She __ and __ he - 19 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | ती__आणि__तो... - 19

Featured Books
Categories
Share

ती__आणि__तो... - 19

भाग__१९


{सकाळी}

सकाळी राधा तीच आवरुन...कान्हाच्या मूर्तीजवळ हात जोडून उभी होती..आणि प्रार्थना करत होती....



राधा__ कान्हा...बरेच दिवस झाले तुझ्याशी बोलताच नाही आल...सगळ तस नीट चालू आहे..पण..ही सोना जी रणजीतच्या आयुष्यात होती ती कुठे आहे? काय झाल तीच?...मला ना हें समजल्याशिवाय चैन नाही पडणार ना...प्लीज कान्हा तू हेल्प कर ना मला...काहीतरी मार्ग दाखवा...आणि रणजीतला सोना बद्दल विचारायची हिम्मत मला दे...कारण त्यांला राग येतो अस विचारल की मग तो चिडला ना कि माझी बोबड़ीच वळते😅☹️प्लीज कान्हा तू हेल्प कर ह मल....हम्म चल मी निघते आता...बाय..!!🙏



राधा खाली येते सगळे जण कसली तरी चर्चा करण्यात बिझी होते...राधा ही येऊन खाली बसली...



सुमन__ आलीस राधा बस...मी तुझा टिफिन घेऊन येते....



राधा__ आई मी घेते हो



सुमन__ असुदे ग बस...



सदाशिव__ आ...रणजीत राधा....बोलायच आहे जरा तुमच्याशी.....



रणजीत__ हम्म बोला ना बाबा...



सदाशिव__ अरे आता झाले तुमच्या लग्नाला ३,४ महीने आता हनीमूनला जाउन या....



रणजीत__ काय......



राधा__ काय....😣



महेश__ काय झाल दोघांना...



रणजीत__ आ काही नाही...बाबा हे क़ाय नवीन हनीमूनच...



सदाशिव__ का रे...यात नवीन काय आहे..खरतर अधिच जायला हव होत तुम्ही...पण आसो..आता जाउन या...



रणजीत__ बाबा काम खुप आहेत...आता कस



राहुल__ जीत...बस झाल ह मी आहे ना इकडे बघतो काम सगळी तुम्ही जाउन या....



राधा__ दादा पण मला ही जास्त सुट्टी घेता नाही येणार....



सुमन__ अस आहे तर मल एक कल्पना सूचली...आहो आपण यांना एकांत मिळावा आणि फिरता याव म्हणून पाठवतोय ना....



सदाशिव__ हो मग....



सुमन__ आहो मग जवळ कुठेतरी पाठवू ना...बाहेर गावी जायला हवः अस काही नाही...नंतर जीत निवांत झाला की जातील ते नाही का...आणि आता जवळ कुठेतरी जाउन २,४ दिवस राहतील मग येतील...कस म्हणजे जास्त वेळ ही जाणार नाही...मज्जा ही करता येईल यांना..



महेश__ वा...सुमन चांगली कल्पना काढली...



सदाशिव__ हो...



रम्या__ मस्त काकू...👌



रणजीत__ ह्म्म्म...ठीके आता तुम्ही बोलताय तर....



राधा__ हम्म...मला ही चालेल...२,४ दिवस मी काढू शकते सुट्टी....



रम्या__ आता ठरवा कुठे जायच ते...मी काय म्हणते map आना आणि डोळे बंद करून बोट ठेवा जिकडे बोट थांबल ती जागा नक्की करा...😃 काय....



रुता__ मम्मा....मी आनला sap जीत काका...काकू हे घे...



राधा__ थांक्यु...बबडू...आणि बच्चा sap नाही map...ह्म्म्म😚



रुता__ ओके काकू...😚



रम्या__ राधा कर डोळे बंद....अन ठेव बोट...



राधा डोळे बंद करते आणि एका जागेवर बोट ठेवते...डोळे उघडून बघते तर...कोल्हापुर निघते....रणजीत कोल्हापुर नाव बघून थोड़ा उदास होतो...



राधा__ अरे वा...कोल्हापुर....मी फीरलेच नाही कधी कोल्हापुर....☺️



सुमन__ अग आपलच गाव आहे...दूसरी जागा निघायला हवी होती पण ठीके...तू फिरली नाहीस ना...मग जाउन या...आणि तस ही कोल्हापुर पण फिरन्यासाठी खुप भारी आहे बाळा...खुप जागा आहेत तुला तिकडे फिरण्यासारख्या...😃



सदाशिव__ हो जाउन या...



