कादंबरी –प्रेमाची जादू
भाग- ३० वा
------------------------------------------------------------------------------
१.
चौधरीकाकांच्या घरी झालेली ती पार्टी ..यशला एक स्वप्न वाटत होते ..पंधरा दिवस होऊन गेले होते ..
सगळ्यांच्या भेटीला ..पण त्याचे मन अजूनही हवेत तरंगल्यासारखे ,जणू जमिनीवर येण्यास
तयार नव्हते .
चौधरीकाकांनी ..हे सगळे करणे “ हे उगीच्या उगीच नाहीये “,अशी शंका यशच्या
मनात सारखी येत होती .
.कारण ..
आपल्या घरातील सगळेजण , आपली मित्रमंडळी ,एकाचवेळी एकत्र येणे ,
सगळ्यांच्या जेवणाचा खटाटोप ,त्या नंतरची ..गाण्याची मैफिल ..
या सगळ्याच्या उद्देश ..मधुरा ‘सगळ्यांच्या समोर यावी हाच होता का . ?
आजी-आजोबांना तर मधुरा कशी आहे ? हे नव्याने सांगावे असे काही नव्हते ..
मग..आपल्या आई-बाबांना , अंजलीवाहिनी आणि सुधीरभाऊ या दोघांना ,आणि स्वतःला आपल्याला
आपल्या मित्रांना ..मधुरा –विविध गुण दर्शन “ घडवावे “
ही आजी-आजोबांची इच्छा ..ही पार्टी करून चौधरी काका –आणि काकूंनी पूर्ण केली काय ?
असाच हेतू असेल तर ..आजी-आजोबांचा प्लैन सक्सेसफुल झाला असेच म्हणावे लागेल ..
कारण ..चौधरीकाकांच्या घरी झालेल्या त्या दिवशीच्या कार्यक्रमात सगळ्यांना ..मधुरा .अनेक रुपात
दिसली , तिच्यातले गुण सर्वांना जाणवले ..
एका अर्थांने ती आली “,तिने पाहिले “- तिने जिंकले “
असेच म्हणावे लागेल .
हे तर सगळ्यांच्या अवस्थेबद्दलचे ,
आपली स्वतःची अवस्था त्या दिवसापासून कशी झाली आहे ?
हे तर फक्त मधुराला माहिती आहे ..
कारण तिनेच पुढाकार घेऊन ..आपल्या दोघातील प्रेमाला ..होकार दिलाय ..
चांदण्या रात्रीतील तिचा निकटचा सहवास ,तिच्या मिठीचा मुलायम अनुभव ..
तिच्या चुंबनाची नशा ...!
“हे सुंदर स्वप्न कधीच संपू नये “वाटत होते..........
पण , असे कसे होईल ?
माणसाच्या मनातल्या स्वप्नाना जमिनीवर आणण्याचे काम वास्तव -वर्तमान करीत असते ..
स्वप्नात रंगलेले यशचे मन भानावर यायचे . आणि जमिनीला पाय टेकले की मग तो
रोजच्या सवयीने कामात स्वतःला झोकून देई.
मधुरा-प्रेमाच्या आठवणी जणू मनाच्या एका कप्प्यात कुलूप बंद करून ठेवीत असे.
यशची अशी अवस्था होती
..तर मधुराची मन:स्थिती काही याहून काही फारशी वेगळी होती ,
असे अजिबात नव्हते ..
ती देखील मनाने अजून ही ,,त्या रात्रीच्या चांदण्यात .. यशच्या मिठीतले सुख अनुभवत होती .
त्याच्या शब्दातून ..लव्ह यु मधुरा ..!
ऐकण्याची तिची आतुरता त्या अविस्मरणीय दिवशी पूर्ण झाली .
त्यानंतरच्या काही दिवसापासून ऑफिसमध्ये आलेली मधुरा ....
यशला आवडते म्हणून ..आता बहुतेक दिवशी साडीत येत असते
तिला सुंदर अशा साडीत आलेली पाहून यशच्या नजरेतील भाव , चेहेर्यावर दिसणारा आनंद ..
हे पाहून मधुराच्या चेहेर्यावर एक वेगळा आनंद दिसतो .
अपान सतत यशच्या नजरेसमोर राहावे असा तिचा प्रयत्न असतो “
हे चोधरीकाकांना जाणवले ..कारण ...
या दोघांच्या मनातील भावनांची कल्पना त्यांना आलेली होती ..”
त्यांची ही अवस्था चौधरीकाकांच्या अनुभवी नजरेतून अजिबात सुटली नव्हती .
एका अर्थाने ..हे त्यांच्या मनासारखेच घडण्याची सुरुवात होती .
त्यामुळे ..एक दिवस त्यांनी ..मधुराला म्हटले ..
मधुरा ..आपल्या घरी काय झाले आहे..त्याची कल्पना आहे मला,
पण एक लक्षात ठेव नेहमी ..
