आई - अहो पण आज विवेकला सांगून आली असती किंवा त्याच्या सोबत तर काय बिघडत होतं?? अजून तरी तिने नात संपवलं नाही आहे ना मग नवरा होता ना तिचा.. आणि तो काळजी करतो ते चूक आहे का?? तिला कळायला नको का? अस त्याला तिथेच तातकळत ठेऊन निघून आली.. बरोबर आहे का हे?? त्याच फोन आला नसता तर आतापर्यंत आपल्या जीवाला घोर लागला असता, किती जबाबदारीने त्याने आपल्याला कळवलं... आणि मधून मधून पण आपली विचारपूस करत असतो..
बाबा - अग ती एकटी नाहीच आली , विवेकची गाडी तिच्या मागेच होती, फक्त हिला माहिती नव्हतं ती तुझ्या शी बोलत असताना मी खिडकीतून बघितलं तो त्याची गाडी पलटवत होता.. आणि तिला त्याने या प्रोजेक्टवर मुद्दाम घेतलं आहे असं तिला वाटत म्हणून थोडा राग आलाय ग तिला.. तू काळजी करू नको होईल सगळं व्यवस्थित.. चला, थाळी लाव जेवण करूयात येईलच गौरवी खाली तिच्यापुढे आता हा विषय नको, आल्या आल्या मूड खराब नको व्हायला..
गौरवी खाली येते पण ती तिच्याच विचारात असते.. ती 'विवेक तिच्या मागे येत होता' याच गोष्टीचा विचार करत असते..तिला आज ऑफिस मध्ये त्याच्या सोबत झालेलं सगळं बोलणं आठवत असतं.. जेवताना सुद्धा ती त्याच विचारांत जेवण करत असते..
दुसऱ्या दिवशी तिला ऑफिसला जायला थोडा उशीरच होतो.. गेल्या गेल्या सृष्टी सांगते की विवेकने तुला केबिन मध्ये बोलावलंय.. तिला कळतच नाही आल्या आल्या का बोलवलं असेल.. ती जाते..
गौरवी - मी आत येऊ का??
विवेक - हो प्लीज..
गौरवी - तुम्ही मला बोलवलत का?? काही काम होतं?? माफ करा आज थोडा उशीर झाला यायला काळ बराच वेळ काम करत बसल्यामुळे रात्री झोपायलाही उशीर झाल्यामुळे उशीर झाला, पुन्हा अस नाही होणार..
विवेक - मी तुम्हाला काही बोललोय का?? तुम्ही प्लीज बसा, मला थोडं बोलायचंय..आणि काल तुम्हाला उशीर झालेला माहिती आहे मला.. बोलता बोलताच तो H.R डिपार्टमेंट ला फोन लावतो आणि गौरवीची फील घेऊन तिथल्या assistant मॅनेजर दीपकला ला बोलावतो..
गौरवी - तुम्ही मला अहो जहो का बोलताय?? आणि मला कशाला बोलावलंय?? काही चुकलं का माझ्याकडून??
विवेक - अहो जाहो बोलायलाच हवं ना कारण तूम्ही पण माझ्याशी तसंच बोलत आहेत आणि का बोलावलं तर कळेलच थोडा धीर धरा..
विवेक थोडा रागात दिसात होता, तिला कळत नव्हतं नेमकं काय झालंय, कदाचित मी काल सांगितलं नाही जाताना म्हणून चिढला असेल.. असू दे बघू कोण येतंय..
तो येईपर्यंत ते दोघेही शांतच असतात..
दीपक - may I come in??
विवेक - yes please...
दीपक विवेकच्या हातात गौरवीची file ठेवतो.. विवेक ती file बाजूला ठेऊन त्याला विचारतो..
दीपक - यांना माझ्या under या प्रोजेक्टवर घ्या अस मी सांगितलं होतं का तुम्हाला??
तो थोडा आच्छर्यचकित होऊन बघतो की अस का विचारताहेत.. पण लगेच भानावर येत..
दीपक - नाही विवेक तू कधीच कुणाला आजपर्यंत अस रेकॉम्मेंड केलेलं नाहीय.. यांनाही नाहीं.. का काय झालं??
विवेक - सांगा यांना.. एवढं बोलून तो उठतो आणि खिडकीबाहेर बघत असतो..
गौरवी ला हे अगदीच अनपेक्षित असतं, अ आता तिला काळात की त्याला कसला राग आलाय,.. ती त्याच्याकडे बघतच असते की दीपक बोलतो..
दीपक - काय झालं गौरवी?? विवेकने नाही असं काही सांगितलं.. ते तर तुमचा जुना प्रोजेक्ट संपला आणि मग तू बेंचवर आली असती आणि या प्रोजेक्ट मध्ये जागा होती म्हणून तुला इकडे शिफ्ट केलं.. काही अडचण आहे का??
गौरवी - नाही दीपक , काहीच अडचण नाहीये तुम्ही येऊ शकता. प्लीज डोन्ट माईंड..
दीपक - विवेक येऊ का मी??
तो कसल्यातरी विचारात असतो पण दिपकच्या आवाज ऐकून लगेच भानावर येतो आणि त्याला हो म्हणतो, तो जायला निघतो...
विवेक - एक मिनिट दीपक, (त्याच्या हातात गौरवी ची file देतो) अरे ही file पण घेऊन जा..
