कादंबरी – प्रेमाची जादू
भाग- ३१ वा
--------------------------------------------------------
केबिनमध्ये बसून यशला “यशसाहेब “ या रोल मध्ये बसवत नसे , इतर मेकेनिकच्या सोबत
ड्रेस घालून ..मशीनमध्ये डोके खुपसून बसण्यास यश नेहमीच आतुर असतो “. ही गोष्ट गैरेज
मधील कामगारांना , तिथे दुरुस्तीसाठी आपली वाहने घेऊन येणार्या कस्टमरना सुद्धा माहितीची होती.
चौधरीकाका म्हणयचे ..
जेव्हा स्वतहा मालक ..सामान्य कामगार होऊन बरोबरीने काम करू लागतो “ याचे दोन फायदे होतात ..
पहिला फायदा म्हणजे –
आपल्यावाचून याचे काहीच काम अडू शकत नाही याची जाणीव “सोबतच्या आणि हाताखाली काम करणार्यांना होणे ..
दुसरा फायदा म्हणजे
–मालक आणि नोकर यांचे संबंध तणावाचे रहात नाहीत ,सोबतच काम केल्याने ,..समजून घेण्याची लेव्हल नक्कीच असते .
रोजच्या प्रमाणे यश नुकताच शोरूमला आलेला होता ..त्याच्या केबिनमध्ये बसून गेल्या महिन्यातले सगळे
हिशेब नजरेखालून घालत होता . चौधरीकाकांचे तसे तर सगळ्याचं ठिकाणी बारीक लक्ष असते,
त्यमुळे कुठे काही बदल दिसू लागला ,जाणवू लागला तर ते लगेच यशच्या नजरेत या गोष्टी
आणून देतात .त्यामुळे यश स्वतहा पुन्हा त्यात जास्त डोके लावत नाही.
या आकडेमोडीत जास्त लक्ष देण्यापेक्षा , मागे गैरेज मध्ये जाऊन ..एखादी खूप बिघडलेली कार
किंवा इतरांच्या दृष्टीने भंगार होऊन पडलेली बाईक ..सुरु करण्यात त्याला जास्त इंटरेस्ट .
असे असले तरी इतका मोठा कारभार ,व्यवसाय कसा चालू आहे ? हे तर पाहणे गरजेचे आहे ,
आणि तू तसे केले पाहिजे “असे त्याला घरून पण सतत सुचना मिळत असतात , यात थोडी सुद्धा
ढिलाई झालेली आई-बाबा ,सुधीरभाऊ यांना चालत नाही. ते यशला चार शब्द समजावत आणि योग्य
शब्दात त्याची कान –उघाडनी करून चांगले सुनावतात सुद्धा . चौधरीकाका नियमितपणे सगळ्या
गोष्टी मोठ्या माणसांच्या कानावर घालतात ..हे यशला माहिती होते .
त्यामुळे आठवड्याला एकदा .. सगळे व्यवहार तो नजरेखालून घालीत असतो ..या कामाच्या वेळी त्याच्या
सोबत चौधरीकाका असतात , ते म्हणाले ..
यश आता या कामात मधुरा पण आपल्या सोबत असू दे ,तिला सगळ्या कामाची माहिती असायला हवी “
अशी सूचना खुद्द चौधरीकाकांनी केली ,तेव्हापासून ..तिघेजण बसून सगळे व्यवहार चेक करीत
हे काम करतांना यशला मधुरची एक गोष्ट- एक सवय खूप जाणवली ..
ती अतिशय बारकाईने कागदंपत्र , पत्रव्यवहार , रोखीचे आणि क्रेडीटवरचे व्यवहार बघते .
सगळे बील , अतिशय काळजीपूर्वक फाईलिंग करीत असते ..त्यावेळीच तिच्या नजरेने या व्यवहारातील
खाचा खोचा टिपलेल्या असतात .
