Ratnavati in Marathi Horror Stories by Sanjeev books and stories PDF | रत्नावती

The Author
Featured Books
Categories
Share

रत्नावती

रत्नावती
रत्नावती अतिशय सुंदर होते रत्नावती ला बघण्याकरता कधीकधी राजे, महाराजे छत्रसिंह महाराजां शी भेटी गाठी करत.
"राजकुमारी रत्नावती जयतु जयतु...!!!"
यांन सगळा आसमंत भरून जात असे रत्नावती ला संकोचल्या सारखं होई त्या वेळेला ती जेमतेम 18 वर्षाची असेल. तिच्या करता विविध राज्यातून राज कुमारां कडून लग्नाचे प्रस्ताव, मागण्या आलेल्या होत्या. शेवटी महाराजा छत्रसिंह राजकुमारी रत्नावती चा विवाह झाला.
अप्रतिम सौंदर्यामुळे कुठल्या ना कुठल्या निमित्ताने कुठल्या ना कुठल्या राज्यांची कुठल्या ना कुठल्या राजांचं भानगड ला येणं जाणं हे होतंच.
राजस्थान मधील अलवार जिल्ह्यामध्ये सरिस्का नावाच्या जंगलांमध्ये भानगड राज्य होत.
राजस्थान तंत्र-मंत्र करता आज ही अतिशय प्रसिद्ध आहे. या काळामध्ये एकंदरच त्या भागांमध्ये ज्योतिषी तांत्रिक-मांत्रिक यांना अतिशय सन्मानाने वागणूक मिळत असे तो साधारण इस० पंधराशे ते सोळाशे चा कालावधी असावा अर्थात त्या वेळेला असणारे मांत्रिक सुद्धा तेवढ्यात ताकदीचे होते.
नियतीशी गती कोणाला ओळखता येत नाही, अश्यात तांत्रिक-मांत्रिकां मध्ये सिंधा सेवडा नावाचं एक उच्च कोटीचा तांत्रिक भानगड मध्ये येऊन राहू लागला.
भानगड च्या आजुबाजुला घनदाट जंगल , ३ बाजूनी उंच पहाडी प्रदेश, बराचसा डोंगराळ भाग.
अशाच एका डोंगरावरती सिंधा ने आपलं आसन जमवलं. आणि साधनेला सुरुवात केली.
,शिकारीच्या निमित्ताने राजा राणी रत्नावती त्यांचं काही निवडक साथीदारा सकट जंगालातन परत राजवाड्याकडे निघालेला असताना सिंधा ची नजर राणी रत्नावती वरती पडली आणि तो आश्चर्याने थक्क झाला.
रत्नावती सौंदर्य अप्रतिम होत. आज पर्यंत त्याने एवढ्या सुंदर स्त्रीया त्याच्या आयुष्यात बघितल्या होत्या पण रत्नवतीत वेगळंच आकर्षण, कशीश होती.
कोण कोणाकडे आकर्षित होईल , कोणाला कोणाविषयी प्रेम वाटेल ही गणित मोठमोठे ज्योतिषी सुद्धा मांडू शकले नाहीत हे आपण इतिहासाची पाने चाळताना बघतोच आणि प्रत्येक काळामध्ये आणि आज ही बघतो. प्रेमामध्ये वय, जात, धर्म, देश, प्रांत काहीही आड येत नाही.
एका दृष्टिक्षेपात सिंधा सेवडा रत्नावती च्या प्रेमात पडला. त्याचा त्याच्या स्वतःच्या मंत्रशक्ती वरती पूर्ण विश्वास होता कसेही करून त्याला आता रत्नावती पर्यंत पोहोचायचं होत. आणि तिला स्वतःच्या नादी लावून घ्यायचं होतं परंतु ती एका मोठ्या राजाची राणी आहे आणि आपल्या अशा प्रकारचे प्रयत्न जर कोणाच्या लक्षात आले तर तो दिवस आपल्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल याविषयी सिंधा सेवडा ह्याला खात्री होतीच.
प्रयत्न करून सुद्धा त्याला साधना करताना रत्नावती चे विचार बाजूला सारता येत नव्हते. त्यामुळे त्यान शेवटी आपल्या तंत्र-मंत्र याच्या सामर्थ्याने रत्नावती ला वश करायचं ठरवलं. तंत्रांच्या मदती मध्ये विशिष्ट प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी यांचा वापर करून एखाद्याला वश केलं जातं. वश झालेली व्यक्ती स्वतःला अस्तित्वच हरवून बसते.