इथे ऑफिस मध्ये सध्या तू एक कर्मचारी आहेस ..ही मर्यादा सांभाळली पाहिजेस .
तुझ्या मनातले ..काही ही .. तुझ्या ऑफिसातल्या कामात , ऑफिसात वावरतांना
कुणाला कधीच जाणवणार नाही “याची काळजी घेशील .
चौधरीकाकांच्या या स्पष्ट बोलण्याचे मधुराला मनातून खूप छान वाटले ..पण तसे न दाखवता
ती म्हणाली ..
माझ्या मर्यादेत राहीन मी .काका ,.
तुम्ही नका काळजी करू .
चौधरीकाका म्हणाले ..
मधुरा – तुला तर माहिती आहेच
..यशच्या आजी-आजोबांची इच्छा आहे ..
म्हणून यशच्या मनात तुझ्यासाठी खास जागा निर्माण व्हावी ..यासाठी मी प्रयत्न केले ..
तेव्हा माझ्या लक्षात आले
तुझ्या मनात तर आधीपासूनच यश विषयी विशेष भावना आहेत “..
पण मधुरा ..सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडतील याचा काही भरवसा नसतो ..
नशीब आणि नियती ..मेहरबान असतील तर सगळ्या गोष्टी अनुकूल .
.आणि नसतील तर
हाता –तोंडाशी आलेला घास निसटून जात असतो “..
म्हणून सगळे व्यवस्थित घडेपर्यंत .
.मनावर कंट्रोल करीत राहायचे आणि वागायचे.
मधुरा त्यांना म्हणाली..
मी प्रोमीस करते तुम्हाला ..माझ्या वागण्याने ..तुम्हाला ,
आणि आजी-आजोबांना माझ्यामुळे कधीच कमीपणा येणार नाही .
चौधरी काका म्हणाले ..मधुरा ..देव तुझं भले करो ...!
--------------------------------------------------------------------------------
२.
येणाऱ्या नव्या दिवसांना यश आणि मधुराच्या प्रेमाचे पंखच लाभले होते की काय ?
असे छान दिवस येत होते आणि जात होते .
.मधुराच्या दीदीला चौधरी काकांनी एकदिवस घरी बोलवून घेत ..
सध्या यश आणि मधुराच्या बद्दल काय घडू पाहते आहे याची कल्पना दिली .
दीदीने समोर बसलेल्या मधुराकडे पाहत म्हटले ..
चौधरीकाका ..
आजी-आजोबांनी त्यांच्या लाडक्या नातवासाठी ..आमची मधुरा ..कधी पासूनची पक्की ठरवून
ठेवली आहे. हे मला माहिती आहे .
गावाकडे आमच्या दोन परिवारातील प्रेमाचे –जिव्हाळ्याचे सबंध जर अजून नव्या पिढीतील
नात्याने नव्याने अधिक घट्ट होणार असतील तर..सर्वांना आनंद देणारी गोष्ट आहे ही.
इतके दिवस आम्हाला भीती एकाच गोष्टीची वाटत असे ..ती म्हणजे ..
यशचे आई-बाबा दोघेही खूप मोठ्या व्यक्ती आहेत , तर अंजली वाहिनी आणि सुधीरभाऊ
हे नव्या पिढीतील हाय –प्रोफाईल फील्ड मधले ..आणि
यशचा स्वतःचा मोठा बिझीनीस ..तो देखील पैसेवाला आहे..
मानाने आणि पैशाने ..दोन्हीने श्रीमंत असलेली ही फैमिली ..
त्यांच्या तुलनेत ..
माझे आई-बाबा दोघे ही साधारण , मी सामान्य फमिली असलेली , आणि ही मधुरा ..
आपल्यासाठी कितीही रूपवती ..गुणवती असो ..
या सर्वांच्या तुलनेत एक सो.सो.. मुलगी. हे सत्य नाकारून कसे चालेल ?
या सगळ्या प्रतिकूल गोष्टीत आशेचा आधार एकाच ..
यशच्या आजी-आजोबांचा मधुर विषयी वाटणारा निर्मल स्वच्छ -आपलेपणा ...
चौधारीकाका ..मी एक दीदी म्हणून .मधुरा .इथे आल्यावर तिला पुरेसा आधार देऊ शकले नाही ,
तो आता तुम्ही आणि काकूंनी दिला आहे.
मधुराने मला इथे झालेल्या कार्यक्रमा बद्दल सांगितले ..ऐकून मला आनंद झाला ..
यशच्या फामिलीबद्दल तुमच्या मनात खूप आदराची भावना आहे..
ते कशामुळे ? कधी पासूनची आहे ? हे सारे काही मधुराने मला मागेच सांगितले आहे.
