संध्याकाळी तिघे पण एक चांगल्या हॉटेल मध्ये जेवायला जातात.. ऑर्डर देतात.. ऑर्डर देताना विवेक सगळं गौरवी च्या आवडीचं मागवतो.. आणि सृष्टीला तिच्या आवडीचं मागावं बोलतो.. सृष्टीला आणखी एक प्रश्न पडतो विवेकला गौरवी च्या आवडीबद्दल कस माहिती? ...ऑर्डर यायला थोडा वेळ असतो ..
सृष्टीचे सकाळचे सगळे प्रश्न अनुत्तरित असतात आणि आता हा आणखी एक नवा प्रश्न.. तिला त्याची उत्तर हवी असतात.. तर तीच सुरू करते बोलणं..
सृष्टी - विवेक मला खूप प्रश्न पडले आहेत विचारू का??
विवेक - विचार विचार..
सृष्टी - चिढणार नाहीस ना
विवेक - नाही ग चिढणार आणि हो सकाळसाठी i m really sorry ..
सृष्टी - तुला गौरवीच्या आवडी निवडी इतक्या कश्या माहिती?? आणि मग ती एक मागून एक असे सकाळसारखेच सगळे प्रश्न विचारत असते.. कुठेतरी जेव्हा ती थांबते तेव्हा विवेक बोलतो..
विवेक - संपलेत का तुझे प्रश्न?? अग खर तर हेच बोलायचं होत मला तुझ्याशी म्हणून हा प्लॅन केला आम्ही आज..
मग तो तिला त्याच्या आणि गौरवी च्या लग्नाबद्दल सांगतो.. पण त्यांचे वाद आहेत हे सांगायचं मात्र टाळतो.. उगाच कुणी त्या वादामधून आपला चान्स आहे असं समजू नये म्हणून.. बोलता बोलताच ऑर्डर येते आणि ते जेवत जेवत बोलत असतात..
सृष्टी हे सगळं ऐकून एकदम शॉकच होते.. 2 मिनिट शांत बसल्यावर ..
सृष्टी - मग हे सगळ्याना का सांगत नाही तुम्ही??
गौरवी - आम्हाला लपवायचं नाहीय पण त्यात सांगण्यासारखं काय आहे.. आम्ही नवरा बायको आहोत हे सगळ्यांना कशाला सांगायला हवं म्हणजे जर माहिती पडत असेल किंवा कुणी विचारलं तर सांगूच पण उगाच ढोल पिटण्यात काय अर्थ आहे??
सृष्टी - हम्म बरोबर आहे.. कोणी अस प्रदर्शन नाही करत .. पण मग तुम्ही कधीच सोबत येत जात नाहीत, तू तुझी वेगळी येते आणि हा आपला वेगळा.. अस का??
गौरवी - अग मी काही दिवस माझ्या आईकडे राहते आहे, तू समजू शकते ना "माहेरपण " म्हणून..
सृष्टीच्या या प्रश्नावर तर विवेकला काय बोलू कळत नव्हतं पण गौरवी बरोबर उत्तर देते त्यामुळे तो एक सुस्कारा सोडतो
सृष्टी - ओहह अच्छा.. मग विवेक तू का सांगितलं नाही मला ..
गौरवी - अग मीच नको सांगू बोललेली खर तर.. म्हणजे बघ ना तुझ्या बॉसची बायको म्हंटल्यावर तू मला थोडं वेगळं ट्रीट केलं असत ना..म्हणजे काम देताना विचार केला असता, उगाच तू काही बोलल्यावर मी तूझी कम्प्लेइंट करेल का अस तुला वाटत राहिला असत आणि बाकी चे पण चांगल्या रेटिंग साठी माझ्याशी उगाच चांगलं वागायचं प्रयत्न करत राहीले असते, माणसाची एक मेंटलिटी असते ग की आपल्या बॉसची बायको म्हंटल्यावर तिच्याशी थोडं अदबीने वागायची.. आणि मला अस काही नको होतं म्हणून मग..
सृष्टी - ओहह अच्छा.. मग आता का सांगितलं??
विवेक - तुला उगाच आमच्याबद्दल काही गैरसमज होऊ नये म्हणून...
सृष्टी - हम्म ..
गौरवी - एक विनंती आहे सृष्टी.. तुला माहिती झालं पण तुझं माझ्यासोबतच वागणं बदलवू नको ग , जस सगळ्यांशी वागशील तसाच वाग मला काही वेगळं अस नको ट्रीट करू , मी अजिबात काहीच नाही सांगणार आहे विवेकला.. तस पण आम्ही ऑफिस मधल्या गोष्टी नाही डीसकस करत एकमेकांबरोबर..
सृष्टी - हो चालेल नक्कीच.. मी तुला आताही जास्तच काम देत जाईल..
आणि एक डोळा झाकत तिच्याशी हसतच बोलते.. तस सगळेच हसतात..