हा माणूस पूर्ण त्या बाईच्या नादी लागला, ती बाई या माणसाच्या नादी लागली आणि घरातून पळून गेली इत्यादी गोष्टी किंवा बातम्या आपण ऐकत असतो मंत्रांच्या मदतीने देखील वशीकरण प्रयोग केले जातात त्यामध्ये कधी दैवी शक्ती तर कदही पिशाच्च सदृश्य दैवतांची मदत घेतली जाते.
वशीकरण म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर फक्त स्त्रीच उभे राहते परंतु असे नव्हे कोणी प्रॉपर्टी करता, कोणी जमिनी करता वशीकरण याचे प्रयोग करतात. तर कधी कधी स्त्रिया वशीकरण प्रयोग करून तिच्या मनामध्ये भरलेल्या पुरुषाला स्वतःच्या नादी लावते. कधी पुरुष असे उद्योग करत होता तर कधी कधी बाबा, बुवा, महाराज लोक त्यांच्याकडे भजनाला दर्शनाला येणाऱ्या जाणाऱ्या स्त्रियांवर वशीकरण याचे प्रयोग करत असतात.
त्या मुळे facebook , whatsup instagram youtube ह्या वर वशीकरण प्रयोगांची रेलचेल असते, कुठे फुकट तर कुठे विकत आणि अर्थात त्याचे अनुभव येतनाही कारण मंत्र चुकीचा किंवा विधान चुकीचं असत, लोक हौसे ने ह्या सर्व गोष्टी करत असतात. विकणारे, विकत घेणारे, अनुभव आला नाही तर सांगणार कोणाला कारण अश्या गोष्टी कोणा जवळ बोलणं शक्य नसतं. पण ह्या गोष्टी केवळ भारतातच नव्हे तर इतर देशात ही घडत असतातच.
सिंधा सेवडा चे डोंगरावरती राहून प्रयोगांना सुरुवात झाली परंतु कधीतरी राज्यात चक्कर मारताना, राजवाड्याच्या अवतीभोवती चक्कर मारताना एक गोष्ट त्याच्या प्रकर्षाने लक्षात आली की आपण केलेल्या कुठल्याही प्रयोगाचा रत्नावती वरती परिणाम झालेला नाही.
सिंधा सेवडाला याची अजिबात कल्पना नव्हती की तो जसा तंत्रविद्या मध्ये माहीर होता तशी राणी रत्नावतीला तंत्रविद्येच सखोल ज्ञान होत.
ह्या जगात सगळ्यात मोहात पडणारी कुठली गोष्ट असेल तर स्त्री मोह. ह्या मोहा पायी इतिहासात झालेल्या भीषण लढाया व नर संहार उदा० महाभारतात सत्यवती, गांधारी, कुंती, दुर्योधना ची मुलगी लक्ष्मणा. आणि मग कुरुक्षेत्रावर झालेला भीषण संहार, तर रामायणात सीते च्या मोहात अडकलेला रावण, पद्मिनी चा जोहार त्या पायी घडलेलं युद्ध आणि अशी असंख्य उदा० केवळ हिंदुस्थान च्या इतिहासात च नव्हे तर ग्रीक रोमन इतिहासात देखील आढळतात असो.
शेवटी सगळे प्रयोग जेव्हा विफल व्हायला लागले तेव्हा सेवडा ने शेवटचा जुगार खेळण्यासाठी ठरवलं त्याने राजमहालातील एका दासीला किमये च्या साह्याने असंख्य तांब्यांच्या दागिन्यांचे सोन्यात रूपांतर करून दिलं आणि माझं काम केलं तर तुला अजून हिरे-मोती जवाहरात देईन असं तिला वचन दिल.
सिंधा न दासी वर केलेला वशीकरण प्रयोग पूर्णतः यशस्वी झालेला होता.
दासी त्याच्यासाठी वाट्टेल ते करायला तयार होती, पण सिंधाला दासी मध्ये काडीचाही रस नव्हता, त्यांचा डोळा होता रत्नावतीवर. रत्नावती हातात आली की बऱ्याच गोष्टी हातात घेणं शक्य होतं.
तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलेला ते छोटे स्वराज्य, राजवाडा वैभव हळू हळू सगळच त्याच्या ताब्यात‍ येणार होतं. कायाकल्प मदतीने तो स्वतःला आणि रत्नावती ला अनेक वर्षे वार्धक्य पासून दूर ठेवणार होतो.
किल्ल्याचा सगळ्या बाजूने बंधन करणे त्याला सहज शक्य होतं तो मोगलांचा काळ होता औरंगजेबाचे शासन काळात घडलेली ही घटना महिमा नावाच्या दासीला सिंहाने बदामाच्या तेलाने भरलेलं एक चांदी चा कटोरा दिला आणि सांगितलं राजवाड्यात जाऊन राजमहालात जाऊन इतर कोणाच्याही दृष्टीला पडणार नाही ही काळजी घेत रत्नावती च्या हातात दे आणि तिला सांग की पहाडावर असलेल्या एका महान तांत्रिकाने हा प्रसाद तुला दिलेला आहे त्या योगे सौंदर्य वृद्धि, चिरकाल टिकणार तारुण्य, उत्तम आरोग्य याने तू कायम युक्त होशील आणि त्यामुळे तुझं परम कल्याण होईल.