चौधरीकाका दीदीला म्हणाले –
यश आणि मधुरा ..यांची जोडी जमावी ..असे आजी-आजोबांना वाटते हे खरे ..
तसे ते ..यशच्या आई-बाबांना , सुधीरभाऊ यांना वाटले पाहिजे ..
कारण ..मधुरा एक छान मुलगी आहे “असे म्हणणे वेगळे ..
पण ..त्यांच्या एव्हढ्या मोठ्या नामंकित घरात ती “सुनबाई “म्हणून यावी “
असे त्यांना वाटले पाहिजे ..
तसे होई पर्यंत ..आपल्याला वाट पहायला लागेल.
आणि आता प्रश्न आहे तो यशच्या मनाचा ..
त्याला मधुरा आवडते आहे “ ही गोष्ट आता लपून राहिलेली नाहीये . मधुरा विषयी असणारी
भावना .. त्याचे मधुरावर असलेले प्रेम आहे “ हे त्याने मधुरा जवळ कबुल केले आहे.
इथपर्यंत सगळं ठीक आहे.. पण माझ्यामते ही फक्त एक बाजू झाली..
जी आपल्याला खूप अनुकूल आहे “असे समाधान देणारी आहे.
मला आणखी एक शंका आहे मधुरा ?
चौधरीकाकांची शंका ऐकून ..
मधुरा आणि तिच्या दिदींनी एकाच वेळी म्हटले ..
काका –आता कशाची भीती वाटते ? कोणती शंका आहे तुमच्या मनात ?
ते म्हणाले - हे बघा मुलींनो –
यशच्या घरातील लोकांच्या बद्दल समजून घेत घेत आपण इथ पर्यंत आलोत ..
आता ..दुसरी बाजू .बघितली पाहिजे ..
ती म्हणजे ..
तुम्हा दोघींच्या घरी ..यश आणि मधुरा बद्दल माहिती झाले तर ..तुमच्या आई-बाबांची
प्रतिक्रिया काय असेल ? कशी असेल ?
काही कल्पना आहे का तुम्हाला ?
चौधरीकाकांची शंका आणि भीती ऐकून घेतल्यावर दीदी म्हणाली –
खरे सांगू का चौधरीकाका –
आमच्या मनात ही शंका कधीच आली नाही ..
कारण आमच्या आई-बाबांना यशच्या आजी-आजोबांच्या घरात आमच्या मधुराचे
सुनबाई “म्हणून जाणे “ ही त्यांना आवडेल अशी गोष्ट आहे.
हे ऐकून चौधरीकाका म्हणाले ..
तुमची अपेक्षा चुकीची आहे असे मला म्हणयचे नाही.
माझे म्हणणे एवढेच आहे की ...
तुम्ही तुमच्या आई-बाबांना इतके गृहीत धरू नका ..!
त्यांच्याशी या विषयवार बोला , त्यांची संमती घ्या , आणि यशच्या आई-बाबांच्या
समोर मधुराचा रीतसर असा प्रस्ताव ठेवण्यासाठी म्हणून त्या दोघांनी इथे येवून हे करावे .
चौधरीकाकांचे बोलणे ऐकून मधुरा म्हणाली ..
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे काका , माझ्या आई-बाबांना मी असे इतके गृहीत धरून चालणे “
चुकीचे आहे.
इथे आल्यापासून मी एकदा ही गावाकडे गेले नाहीये ,की माझे आई-बाबा कधी इकडे आलेत ..
त्यामुळे ..इकडे काय काय घडामोडी घडल्या आहेत “हे त्यांना अजिबात माहिती नाहीये.
एखादे वेळी ..यशचे आजी-आजोबा गावाकडे गेले असते तर कदाचित त्यांच्या कडून नक्कीच काहीतरी
कळले असते ..
नेमक्या या वेळीच यशचे आजी-आजोबा अजून इकडेच राहिले आहेत.. आणि सध्यातरी ते हे घर
सोडून कुठे जाणायची काही चिन्हे नाहीत.
म्हणून.. माझ्या आई-बाबांची भेट घेण्यासाठी मलाच जावे लागेल असे दिसते आहे ..
बघू या ..
मधुराचे ऐकून घेत काका म्हाणाले ..
असे बघू या, करु या मध्ये वेळ नको घालवू ..
यशच्या आणि तुझ्या प्रेमावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले तरच पुढच्या पायरीवर चढता येईल ..
दीदी म्हणाली ..अहो काका ..आपण पाहू या न , मधुरा स्वताच्या प्रेमासाठी काय काय करते ती ?
मधुरा म्हणाली – दीदी आणि काका ..तुम्ही बघाच ..मी काय काय करते ते ..
प्यार के लिये सब ...!.
----------------------------------------------------------------------------------------------------------
बाकी पुढच्या भागात ..
भाग – ३१ वा लवकरच येतो आहे ...
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कादंबरी – प्रेमाची जादू
ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.
9850177342
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------