ek adhuri prem kahani in Marathi Love Stories by Suraj Kamble books and stories PDF | एक अधुरी प्रेम कहाणी

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

Categories
Share

एक अधुरी प्रेम कहाणी

ऑक्टोबर चा महिना असतो
थंडीची चाहूल थोडी थोडी सुरू होते,

YOU HAVE A NEW FRIEND REQUEST FROM PAYAL????
असंच काहीतरी नोटिफिकेशन श्रीयांश च्या मोबाइल स्क्रीन वर येते,
तो दचकून जागा होतो....

मला एक FRIEND REQUEST आली आणि ते पण एका मुलीची!!!!

आठव आश्चर्य व्हावं जगातील अशीच गोष्ट होती न ती श्रीयांश साठी...
एव्हाना आता ती तर मुलांसाठी आश्चर्य कारक गोष्ट झाली आहे,
फेसबुकवर मुलीची REQUEST येणं किंव्हा ती ACCEPT होणं,

बरं असो,

लगेच क्षणाचाही विलंब न करता श्रीयांश नी ती रिक्वेस्ट स्वीकार केली,
अभ्यासात गुंतलेला असल्याने तो हा मीडिया प्रकार ज्याला फेसबुक,

अर्थात तोंड ओळख होण्यासाठी ज्यात खूप कमी आपलेलपणा असतो आणि देखावा जास्त असं

हे फेसबुक याकडे तो काही
तेवढा लक्ष देत नाही...
तसंही हल्ली मुलींच्या नावे अकाउंट बनवून
खोट्या वाह वाही लुटण्यात काही
मुलां-मुलींना जीवनाचे युद्ध जिंकल्यासारखे वाटत असते,
सुट्टीचा दिवस असल्याने झोपेतून उठायला वेळच होतो,
आज तर लायब्ररी बंद असल्याने काय करायचं हा मोठा गंभीर प्रश्न श्रीयांश च्या डोक्यात सुरू असतो...

करमत ही नाही म्हणून तो त्या मुलीला hii असं काहीतरी पाठवत असतो,
प्रतिसाद मिळेल याची शाश्वती शून्य टक्के असते,
लगेच तिकडून hiii असा रिप्लाय येतो,

पायल-how are you
श्रीयांश-i am fine...

पायल-काय करतोस???
i mean शिक्षण काय झालं...

श्रीयांश-बी.ई.मेकानिक्स मध्ये झालं आहे आणि
सध्या सुशिक्षित बेरोजगार आहो,

पायल-म्हणजे???

श्रीयांश-अरे काही नाही स्पर्धा परीक्षेची तयारी
करतो आहे....
आणि तू काय करतेस????

पायल- पीजीडीएमल्टी सुरू आहे...

श्रीयांश-अरे वा!!!
म्हणजे मेडिकल शी संबंधित आहे
म्हणायच्या तुम्ही...

पायल-हम्मम

असं अगदी सर्व जसे काही फार पूर्वीपासून ओळखीचे आहोत ,
अगदी तस बोलनं दिवसभर होते,

पायल कडून ही रिप्लाय येतो आणि
श्रीयांश पण मस्तपैकी रिप्लाय देत असतो...

काही महिन्यानंतर,

अशीचं आता पायल आणि श्रीयांश यांची ही अनोळखी असणारी ओळख काही दिवसांनी मैत्रीत वायला सुरु होते...

सकाळी गुड मॉर्निंग पासून तर
रात्री गुड नाईट,
मिस यु
पर्यंत ही मैत्री वाढत जाते...

पण दोघांनीही एकमेकांना पाहिलेलं नसतंच,

दोघेही यापूर्वी काही पाहिजे तसा या फेसबुक चा वापर करत नसल्याने,
दोघांनी पण कधी स्वतःची फोटो यावर टाकलेली नसते,
दोघेही एकमेकांना अजूनतरी अनभिज्ञ असतात...

अशीच मैत्री वाढत जाऊन एकमेकांच्या मोबाईल नंबर ची ही अदलाबदल होते,
आता श्रीयांश आणि पायल कॉल वर बोलायला लागतात,
म्हणजे यांच्या मैत्रीत आता प्रेमाचा अंकुर फुटायला सुरुवात होते,
एकमेकांशिवाय राहणं खूपच कठीण वायला लागत,
हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात,
पण सांगण्याची हिंमत ना पायल करत नाही हा श्रीयांश,
तासनं तास हे लव्ह बर्डस
कॉल वर व्यस्त असतात,
ना यांना जगाचं भान,
नाही जुन्या मित्र-मैत्रिणीचं,
मैत्रिपेक्षा थोड्या वरच्या विश्वात हे रममाण होऊन जातात,