आणि मधुराने गेल्या महिन्यातील काही क्रेडीट बिलं आणि नंतर पेमेंट झालेली ही बिलं
या दोन्ही फाईल यश आणि चौधरीकाकांच्या समोर ठेवीत म्हटले ...
आपल्याला रेकॉर्ड्स वर असलेल्या बिलांच्या आणि पेमेंट केलेल्या बिलांच्या रकमेत फरक आहे ..
आणि यातील खरेदी केलेल्या वस्तूंच्या किमती मध्ये फरक आहे ..
हा फरक म्हटले तर किरकोळ आहे..पण सगळी
बिलं एकत्र करून हिशेब केला तर ..मात्र ही राक्म वर्षा अखेर बरीच मोठी असेल .
हे लक्षात घेतलेतर .आता पासूनच याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
ती यशला आणि चौधरी काकांना काही फायली दाखवत म्हणाली –
यातील अनेक नोंदी मला शंकास्पद वाटत आहेत , काहीतरी चलाखी केलेली आहे , हुशारीने हे चालू आहे
माझ्या मते निदान सहा महिन्या पासून तरी नक्कीच ..यातले पहिले तीन महिने सोडले तर ..
गेल्या दोन महिन्या पासून तर हे सगळे रेकॉर्ड्स मीच सांभाळते आहे.
माझ्या पाहण्यात जाणवलेली गोष्ट मी आज तुम्हाला सांगणे गरजचे म्हणून आवश्यक आहे..
यश म्हणाला –
मधुरा – तू देखील या ऑफिसची एक जबाबदार अशी कर्मचारी आहेस.. तुझ्या शंका तू मोकळ्या मनाने
आमच्या समोर बोलून दाखवणे योग्य आहे. तुझे म्हणणे आम्ही ऐकून घेऊन मग यावर योग्य
कारवाईचे पाउल उचलू .
मधुरा सांगू लागली -
सगळे रोख व्यवहार चोख होतात हे ठीक आहे , पण, क्रेडिटवर अनेक वेळा अनेक व्यवहार केले जातात ,
त्यातले अनेक व्यवहारा बद्दल मला संशय येतो आहे .
मला माहिती आहे ,ही जबाबदारी विश्वासू आणि अनुभवी माणसावर ही कामे सोपवली जातात ..
तरी पण पुरेशी सावधानता बाळगून याबद्दल चौकशी कराई असे मला वाटते.
चौधरीकाका म्हणाले – यश ,ही बाब खूप गंभीर आहे.
मधुराने जी गोष्ट आपल्या निदर्शनास आणली आहे ..त्याकडे दुर्लक्ष करून
चालणार नाहीये ..पण..एक करावे लागेल आपल्याला, ते म्हणजे –
आपल्याकडे पहिल्यापासून काम करणाऱ्या अशा जुन्या –विश्वासू नारायणकाकांवर या सर्व क्रेडीट
व्यवहाराची जबादारी सोपवलेली आहे आणि त्यांनी आपल्यावरच्या विश्वासाला कधी तडा जाऊ दिलेला
नाही ..मग आताच असे नेमके काय होते आहे ? हे शोधावेच लागेल आपल्याला .
या सगळ्या व्यवहाराची आपण चौकशी करतोय “ हे नारायणकाकांना कळता कामा नये “
समजा यातून दुसरेच काही निष्पन्न झाले तर ? मग मात्र
आपला विश्वासू माणूस दुखावला जाणे “हे बरोबर होणार नाहीये..
हे मात्र लक्षात असू दे तुझ्या यश .
काका – तुम्ही काळजी नका करू , मी सगळं काही काळजीपूर्वक करीन .मला आपली माणसे
दुखवायची नाहीत, गमवायची नाहीत ..पण, नेमकं काय घडते आहे ? याचे उत्तर तर मिळाले पाहिजे .
मधुराकडे पाहत यश म्हणाला – मधुरा , एक तर अशा गोष्टी आपल्याकडे
पहिल्यांदा आपल्याकडे घडत आहेत , कदाचित अगोदरपासून घडत असतील ,याचे कारण एकच की -
इतक्या बारकाईने हे व्यवहार कधी पाहावे असे वाटले नाहीये ..