महेश__ हो...जा उद्याच निघा...मी आपल जे तिकडे फार्म हाउस आहे ते साफ करायला सांगतो...ठीके...



माधवी__ हो..



रणजीत__ बाबा....कोल्हापुर....



राधा__ (मनात)...रणजीत नकार का देतोय..तो पन तर खुप वर्षानी जातोय ना कोल्हापुरला...मग.....अरे हो....कोल्हापुर..रणजीतच गाव...तिकडेच सोना होती...मला अस वाटत आहे की तिकडेच गेलो कि समजेल..आणि मला रणजीतशी बोलताही येईल....



सदाशिव__ अरे जा ना...त्यात काय...



राधा__ (केविलवाना चेहरा करून).....अब..रणजीत जाऊया ना...प्लीज....प्लीज...रणजीत....☹️😚😚



रणजीत__ (मनात).....राधा कस सांगू ग तुला....माझ गाव असूनही मी तिकडे इतक्या वर्षात गेलो नाही...आणि आज.......प्लीज नको ना हट्ट करूस...समजून घे ना...तिकडे गेलो तर पुन्हा जुन्या आठवणी समोर येतील...पण तुला ही काहिच माहित नाही म्हणा...तुझी काय चूक....पण काय करू...राधा असा चेहरा करतेय की नाही म्हणावस वाटत नाही आहे...शीईई यार काय करू.....(तिच्या डोळ्यातील भाव बघून)....मला राधासाठी जावच लागेल...रणजीत विसर आता सगळ..काय सांगितला होता तुला लग्नात बाबा आणि काकानी..राधा आता तुझी बायको आहे...तुझी जबाबदारी आहे....हूहू...



राधा__ रणजीत......



रणजीत__ आआ ह ठीके जाउया....☺️पैकिंग कर हम्मम..



सगळे तसे खुश होतात आणि राधाही आनंदी होते...कारण तिला जे हव तसाच घडत होत...राधाला आता कोल्हापुरला जाण्याची उत्सुकता लागली होती...पण रणजीतच्या मनात एक वेगळीच भीती होती...राधाला खुश बघून तो ही आनंदी होताच पण एक अनामिक भीती होतीच....


******************************



रात्री रणजीत पैकिंग करत होता...पण मॅडम कपाटाकड़े बघत विचारात हरवल्या होत्या...रणजीतला आधी समजलच नाही की नक्की राधाच चालय काय...🙄



राधा__ (स्वतःशी बोलात).....आहह😣 कोणते कपड़े पैक करू...कुर्ते-लेगीज करू..नको नको फिरायला जातोय ना...मग ड्रेस काय🙄साड़ी....त्याच तर विचारच नको करायला🙄😣काय करू....(कान्हाच्या मूर्तीला बघत)....हे कान्हा काय पैक करू सांग ना🙄 मला...



रणजीत मधेच जोरात हसतो...त्याच हसन बघून राधा चिड़ते😂😡



राधा__ हसतोयस काय बटाटया😡☹️😏



रणजीत__ (हसत).....अग..😂 तू कान्हाला का विचारतेस काय कपङे घेऊ म्हणून...ते बोलणार आहेत का...वेडी...



राधा__ हो कान्हा माझ्याशी बोलतो..😏😡



रणजीत__ बर बाई...पण काय झाल तुझ मला विचार मी हेल्प करतो...



राधा__ मी कोणते कपड़े पैक करु मला कळतच नाही आहे....☹️😣



रणजीत__ अग...४ दिवस तर जातोय आपण...मग तू कुर्ती,ड्रेस,त्यानुसार पैक कर...एक एक दिवसासाठी....ह्म्म्म



राधा__ हा ओके...😃

रणजीत__ माझ झालय...तू कर पैकिंग...



राधा__ ह...




राधा तिची बॅग पैक करते...तिला हवे असलेले सगळ सामान ती घेते..तिच्या मनातून अजुन कालचे विचार गेले नव्हते...मग ती बेडवर पड़ते,पडल्यावर तिला लगेच झोप लगते...



मध्यरात्री अचानक तिला एक स्वप्न पड़त...स्वप्नात तिला दिसत की तिच्यासमोर रणजीत एका मूलीबरोबर तिला सोडून जात होता...राधा रडत होती आणि रणजीतच्या मागे पळत होती..त्याला आवाज देत होती अडवण्याचा प्रयत्न करत होती...अचानक रणजीत कुठेतरी गायब झाला...



