June 29, 2061 - Black Night - 15 in Marathi Horror Stories by Shubham Patil books and stories PDF | २९ जून २०६१ - काळरात्र - 15

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

२९ जून २०६१ - काळरात्र - 15

पाण्याचा भरलेला तो ग्लास हातात घेत सारंग खिन्नपणे हसतच हंसीकाला म्हणाला, “तुला माहितीये का? मी माझ्यासाठी काही चॉइस बनवल्या होत्या. ज्यांच्यासोबत मी आता इथे अडकलोय. बघ, आता मी... मी ह्या चॉइस सोबत इथे अडकलोय. मी त्या मेलेल्या मांजरासारखा आहे. बरोबर ना? ही संपूर्ण रात्र आपण चिंता करतोय. आता मी इथे ह्या विश्वात अडकलोय आणि माझ्यासोबत तूसुद्धा. हे दुसर्‍या विश्वातले आपलेच लोकं बघ कसं वागताय? आपलं एक डार्क व्हर्जन असतं असं आपण म्हणतो आणि हे बघ....”

त्याचं बोलणं सुरू असतानाच त्या दोघांना किचनमधून जोरजोरात आवाज यायला लागले. अनि निलीमाला मारत होता बहुतेक. तिच्या रडण्याचा आणि किंचाळण्याचा जोरात आवाज येत होता आणि अनिचा जोरजोरात आणि परत परत तू मला का सांगितलं नाहीस? असा आवाज येत होता.

सारंग, आर्या आणि हंसीका निःशब्द होऊन एकमेकांकडे बघत होते. तेवढ्यात अचानक दरवाजा उघडण्याचा जोरात आवाज झाला आणि बाहेरून एक सारंग आत आला. हुबेहूब आपल्या सारंग सारखा. त्याच्या गळ्यात हिरव्या रंगाची ग्लोस्टिक अडकवली होती. कुणाला काही कळण्याच्या आत त्याने सारंगला खुर्चीवरून ओढलं आणि बेदम मारहाण करायला सुरुवात केली. हंसीका आणि आर्याला तर काहीच कळत नव्हतं. पण धीर एकवतून हंसीका जोरात ओरडली, “पटकन या. घरात कुणीतरी घुसलंय.”

गळ्यात हिरवी ग्लोस्टिक असलेला सारंग जेव्हा सारंगला मारत होता, तेव्हा मारता मारता अचानक त्याचे लक्ष मार खात असलेल्या सारंगच्या चेहर्‍याकडे गेलं. त्याने त्याच्याकडे चमकून बघितलं. सारंगलाच सारंग मारत होता. मारत असलेला सारंग थांबला आणि परत जायला मागे वळला. तोपर्यंत हंसीकाचा आरडाओरडा ऐकून सर्वजण हॉलमध्ये आले होते. त्यांनी जमिनीवर बेशुद्ध झालेला सारंग आणि दरवाज्यात घाईत खाली पडलेली हिरवा रंगाची ग्लोस्टिक उचलत असलेला सारंग बघितला. हिरवी ग्लोस्टिक उचलून सारंग आल्यापावली पळून गेला. सर्वजण त्या प्रकरकडे बघतच राहिले. इकडे सारंगला बेशुद्ध पडलेला बघून रचनाने टाहो फोडला. त्याला अशा रक्तबंबाळ आणि बेशुद्धवस्थेत बघून ती धाय मोकलून रडू लागली.

शौनक परिस्थितिचं भान ओळखून तिला आवरायला गेला. पण ती जोरजोरात रडत होती. अनि आणि नीलिमा तर सारंगला हातच लावू शकत नव्हते. सक्षम सर्वतोपरी त्याला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करत होता. सारंगचा रक्तस्त्राव बंद व्हावा म्हणून आर्या औषध वगैरे आणायला बेडरूममध्ये गेली होती. रचना शांत बसत नाही हे बघून नीलिमा तिला शांत करण्यासाठी तिच्याजवळ गेली तर रचना तिच्या अंगावर धावून गेली आणि रडतच जोरात ओरडली, “ब्लडी बीच, तुझ्यामुळे झालं हे सगळं. मी तुला सोडणार नाही.”

