Mitranche Anathashram - 7 in Marathi Drama by Durgesh Borse books and stories PDF | मित्रांचे अनाथाश्रम - भाग ७

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

Categories
Share

मित्रांचे अनाथाश्रम - भाग ७



"काय ?", असे बोलून मी उभाच राहिलो,
सर्वजण माझ्याकडेच बघत होते.
संजय, "मलाही असच धक्का त्या दिवशी बसला"
दरवाजा वाजला, संजय ची आई आणि काकू जेवण घेऊन आल्या होत्या. काकू आम्या जवळ जाऊन बसल्या. त्याच्या तब्येतीची चौकशी करू लागल्या. संजयच्या आई जेवणाची तयारी करत होत्या. मी आणि विवेक ने घरी जाण्याचं ठरवलं होत, आता आम्या सुध्दा ठीक झाला होता. दोन दिवस झाले घरी वेळ दिला नाही. सर्वांना सांगून मी आणि विवेक दोघेही बाहेर पडलो.
मध्येच विवेक, "मला पण आत्ताच समजले"
मी, "काय समजले"
विवेक, "संजय संध्यावर प्रेम करतो ते"
मी, "म्हणजे तुला नव्हतं माहिती"
विवेक, "नाही, पण..."
मला कुणीतरी मागून आवाज दिल्याचा भास झाला, मी वळून पाहिले तर कुणीच नव्हतं.
मी, "मग तुझा काय विचार आहे, तुला पण ती आवडते की काय ?"
विवेक, "आम्ही खुप चांगले मित्र आहोत लहानपणापासून"
मी, "लहानपणापासून ? म्हणजे"
विवेक, "हो, तु पण ओळखतो तिला"
मी, "कसं शक्य आहे, मी विसरत नसतो कुणाला"
विवेक, "तेव्हाची परिस्थिती वेगळी होती पण आताची वेगळी आहे. आपण लहान होतो तेव्हा एकदा एका मुलीला दगड मारला होता, ती संध्या होती"
मी, "हो, तिला माई की माऊ असे काहीतरी बोलत होते, पण तेव्हा ती बोलायची. नंतर असे काय झाले"
विवेक, "तु आहे म्हणून तुला सांगतो, तु कुणालाच सांगू नको"
विवेक ने गोष्ट सांगायला सुरुवात केली,
तुला आठवत असेल आपण एकाच शाळेत होतो, तु काही वर्षांनी घर बदलले आणि दुसरीकडे राहायला गेला. आम्ही लहानपणापासून जवळचे मित्र होतो, तुझ्या आधी ती माझी मैत्रीण होती. सातवी पर्यंत वेगवेगळ्या वर्गात होतो. नंतर त्यांनी घर बदलले आणि आमच्यातील अंतर वाढत गेले. आठवी पासुन आम्ही एकाच वर्गात होतो. पण बोलण आता खुप कमी झालं होत. मी माझी चांगली मैत्रीण गमावली होती. बघता बघता आम्ही दहावीला गेलो.
एके दिवशी ती शाळेत आलीच नाही. दोन दिवस झाले, तीन, चार, एक आठवडा ती आली नाही. सहजासहजी सुट्टी घेणारी ती नाहीच आणि ते पण एक आठवडा. रात्री अभ्यास करून मी झोपणार होतो तेवढ्यात माझ्या कानावर कुणीतरी बोलण्याचा आवाज आला. मी नीट लक्ष देऊन ऐकले तर तो बाबांचा आवाज होता, "कशी आहे आता ती"
आई, "हो, ठीक आहे पण तिला बोलता येत नाही आता"
बाबा, "त्याला लाज नाही वाटली का ?"
आई, "हो ना, काय अवस्था करून ठेवली सोन्यासारख्या पोरीची"
बाबा, "त्याला पोलिस घेऊन गेले आणि ती दवाखान्यात आहे"
मला इतकेच ऐकू आले, त्यानंतर मी सकाळी उठून आईला विचारले, "आई, माऊ आठ दिवस झाले शाळेत येत नाही, काय झालं तिला"
आई, "अरे तिची तब्येत ठीक नाही"
मी, "काय झाले तिला"
आई, "काही नाही"
मी, "मग तू आणि बाबा रात्री कुणाबद्दल बोलत होते"
आई, "तु जास्त मोठा झाला का, आमचं बोलणं लपून ऐकतो, जा शाळेची तयारी कर"
त्यानंतर आईला संध्याबद्दल काही विचारायची हिम्मत झाली नाही. शाळेत मित्रांकडून समजले की संध्याच्या बाबांना अटक झाली. संध्या आणि तिची आई आता मामाकडे राहायला गेले. संध्या शाळेत येणार नव्हती आणि ती सरळ दहावीचे पेपर देणार आहे. एका आठवड्यात संध्याचे परिवार पार उध्वस्त झाले पण कसे ते मला समजले नाही. दहावीच्या पेपरच्या वेळी ती मला कधी दिसली नाही. अश्या प्रकारे शाळा आणि शाळेतली जवळची मैत्रीण एकाच झटक्यात दूर गेले.
