Tujhi Majhi yaari - 18 in Marathi Women Focused by vidya,s world books and stories PDF | तुझी माझी यारी - 18

Featured Books
  • You Are My Choice - 35

    "सर..."  राखी ने रॉनित को रोका। "ही इस माई ब्रदर।""ओह।" रॉनि...

  • सनातन - 3

    ...मैं दिखने में प्रौढ़ और वेशभूषा से पंडित किस्म का आदमी हूँ...

  • My Passionate Hubby - 5

    ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा॥अब आगे –लेकिन...

  • इंटरनेट वाला लव - 91

    हा हा अब जाओ और थोड़ा अच्छे से वक्त बिता लो क्यू की फिर तो त...

  • अपराध ही अपराध - भाग 6

    अध्याय 6   “ ब्रदर फिर भी 3 लाख रुपए ‘टू मच...

Categories
Share

तुझी माझी यारी - 18

केशव ला भेटून आल्यावर अंजली नेहाला केशव तिचा क्लासमेन्ट असल्याचे व केस पुन्हा रिओपन करता येऊ शकते याबद्दल सांगते .नेहा ला ही आनंद होतो.अंजली पंकज कडून सरूच्या सासरचा पत्ता विचारून घेते.. व तिथे जाऊन थोडी चौकशी करण्याचे ठरवते..अंजली जेव्हा हरीश च्या शेजाऱ्यांना त्याच्या बद्दल विचारते तेव्हा तिला कळत की त्याची वागणूक सरु बरोबर चांगली नव्हती ..तो सुरवातीपासूनच संशयी वृत्ती चा, गुंड टाईप व व्यसनी होता...अंजली जेव्हा तिथे गेली होती त्याचं वेळी सरु ची चुलत नणंद शितल कॉलेज ला निघाली होती...सरु बद्दल शितल ला आपुलकी होती..ती नेहमी सरु जवळ असायची ...आणि अंजली ही तिच्या सोबत बोलली होती फोन वर ...त्यामुळे शितल नक्की आपली काही ना काही मदत करेल अस अंजली ला वाटलं..अंजली ला शितल ला भेटायचं होत पणं त्या आधीच ती निघून गेली..अंजली ने तिच्या कॉलेज चा पत्ता शितल च्या शेजारी राहणाऱ्या एका मुली ला विचारून घेतला व दुसऱ्या दिवशी शितल ला भेटायचे ठरवले.

दुसऱ्या दिवशी अंजली शितल च्या कॉलेज समोर येऊन ती बाहेर येण्याची वाट पाहत होती..थोड्या वेळातच कॉलेज सुटलं आणि शितल आपल्या मैत्रिणीनं सोबत कॉलेज च्या गेट मधून बाहेर येऊ लागली...तेव्हा अंजली ने तिला आवाज दिला.

अंजली : शितल..

शितल ने अंजली ला ओळखलं नाही कारण तिने फक्त फोन वरती तिचा आवाज ऐकला होता आणि तिच्या सोबत तिचं बोलण ही फोन वरून च झालं होत सामोरा समोर दोघी कधी भेटल्याच नव्हत्या..त्यामुळे एक अनोळखी मुलगी आपल्या ला आवाज देते हे पाहून शितल थोडी चकित झाली.

शितल : मी ?

शितल ने स्वतः कडे बोट दाखवत विचारल ?

अंजली : हो तूच..तुझ्या सोबत मला थोड बोलायचं आहे..

शितल: सॉरी पणं..मी तुम्हाला ओळखलं नाही..

अंजली: मी तुला ओळखते व तू ही मला ओळखते..सांगते .. वेट आपण थोड बसून बोलुयात का ?

शितल ने ही मग होकारार्थी मान हलवली व आपल्या मैत्रीणीना पुढे जाण्यास सांगितले व अंजली ला घेऊन पुन्हा कॉलेज मध्ये असणाऱ्या बागे कडे वळली.तिथे दोघी ही बागेत असणाऱ्या लॉन वर बसल्या.

शितल: हा बोला ..तुम्ही मला कस ओळखता ?

अंजली : शितल ,मी अंजली..तुझ्या सरु वहिनीची बेस्ट फ्रेन्ड..

अंजली ने ओळख सांगितल्यावर शितल चा चेहरा आनंदाने फुलला..

शितल: अय्या ,अंजली दीदी तुम्ही ? सॉरी.. ह..मी तुम्हाला कधी पाहिल च नव्हत त्यामुळे ओळखू शकले नाही..पणं तुम्ही कस ओळखलं मला ? आपण तर कधीच भेटलो नाही..

अंजली : मी काल तुमच्या घरा शेजारी आले होते..तेव्हा तिथे पाहिलं तुला..शेजारी विचारल तर समजल तू शितल आहेस म्हणून तू त्यावेळी कॉलेज ला चालली होतीस...मी कालच भेटणार होते तुला पण. ..नाही झाली भेट..

शितल: अरे दीदी तुम्ही आमच्या शेजारी आला होता तर घरी तरी यायचं ना..आमच्या शेजारी कोणी ओळखीचं राहत का तुमच्या ?

अंजली : नाही...मी तिथे चौकशी साठी आले होते..

शितल थोड चकित होऊन विचारते.

शितल : कसली चौकशी दीदी..

अंजली : ते सर्व राहू दे शितल...सरु ला काय झालं होत ? ती अशी अचानक कशी काय वारली? तुला तर माहित असेल ना?

शितल अंजली च बोलणं ऐकून गोंधळून गेली...ती कावरी बावरी होऊन इकडे तिकडे पाहू लागली व गडबडून बोलली.