सृष्टी - फक्त एक कराल तुम्ही नवरा बायको आहे ते सगळ्यांना सांगा अस नाही म्हणत मी, पण जर कधी कुणाला काही संशय वाटला तुमच्याबद्दल तेव्हा मात्र त्या व्यक्तीला नक्की सांगा.. मी तर सांगेल मला कुणी काही बोलल तुमच्याबद्दल तर...😊
गौरवी - ओके मॅडम... 😊👍
जेवण आटोपते, आणि सृष्टी दोघांना बाय करून निघून जाते.. आता बऱ्याच दिवसांनी विवेक आणि गौरवी एकत्र असतात... बिल देऊन दोघेही निघतात. बोलायचं असत पण काय बोलावे काळात नाही.. हळूहळू ते त्यांच्या गाडीजवळ जात असतात.. ही वेळ गेलीबतर परत मिळणार नाही म्हणून हिम्मत करून विवेकच बोलतो..
विवेक - काल जायच्या आधी सांगितलं नाहीस तू मला.. मी थांबलो होतो..
गौरवी - हो रे, पण मी रागात होते ना त्या गैरसमजामुळे.. म्हणून तू माझ्यासाठी थांबला असताना सुद्धा तुला सोडून निघून आले.. मला यासाठी पण तुझी माफी मागायची होती.. आय अम सॉरी..
विवेक - सॉरी ची गरज नाहीय ग पण एव्हढ्या रात्री तू अस एकटीने जायचं , आणि त्यात मधात तो रस्ता पण जरा विचित्र आहे.. काळजी वाटत होती ग..
गौरवी - हम्म सॉरी ना.. पुन्हा नाही असं होणार.. आणि तू घरी आईला काय सांगितलं होतं??
विवेक - अग मला वाटलं तू विसरली असशील कामाच्या गडबडीत फोन करून उशीर होईल असं सांगायला, आणि ते घरी उगाच काळजी करत बसतील ना म्हणून मी सांगितलं की तुला आज वेळ होईल आणि मी तुला सोडायला येईल म्हणून.. पण तू मला ना सांगताच गेली निघून .. त्यांना काय वाटलं असेल की मी अजून पण दिलेला शब्द पाळू शकत नाही..
गौरवी - मी नाही सांगितलं मान्य आहे पण तू तर आलाच होता ना माझ्या मागे.. मी बघितला तुला माझ्या घराच्या बाहेरून गाडी घेऊन जाताना.. आणि तू खरच इतका विचार करायला लागलांय आई बाबांचा??
विवेक - हो तू पण एकटी आहे आणि मी पण.. तू करतेस ना माझ्या आई बाबांचं विचार मग मी केला तर काय बिघडलं?? आणि तुला माहिती होत मी तुझ्या मागे येतोय ते??
गौरवी - नाही मला मी घरी पोचल्यावर कळलं.. पण आईला माहिती नव्हतं..
विवेक - हम्म, आईला नक्की वाटलं असणार मी अजूनही तसाच आहे ते.. असू दे तू सुखरूप पोहोचणं हे जास्त महत्वाचं होत माझ्यासाठी म्हणून मी आलो होतो तुझ्या मागे..
गौरवी - आई काही विचार करणार नाही, तिला मी सांगितलं सगळं मी तुला ना सांगता आली ते.. नको काळजी करू.. घरी आई बाबा कसे आहेत???
विवेक - छान आहेत, नेहमी तुझी आठवण काढत असतात.. तू कधी घरी येशील याची वाट बघत आहेत ते,
आणि तिच्या नजरेत बघत हळूच बोलतो..
आणि मी पण..
गौरवी - मी त्यांना येईल या रविवारी भेटायला, सांगशील त्यांना, मला पण त्यांची खूप आठवण येते..
विवेक - आणि माझी??
गौरवी चमकून त्याच्या कडे बघते तर तो तिच्याच नजरेत नजर घालून एकटक बघत असतो.. त्याच्या या अनपेक्षित प्रश्नानी आणि कृतीने ती जरा गोंधळते काय बोलावे तिला कळत नाही.. नजर चोरातच ती बोलते..
गौरवी - चल मला निघायला हवं , नाहीतर आज पण उशीर होईल.. आणि निघायला जाते तोच तो माघून आवाज देऊन तिला थांबवतो..
विवेक - गौरवी , एक मिनिट..
ती पलटून बघते..
विवेक - आज तर घरी माहिती आहे ना की तु जेवायला जाते आहे बाहेर तर उशीर होईलच ते.. थांब ना थोडावेळ.. किती दिवसांपासून बोललो नाहीय .. बोल ना ग थोडावेळ.
गौरवी - तशीच परत येते, ठीक आहे पण इथे अस मधात उभं राहून बोलायचं का??
विवेक - चल तिकडे बाकड्यावर बसूयात..
-
-----------------------------------------------
क्रमशः