फेब्रुवारी चा महिना असतो
प्रेमाचा महिना,
यांची मैत्री हे प्रेमाच्या जवळ गेलेली असते,
परंतु एकमेकांना याविषयी सांगितलं नसते,
आणि विशेष म्हणजे कुणी कुणाला अजून पाहिलं पण नसते,
तशी ती पायल ची अटअसते,

न पाहता बोलायचं,
जेव्हा भेटायचं राहील तेव्हा एकमेकांना बघायचं,
आणि नुसतचं बघत राहायचं...
फक्त यांच्यात सर्वात जवळचा म्हणजे मोबाइल फोन,
यांनी फक्त एकमेकांचा आवाज ऐकलेला असतो...
पण मनात हे प्रेम किती दिवस ठेवणार तरी,तब्बल यांच्या मैत्रीला 4-5 महिने उलटलेले असतात,
शेवटी श्रीयांश ठरवतो की,पायल ला आपल्या मनातील सर्व सांगून देऊन मोकळं वायचं,
हे अवजड जागेच दुखणं जरा जास्तच दुखायला लागलं आहे...
सांगण्याशिवाय पर्याय आता उरला नाही,
आणि
पायल नी उत्तर काहीही दिले तरी,
आपण मात्र 14 फेब्रुवारी ला म्हणजेच valentine day ला नक्कीच मनातलं सांगायचं...
तिने उत्तर होय दिले तर तिच्या आयुष्यात थांबायचे अन्यथा,
परत तिच्या आयुष्यात कधी जायचे नाही,
आणि आपला चेहरा कधी दाखवायचा नाही...

हॅलो पायल,
श्रीयांश बोलतो,

बोल न श्रीयांश-पायल

बघ,मला तुझ्यासोबत महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे,
तू जेव्हा फ्री असेल तेव्हा सांग
मग तुझ्याशी निवांत बोलतो...

अरे श्रीयांश मी नेहमीच तुझ्यासाठी फ्री असते,
आणि
कितीही busy असली तरी वेळात वेळ काढून बोलत असते,
आफ्टर यु आर माय....
अर्धवट शब्द बोलून पायल थांबते...

बर ठीक आहे,
ऐक मग,
पायल,
मी बोललो तर तू वाईट वाटून नको घेशील???
वाईट वाटणार असेल तर असू दे,
नाही बोलत या विषयावर....

अरे,श्रीयांश
मला कश्याला वाईट वाटणार आहे,
आणि तुझं बोललेलं वाईट मला वाटेल शक्य तरी आहे का???
काही पण बावळटासारखा बोलतो आहे,
बोल,बिंदास पणे सांग,
नाही वाटणार वाईट प्रॉमिस???

पायल
आपण जवळजवळ 4-5 महिने न पाहता बोलत आहो,
जसा वेळ मिळेल तसा तू msg किव्हा कॉल करत असते,
तसच मी पण कॉल,
msg करत असतो,
त्याचा असा अर्थ की माझं जग सध्या तरी तूच बनली आहेस,
तुझ्या बोलण्यावरच मला प्रेम झालं,

i love you पायल....
will you marry me????

शेवटी श्रीयांश ने मनातली भावना पायल जवळ म्हणून दाखविली...

तू कशीही पाहायला असली तरी मला तू आवडते,
आता तू तिथे आणि मी इथे,
असला दुरावा मला नकोसा वाटायला लागला,
प्लिज ???
माझ्या प्रेमाला स्वीकार करणार का???

माझ्या आयुष्याच्या सुखदुःखात सहभागी जोडीदार म्हणून होशील का????

हा ,
वाटल्यास तू उत्तर विचार करून दे,
निवांत वेळ घे,
आणि मगच मला माझ्या प्रेमाच उत्तर दे????

आणि
जेव्हा तू उत्तर द्यायला तयार असेल तीच आपली पहिली भेट राहील....

पायल ला काय बोलावे सुचत नव्हते,

एकाएकी अश्या मोठ्या युध्याला हात घालावं लागेल,
ते ही एवढ्या लवकर,
अस तिला कधी वाटलं नव्हतं,

ठीक आहे म्हणत,
पायल नि फोन ठेवून दिला....

दोघेही विचारात,

श्रीयांश ला हा विचार की पायल काय उत्तर देणार,
आणि
पायल ला हा विचार की आता नेमकं उत्तर काय द्यायचं,

प्रेम तर मलाही आहेच,
मुलगा बोलून चांगलाच आहे,
आणि नेमकं त्याच्यापासून न बोलता राहणे अवडघडच होतं,
अश्याच विचारात न बोलता ५-६ दिवस असेच निघून गेले....

