Maajhich tu aani tujhaav mi - 1 in Marathi Love Stories by Diksha Kamble books and stories PDF | माझीच तू आणि तुझाच मी - 1

Featured Books
Categories
Share

माझीच तू आणि तुझाच मी - 1

आज शृंगार खूप रागातच घरी आली. तिला पाहून तिच्या आईला आणि बाबांना पण कळून चुकले की नक्कीच हिचे काहीतरी बिनसले आहे. ती आज काहीही न खाता तशीच झोपायला निघून गेली. आईने किती फोर्स केला तरी काही खाल्ली नाही की काही बोलली नाही. आज तिला झोपच लागत नव्हती. राहून राहून त्याचाच चेहरा डोळ्यांसमोर येत होता. मागचा काळ अस डोळ्यांसमोर पुन्हा उभा राहत होता.
का मी त्याचा विचार करत आहे. नाही नाही. मला नाही विचार करायचा त्याचा. अस म्हणत आपसूकच तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले.
तिला आजचा दिवस आठवत होता.

सर, मी काय म्हणते, तुम्हीच अगोदर सामोरे जा ना त्यांना.
मिस शृंगार तुला कोणी विचारलं नाहीये ऑर्डर दिली आहे. सो जा आपल्या बॉसच स्वागत कर.

सर पण मीच का? कीर्तीला जाऊ द्या ना. तसही ती सिनियर आहे आमची.

मिस शृंगार तुला सांगितलेलं कळत नाही का? इट्स माय ऑर्डर. दॅट्स इट.

ओके सर.

श्री काय झाल ? काही प्रोब्लेम आहे का? - अरुण

नाहीतर. - शृंगार

मग तू कधीपासून इतकी नर्व्हस होऊ लागली? - अरुण

काही नाही रे. चल येतीलच ते इतक्यात. - शृंगार

(अरुण म्हणजे शृंगार चा होणारा नवरा आणि श्री म्हणजे आपली शृंगार बरं. )

तेवढ्यात एक गाडी दरवाज्यात येऊन थांबते. गाडीतून एक राजबिंडा तरूण बाहेर येतो.
वेलकम Mr सरपोतदार. तुमचे आपल्या कंपनीत मनापासून स्वागत आहे. - श्री उसन हसू आणत म्हणाली.
सरपोतदार. सूर्या सरपोतदार. सरपोतदार इंडस्ट्रीजचा मालक. त्याच्या वडिलांचा बिझनेस त्यानेच इतक्या उंचीवर नेऊन ठेवला. वयाच्या तेविसाव्या वर्षीच बिझनेस बघायला सुरुवात केली त्याने. जस बिझनेस मध्ये त्याचा हात कुणीही पकडू नाही शकत तसच रूपामध्ये ही काही कमी नाही. साक्षात मदनाचाच पुतळा.
साजेसे असे कपडे वर डोळ्यांवर गॉगल. त्याला पाहून तर कोणावरही त्याची भुरळ पडल्याशिवाय राहिलं नाही. चेहऱ्यावर तेज आणि एका बिझनेसमनला शोभेल अशी ऐट. गोरा वर्ण तेज ने अजूनच गोरा दिसत होता. वाऱ्याने कपाळावर येणाऱ्या केसांमुळे तर कित्येक मुलींच्या काळजाचा ठोका चुकत होता. त्याला पाहताक्षणीच कित्येक जणींचा तो क्रश बनला होता. चालण्यात ही थाट होता त्याच्या.
वेलकम सर. - श्री फुलांचा गुच्छा पुढे करत म्हणाली.
त्याची नजर तिच्या वर पडताच तो ही तिच्या सारखा दोन क्षण स्तब्ध झाला. पण लगेच स्वतः ला सावरुन तो तिच्याजवळ जातो.
एका हात खिशात आणि दुसऱ्या हाताने तो गुच्छ घेऊन त्याकडे पाहून तुच्छतेने म्हणतो, नक्की मनापासूनच स्वागत आहे ना?
श्री गोंधळून त्याच्याकडे पाहते तर तो तिच्याकडेच पाहून कुत्सित हसत असतो.
तेवढ्यात मॅनेजर स्वामी पुढे होऊन सर्व सावरत त्याला आत येण्याची विनंती करतात.आत येऊन मॅनेजर त्याला त्याच्या कॅबिन मध्ये नेतात. सगळ्यांची ओळख करून देतात.
सूर्या - हॅलो गायस्, मी सूर्या . सूर्या सरपोतदार. आजपासून तुम्ही तुमच्या जुन्या कंपनीत जे काही करत होता ते आता इथे चालणार नाही. बिल्डिंग जरी तीच असली तरीही मालकी आता बदलली आहे. कामाच्या वेळेत मला फक्त काम पाहिजे. त्यानंतर जे काय करायचंय ते करा. पण मला कामात कोणतीही कसूर दिसता कामा नये. ठरलेल्या वेळेत मला काम पूर्ण पाहिजे. अगोदरच्या मालकाने ज्या काही चुका केल्या त्या आता पुन्हा होणार नाहीत. या कंपनीला मी एक नवीन नाव दिले आहे पण त्या नावाला ओळखीत रूपांतर करण्यासठी मला तुमची, तुमच्या मेहनतीची गरज आहे. आय होप सो तुम्ही मला साथ नक्की द्याल. Thank you.