महिमा डोक्यावरुन पदर घेऊन चांदीचा कटोरा लपवून राज महालामध्ये आली सिद्धाने सांगितलेल्या सर्व गोष्टी तिने जशाच्या तशा सांगितल्या आणि बदामाच्या तेलाचा तो कठोरा राणी रत्नावती पुढे ठेवला रत्नावतीनेही सगळं म्हणणं ऐकून घेतलं, बदामाच्या तेलाने भरलेला चांदीचा कटोरा तिथे ठेवायला सांगितला, तिला जायला सांगितलं.
जमिनीवरती रांगोळीने तिने पंचकोनी तारा‍काढून त्याच्या वरती पास कोणा वरती पास पणत्या ठेवल्या मध्यभागी बदामाच्या तेलाने भरलेला चांदीचा कटोरा ठेवला मायानृसींह बीज म्हणत तिने पाची दिव्यांना काळी हळद व गुलाल वाहिली आणि नंतर जवळ असलेल्या चांदीच्या डब्यातून हत्ताजोडी नावाची अनुष्ठाने सिद्ध केलेली वनस्पती बाहेर काढली तीच्या वरती कुमकुम युक्त अक्षता गुलाबाच्या पुष्पांच्या पाकळ्या इत्यादी टाकून त्यांची यथासांग पूजा केली आणि स्मशान कालीला आवाहन केलं बराच वेळ तोंडा न विविध प्रकारचे मंत्र जप चालू होते. ते झाल्यावर तिने गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या अक्षता चांदीच्या कठोर यामध्ये टाकल्या गुलाबाच्या पाकळ्या त्वरित कोमेजून गेल्या होत्या,चांदीच्या कटोर्या तल तेल हळूहळू गोलाकार फिरायला लागलं होतं ते अक्षता मुळे लक्षात येत होतं.
एका क्षणात तिच्या लक्षात आला की हा त्या महान तंत्रिकाचा भयानक वशीकरण आणि मारण प्रयोग होता
त्या तांत्रिकाने प्रयोग करून ते बदामाचे तेल महिमा च्या हाती पाठवलेल होत.
नेहमी प्रसन्न हसतमुख असणाऱ्या रत्नाच्या ह्या सर्व गोष्टी डोक्यात गेल्या होत्या, तिने थोडेश्या पांढऱ्या मोहोऱ्या हातात घेऊन चांदीच्या कटोर्या वरती मंत्र म्हणून तो कटोरा खिडकीत न त्या डोंगराच्या दिशेने भिरकावून दिला.
ज्या डोंगरावरती त्या तांत्रिकाने स्वतःसाठी आसन मांडलेलं होतं चोरांच्या वाटा शेवटी चोरांना माहिती असतात सिंधाला काहीतरी गडबड झाली हे कळलं होतं पहाडावर न तो खाली यायला निघाला होता त्याच वेळेला ज्या झाडाखाली त्यानं आसन मांडलं होत, त्या जवळच असलेला मोठा शिलाखंड अचानक तुटून निखळला, स्वतःचे प्राण वाचवायची संधी सेवडाला मिळालीच नाही, परंतु त्याही अवस्थेत त्याला येत असलेला मारण प्रयोग रत्नावती सकट त्या संपूर्ण गावा वरती केला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला.
पूर्वीच्या काळी बरेच तांत्रिक-मांत्रिक योगी हे कुठे ना कुठे तरी भटकत असत, ज्या राज्यां मध्ये किंवा गावा मध्ये ते प्रवेश करत, त्या संपूर्ण गावाला किंवा राज्याला मंत्रशक्तीने आपल्या अनुकूल करून घेत ज्यायोगे त्यांना तेथे हवे तेवढे दिवस राहता येत असेल त्यांची जेवणाखाण्याची सोय होत असे ही परंपरा जवळजवळ अठराव्या शतकाच्या शेवटापर्यंत भारतामध्ये चालत आलेली होती, हळूहळू ते मंत्र काळाच्या पडद्याआड झालेले आहेत त्यातले अवशेष भाग कुठेतरी सापडतात ते मोडी लिपीमध्ये, ब्राम्ही लिपी मध्ये किंवा राजस्थानमधील मोडी भाषा अजून थोडीशी वेगळी आहे त्यामध्ये ते आहेत ही हस्तलिखित प्राचीन वस्तुसंग्रहालयात लायब्ररीमध्ये जपून ठेवलेली असली तरी त्यातली भाषा त्यातील शब्द त्यातील विधान याचा अर्थ लागत नाही.
