Jodi Tujhi majhi - 46 in Marathi Fiction Stories by Pradnya Narkhede books and stories PDF | जोडी तुझी माझी - भाग 46

Featured Books
  • YoYo प्रसंग!

    YoYo प्रसंग! "चल मैं निकलत हंव! ते लिख के डार दे! नए शहर को...

  • कहानी फ्रेंडशिप की - 3

    Friendship Story in Hindi : ‘‘साहब मैं आपका सामान उठा लूं क्...

  • बैरी पिया.... - 33

    शिविका ने फोन की स्क्रीन को देखा तो फोन उठा लिया । संयम " कौ...

  • Dard...e lotus

    दर्द का रिश्ता तो मेरा बचपन से रहा है और आज भी वही सिलसिला च...

  • You Are My Choice - 23

    जब जय पुलिस स्टेशन से निकल कर बाहर आया तो उसने देखा की आकाश...

Categories
Share

जोडी तुझी माझी - भाग 46

गौरवी सगळं ऐकत होती पण कुठेतरी हरवली होती.. तीच रुपलीच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं..

रुपाली - (गौरवीला हलवत ) गौरवी, सगळे तिच्याच कडे बघत होते.. गौरवी तू ठीक आहे ना?? काय झालं?? काय विचार करतेय??

गौरवी - अ.. अ ... काही नाही ग मी तर ऐकत होते..

रुपाली - बर मग सांग तुझा काय निर्णय आहे.. तूला संदीप माझ्यासाठी पसंत आहे का??

गौरवी- (थोडं स्वतःला कसंबसं सावरत) आता मिया बिवी राझी तर क्या करेगा काझी ना.. पण मला विचारलंच आहे तू तर मला संदीपशी जरा एकांतात बोलायचंय..

रुपाली - ठीक आहे आम्ही बाहेर थांबतो आणि हा रेस्टो वाला स्टार्टर वरच पळवणार आहे वाटत, आम्ही ऑर्डर कुठे अडकली ते बघतो.. चला जीजू..

रुपाली आणि विवेक उठून बाहेर येतात..

गौरवी - संदीप , सॉरी मी अस तुझ्याशी एकटयात बोलायचं म्हंटल ते..

संदीप - काहिच हरकत नाही वहिनी, आणि तुमची काळजी कळली मला, मी रुपलीला कसलाच त्रास नाही होऊ देणार..

गौरवी - संदीप, मी ज्या धोक्यातुन सावरायचा प्रयत्न करतेय ना तशी वेळ कधीच कुणावर येऊ नये, लग्न म्हंटल की मला जरा भीतीच वाटते आजकाल.. मला तू वचन दे की तू रुपलीला कधीच फसवणार नाहीस, कधीच कुठली गोष्ट तिच्यापासून लपवणार नाहीस, ती रेऍक्ट करेल मान्य आहे तो तिचा स्वभावच आहे पण तुला ते सगळ सांभाळून घ्यावं लागेल, लग्न करण्याआधी 10 वेळा विचार कर.. पण लग्नानंतर तिला कधीच कुठल दुःख नको देउ..

संदीप - वहिनी मी खरच प्रेम करतो तीच्यावर, तिच्या या अल्लड स्वभावावर, आणि मी विवेक सारखं तर कधीच नाही करणार... माफ करा.. तुम्ही निश्चिन्त राहा ती खूप खुश असेल माझ्याबरोबर..

गौरवी - उत्तम आहे मग माझी काही हरकत नाही या लग्नाला...

संदीप - वहिनी एक विनंती होती,

गौरावी - हं बोला..

संदीप - विवेकला खरच खूप मनस्ताप होतो त्याच्या केलेल्या चुकांचा, त्याला तडफडताना बघतोय मी... खूप हळवा झालाय तो आजकाल , अ मला फक्त एवढंच बोलायचं होत की जर तुम्ही त्याची परीक्षा बघत असाल तर ती आता संपवावी...

गौरवी - नाही मी कुणाची परीक्षा नाही बघत आहे संदीप, पण मी अजून पूर्णपणे त्या सगळ्या आठवणी विसरू शकली नाहीय, मी अजून तरी त्याला माफ करू शकली नाहीय...