हॅलो श्रीयांश,
पायल बोलत आहे,
तुला तुज्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे न,
भेटू शकतेस का मला तू???

ठीक आहे येतो मी,
लगेच तयारी करतो,आणि बस नी येतो(बाहेरगावी राहत असल्याने)
अस म्हणतं श्रीयांश नी फोन ठेवून दिला तो एक वेगळ्याच excitement नी...

आज मात्र श्रीयांश भलताच खुश दिसत होता,
ब्लॅक जीन्स आणि व्हाईट शर्ट आज घातला,
तसा पाहायला देखणाच होता,

आज जरा जास्तच हॅन्डसम बनून चालला होता,
थोडा परफुम्स पण मारला होता,
कारण
आज त्याला त्याच्या प्रश्नाच उत्तर मिळणार होते,
आणि
उत्तर देणाऱ्या व श्रीयांश च्या मनात प्रेमाचा अंकुर फुलवणाऱ्या फुलाचा म्हणजे पायल ला आज पाहता ही येणार होते,
अश्या दुय्यम खुशीत श्रीयांश ने तयारी केली...

इकडे पायल
ने ही आज केस धुतले होते,
त्याची वेणी न करता मोकळेच सोडले होतें,
हिरवा सलवार घालून ती पण थोडी
जास्तच मटकली,

पहायला तशी सुंदरच होती,

लांब केस,
देहबोली ही चांगलीच ,
टपोरे डोळे,
नाक थोडं आखूड,
पण सरळ मुलीला शोभेल अशीच उंच,

ऑलओव्हर
कुणाच्याही नजरेत भरावी अशीच पायल आज दिसत होती....

पण आतून थोडी घाबरली होती,

एका अनोळखी ला आज भेटायला चालली होती,
दुरूनच बोललो होतो आज मात्र प्रत्यक्षात ते बोलनं होणार होते,
शेवटी खंबीर मनाने श्रीयांश ला भेटायला पायल घरून निघाली...

भेटायचं कुठे हा तर मोठा यक्ष प्रश्न दोघांपुढे उभा ठाकला होता,
शेवटी हॉस्पिटलमध्ये भेटायचं ठरलं....

हे हॉस्पिटल म्हणजे आता वेगळंच नाही झालं का???????
असं कधी रोमॅण्टिक ठिकाण तुम्ही तरी ऐकलं का??????

हॉस्पिटल याचसाठी की दोघेही या भेटीभेटण्याच्या दुनियेपासून अजून तरी फार लांब होते,
आणि
कोणता बाग बगीचा यांना माहिती नव्हता,
असता तरी तिथे भेटलेच नसते....
म्हणून हॉस्पिटल निवडलं...
कुणी ओळखीचे जरी भेटले असते तरी आलो होतो भेट घ्यायला,
अमुक टमुक भरती आहे असं सांगून मोकळं होता आलं असतं...

शेवटी एकदाची भेट झालीच....
दोघांच्याही नजरा एकमेकांपासून दूर होत नव्हत्या,
असं वाटत होतं की
आज इथे वरुण राजा बर्फ़ाचा किस या आज एक होणाऱ्या जोडप्यावर फुलांचा वर्षाव म्हणून पाडत आहे आणि
यांना जगाचे भान न राहता हे दोघेही एकमेकांत तल्लीन होऊन आपल्या दोघांची स्वप्न रंगवत आहेत...

आज इथे शब्द कमी आणि भावना बोलक्या झाल्या होत्या....
कुणाला काय बोलावे,
सुचतच नव्हते,
शेवटी या नयनचक्षु खेळातून जाग येत,
मुद्दामच पायल ने आपली नजर दुसरीकडे वळविली आणि
त्या प्रेमळ विश्वातून बाहेर येत बोलायला सुरुवात केली,

बरं श्रीयांश कसा आहे,
त्रासात गेले असतील न हे ४-५ दिवस,
कशी वाटली मी???
पाहायचं होत न तुला मला???

एकदम मस्त आहेस तू,
मी कल्पना केली त्याहीपेक्षा सुंदर आणि प्रेमळ,
असा हळूच प्रतिसाद श्रीयांश च्या तोंडून बाहेर आला,

कारण त्याच लक्ष तिच्याकडे अजून तरी होत,
त्याची नजर काही हटेना...
जसं तीच रूप तो आपल्या डोळ्यात स्वतःच सागर समजून साठवून घेत होता....