दहावीला चांगले मार्क्स मिळाले आणि मी सिटी कॉलेजला सायन्सला ऍडमिशन घेतले. तिथे पहिल्याच दिवशी वर्गात संध्या दिसली. मी लेक्चर संपल्यावर बोलण्याचा प्रयत्न केला पण ती माझ्यापासून लांब निघून जायची. नंतर मी तिला वेळ देण्याचे ठरवले. खुप दिवसांनी मला ती पार्किंग मध्ये दिसली. मी तिला बोलण्यासाठी आवाज दिला. पण तिला माझ्याशी बोलायचं नव्हतं हे तिच्या वागण्यावरून दिसत होत कारण तिने पुढे जाऊन एका गाडीला धडक दिली. दुसऱ्या दिवशी मी पुन्हा प्रयत्न केला पण तिची एक मैत्रीण बोलली, "तुझ्या घरी आई बहिणी नाहीत का ?"
मी, "आई आणि बहिण आहे पण माऊ नाही ना, माझी सर्वात जवळची मैत्रीण"
त्यानंतर संध्याच्या चेहऱ्यावर मी वेगळ्याच प्रकारचा आनंद पाहिला. तेव्हा समजले की ती माझ्यापासून पळत नव्हती. फक्त तिला मी दुसरा कुणी असेल असा गैरसमज झाला असेल म्हणून ओळख देत नसणार. तिला विचारले मी, "काय इतक्या दिवस कुठे होती"
तिचा चेहरा गंभीर झाला, मला माहिती होत ती आता निघून जाणार म्हणुन मी तिला आधीपासून कागदावर लिहून ठेवलेला माझा नंबर दिला. झाले तेच, ती खुप जोरात गाडी चालून गेली आणि एका गाडीला धडक दिली अर्थात काल आणि आज संध्याने संजयच्या गाडीला धडक मारली. हो, तो संजय होता. रात्री मला अनोळखी नंबर वरून मेसेज आला "मी माऊ आहे". मी लगेच त्या नंबर वर कॉल केला. तिकडून थोड्या वेळासाठी काहीच ऐकू आले नाही, नंतर कोणत्यातरी मुलाचा आवाज आला, "हॅलो"
मी, "कोण आहे"
फोनवरून, "संजय पाटील ..."
पुढे काय झाले हे तुला माहिती आहे. रात्री पुन्हा एकदा ती बरोबर पोहचली की नाही हे विचारायला फोन केला तर समोरून मुलीचा आवाज आला, "हॅलो"
मी, "कोण आहे ?"
फोनवरून, "आई बहीण विचारणारी"
मी, "माऊच्या आपण कोण"
फोनवरून, "मी निशा, तुमच्या माऊची रूममेट"
मी, "आता कशी आहे ती, बरोबर आली ना"
निशा, "हो, कुणीतरी मुलगा आला होता"
मी, "तिला नक्की काय झालं आहे हे सांगणार का?"
निशा, "आधी आपण कोण ते सांगा मला"
त्यानंतर मी माझी आणि संध्या ची ओळख कशी होती, आमची लहान असताना ची मैत्री, सर्व काही सांगितले. त्या रात्री मी आणि निशा दोन ते तीन तास बोललो. निशाने मला संध्याबरोबर नक्की काय झाले ते सांगितले. तिच्या परिवाराला उध्वस्त करणारी घटना ऐकून मला तिची जितकी दया आली तितकाच राग सुध्दा येत होता. निशा मला बोलली, "उद्या काही करतो आहे का ?"
मी, "कॉलेज त्यानंतर काही नाही"
निशा, "मग संध्याला डॉक्टर कडे घेऊन जाणार का, मला दुसरं काम आहे"
मी, "हो, चालेल ना"
दुसऱ्या दिवशी डॉक्टर कडे गेल्यावर मी आणि संध्या नंबर लावून बसलो होतो. पण तितक्यात मला फोन आला, मी जास्त वेळ बोलत बसलो फोनवर तोपर्यंत संध्या डॉक्टरला भेटून आली होती. मी दिलेले औषध घ्यायला गेलो तर तिथे मला आम्या भेटला. कॉलेजला जेव्हा संध्या ने गाडी ठोकली तेव्हा आम्याला पाहिले होते म्हणून मीच ओळख काढली तो त्याच्या लहान भावाला घेऊन आला होता, बंटीला. त्यापुढे तुला माहिती आहे.
सर्व घटना विवेकने सांगितली तो पर्यंत विवेकच घर जवळ आले. मी त्याला तिथे सोडून माझ्या घरी गेलो. पुन्हा रात्री झोपायला हॉस्पिटल ला जायचं म्हणून मी जेवण करून आराम करणार होतो. पण संध्यावरोबर काय घडलं असेल याचं प्रश्नात झोप आली नाही. रात्री विवेक चा कॉल आला आणि मी त्याच्याकडे गेलो. दोघेही रस्त्याने हॉस्पिटलच्या दिशेने निघालो. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होत म्हणून मी विवेकला विचारलं, "निशाने त्या रात्री तुला काय सांगितले"
विवेक, "तुला नक्की ऐकायचं आहे का, कारण तुझ्यासारख्या हळव्या मुलाला सहन होणार नाही म्हणून मी तुला सकाळी बोललो नाही"
मी, "मला झोप आली नाही सांग तु, आता मी बदल केले खुप"
निशाने विवेकला सांगितलेली गोष्ट आता विवेकने मला सांगायला सुरुवात केली.
पहिल्या दिवशी संध्या शाळेत आली नाही, त्याच्या आधीच्या दिवशी संध्याकाळी,

क्रमशः