यो निघून गेल्यावर
गौरवी - काय आहे हे विवेक?? अरे अस वागला तर सगळ्यांना कळेल ना आपल्याबद्दल...
विवेक - कळू दे ना मग, त्यात काय लपवायचं?? आणि आधीच तू 6 महिने होऊन गेले तरी मला माफ नाही करू शकली त्यात आणखी असे गैरसमज झालेत तर माझी प्रतीक्षा आणखी लांबायची.. आणीं मला आता अशी कुठलीच चूक करायची नाहीय ज्यामुळे मी तुला मिळवण्याचा एकही दिवस लांबणीवर जाईल.. आणखी...
तो बोलतच असतो की सृष्टी कनोक ना करता सरळ आत येते..
सृष्टी - ही विवेक, गुड मॉर्निंग.. त्याच्या कडे एकदा बघून अरे वाह विवेक आज काही विशेष आहे का?? खूपच handsome दिसतोयस ..
विवेक - हो आज माझ्या चुलत काकांच्या मामे बहिणीच्या मावस दिराच्या मुलीचा वाढदिवस आहे..
सृष्टी - बापरे किती कॉम्प्लेकॅटेड आहे हे.. ती कुणी खास आहे का तुझ्यासाठी??
विवेक - सृष्टी, it's called sarcasm.. तुला एवढं पण काळात नाहीं का.. आणि कनोक करून आत आययच असतं हे माननेर्स पण विसरलीस का??
सृष्टीला आता कळत.. ती थोडी घाबरूनच गौरवी कडे बघत..
सृष्टी - सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का?? मी येते..
आणि ती जायला निघते तोच गौरवी तिला हाक मारते.. ती उगाच भाळात सलत समजून ऑफिस टीम यामध्ये अफवा पसरवले म्हणून गौरावी तिला रोकते..
गौरवी - थांब सृष्टी, अ झालाय आमचं बोलून आणि इतकं काही महत्वाचं नव्हतं तसं.. तू बोल विवेकशी.. मी येते..
महत्वाचं नव्हतं?? माझं अक्ख आयुष्य टांगणीला लागलंय आणि ही म्हणते महत्वाचं नव्हतं.. इतकी सहज कसं बोलू शकते ही हे सगळं.. माझं बोलणंही पूर्ण होऊ दिलं नाही.. तिच्या ही आयुष्याचा प्रश्न आहे ना हा.. तो विचार करत असतो .. सृष्टी त्याला 2 - 3 वेळा आवाज देते पण त्याच लक्षच नसतं, तो गौरवी गेली त्याच दिशेने बघत असतो.. शेवटी सृष्टी त्याला खांद्याला हॅट लावून आवाज देते तेव्हा तो भानावर येतो.. आणि जर चिडूनच बोलतो..
विवेक - सृष्टी माझ्या पासून 4 हात लांबून बोलायचं कळलं.. एक तर विचारून आली नाहीस आणि तुझं हे वागणं मला कळत नाही असं वाटत का??
सृष्टी - विवेक मी तुला 2 - 3 आवाज दिलेत तुझं लक्ष नव्हतं म्हणून मी .. सॉरी पण तू ठीक आहेस ना म्हणजे मिबटूला अस चिढलेलं कधी बघितलेलं नाहीय.. ही गौरवी काही बोलली का तुला?? ती आली तेव्हा पासून बघतेय तू थोडा डिस्टर्ब वाटतोय मला.. काही बोलली का ती??
विवेक - माझ्या पर्सनल आयुष्यात डोकावू नको सृष्टी मी तुला शेवटचं सांगतोय मला नाही आवडत.. आणि गौरवी बद्दल नीट बोलायचं.. आणि बरं झालं तू आलीस मी तुला बोलावणारच होतो.. मला थोडं बोलायचं होत तुझ्याशी..
सृष्टी- हा बोल ना विवेक..
विवेक - मी टीमच्या सगळ्या एम्प्लॉईस चे लॉग चेक केलेत आणि टास्कस पण तू बाकीच्यांपेक्षा गौरावीला जास्त काम देते आहेस.. याच कारण कळेल का मला??
सृष्टी - ओहह तर ती तुझ्याकडे complaint घेऊन आली होती माझी..
विवेक - मी तुला बोललो ना की मी चेक केलं म्हणून मला कळलं, तिने काहीच नाही सांगितलं अजून मला, काश तिने सांगितलं असत पण , असो.. हे सगळं आताच्या आत्ताच थांबवायचं सगळ्यांना समान काम दे.. काळ रात्री 10:15 वाजले तिला घरी जायला..
सृष्टी - तुला तिनी हे सगळं नाही सांगितलं तर इतकं सविस्तर तुला कास माहिती की ती केव्हा घरी पोचली आणि बाकी सगळं..
विवेक - तुला सांगितलं तेवढं कर सृष्टी मला जास्तीचे प्रश्न नकोयत.. आजच्या कामाची लिस्ट मी तुला मेल करतो..तू येऊ शकतेस..
सृष्टीला विवेकच बोलणं फार जिव्हारी लागतं.. ती रडतच विवेकच्या केबिन मधून बाहेर येते.. गौरवी च्या ते लक्षात येतं, पण मी काय बोलू दोघांमध्ये म्हणून ती शांत बसली असते..
क्रमशः
----------