संदीप - तुमचं बरोबरच आहे वहिनी, तुमच्या जागी कुनी असती तर कधीच त्याला सोडून निघून गेली असती.. पण तुम्ही अजूनही त्याला संधी दिली आणि त्याला माफ करायचा प्रयत्न करत आहात हीच खूप मोठी गोष्ट आहे.. बर आणखी एक विनंती करू??

गौरवी - हो नक्कीच... बोला

संदीप - मला कुणी भाऊ नाही वहिनी नाही मामी पण नाही, तर मला तुम्ही हळद लावाल का??

गौरवी - हो मला खूप खुशी होईल पण अजून सगळं पक्का तर होऊ द्या.. रुपाली म्हणते तसं अगदी उतावीळ आहात तुम्ही.. बरं ते दोघे बोर झाले असतील बोलवा त्यांना...

इकडे रुपाली नि विवेक पण तर्क लावत असतात काय बोलत असेल गौरवी संदीपला असं??

विवेक - नक्कीच संदीपला सांगत असणार जस विवेक वागला तस वागू नको कधी म्हणून..

रुपाली - हम्मम.. त्यात काही चूक पण नाहीय बरोबरच आहे तिचं.. तिला वाटत असेल जे तिने सहन केला ते माझ्या वाट्याला येऊ नये.. शेवटी तो तुमचाच मित्रा आहे ना... हा पण तो तुमच्यासारखा नाही हे खरं आहे..

विवेक - किती टोमणे मारणार आहेस रुपाली... मला खरच मनस्ताप होतोय ग आणि गौरवीच अस लांब राहणं मला आणखी त्रास देत ग पण मी तिला काहीच बोलू शकत नाही , कुठल्या तोंडणी बोलू.. तीच बरोबरच आहे सगळ.. पण तुमच्या साठी मात्र मी खूप खुश आहे.. मस्त मज्जा येईल लग्नात..

रुपाली - हो आणि आमच्या लग्नात तुम्हाला जवळ आणता येईल अशी आयडिया पण आहे माझ्याकडे..

विवेक - हे बघ अस काही करू नको गौरावीला वाटेल की तुझी माझी मिली भगत आहे काही... तिला उगाच राग येईल माझा... सुधारायला जाशील आणि आणखी बिघडायच..

रुपाली - तुम्ही नका काळजी करू जीजू.. आमचं लग्न आमच्यासोबत तुम्हाला पण एक करतय की नाही ते बघा तुम्ही...

तेवढ्यात संदीप बाहेर येतो यांना शोधत.. आत बोलावण्यासाठी, सगळे पुन्हा आपल्या जागेवर बसून जेवण करायला घेतात ऑर्डर आलेली असते.. मस्त जेवणावर ताव मारतात चौघेही..


रुपालीच्या घरून पण परमिशन मिळते आणि लगेच साखरपुडा आटोपतो.. आणि दोन महिन्यांनी लग्नाचा मुहूर्त असतो..लग्नाची भरपूर काम.. विवेक आणि गौरवी ही जीव ओतून त्यांना मदत करत असतात..


एक दिवस रुपाली आणि गौरवी कार्यक्रमाची आखणी करत असतात.. त्यात संगीत डान्स अस रुपलीला करायचं असत तिने कोरिओग्राफर सुद्धा निवडलेला च असतो..


रुपाली - गौरवी, 2 दिवसांनंतर माझी डान्स प्रॅक्टिस सुरू होणार आहे, मला लग्नात माझा आणि संदीपचा couple डान्स करायचंय, अ.. अ.. गौरवी तू माझी एक इच्छा पूर्ण करशील??


गौरवी - अजून काय करतेय मी गेल्या महिन्यापासून मॅडम... बोल काय??


रुपाली - आमच्या लग्नात तू आणि जीजू पण करा ना ग एखादा couple डान्स.. माझा कोरिओग्राफर आहे तो शिकवेल तुम्हाला..