राधा झोपेतुन घाबरून उठली...बाजूला रणजीत आहे का ही खात्री केली...कान्हाच्या मूर्तीला हात जोडले..अन ती पुन्हा बेडवर पडली...



राधा__ (मनात)......का अस स्वप्न पड़ल मला...यचा अर्थ काय..? ती मुलगी कोन होती?? रणजीत माझ्यापासून दूर जाईल का?...आम्ही कोल्हापुरला जातोय खर पण..एक वेगळीच भीती माझ्या मनात आहेच..रणजीत माझ्यापासुन दूर गेला तर......नाही...शीईई मी उगाच इतका विचार करतेय...



राधाच्या मनातून हे काय जात नव्हतं...सारख तिला तिने डायरीमध्ये वाचलेले त्यांचे क्षण आठवत होते..तीला सारख ते इमैजिन होत होते...अस्वस्थ वाटत होत...रात्रभर ती कुस बदलत होती...


**************************



सकाळी रणजीत लवकर उठतो...पण राधा अजुन उठलीच नव्हती...रणजीत आंघोळ करून बाहेर आला तरी राधा बेडवर लोळतच होती...😂



रणजीत__ बापरे...रेडिओ अजुन उठली नाही...रोज तर माझ्या आधी उठते...आम्हाला लेट पण होतोय हिला आता मलाच उठवायला लागेल...पण🙄 हिला मी हात लावलेल आवडत नाही ना....हः उठवायला तर लागणार..हनीमूनला जातोय ना आम्ही..😂 हनीमून😏 कसल काय.....हह...असो..



रणजीत राधाला आवाज देतो पण तीं उठत नाही...चुळबुळ करत राहते...इकडे रणजीत तिला हाका मारून वैतागला...😂 पण ही लेडी गागा काय उठायला तयार नव्हती...😂मग फाइनली रणजीत राधाला जोरात आवाज देतो आणि तिला उठवून बसवतो....



रणजीत__ राधा.....



राधा__ (चुळबुळ करत).....आआ हह😖😣



रणजीत__ हुशहह...फाइनली उठलीस बाबा....



राधा डोळे चोळत बघते तर रणजीतने तिच्या कमरेला पकडल होत...आणि हात धरले होते....



राधा__ (त्यांला दूर करत)....ए बटाटया...काय चान्स मारत होतास का माझ्यावर...😡😖




रणजीत__ तुझ्यावर...चान्स...ह😂😏 चेहरा बग आरशात...गब्बर...उठ चल...वाजलेत बग किती..आवाज देऊन दमलो म्हणून हात लावला तुला..



राधा__ बर...तरी ही तू मला हात लावलेल मला आवडत नाही...ईसस मला आता पूर्ण अंगाला इचिंग होतय..😖😏



रणजीत__ ओय...मी काय हाताला खाजेची पावडर नव्हती लावली की तुला इचिंग होतेय...जा आता अवार..हनीमूनला जायच ना आपल्याला😂🤣 जा..लेडी डॉन...



राधा__(बाथरूममध्ये जाताना).....ह 😏....



रणजीत__ वेडी...😃😚चला जरा रेडिओवर गाणी लावतो आणि आवरतो...



रणजीत रेडीयो ऑन करतो...आणि सॉन्ग्स ऐकत आवरतो...राधा ही बाथरूम मधुन बाहेर येते...आणि बाल्कनीमध्ये जाउन तिची ओली केस पूसत होती...आवरताना आरशातून रणजीतच लक्ष राधाकडे गेल...तिचा तो गोरापान चेहरा..ओठांवरील तीळ..तिची लांब ओली केस...त्यांला हे सगळ भूरळ पाडत होते..तो आरशातुन चोरुन तिला पाहत राहिला...तोवर एक सॉन्ग रेडिओवर लागल....



📻🎶


बेसुरे दिल ने सुर खनका दिए..
इश्क के मोती है छनका दिये..
अब उड़ रहा हु जैसे रंगीन बुलबुला...
नाद खुला नाद खुळ...
हाय हाय लग गया रे इश्क का Naad Khula...♥️


इश्काची रीत माझी, मोलाची प्रीत माझी...
तूच रे तूच रे..जीव माझा तुझ्यात रे...♥️


📻🎶



राधा__(त्यांला बघत).....ओय...आता नाही जायच का हनीमूनला😏 मगाशी तर मला घाई करत होता...काय बघत बसलायस रे इतका...🙄



रणजीत__ आआआ...ऊन...अग पावसाच्या महिन्यात पण किती ऊन आलय नाही...ते बघत होतो...😅



राधा__ बर....आवर आता...