कारण ..नारायणकाका यांच्याबद्दल शंका येउच शकणार नाही,
इतका विश्वास त्यांनी कमावलेला आहे , मीच काय आपली सगळी बिझनेस लाईन ..नारायणकाकांना
एक प्रामाणिक माणूस म्हणूनच ओळखते .”
यशचे ऐकून घेत मधुरा म्हणाली –
पण..ही बिलं ती सुद्धा काही तरी सांगतच आहेत , ती खरी नाहीत ..हे उघड्या डोळ्यांनी दिसणारी गोष्ट आहे.
आणि मी कुठे म्हणते आहे की या सगळ्या गोष्टी नारायणकाकानी केल्या आहेत ?
त्यांना मी कशी काय “आरोपी “ ठरवणार आहे . ?
मी माझे कर्तव्य म्हणून तुम्हा दोघांना माझा रिपोर्ट देते आहे.
मधुरा आणि चौधरीकाका आपापल्या कामाला लागले , यश त्याच्यासमोर मधुराने ठेवलेल्या फाय्लीकडे ,
त्यातील कागदपत्रांकडे , पेमेंट झालेल्या बिलाकडे पाहत होता . हा गैरव्यवहार ..नारायणकाकांनी केला असेल ?
त्याचे मन अजूनही या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार होत नव्हते . मग, काय असेल यातले रहस्य ?
त्याने मधुराला पुन्हा आत बोलावले ..आणि म्हणाला
पेमेंट झालेली जी जी बिलं तुला संशयास्पद वाटत आहेत , त्यांच्या झेरोक्स कोपी मागवून घे,
आणि त्याची एक स्वतंत्र फाईल तयार करून माझ्याकडे दे , लंच झाला की मी मार्केट मध्ये जाऊन येतो .
बघू या ..कोण आहे या सगळ्या मागे .
यश वर्कशोप मध्ये गेला ..सगळीकडे त्याने पाहिले ..प्रत्येकाच्या हातावर काहीना काही
काम चालू होते ... यात फक्त नारायणकाका नाहीत असे दिसले . रोजच्या प्रमाणे सकाळी तर ते आलेले यशने पाहिले होते ,
कामावर हजरी लागली होती त्यांची . मग ऐन कामाच्या वेळी ..हातावरचे काम सोडून
नारायणकाका कुठे गेलेत ?
त्याने इतर लेबरंना विचारले ..तर ते म्हणाले ..
जातांना काका म्हणत होते -
जरा प्रोब्लेम झालाय , जाऊन येतो ..तो पर्यंत घ्या जरा सांभाळून ..!
यश म्हणाला – तसे असेल तर ठीक आहे , पण झालं तरी काय ? तुम्हाला काही कल्पना ?
एक जण म्हणाला ..
नारायणकाका गेले चार –सहा महिने जरा जास्तच प्रोब्लेम मध्ये आहेत .. त्यांचा भाचा ..बहिणीचा
मुलगा ..जो आता त्यांचा जावई झालाय ..काही काम धंदा करीत नाही ..पण..उलटे –पालटे धंदे करून
ठेवतो , राडा घालतो ..तो निस्तरण्यासाठी ..आपले बिचारे नारायणकाका हातातले काम सोडून धावत जातात ..
हे ऐकून ..यशच्या डोक्यात ..लक्ख प्रकश पडला ..
आपल्या नारायणकाकांचा हा दिवटा जावाई, यानेच तर केला नसेल ना ..आपल्या ऑफिसमध्ये घोळ ?
कारण सगळ्यांच्या विश्वासाचा गैरफायदा हा भुरटा इसम सहज घेऊ शकतो . या माणसाच्या मागे
लागले पाहिजे ,नक्कीच काही धागे दोरे आपल्या हाती लागतील.