शितल: मी...मला ..मला काहीच माहिती नाही...मी काहीच पाहिलं नाही ...

अंजली ला तिची अवस्था पाहून समजलं की शितल ला नक्की काही ना काही माहिती आहे.

अंजली : अग इतकी का घाबरत आहेस ? मी कुठे विचारल तु काही पाहिलंस का ? सरु ला काय झालं होत इतकचं विचारल मी तर..

शितल: मी ...मी कुठे घाबरले? वहिनी ..वहिनी तर स्टो चा भडका होऊन भा...भा.. भाजली होती... तुम्हा..तुम्हाला तर समजलं च असेल ना ?

शितल बोलताना ही अडखळत होती..

पण ..तुम्ही आता हे सर्व का विचारत आहे ? इतक्या वर्षांनी ?

अंजली : कारण मला वाटतं सरु चा मृत्यू भाजल्यामुळे नाही झाला..आणि सरु च्या मृत्यू च खर कारण मी शोधून काढेन..

अंजली ने नजर रोखत शितल कडे पाहिलं...शितल आपली नजर चोरत ..उठून उभी राहीली.. व अंजली ला बोलली..

शितल: दिदी तुम्हाला काय करायचं ते करा..पणं प्लीज या पुढे मला भेटू नका...मला याबद्दल काहीच माहिती नाही..

अंजली ही शितल उठल्या बरोबर उठून उभी राहत बोलली.

अंजली : खोट बोलते आहेस शितल तू.. तुझा चेहरा साफ साफ सांगतो की तू काही तरी लपवत आहेस..

शितल : दिदी....मला उशीर होतो आहे..मी निघते आणि प्लीज मला पुन्हा भेटू नका...

शितल इतकं बोलून तिथून निघून जाते..अंजली तिला थांबवायचा प्रयत्न करते परंतु शितल अजिबात तिचं ऐकून घेत नाही.

अंजली निराश होऊन पुन्हा आपल्या रूम ला निघून येते.नेहा अंजली ला उदास झालेलं पाहून विचारते.

नेहा : अंजली ,काय झालं ? तू शितल ला भेटायला गेली होतीस ना ? काही बोलली का ती?

अंजली हताश होत बोलते.

अंजली : नाही ना..ती तर काहीच बोलत नाहीये.. उलट पुन्हा मला भेटू नका बोलली ..

नेहा ही अंजली च्या बाजूला बसत विचारते..

नेहा : मग आता काय करायचं ? काहीच हाती लागत नाहीये..

अंजली थोड विचारत हरवून पुन्हा भानावर येत बोलते.

अंजली : नेहा पणं I am sure... काही तरी नक्की गडबड आहे...शितल काही तरी लपवत आहे ..तिला नक्की काही ना काही माहिती आहे.

शितल : पणं ती तर काहीच बोलली नाही अस बोलली ना तू..मग तू हे सर्व कशा वरून बोलते आहेस ?

अंजली: अग हो नेहा मला खात्री आहे ..नक्की काही ना काही झालेलं ..शितल ला मी सरु बद्दल विचारल तेव्हा तू तिचा चेहरा पाहायला हवा होतास..किती घाबरली होती ती..

नेहा : असेल घाबरली पणं तिने जर आपली मदत नाही केली तर तू काय तिच्या चेहऱ्या वरून ओळखा अस सांगणार आहेस का जज ला?

अंजली : शट अप यार..तुला काय चेष्टा सुचत आहे ?

नेहा : अग पण आता काय करायचं ती तर हेल्प करायला रेडी च नाही तर..

अंजली : करेल ती हेल्प आपली नक्की...मी माझे प्रयत्न सोडणार नाही..

नेहा : हम्म..

शितल ला भेटल्या नंतर अंजली पुन्हा तीन चार वेळा तिच्या कॉलेज ला तिला भेटण्यासाठी पुन्हा पुन्हा गेली पणं शितल ने तिला भेटण्यास नकार दिला ..तरी ही अंजली ने आपले प्रयत्न सोडले नाही.

आज ही ती पुन्हा शितल च्या कॉलेज समोर उभी होती.शितल जशी कॉलेज बाहेर आली अंजली ने तिला आवाज दिला .

अंजली : शितल..

शितल ने आपल्या मैत्रिणी ना ..पुढे जायला सांगितलं व ती अंजली कडे आली .

शितल : दिदी प्लीज , पाया पडते मी तुमच्या...माझ्या दादा ला जर तुमच्या बद्दल समजलं आणि मी तुम्हाला भेटते हे कळलं तर तो माझं कॉलेज ही बंद करेल..तुम्ही नाही ओळखत माझ्या भावाला ...माझा पिच्छा सोडा...मी तुम्हाला काहीच हेल्प करू शकत नाही..

अंजली : शितल ,मला माहित आहे ..तुला नक्की सत्य माहित आहे..सरु वर तुझा ही जीव होता ना? तिला न्याय मिळावा अस तुला नाही का वाटत ?

शितल : हो ..वहिनी ला मी माझ्या मोठ्या बहिणी प्रमाणे मनात होते ..परंतु मी तुमची काहीच हेल्प नाही करू शकत .....प्लीज तुम्ही मला या सर्वात ओढू नका.

शितल इतकं बोलून पुन्हा निघून गेली.अंजली आज ही हताश पने परत आली.केशव च्या ही केस च काम झालं होत.त्याने अंजली ला फोन करून काही माहिती मिळाली का याबद्दल विचारल तेव्हा तिने शितल बद्दल केशव ला सांगितले.केशव ने ही शितल ला आपण समजावू अस अंजली ला आश्वासन दिले.

क्रमशः