तुला उत्तर पाहिजे होत न तुझ्या प्रश्नाचं,
तर ठीक आहे
ऐक मग,
पायल ने बोलायला सुरुवात केली,
होय,,
मलाही तुझ्यावर प्रेम झालं आणि ते ही न पाहता,
तू कसाही असता तरी माझ्या मनात तूच आहे,
तुझ्या बोलण्यावर प्रेम झालं,
तुझ्या चांगल्या विचारावर प्रेम झालं,
शरीर तर नाशवंत असत,काही लोक रुपाला महत्व देतात,
पण मी तुझ्या मनावर प्रेम केलं,
म्हणून आज मी तुला भेटायचं ठरवलं....

पण?????

पण काय????
श्रीयांश चे डोळे पण मुळे थोडे किंचितच घाबरल्यासारखे झाले...

अरे मला स्पॉंडिलिटीज आहे म्हणजे मणक्याचा आजार एवढं या आजाराला भिण्याचं कारण नाही
पण मला यातला एक प्रकार एचएलए-बी27 हा आहे जो possitive आहे
जगातल्या खूप कमी टक्के लोकांना हा आजार असतो,
हा जिनेटिक आजार आहे एका पिढीला झाला तर नंतर तो सातव्या पिढीला होतो,आणि त्यात माझा नंबर लागला आहे यात माझी काही चूक तर नाही ना..
मनुष्याला मृत्यू वैगरे नाही पण एकदाच याचा त्रास वायला सुरुवात झाली की मग जीवनच
हे जगणं असह्य होऊन जाते,
मरणाला जवळ करणं सोपं वाटते एवढं या आजारात पाठीच दुखणं वाढत जाते,

बरा होतो पण पूर्णतः नाही इलाज आहे
पण महागडा खूप आहे,
म्हणून मी स्वतःला busy ठेवत असते नेहमी...

या पूर्वी एकदा असाच या आजाराचा attack म्हणजे त्रास झाला होता,
लहान होते मी,सहनशक्ती नव्हती तेवढी,
पण त्या आजाराने मरणार असच सर्वाना वाटत होते,
पण केला तो मी त्रास सहन,
आता कुठे ठीक आहे,
पण तो कधीही येऊ शकतो असा त्रास नेहमीच होत असतो,
लग्नानंतर मी मुल ठेऊ शकत नाही,
तुला मी मुलाचही सुख देऊ शकत नाही,
गर्भधारणेच्या वेळी माझ्या जीवाला सर्वात जास्त धोका पोहचू शकतो,
असं डॉक्टरांनी अगोदरच बजावून ठेवलं आहे
त्यामुळे माझं माझ्या दुखण्याचं ओझं मला वाटते तुझ्यावर पडू नये,
शेवटपर्यंत तुला त्रास होईल,

आणि आता लग्न ,
तर माझी इच्छा आहे तुझ्यासोबत शेवटपर्यंत अशीच हसत हसत जीवन जगायची,
तुझ्या प्रत्येक सुख दुःखात सहभागी व्हायची,
पण याला तुझ्या माझ्या घरचे परवानगी देणार का???

का नाही देणार परवानगी????
असा खोचक प्रश्न श्रीयांश नी केला,

अरे आपल्यात मोठा प्रश्न येतो तो म्हणजे जातीचा...(बोलताना यांनी पूर्वीच हा विषय निघाला असल्याने दोघांना ही माहिती होतं)

एका जातीची आपण असतो
तर सहज मान्य केलं ही असत आपण केलेलं लग्न,
पण आपण आहोत दुसऱ्या जातीचे,
आणि हे माझ्या,
तुझ्या घरचे सहजासहजी स्वीकारणार नाही,

तुलाचं म्हणतील,
दुसऱ्या जातीची पोरगी घेऊन आला तर आला वरून तिची बिमारी पण सोबत घेऊन आला,
लंगडीचं मुलगी भेटली होती का,
प्रेम करायला,
असे किती तरी टोमणे मारतील,
बोलता बोलता पायलच्या डोळ्यात कधी अश्रू येऊन गेले,
तिला ही कळले नाही....

मग सांग आता
श्रीयांश,
करणार का माझ्याशी लग्न,
करणार एका आजार असणाऱ्या मुलीशी लग्न????

श्रीयांश एकदम शॉक झाला,

काय बोलावे आणि काय उत्तर द्यावे,
सुचत नव्हते,

पायलच्या डोळ्यातील अश्रू पुसत,
मी येतो म्हणतं श्रीयांश निघून गेला...