विचारांचे ओझे हलके झाले आणि यश पुन्हा ऑफिसात येऊन बसला . मग नंतरचा वेळ रुटीन कामात
कधी सरला समजले नाही. यश केबिनच्या बाहेर आला .कामे आटोपून स्टाफ घरी जायच्या तयारीत होता .
चौधरी काकांच्या टेबला जवळ उभे राहत तो म्हणला ..
काका..मधुराला मी बाहेर घेऊन जाऊ शकतो का ? तिची स्कुटी ऑफिसमध्ये ठेवून देऊ या .
मी सोडतो तिला घरी . चालेल न ?
मधुराच्या कानावर हे सारे शब्द पडत होते ..पण मान वर करून तिने पाहिलेच नाही.
चौधरीकाका म्हणाले –
यश , मला काय हरकत असणार आहे तुम्ही मिळून बाहेर जाण्याला ..
फक्त एक काळजी घ्या ..आजकाल दिवस फार वाईट आहेत..
दोघेच दोघे ..निर्जन परिसरात जाऊ नका .
एखाद्या मवाली टोळक्याने तुम्हाला दोघांना आडवले तर मोठा कठीण प्रसंग उद्भवेल .
उत्साहाच्या भरात या गोष्टीचे भान ठेवा ..सांभाळून जा..सांभाळून या.
रात्रीच्या वेळी फार उशीर करू नका रे पोरांनो.
यशच्या फेवरेट बाईकवर जोडी निघाली .. मधुरा थोडेसे अंतर ठेवूनच बसली आहे .
.हे जाणवून यश नाराजीच्या स्वरात म्हणाला ..
हे काय मधुरा ..हातभार दूर बसायला हे काय ऑफिस आहे?
बाईकच्या मागे बसलेली मुलगी अशी कोसभर अंतर ठेवून बसलेली पाहून ..काय वाटेल बघणार्यांना ?
मधुरा म्हणाली – यश ..
तुला काय वाटले ..तुझ्या सोबत मागे बसल्यावर तुला घट्ट मिठी मारून बसावे “ असे मला वाटत नसेल का ?
अरे राजा ..तुला हवे ते स्पर्श सुख द्यावे..यासाठी मी देखील अधीर झालेली असते ..पण, काय करू ,
सिटीमध्ये कोणत्याही रस्त्याने जा , सगळ्यांच्या नजरा ..आपल्या दोघांवर असतील ..आणि तुला
माझे बिलगून बसलेले पाहणे ..कुणाला आवडणार नाही.. याची मला खात्री आहे ..
कारण ..चार चौघात आपण असे थिल्लरपाने वागणार नाही “ अशी त्यांना खात्री असते . हा भल्या
घरचा मुलगा ..रस्त्याने जातांना असे नक्कीच वागणार नाही.. त्यंना तुझे आई-बाबा ही मोठी माणसे
आठवत असतात .
त्या ऐवजी आपण छान एक राईड करून येऊ ..मोकळ्या हवेत छान फ्रेश वाटेल ..
आणि मग ..मला घरी सोडशील
तेव्हा ..आपण दोघे गच्चीवर जाऊ थोडा वेळ ..
तिथे..मीच देते ना तुला ..गोड गोड ..तुझे मन भरे पर्यंत घे राजा ..!
पण असे लोकांच्या समोर असे काही करायला लावू नकोस मला .
आपल्या प्रेमाचे प्रदर्शन करणे मला पटत नाही ..ते मान्य पण नाही.
यश ..तू समजून घेशील न तुझ्या मधुराला ?
यश तिच्याकडे पाहत म्हणाला ..ओके डियर ..
आता गच्चीवरच बोलेन मी काय ते ..
यशच्या खांद्यावरचा हात अधिक घट्ट ठेवीत मधुरा म्हणाली ..
मग चल ना लवकर ..घरी ....!
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
बाकी पुढच्या भागात
भाग -३२ वा लवकरच येतो आहे.
------------------------------------------------------------------
कादंबरी – प्रेमाची जादू .
ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.
9850177342
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------