रणजीत__ ह...बर माझ आवरुन झालाय..मी खाली जातो..तू चेंज वैगेरा कर तुझ आणि ये हम्म...



राधा__ हम्म...


****************************



रणजीत आणि बाकीचे सगळे खाली बसलेले असतात...पण राधा अजुन आलीच नव्हती☹️🤣



रणजीत__ राधा पण ना...कुठे राहिली...वहिनी तिला बोलवायला गेली आणि आलीच नाही...



राहुल__ हो न..बग चार बायका एकत्र आल्या की लेट होणारच..इथे तर या दोघिच आहेत पण दहा जनाना भारी पडतील अशा.मग..🤣😂



रणजीत__ पॉइंट आहे😂🤣



सुमन__ गप्प बसा रे..तुम्ही दोघा ना नुसत माझ्या पोरीना बोलात बसता...रेवू पण उगाच नाही चिड़त तुमच्यावर..🤣बर झाल तुझा निरोप घेऊन ती कोलेजला गेली..नाहितर तिला ही सोडली नसतीस तू...😂



माधवी__ हो ना...ही पोर म्हणजे काय म्हणावे...😂चल ग सुमन आपण किचनमध्ये जाऊ...



सुमन__ हो चला...



रणजीत__ बाबा आणि काका..ऑफिसला गेले का...



राहुल__ हो आज तू नाहीस सो लवकर गेले...मी ही जाइन आता...



रणजीत__ हम्म..काय लागल तर प्लीज मला कॉल कर...



राहुल__ ओके बाबा...



रुता__ जीत काका....काकू आणि मम्मा कुठे गेली...आणि तू आणि तुझी बाइफ कुठे जाता...



रणजीत__ मी आणि माझी बाइफ हनीमूनला चालो...बूम....फिरायला...



रुता__ अश आहे तल...म्हणजे तुम्ही येताना बेबी घेऊन येणार ना.....😃 तुमचा बेबी...



रणजीत__ काय म्हणजे....🙄



राहुल__ बबडू..काय...



रुता__ अले काका..विनय काका आणि तू त्या दिवशी बोलत होता ना..हतीमूनला जाउन बेबी घेऊन येतात लोक...मग तुम्ही पण आता हतीमुनला जातय ना...मग बेबी आनार तुमी...हो ना काका😃



राहुल__ जीत काय बोलते ही...काय शिकवतोस रे माझ्या लेकीला🙄😂🤣🤣



रणजीत__ दादा...अरे त्या दिवशी मी आणि विनय असच गप्पा मारत होतो आमच काय तरी टॉपिक चालू होता तेव्हा हिने एकल असनार😂 बबडूना खरच...🤣बेबी म्हणे...एकतर ती राधा मला तिच्या......(मधेच थांबून)



राहुल__ काय... तिच्या...



रणजीत__ नथिंग....😅




राहुल__ बर माझ्या पोरीसमोर अस काही बोलात जाऊ नकोस...🤣😂 अरे ४ वर्षाची आहे ती ओन्ली...



रणजीत__ हम्म🤣भयानक आहे बबडू...



रुता__ आले...राधा काकू आली......(तिच्याकडे पळत जात)



रणजीत नजर वळवून पाहतो तर आज राधाने...फूल हैंडची गुडघ्याएवढी यलो कलरची फ्रॉक घातली होती..त्यावर फ्लॉवर प्रिंट होती...केसांची मेझी पोनी बांधली होती..केसांच्या दोन बटा चेहऱ्यावर आल्या होत्या...दोन्ही हातात दोन-चार अशा हिरव्या बांगड्या होत्या...गळ्यात छोट तीन पदरी मंगळसूत्र आणि रणजीतने गिफ्ट दिलेली चैन होती...डोळ्यात हलकी काजळ लावली होती..ओठांवर पिंक लिप बाम लावल होत..लाइनरने कपाळावर छोटी टिकली लावली होती...आणि पायात व्हाइट शूज घातलेले...!!



Without मेकअप ही ती अद्भुत दिसत होती....आज रणजीतला राधाच हे रूप ही दिसल होत..आणि आवडल ही होत...!!



सुमन__ राधा...अग किती गोड़ दिसतेस...



माधवी__ हो न...



रम्या__ आई,काकू आहो तिला अस वाटत होत की असे कपड़े तुम्हला आवडनार नाही...🤣म्हणून घाबरत होती...