निघून गेला तो पायलच्या डोळ्यात तिने विचारलेल्या प्रश्नांच उत्तर अर्धवट ठेवून,

पायल चं प्रेम घेऊन आणि
परत येणार की नाही असे खूप सारे प्रश्न पायलच्या मनात ठेवून श्रीयांश तिथून निघून गेला...

आता मात्र श्रीयांश च्या मनात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती,

एक तर पायल ची गोष्ट मनाला स्पर्शून गेली,
आणि तिच्याशिवाय जगणे आता मात्र शक्य होणार नव्हते,

शेवटी मनात निर्धार केला की,
मी प्रेम पायलवर केलं,
तिच्या मनावर केलं,
ती जशी आहे तशी मी तिला स्वीकारेल,
यासाठी घरच्यांचा विरोधही झाला तरी चालेल,
पण पायल शी लग्न करायचं,
आणि आपल्या प्रेमाला पूर्ण आकार द्यायचा...
वाटल्यास आपण घरच्यांना समजावून सांगू,
बोलून पाहू आपल्या प्रेमाविषयी,
पाहू काय होते तर????
हे विचार श्रीयांश च्या मनात सुरू होते,

इकडे पायलही श्रीयांश च्या उत्तराची वाट पाहत होती,
तिलाही कुठे करमेनासं झालं,
कारण ओढी आता प्रेमाची लागली होती,
जाती धर्म या सध्या तरी यांच्यासाठो गौण बाबी होऊन बसल्या होत्या...

बाबा,
माझं पायल या नावाच्या मुलीवर प्रेम आहे,
आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे???
पण???
ती आपल्या जातीची नाही,
तुम्ही परवानगी द्यावी म्हणून तुमच्यासमोर आज ही गोष्ट मी सांगत आहे,
तुम्हाला या विषयी माहिती करून दिली,
मग तुम्ही म्हणायला नको की याने सांगितलं नाही???
आजाराविषयी मुद्दामच लपवल होत,,
एवढं बोलून श्रीयांश शांत झाला,
तो बाबा काय बोलतील याची वाट पाहू लागला...

“काय????
दुसऱ्या जातीची नी धर्माची तू आमच्या घराण्याची सून बनवायला निघालास"??
प्रेम करायच्या पूर्वी विचार केला नाही का?????
की आपल्या घरी असं चालत नाही,
डोकं गहाण ठेवलं होतं का प्रेम करायच्या वेळेस???

चालता हो इथून,
माझ्या संपत्तीचा एकही भाग तुला हे कृत्य करशील तर मिळणार नाही,
बाबा मात्र संतापून बोलत होते...

श्रीयांश मात्र चूप बसून ऐकत होता,
तसाही तो ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हताचं,
कारण त्याला याची फार पूर्वी खात्री,
जाणीव झाली होती की लग्न काही केल्या हे करू देणार नाही....
पण निर्णय मात्र ठाम होता,
की लग्न करायचं ते पायल शी,
मग कोणत्याही संकटाशी दोन हात करायला मागे पुढे पाहायचं नाही...

इकडे पायलने ही आपल्या घरी श्रीयांश चा कॉल आल्यावर सांगितलं की मी तुझ्याशिच लग्न करणार आहे,
ही गोष्ट पायल नी आपल्या घरी सांगितली,
पण पायल ला ही तेच उत्तर मिळाले,

“तोंड काळ करून आली तिकडून,
दुसऱ्या जातीचाच भेटला होता का तुला,
की आमच्या तोंडावर काळ फेकायला चालली तू हे असं करून"...
हे शक्य होणार नाही,
आणि
तू जर एकटीने हा निर्णय घेतला तर अस समज की तू आमच्यासाठी कायमची मेली,
तुझा आणि आमचा कोणताच संबंध असणार नाही,

काय करावे सुचत नव्हते,...

बरेचदा श्रीयांश ने ही पायलच्या घरच्यांशी बोलून सर्व व्यवस्थित होईन यासाठी प्रयत्न केला,
तर त्याला ही अपमान सहन करावा लागला,
एवढंच नव्हे तर त्याला जीवे मारण्याची धमकी ही येऊ लागली,

पायल आणि श्रीयांश
मात्र आता मोठ्या पेचात अडकले होते,
प्रयत्न करूनही निराशा हाती लागत होती,
नेमकं केलं तरी काय होतं ,
प्रेमचं केलं न,

आणि प्रेम थोडी जाती, धर्म, रंग, रूप पाहून केलं जातं,
प्रेमात तर या गोष्टी गौण होऊन जातात,
मग एवढा नकार या लग्नासाठी का???