बरीचशी विधाना ही अपूर्ण आहेत, काही विधाना मधली पान कुठेतरी गायब झालेली आहेत. सिंधा च्या प्रयोगामध्ये संपूर्ण राज्य नष्ट झाला मात्र त्या राज्यांमध्ये जी मंदिर होती त्या मंदिरांना मात्र काहीही झालं नाही ती सगळे मंदिर शिल्प शास्त्राचे वास्तुकलेचे अतिशय सुंदर नमुने आहेत.
आजही उजाड प्रदेश, किल्ल्याचे अवशेष आहेत. त्या ठिकाणी रात्री जाण्याकरता परवानगी नाही किल्ल्याच्या बाहेर असलेल्या विहिरी वरती जवळच्या जवळच्या गावातले लोक येऊन पाणी वगैरे घेऊन जातात.
या किल्ल्याभोवती अनेक कथा गुंफल्या गेलेल्या आहेत उदाहरणार्थ प्रत्येक सीझनमध्ये या किल्ल्याचा रंग बदलतो, किल्ल्याचे अवशेष फक्त उरलेले आहेत जिकडेतिकडे केवड्याच बन आहे सुगंधामुळे तिथल्या वातावरणाला एक प्रकारची वेगळीच भीतीदायक भावना फक्त कायम असते या कथेमध्ये पाठभेद देखील आहेत.
भानगड किल्ल्या मधला एकही माणूस जिवंत राहिला नाही किल्ल्यामध्ये येणारया विचित्र अनुभवांमुळे अजबगड च्या राजाने राजाच्या किल्ल्यात येऊन कधीच वास्तव्य केले नाही.
आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया सरकारने सक्त आदेश दिलेले आहेत सूर्यास्तानंतर याठिकाणी कोणालाही थांबू द्यायचं नाही.
किल्ल्यात नक्की नक्की काय आहे याच्या करता भारत सरकारने एकदा आर्मी ची टीम देखील तिथे पाठवलेली होती किल्ल्यात महिलांच्या रडण्याचे, बांगड्यांचे, तलवारींचा खणखणाट, लोकांच्या ओरडण्याचे आवाज येतात असं बरेच लोक म्हणतात किल्ल्याच्या मागच्या बाजूला एक विशिष्ट प्रकारचा गंध येत असतो अचानक किल्ल्यात न कोणाच्यातरी ओरडण्याचे आवाज येतात असंही म्हटलं जातं १५७३ मध्ये बांधला गेलेला हा किल्ला अकबराच्या काळामध्ये फारच भरभराटीस आलेला होतो मात्र औरंगजेबाचे शासन काळामध्ये वैमनस्य आपसातील भांडण यामध्ये या किल्ल्याचे फक्त अवशेष शिल्लक राहिले आणि आजही अवशेषच शिल्लक आहेत दिवसा किल्ला जाऊन बघण्याची परवानगी आहे किल्ल्यामध्ये सोमेश्वर महादेवाचे मंदिर आहे ज्याठिकाणी सिंधिया सेवडा से वंशज आजही पुजापाठ करतात त्याना भेटायचं असेल तर भानगड ला तुम्हाला सोमवारी जावं लागेल कारण सोमवारी दिवसभर ते सोमेश्वर महादेव मंदिरात असताना इतर वेळेला ते पूजा करून निघून जातात हॉलिडेज म्हणून जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये भानगड चा आजूबाजूचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला असतो परदेशांमध्ये जसे हॉंटेड हॉलिडेज नावाची कन्सेप्ट आलेले आहे ज्याच्या मध्ये ज्या लोकांचा भुता-खेतांवर विश्वास असेल असे लोक लोकांची ट्रीप ट्रॅव्हल कंपनी ऑर्गनाइज करते आणि त्यांना तिथे येऊन जाते मग काही माहिती सांगितली जाते.
काही लोक अनुभव आले असं म्हणतात काही लोकांना कुठल्याही अनुभव येत नाहीत अशा प्रकारचे हॉंटेड हॉलिडे सर्व्हिसेस भारतात सुद्धा सुरू झालेल्या आहेत सगळ्यात जास्त haunted जागा कुठल्या देशांमध्ये आहेत हा एक अभ्यासाचा विषय होऊ शकतो भारतामध्ये असलेल्या अनेक झपाटलेल्या जागांपैकी भानगड ही एक जागा आहे वेळ मिळाल्यास पुढच्या वेळेला शक्य झाल्यास एखाद्या नवीन ठिकाणी ट्रिप काढू
@स्वामी@