गौरवी - रुपाली, तुला सगळं माहिती आहे तरी पण तू अस कस काही पण बोलतेस ग? मला नाही जमणार .. मी अजूनतरी त्याच्या जवळ नाही जाऊ शकत..


रुपाली - गौरवी मला ना तुझं कळतच नाही, का नाही जाऊ शकत तू जीजू जवळ?? नवरा आहे तो तुझा.. मला काही माहीत नाही तुला करावाच लागेल मी जिजूनशी बोलते आणि त्यांना कुठली हरकत नसेल मला माहितीय.. आणि तू जर नाही म्हंटलास तर मी पण नाही करणार.. तुला माहिती आहे मी किती हट्टी आहे ते..


गौरवी - रुपाली प्लीज समजून घे, मला सगळं जून पुन्हा आठवत ग.. मी अजून नाही विसरली ते सगळं..


रुपाली - आणि कधी विसरु पण शकणार नाहीयेस.. पण गौरवी तेच ते घोकत तू तुझा आज का वाया घालवतेय? मी समजू शकते तुला त्याच्या जवळ जाणं एवढं सहज नाहीय पण अग तू तुझ्या या प्रॉब्लेम पासून जितकं दूर जायचा प्रयत्न करशील तितकीच ते तुला आणखी त्रास देतील.. गौरवी face कर, हे अस किती दिवस चालणार आहे?? एकतर सरळ जिजूंना सांग की मी नाही राहू शकणार तुमच्याबरोबर पुन्हा.. हे अस स्वतः पण अडकून बसायचं आणि समोरच्या माणसाला पण आशेवर लावायचं काय अर्थ आहे याला.. ती व्यक्ती किती तडफडतेय दिसत नाही का ग तुला?? गौरवी तू जे सहन केला ते खरच खुप मोठं दुःख आहे पण किती दिवस तू तेच उगाळत बसणार आहेस?? समोरची व्यक्ती आज तुझ्यावर जीव ओवाळून टाकायला तयार आहे आणि तू कुठे त्या जुन्या तिटकार आठवणींमध्ये गुरफटून बसली आहेस.. संधी दिली आहेस ना तू मग ती खऱ्या अर्थाने दे ना.. तू जे वागतेय यात कुठेच तू संधी देतेयेस अस दिसत नाही....


गौरवी - रुपाली , मी प्रयत्न करतेय ना ग.. पण प्लीज हे अस डान्स वगैरे नको ग..


रुपाली - मी तुझं काहीच ऐकणार नाहीय तुला करावा लागेल म्हणजे लागेल..मी जिजूंना सांगून आले..


अस म्हणत फोन हात घेऊन तिथून निघून जाते..


रुपाली पुढे गौरवीच काहीच चालत नाही, आणि गौरवी तयार असेल तर विवेकचीही काहीच हरकत नसते.. गौरवी पण रुपलीच्या बोलण्यावर खूप विचार करते आणि बळजबरीने का होईना पण तयार होते.. डान्स प्रॅक्टिस सुरू होते .. आधी रुपाली संदीप आणि नंतर गौरवी आणि विवेक अस schedule ठरतं.. सुरुवातीला गौरावीला थोडा त्रास होतो, बरच awkwrad वाटत असतं.. पण विवेक तिला comfortable करायचा प्रयत्न करतो.. हळूहळू तिचा अवकवॉर्डनेस कमी होऊन ती छान प्रॅक्टिस करू लागते.. विवेक तर तसाच खुश असतो.. गौरवी पुन्हा रुळतेय हे बघून घरचेही आनंदी असतात आणि रुपलीला पण चांगलं वाटत.. लग्नाची तारीख जसजशी जवळ येत असते तसतशी लग्नाची तयारी पण जोरात सुरू असते.. रुपाली च्या गौरवी च्या मदतीने खरेदी, कॉन्ट्रॅक्ट, मेहंदी ,मेकअप सगळ्या ऑर्डर्स देऊन झालेल्या असतात, सगळी धावपळ सुरू असते.. हळूहळू लग्नाचे कार्यक्रम सुरू होतात.. मेहंदी, संगीत..


क्रमशः