तिचा असा अवतार बघून अनिने निलीमाला आवरायला सुरवात केली आणि शौनकने रचनाला. सर्वजण जोरजोरात भांडत होते. कुणीच कुणाचं ऐकून घेण्याच्या परिस्थितीत नव्हतं. एकमेकांना घाणेरड्या शिव्या देणं सुरू होतं. आर्या आणि सक्षम सर्वांना शांत बसा म्हणून सांगायला गेले तर अनि आणि रचना त्यांच्यावरच उलटले. परत एका मोठ्या भांडंणाला सुरुवात झाली. यज्ञकुंडात तूपाची आहुती टाकल्यावर अग्नि ज्याप्रमाणे भडकतो, त्याचप्रमाणे अतिशय जोरात भांडणाला सुरुवात झाली. कुणीही कुणालाही मारत होतं. बेशुद्ध पाडलेल्या सारंगकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. इकडे रचनाने केलेल्या हल्ल्यामुळे निलीमाच्या नाकातून परत रक्त यायला सुरुवात झाली होती. पण सर्वजण भांडण आणि मारामारीत व्यस्त असल्यामुळे त्यांना कशाचीही पर्वा नव्हती. थोडक्यात काय तर तिथे यादवी मजली होती. आपापसांत लढत होते ते आणि आपापसांत लढून त्यांनाच संपवणार होते.

विषण्ण आणि रिकाम्या मनाने हंसीका ते दृश्य बघत होती. ते सर्वजण तिचेच होते आणि तिचे नव्हतेसुद्धा.....

तिने मनाशी काहीतरी निर्णय घेतला आणि दरवाज्याकडे जाऊ लागली. तिला आसं जाताना बघून शौनकने तिला आरोळ्या मारल्या, “हे हंसीका, कुठे चाललीस तू? हंसीका... हंसीका...”

हंसीकाने मागे वळून बघितले नाही. तिला जणू ऐकूच आले नव्हते. तिने शांतपणे दार उघडले आणि बाहेर पाऊल टाकले. परत एकदा तिने घरात वळून बघितलं. तिला काही क्षणांपूर्वी आरोळ्या मारणारा शौनक परत भंडायला लागला होता. सर्वजण एकमेकांचे हाडवैरी असल्यासारखे भांडत होते. हंसीकाने सर्वांकडे एकवार नजर फिरवली आणि दरवाजा बंद करून बाहेर पडली. दरवाजा बंद करताना तिचं लक्ष गेलं तर तिथे एक कगद चिकटवला होता. त्यावर काही असे लिहिले होते,

हॅलो, आम्हाला पाच मिनिटांसाठी तुमचा फोन हवा आहे. एक अर्जंट कॉल करायचा होता. धन्यवाद...

हंसीकाने तो कागद काढला आणि घरात सरकवून दिला.

हंसीका गेटच्या बाहेर आली. बाहेर नेहमीसारखा काळोख होता. विचित्र आणि भयाण शंतत पसरलेली होती. काही स्ट्रीट लाईट्स सुरू होते. त्यांचा पिवळा प्रकाश पडला होता. चालताना हंसीकाच्या पावलांचा टप टप तेवढा आवाज शंतता भंग करत होता. हंसीका निघाली तर होती खरी पण पुढे काय वाढून ठेवले आहे? हे तिलासुद्धा माहिती नव्हते. ती आता तिच्या मूळ विश्वात जाऊ शकणार नाही, हे तिलासुद्धा ठाऊक होते. थंडी बर्‍यापैकी जाणवू लागली होती. घरातून निघताना ती तिचा कोट आणि मफलर घ्यायला विसरली होती. पण काहीही फरक पडणार नव्हता. कारण इथून पुढे ती कुठल्याही विश्वात गेली तरी तिचा पोशाख तोच असणार होता. त्यामुळे तशी चिंता तिला नव्हती.