सुमन__ अग त्यांला काय झाल...तुम्हाला आवडत ते तुम्ही घालु शकता...आमची आणि यांची काही हरकत नसते..



माधवी__ हो...आता रेवा नाही घालत का...जे नियम,फ्रीडम मुलीला तेच सुनाना सुद्धा...हो पण जर लिमिटबाहेर कपड़े घातले तर मग आम्ही ओरडतो...



सुमन__ हो...सगळ कस लिमिटमध्ये कराव...बर आता निघा तुम्ही...ह रणजीत...



रणजीत__ हो...मी बाहेर आहे गाड़ी काढतो...



राधा__ (पाया पड़त)....आई येते...



सुमन__ सुखी रहा ग...नीट जा😙



राधा__ काकू....



माधवी__ नीट जा हम...काळजी घे....☺️



राधा__ येते...रम्या ताई...



रम्या__ हो ग सावकाश जा...



राधा__ बाय बच्चा...😚...काळजी घे हा..रडू नको मी लवकर येइन ह..बर काय आनु माझ्या बच्चाला...(तिला उचलून घेत)



रुता__ काकू...मला ना...मला बेबी पाहिजे तुमचा...येताना आन ह😚



राधा__ (लाजत)....आ बबडू..वेडी..😚😅



सुमन__ राधाबाई बबडू बोले ते खर होऊदे...



माधवी__ हो न😂



रम्या__ हो हो😅



राधा__ काय तुम्ही सगळ्याजनी पण😅येते....



रम्या__ लाजली...वेडी जा अरामात...



राधा__ बाय...




रणजीत__ बाय....बाय बबडू..



रुता__ बाय काका,काकू...बेबी घेऊन या ह...



तसे सगळे हसतात...मग राधा आणि रणजीत कोल्हापुरला जाण्यासाठी निघतात...गाडीत बराच वेळ शांतता होती..मग रणजीत रेडिओ ऑन करतो...दोघेही सॉन्ग मस्त फील करत होते..आणि दोघे चोरुन एकमेकांकड़े पाहत होते...



🎶📻♥️
कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का..
का हे कसे होते असे,ही आस लागे का जीवा..
कसा सावरु मी आवरु स्वतः,..
दिसे स्वप्न का हे जागताना ही मला...
आभास हा..! आभास हा..!
छळतो तुला,छळतो मला..
आभास हा..! आभास हा..!



रणजीतला आरशातुन दिसत मागे तो आणि राधा जवळ जवळ बसलेत...रणजीत हळूच तिचे केस बाजूला करतो..राधा लाजुन मान खाली करते..मग रणजीत त्याचे ओठ राधाच्या ओठांवर ठेवतो.....तेवढ्यात तो भानावर येतो...तर राधा बाजुच्या सीटवर बसून होती..मग त्यांला कळत की तो आभास होता...मग सगळ आठवून रणजीत हळूच गालातच हसतो...



🎶🎶🎶
हम्म क्षणात सारे उधान वारे झुलुक होऊन जाती..
कधी दूर तू ही कधी जवळ वाटे,पण काहीच नाही हाती..
मी अशीच हासते,उगिच लाजते पुन्हा तुला आठवते..
मग मिटून डोळे तुला पाहते,तुझ्याचसाठी सजते..
तू नसताना असल्याचा खेळ हा..
दिसे स्वप्न का हे जागताना ही मला..
आभास हा..! आभास हा..!
छळतो तुला,छळतो मला..
आभास हा..!!



राधाही डोळे मिटून बसली होती...तर तिला सगळ आठवत होत...तिची आणि रणजीतची पहिली भेट..नंतर त्यांचा लग्नातले क्षण...त्यांची भांडण..रणजीतची वेगळी वेगळी रुपे तीच्या डोळ्यासमोरून जात होती...सगळे क्षण तिला आठवत होते..अचानक ती डोळे उघड़ते आणि रणजीतकड़े एकटक बघत बसते...



🎶🎶🎶
मनात माझ्या हजार शंका तुला मी जाणु कसा रे..
तू असाच आहेस, तसाच नाहीस, आहेस खरा कसा रे..
तू इथेच बस ना, हळूच हस ना, अशीच हवी मला तू..
पण माहित नाही मलाही अजूनी तशीच आहेस का तू..
नवे रंग सारे, नवी वाटे ही हवा..
दिसे स्वप्न का हे जागताना ही मला..
आभास हा..! आभास हा..!
छळतो तुला, छळतो मला..
आभास हा..! आभास हा..!
🎶🎶🎶



रणजीतच लक्ष काहीवेळाने राधाकडे जात..तर लगेच राधा खिड़की बाहेर बघते...असच प्रवास करत रात्र होते..बराचवेळाने रणजीत गाड़ी एका धाब्यावर थांबवतो...



