला. जे नको घडायला तेच घडत होत. त्याने तिचे कपडे पार फाडून टाकले होते. तितक्याच दरवाजा वाजला, तिला तसेच सोफ्याच्या मागे टाकून तो चाकू मागे लपवून दरवाजा उघडण्यासाठी गेला. दरवाजा उघडला तर समोर लहान मुलगा होता, "ताई कुठे आहे ?"
तो, "नाही ती बाहेर गेली आहे"
त्या मुलाला काहीच समजले नाही, तो पर्यंत संध्या ने बांधलेले तोंड उघडले होते, मागून त्याला आवाज दिला, "गुड्डू"
गुड्डू ने मागे वळून बघण्याआधी दादाने त्याला पकडून कपाटात बंद केले. संध्याने बांधलेले हात सोडून पळणार तितक्यात त्याने तिचा एक हात पकडला. त्याच हाताला जोरात झटका देत त्याने तिला खाली पाडले आणि त्याच्या दुसऱ्या हातात चाकू लागला. तो चाकू तिच्या गळ्यावर फिरवला. सगळीकडे आता फक्त रक्त आणि रक्त झाले होते. हळू हळू संध्याची हालचाल कमी कमी होत होती. अजुनही त्याला काय घडतं आहे याचा अंदाज येत नव्हता, तो त्याला जे पाहिजे तेच मिळवत होता. गुड्डू ने कसाबसा दरवाजा उघडला आणि बाहेर आला. गुड्डू चा तसा अवतार आजपर्यंत कधीच पाहिला नव्हता. गुड्डू ने जवळ असलेली फुलदाणी त्याच्या डोक्यात मारली आणि दादाची हालचाल बंद झाली होती. गुड्डू ने चाकू उचलून बाजूला फेकला. मदतीसाठी बाहेर धावणार तोपर्यंत संध्या चे बाबा आले होते. त्यांनी संध्या ची अवस्था पाहून शुध्दीवर येत असलेल्या दादा वर चाकूने प्राण जात नाही तोपर्यंत वार केले.
आतापर्यंत आजुबाचे येऊन संध्या आणि गुड्डू ला दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टर ने ऑपरेशन नंतर सांगितले की संध्या बोलू शकणार नाही, गुड्डू खुप लहान आहे त्यामुळे त्याच्यासाठी हे सर्व त्रासदायक असणार आहे. पोलिस संध्याच्या बाबांना घेऊन गेले. या सर्व घटनेमुळे संध्याच सर्व परिवार उध्वस्त झालं. त्यानंतर तिच्या बाबांना शिक्षा झाली ते तुरुंगात असतात. तिची आणि ती मामांकडे राहायला गेले.

विवेक सांगत असलेल्या प्रत्येक शब्दामुळे माझ्या अंगावर शहारा येत होता. डोळ्यासमोर तो प्रसंग घडतो आहे असा भास होत होता. दोघंही हॉस्पिटल पर्यंत शांत होतो. पोहचल्यावर विवेक बोलला, "कुणाला सांगू नको"
मी, "मी आठवण काढणार नाही त्याची, किती भयंकर आहे सर्व"
विवेक, "ते पण नको सांगू"
मी, "ते पण म्हणजे"
विवेक, "मला पण संध्या आवडायची, पण प्रेम नव्हतं ते"
आम्ही आम्या च्या रूम जवळ येताच, डॉक्टर बाहेर जाताना दिसले. घाबरून आत गेलो तर तिथे संजय बसला होता.
विवेक, "काय झालं ?"
संजय, "काही नाही"
विवेक, "मग डॉक्टर ?"
संजय, "आपण उद्या आम्या ला घरी घेऊन जाऊ शकतो हे सांगायला आले होते"
त्याच आनंदात विवेक आणि मी काय बोलत होतो ते विसरलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्याला रजा मिळाली. त्याला आश्रमात पोहचवले. त्याच्याबरोबर जरा गप्पा मारल्या आणि विवेक सोबत आपल्या रस्त्याला चालायला लागलो. घरी जातांना मला सर्व प्रश्नांचे उत्तर मिळाले होते. फक्त आम्या ची अशी अवस्था कशी झाली हे माहिती नव्हतं. विवेक सांगेल सुध्दा, पण आता त्याला विचारून पुन्हा त्रास नाही द्यायचा.
एवढ्या सगळ्यात मला सर्व मित्रांचा हेवा वाटायला लागला होता. मित्रांसाठी किती काय काय करतात. माझ्याकडे सुध्दा इतकी मोठी मित्रांची फौज नाही फक्त दोन मित्र होते. एक विवेक आणि दुसरा मित्र.