मॅनेजर - हो नक्कीच सर. आम्ही नक्कीच साथ देऊ.

हो सर - सर्वजण

सूर्या - Good . Now go to desk and start a new journey of our company. The Surya Enterprise. I will see you soon.

Thank you Sir.

सर्वजण जाऊ लागतात. तेवढ्यात सूर्या मॅनेजरला थांबायला सांगतो.
ते स्वागत करताना ती मुलगी कोण होती?.... तिचं नाव आठवत तो विचारतो

अच्छा ती. ती मिस शृंगार देसाई. - मॅनेजर

तिला द्या पाठवून. - सूर्या

येस सर. म्हणून तो जातो.

तो दरवाज्याकडे पाठ करून बसतो. कुत्सित हसून तो काही विचार करत असतो. तेवढ्यात...
टकटक
दरवाजा नॉक करून मे आय कम इन सर?

त्याची तंद्री भंग पावते.
तो - येस. अस बोलून तो मागे वळतो. खुर्चीला टेकून वर बघून, आयुष्यात कधी तुझ तोंड पुन्हा बघावं लागेल असा विचार केला नव्हता.
तिच्याकडे बघून, हाच विचार करत होतीस ना.... आणि आता बोलावलंय तर नक्कीच काहीतरी टोमणा मारेल. हो ना?
तिला राग येत असतो पण तस न दाखवता ती शांत होत त्याला - काही काम होत का सर?

तो - काम . हो . आता कामाशिवाय दुसरं काय बोलणार ना मी तुला. मी ऐकलंय तू दोन वर्ष झाले इथे काम करत आहेस आणि अजून काही प्रमोशन नाही काही नाही. तिथेच आहेस अजून. पे ही तेवढाच आहे.

ती - सर , तुम्हाला काय म्हणायचं आहे?

तो - (तिच्या जवळ येऊन) मी मदत करू का काही? (तिच्या चेहऱ्यावरून आपली बोट फिरवत) प्रमोशन करून देतो तुझे. फक्त मला कोऑपरेट कर.

ती रागाने त्याला मागे ढकलून ओरडते सूर्या... खबरदार पुन्हा मला हात लावशील तर....

तो- तर... ओह् राग आला का तुला? सॉरी सॉरी. पण मी तर तू जे सांगितलस तसच तर बोलतोय.

ती न कळून त्याच्याकडे पाहते.
तो असच हळूहळू तिच्याकडे जात असतो तर ती मागे मागे जात असते. केबिनच ते किती मोठं असणार. शेवटी ती काचेच्या भिंतीला टेकून थांबते. तोही ती जाऊ नये म्हणून तिच्या दोन्ही बाजूला आपले हात काचेला टेकवून थांबतो. तिला आता कुठे जाता येत नसत. तो जवळ जाऊन,
तो - अग अस काय करतेस? तूच तर नाव दिलंस ना मला. काय नाव होत बरं ते... म्म... र वरूनच होतं . पण काय होत. आह. हा आठवल. (तिच्याजवळ जात) रेपिस्ट. हेच नाव दिलं होत ना?
ती त्याच्या डोळ्यात पाहते तो त्याच्या डोळ्यांत राग दिसत असतो तिला.
तो - बरोबर बोलतोय ना मी? आणि राग का आला तुला? रेपिस्ट लोकं तर असच बोलतात ना.
आपला चेहरा तिच्या चेहरा जवळ आणत, नावाला तर
जागायला नको का? अस म्हणत तो तिच्या माने जवळ जातो. त्याचे गरम श्वास तिच्या मानेला जाणवू लागतात. तिला त्याची, त्याच्या स्पर्शाची किळस येत असते. ती लागलीच त्याला धक्का देऊन त्याला दूर करते आणि खणकन त्याच्या कानाखाली मारते. डोळ्यात जणू ज्वालामुखीच .

ती - बॉस आहेस म्हणून वाट्टेल ते खपवून घेणार नाही मी. पुन्हा असा प्रयत्न करशील तर लक्षात ठेव. अस बोलून ती निघतच असते की,

तो - थांब . तुला अजून मी जा नाही म्हणालो.तू चांगली असशील पण मी वाईट आहे. खूपच वाईट. आज हिंमत केलीस पण पुन्हा जर माझ्यावर बोट जरी उगारलस तर लक्षात ठेव खूप महागात पडेल तुला.

ती - तू मला भीती घा..

तो - माझ बोलण झालं आहे. Now... get... lost.

ती रागातच तेथून निघून जाते.
cabin पूर्ण काचेची असते . तो आतून सर्वांना पाहू शकत होता पण बाहेरचे आतील पाहू शकत नव्हते. येण्या आधी त्याने तशी केबिन बनवून घेतली होती. आणि ती केबिन वरच्या मजल्यावर होती. त्यामुळे आत जे काही झालं ते ना बाहेरच्यांना कळल ना ही काही ऐकू आलं.

(क्रमशः)