पायल-बर आपल्या नात्याला तुझं माझं घर,
कदापिही स्वीकारणार नाही???
इथे नाही जगता येणार सुखानं आपल्याला!!!
मरून निदान एक तरी होता येईल???
चल श्रीयांश आपण दोघही स्वतःला
संपवून टाकू???
बोलत बोलता पायलचा कंठ दाठुन आला,

श्रीयांश-हो हा उपाय छान आहे ग,
पण मग आपल्या प्रेमाचं काय???
आपण सोबत रहायची वचने घेतली
त्याच काय???
मरणाने जर समस्या सुटल्या असत्या न तर नक्कीच हसत हसत स्वीकारलं असत.. जे आत्महत्या करतात न ते भेकाड़ असतात....
आपण लढू,यांच्या विश्वाच्या वेगळं राहू,
पण परत तू असला बेकार विचार मनातही आणू नकोस!!!!

दिवसेंदिवस जात होते, शेवटी दोघांनी निर्णय केला,
पायल, आपण आता लग्न करायचं,
असं भावूक होत श्रीयांश म्हणत होता,

अरे पण घरच्यांच कसं,
ऐकतील नाही ते,
उलट मला आणि तुला त्रास होईल त्यांचा,
पायल ने भीती व्यक्त केली...
काय करणार शेवटी ठारचं करतील न मग आपण घाबरायचं का????
केले न मी प्रयत्न,
तू ही केले
आता यांच्या मानसिकतेत बदल नाही होत,
त्यात आपली काय चुकी,सांग बरं तू????
अरे हो पण???
पण वैगरे काही नाही,
बर आपण लग्न करायचं पाहू समोर जाऊन करतीलच न आपल्याला स्वीकार,आपल्या प्रेमाला स्वीकार,
असं म्हणत लग्न करायचं अशी शास्वती श्रीयांश ने पायल ला दिली...

शेवटी दोघांनीही ठरवलं की आता घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न करायचं,
आणि यांच्या नजरेआड होऊन आपण वेगळं विश्व निर्माण करायचा,
आणि सोबत राहायचं...

काही मित्र मैत्रिणी च्या मदतीने आणि
न्यायदेवतेच्या साक्षीने
पायल आणि श्रीयांश नि रजिस्टर मॅरेज असा विवाह केला,
अश्या तर्हेने
आज एकाच रंगाच्या रक्ताची असलेल्या
पण जाती धर्म यामुळे त्यांच्या रक्ताच्या रंगात फरक पडलेले प्रेमीयुगल
आज आंतरजातीय विवाहात विवाहबद्ध झाले...
घरच्यांच्या विरोधात जाऊन,

प्रेमाच्या नात्याला आज मात्र एक पती पत्नीचं नातं त्यांनी दिलं...

आयुष्यभर सुखदुःखात साथ देण्याची वचने देऊन,
ते विवाहबद्ध झाले...


दोघांनीही दुसऱ्या ठिकाणी घरच्यांच्या पासून खूप लांब राहण्याचा निर्णय घेतला,
आणि
आपला संसार सुरू करण्याचा विचार केला...

श्रीयांश नी थोडे जमा केलेले पैसे काही वेळ टिकतील एवढे होते,
म्हणजे संसार काहीतरी दिवस चालेल एवढे होते,
आणि
शासनाने आंतरजातीय विवाह केला त्यामुळे काहीअंशी आर्थिक मदतही ही मिळणार होती,

ती रक्कम भेटल्यानंतर मात्र
श्रीयांश ने ती पायल च्या नावे बँकेत जमा करून दिली...

नवीन शहर,

श्रीयांश ने एका कंपनी मध्ये जॉब मिळविला होता,
बी. ई. मेकानिक्स मध्ये झालं होतं...
घर सुरळीत चालेल एवढा पगार त्याला मिळत होता...

पायल ने ही
वैदक शास्त्राशी संबंधित शिक्षण घेतल्याने तिला एका चांगल्या दवाखान्यात कंत्राटी पद्धतीने जॉब मिळाला होता...

दिवसभर दोघेही आपापल्या कामावर जायचे,
वेळ मिळाला तर थोडं फोन वर बोलून घ्यायचे..

कधी सुट्टी असली तर मग मुद्दामच बाहेर फिरायला जायचं,जेवण करायला जायचं..
प्रेम केल्यानंतर या गोष्टी त्यांना काही अनुभवता आल्या नाही म्हणून दोघेही प्रेमाचा मनोसक्त आनंद लग्न झाल्यावर प्रेमी म्हणून लुटत होतें...
कधी थिएटर ला जायचे,कधी कॅडल लाईट डिनर,तर कधी नवीन मित्र बनलेल्या पार्टी मध्ये जायचं,अस सुट्टी असली की ठरलं असायचं...