मला अजून पण तो दिवस आठवतो आहे. त्या दिवशी मी गाडी काढली आणि विवेकला भेटायला त्याच्या घरी गेलो. विवेकच्या घरात गेल्यावर मला समोर साध्या राहणीचा एक मुलगा खुर्चीवर बसलेला दिसला. मी विवेक ला आवाज दिला. त्याची आई बाहेर आली आणि म्हणाली, "तो अमर कडे गेला आहे"
मी तेव्हा सर्वांना फक्त नावाने ओळखत होतो, कारण विवेक बारावी नंतर इंजिनिअरिंगला गेला. तो कायम मला संजय आणि अमर बद्दल सांगायचा. विवेक च्या आईने सांगितले, "तु येणार आहे असे सांगून गेला आहे, मी पत्ता देते तु जा तिथेच"
मी पत्ता घेऊन बाहेर जाणार तितक्यात त्यांनी मला आवाज देऊन बोलावले, "हा, विवेक च्या कॉलेज चा मित्र आहे, विवेक बरोबर आला आहे. विवेक सकाळी लवकर उठून गेला, हा बिचारा इथेच राहिला. घेऊन जा याला पण"
मी त्याच्याकडे पाहून, "चल मित्रा, फिरून येवू"
एकमेकांबरोबर ओळख झाली, गप्पा मारता मारता दोघंही सरपोतदार अनाथाश्रमासमोर आलो. आमच्या बोलण्यातुन आम्ही आत्ताच भेटलो याचा अंदाज येत नव्हता.
आश्रमात पोहचल्यावर दोघं खुर्चीवर बसले होते. त्यातल्या एकाच्या डोक्यावर कॅप होती, दुसरा विवेक होता. दोघं पायरीवर बसले होते. एका बाजूला गार्डन होत तिकडे सर्व मुल मुली खेळत होते. मला पाहून विवेक खुर्चीवरून उठला आणि जवळ येत म्हणाला, "अरे तुम्ही दोघं, आई ने पाठवलं, झोप झाली."
दुसरा मित्र, "हो"
टोपीवाला उठून पायरीवर बसला आणि विवेक ने खुर्चीवर बसवले. तो पायरीवर जाऊन बसला. त्याने ओळख करून देत, टोपिवाल्या कडे हात करत, "हा, संजय पाटील."
काका कडे हात करत, "सुरेश काका"
आणि तिसरा स्वतः बोलला, "मी, अमर"
इतकी ओळख करून दिली, संजय आणि विवेक काहीतरी बोलायला बाजूला गेले. सुरेश काका काहीतरी काम होत म्हणून उठून आत गेले. तिघाही त्या दिवशी जवळचे मित्र असल्यासारखे गप्पा मारत बसलो होतो. खुप वेळ झाला तरी संजय आणि विवेक बोलतच होते.
आम्या, "चला बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ, कुठे जायचं ?"
मी, "तु सांग, जिथे कुठे घेऊन जाणार मी येतो"
कुठे जायचं ते ठरवत असताना,
विवेक, "तु याला घरी घेऊन जा, मला काम आहे"
मी, "पण ..."
विवेक रागात, "मी सांगतो ते कर फक्त"
मला खुप राग आला, त्याच रागात गाडी काढली आणि मी निघालो. दोघंही गाडीवर गावभर खुप फिरलो.
त्या दिवशी जे घडल त्यानंतर मला विवेक चा खुप राग आला म्हणून मी त्याच्याशी बोलण बंद केलं होत. दोघंही एकमेकांशी बोलत नव्हतो.
विवेक च्या घरासमोर पोहचलो,
विवेक, "Thank You आणि सॉरी"
मी, "का ?"
विवेक, "माझ्या एका हाकेला आला म्हणून"
मी, "आणि सॉरी का ?"
विवेक, "त्या दिवशी मी खुप चुकीचा वागलो ना म्हणून"
मी, "पण इतक्या रागात बोलला तु ?"
विवेक, "हो, चुकलं माझं"
मी, "बर पण त्या दिवशी काय झालं होत."
विवेक, "संजय चे बाबा वारले होते आणि पंधरा दिवस झाले होते आणि ..."
मी, "म्हणून त्याने टोपी घातली होती"
विवेक, "हो.."
आणि विवेकला आई ने आवाज दिला.
विवेक, "मी तुला सर्व काही सांगेल सकाळी ये, आश्रमात जाऊ"
मी, "ठीक आहे"
मी घरी गेलो, दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर तयारी करून मी विवेक कडे गेलो त्याला गाडीवर मागे बसवले अब्ज आश्रमाच्या दिशेने गाडी वळवली.
मी, "संजय बद्दल काय सांगत होता ..."

क्रमशः