रस्त्यावर समोर एक काळोखी जागा होती, त्या जागेतून ती पुढे गेली. तिथे तिला ‘मृगजळ’ नावाचं एक घर दिसलं. ती गेटमधून घरात जाणार तोच तिला खाली एक बॉक्स ठेवलेला दिसला. तो तिने उघडून पहिला. त्यात एक टेडी बिअर आणि एक पाकीट होते. तिने ते सर्व तसेच ठेऊन दिले. चेहर्‍यावरची नाराजी अजून वाढली. ती परत रस्त्याला लागली. काळोखतून पुढे गेली. एका घरच्या खिडकीतून डोकावून पहिलं, तिथे हंसीका डोक्याला हात लावून बसली होती. तिच्या नाकातून रक्त येत होतं. असं दृश्य बघून ती मागे वळली आणि पुढच्या घरचा रास्ता धरला.

त्या घराच्या खिडकीतून डोकावून बघितले तर तिथे सर्वजण जोरात भांडत होते आणि ती एका कोपर्‍यात उभं राहून शांतपणे सर्वांची गंमत बघत होती. तिने परत पुढच्या घराकडे मोर्चा वळवला. तिथे तिने पहिले की दोन सारंग एकमेकांच्या बाजूला खुर्चीवर बांधून ठेवले आहेत. पैकी एकच्या गळ्यात लाल आणि दुसर्‍याच्या गळ्यात हिरवी ग्लोस्टिक आहे. ते दोघं सारंग एकमेकांकडे बघत होते. त्यांच्या तोंडात कापडाचे बोळे कोंबले असल्याने ते एकमेकांकडे फक्त बघत होते. हंसीका हे दृश्य बघून पटकन तिथून निघाली आणि मार्गाला लागली.

पुढच्या घरातील खिडकीतून तिला दिसलं की, घरात आनंदात पार्टी सुरू आहे. शौनक आणि रचना एकमेकांच्या बाजूला बसून हास्याविनोद करताहेत आणि एकमेकांना वाईन शेअर करताहेत. ते दृश्य बघून तिला खूप दुःख झाले आणि तिच्या डोळ्यांतून आसवे गळू लागली. पण तरीही ती ते दृश्य बघतच होती. पण जेव्हा तिने बघितले की रचना आणि शौनकने वाईन ग्लास खाली ठेऊन सोबत डान्स करायला सुरुवात केली तेव्हा मात्र तिला संताप अनावर झाला. ती अश्रु पुसत जोरात पळत तिथून निघाली.

पुढे अजून काही घरं फिरल्यावर तिला असंच काहीतरी विचित्र आणि वेगळं दिसू लागलं. कुठे नीलिमा आणि आर्या मिळून केटमाइनचं इंजेक्शन घेत होत्या, कुठं सारंग संतापात वाईनच्या बॉटल फोडत होता, कुठं शौनक आणि अनि भांडत होते तर कुठं तीन सारंग एकमेकांना मारत होते. ती हताश होऊन एकेक विश्व फिरत होती.

हंसीका तिच्या मनासारखं विश्व शोधात होती. जिथे शौनक तिच्यावर निर्व्याज प्रेम करत असेल, ते आठही जणं अगदी जीवश्च कंठश्च मित्र असतील. अशा विश्वाच्या शोधत ती होती. तसे विश्व कदाचित अस्तीत्वात असेलही. पण सुमारे पन्नास लाख अडतीस हजार आठशे अडतीस विश्वात तिचं मूळ आणि तिला हवं असलेलं विश्व सपडणं म्हणजे केवळ अशक्यप्राय गोष्ट होती. आता देवावर भरोसा ठेऊन ती एकेक विश्व बघत चालली होती. देवावर म्हणजे अनंत विश्वंच्या उत्पत्ति, स्थिति आणि लायचे एकमात्र कारण असलेल्या देवाच्या मनात जसं असेल तसं होऊ देत असं तिने तिच्या मनाला समजवलं होतं.