पण या दोन तीन वर्षांत कधी यांच्या घरून फोन आला नाही किव्हा साधं विचारलं नाही कसे आहेत म्हणून...यांनी दोघांनी खूप प्रयत्न केला लग्न झाल्यानंतर की होईल सर्व ठीक,बोलवेल आपल्याला परत,करेल स्वीकार एकदिवस तरी,
पण दोघांच्याही प्रयत्नाला, भावनेला निराशाच हाती लागत होती...

पायल-श्रीयांश चल न रे आपण बरेच दिवस झाले बाहेर कुठे फिरायला गेलो नाही,
मनोसक्त फिरायचं आहे तुझ्यासोबत,
देव जाणे उद्या मी नाही राहिली,
किव्हा माझा त्रास सुरू झाला तर चालणेही अवघड होऊन जाईल...
मग का तू मला पाठीवर घेऊन फिरवणार आहेस का,अस मिश्कीलपणे पायल बोलली....

श्रीयांश-
हो नेईल न ग तुला पाठीवर बसवून,
तूच माझं जग असल्यावर तू काही जड नाही माझ्यासाठी,
जाऊयात आपण नक्की फिरायला,
असं होकारार्थी उत्तर श्रीयांश ने दिल...

आयुष्याची, लग्नाची दोन तीन वर्षे सुखात जात असताना,
पायल ला त्या स्पॉंडिलिटीस यातील एच. एल.ए.-बी27
अश्या दुर्धर प्रकाराने त्रास द्यायला सुरुवात केली,
दररोज तिला सकाळी उठताना,
चालताना त्रास वायला लागला,
पण श्रीयांश नी हिंमत हारली नव्हती,

तो तिची सर्व प्रकारे सुश्रुषा करत होता,
तिला प्रत्येक च कामात मदत करत असे...

एवढंच नव्हे तर तिला त्रास होईल म्हणून स्वतःहा तिची अंघोळ पण करून घालत होता,
केसांचा जुडा ही तोच बांधून देत होता...

कंपनी च्या कामावरून परत आला की तो पायल ला आपल्या हातानी जेवण बनवत असे,
एवढं करूनही श्रीयांश च्या चेहऱ्यावर थोडं ही दुःख दिसत नसे,
नेहमी पायल ला सुखी ठेवण्याचा प्रयत्न तो करत होता...
त्याला माहिती होतं आज ना उद्या हा त्रास पायल ला नक्कीच होणार,
म्हणून त्याने पायल शी लग्न करण्याचं टाळलं नव्हतं,
हिम्मत अजून सोडली नव्हती,

हर संभव प्रयत्न श्रीयांश पायल च्या
आजारासाठी करत होता...

पायल चा जॉब सुटला,
ती एकाच जागेवरची झाली,
अंथरुणावर खिळून बसली होती,
श्रीयांश ची एवढी दगदग पाहून पायल सारखी अश्रू गाळत असायची...

श्रीयांश तू एवढी माझी काळजी करतो,
सेवा करतो,
तरी तुझ्या चेहऱ्यावर दुःख कस का नाही रे????
मी फक्त ओझं झाली आहे,
कर ना मला या त्रासातून मुक्त???
चूप राहा पायल,
तोंडावर हात ठेवत त्याने पायल ला चूप केलं,
असं काही बोलू नको न ग....
तुझ्यासाठी च करतो मी,
तूच दिली आहे मला सुख दुःखात साथ,
मग मी नको द्यायला का????
श्रीयांश ने कमीच बोलत आपलं बोलन थांबवलं...

शासनाने आंतरजातीय विवाह केल्याची आर्थिक मदत,रक्कम पायलच्या आजारावर संपली होती,
तरी श्रीयांश एखाद्या वृक्षाप्रमाणे किव्हा एकाद्या पहाडासारखा तटस्थ उभा होता,
पायलच्या पाठीमागे...

एक दिवस रात्रीच्या वेळी अचानक पायल ला जास्तच त्रास वायला लागला,
श्रीयांश तिची औषधे घेण्यासाठी मेडिकल स्टोअर मध्ये आणण्यासाठी गेला,
औषधी घेऊन परत येतांना,
रस्त्यावर अंधार असल्याने भरधाव येणाऱ्या ट्रक ने श्रीयांश ला धडक बसली,आणि श्रीयांश चा देह कुठच्या कुठे रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडून होता,
ही बातमी पायलच्या कानावर कळताच,
तिच्याही शरीरात श्रीयांश साठीचं असलेला थोडासा प्राण श्रीयांश च्या मृत्युने,
तिच्या शरीरातून पण उडून गेला...
दोघांचीही शरीर निपचित पडली होती...

नियतीने घात केला,
प्रेमीयुगलाचा जीव गेला,
ना जातीची बंधने आड आली होती
यांच्या प्रेमाला,
ना ही कसला क्लेश मनी उरला होता,
एक मनी तुटून पडला तर,
दुसराही त्याशी सोबत आला
नियतीने घात केला,
प्रेमी युगलाचा जीव गेला...

आज दोघांचीही शरीर अग्नी देण्याची वाट पाहत होते,
इथे या जन्मात जातीने आपल्याला घरच्यांनी दूर लोटले,
माझ्या आजाराने तुला सुखी ठेवले नाही,
या जन्मात आपली प्रेमकहाणी अधुरी राहील,
पण पुढल्या जन्मात
पायल आणि श्रीयांश एकत्र होऊन कहाणी पूर्ण होईल
या आशेने अग्नी देण्याची वाट पाहत होते...

शेवटी मित्रांनीच त्या दोन्ही प्रेमी आत्म्यांना अग्नी दिला...
दोन्ही प्रेमीयुगल अग्नीच्या अश्रूधुरासोबत त्यांच्या आत्म्यांचे मीलन एक होताना दिसत होते...

💐 समाप्त💐
टीप-
कथा लिहिण्याचं हेच की,आंतरजातीय विवाहाला आज शासन प्रोत्साहन देत,अश्या जोडप्याना आर्थिक मदत देते,ती यासाठी की जात धर्म यांची समाजात रुजलेली पाळेमुळे नष्ट व्हावी...
पण आपला समाज स्वतःला सुशिक्षित म्हणून घेऊन सुद्धा अडाणी चं राहिला आहे,
म्हणून तो अश्या आंतरजातीय विवाहाला आजही मोठ्या प्रमाणात विरोध करत असतो...प्रेम हे व्यक्तीवर केल्या जाते,मग हा जात धर्म का आडवा यावा...भावनेपेक्षा ही जात धर्म महत्वाचे झाले आहेत का...????
आज तर पायल आणि श्रीयांश च्या घरच्यांनी या विवाहाला सहमती दिली असती तर पायल ज्या आजाराने बळी पडली कदाचित तिची चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचार केला असता तर तिचा जो जीवनकाल आहे तो वाढला असता,पण आर्थिक अडचण असल्यामुळे पायल चा इलाज होऊ शकला नाही शेवटी तिला त्या आजाराने एवढं ग्रासलं की अंथरुणाला खिळून बसावं लागलं...
सर्वच आईवडील विरोध करतात असं नाही तरी पालकांनी त्या मुलाची चौकशी करून,आपल्या मुलीला सुखी ठेऊ शकतो की नाही एवढं पाहून मग कोणत्याही जातीच असल्यास परवानगी द्यायला पाहीजे... ही कथा जरी असली तरीपण वास्तविक जीवनात ही कितीतरी प्रेमीयूगल लग्न होत नाही ते फक्त या जातीमुळे म्हणून स्वताला संपवून टाकतात,आत्महत्या करतात,मुलांच्या प्रेमाचा भावनिक विचार करून आईवडील यांनी परवानगी द्यावी आणि आपल्या अपत्याला सही सलामत ठेण्याची काळजी घ्यायला हवी...
दुसरा मुद्दा हा की या अश्या आजार असलेल्या व्यक्तींना मायेचा आधार दिला तरी बर वाटत असते,
स्पोडिलिटीस हा दुर्धर आजार जरी नसला तरी त्यातील
HLA-B27 हा जगातील काहीच ८-१५ टक्के लोकांना असतो,ज्यात शरीर पूर्णपणे व्याधीग्रस्त होते,ज्यात त्रास वाढून शरीर ही निकामी होऊ शकते...अश्या आजारांवर योग्य आर्थिक खर्च करून उपाय केल्यास पूर्णतः नाही पण त्या आजारीत व्यक्तीचा जीवनकाल काही वर्षे अजून वाढवता येईल...या रोगाशी ही वाचकांनी जागरूक वावे हा या कथेचा दुसरा मुद्दा होता...
कथा कशी वाटली ते आपली
“एक अधुरी प्रेम कहाणी"या कथेवर प्रतिक्रिया द्यावी हीच माफक अपेक्षा...

आपलाच
सुरज मुकींदराव कांबळे
मु.पोस्ट-शेकापूर मोझरी
तह-हिंगणघाट
जिल्हा-वर्धा
मोबा-9890237879