रणजीत__ राधा..चल जेवून घेऊ...



राधा__ हम्म...आपण कुठवर आलोय...



रणजीत__ आलोय आता जवळ...आआ आता १ वाजलाय....सकाळी पोहचु ४,५ ला...



राधा__ ह्म्म्म...तू एवढावेळ ड्राइव्ह करणार आहेस..मधेच झोपलास म्हणजे🙄☹️☹️



रणजीत__ नाही ग..तू नको टेंशन घेऊस मी सुखरूप घेऊन जाइन तुला...🤣😂मला सवय आहे या सगळ्यांची....



राधा__ हम्म...जास्त हसू नकोस...😏......(उठत)



रणजीत__ अग कुठे चालीस...?



राधा__ वाशरूमला जातेय रे...



रणजीत__ ह्म्म्म....तिकडे बग धाबयाच्या मागे आहे वाशरूम....



राधा__ ह्म्म्म माहित आहे मला...तू नको सांगू😏



रणजीत__ मी येऊ का...अंधार आहे तिकडे...



राधा__ काय नको...मी घाबरत नाही कोणाला..जाइन मी..😏😌



रणजीत__ ह्म्म्म फुट मग....😂



राधा धाबयाच्या मागे जाते...अर्धा तास होऊन जातो तरी राधा येत नाही..रणजीतला आता काळजी वाटू लागली होती...तिला बघायला जायला रणजीत उठलाच तेवढ्यात राधा समोरून येताना दिसली आणि तो परत खुर्चीवर बसला....



रणजीत__ काय ग...इतका वेळ का लावला...????



राधा तरी शांतच होती...अचानक तिला घाम फुटायला लागला...आणि ती रडायलाच लागली...रणजीतला काही कळत नव्हतं....



रणजीत__ राधा.....अग रड़तेस का...आणि घाम का फुटतोय तुला...घाबरलेस का इतकी काय झाल...कुठे पडलीस का..की अंधारात घाबरलीस काय झाल राधा...ए माय लेडी डॉन काय झाल.....



तरीही राधा रडतच होती....आणि थरथर कापत होती मग रणजीत उठून तिच्या जवळ गेला तर राधाने त्यांला मीठी मारली...रणजीतने तिच्या डोक्यावरुन हात फिरवला...मग तीं थोड़ी शांत झाली...



रणजीत__ राधा सांग काय झाल...पडलीस का कुठे....



राधा__ नाय...😢



रणजीत__ मग काय झाल..?



राधा__ (थोड़ी घाबरत)......मी वाशरूमला मागे गग गेले...तत तर तिकडे एक मुलगा होता..मम मी वाशरूमला जाउन आले तर येताना...😭



रणजीत__ काय केल त्याने.......😡😠



राधा__ येताना त्याने शिटी वाजवली मी इग्नोर केल तर तर..त्याने पटकन माझा हात पकडला...मी त्याच्या कानाखाली मारली तर त्याने...माझा हात मुरगळला..मग त्याने माझ्या पाठी मागे आणि छातीवर........😭😭मग त्याने मला सोडल😭



रणजीत__ काय.......😠😠😠😠...आणि अग तुला हा डाग कसला लागला...😦



राधा__ त्याच्या हातात न सिगरेट होती ना मग त्याने पकडला तेव्हा लागली सिगरेट तिकडे😭



रणजीतला आता हें ऐकुन संताप झाला....त्याचा स्वतःवरंच कंट्रोल नाही राहिला...मग त्याने कोणाला तरी कॉल लावला...



रणजीत__ 📱 hello.... Commissioner uncle....मी रणजीत बोलतोय....



Commissioner__📱 हेय जीत बोल आज कशी आठवण आली....



रणजीत__📱 uncle एक काम आहे.......
आणि तो सगळ घड़लेल त्यांना सांगतो...



रणजीत__📱 प्लीज तुम्ही अताच्या आता इकडे या....लवकर......
मग तो फोन ठेवतो...



मग रणजीत राधाला घेऊन वाशरूम जवळ जातो...तिकडे तो मुलगा उभा होता...रणजीतचा पारा चढतो तो जाउन सरळ त्याच्या कानाखाली लगावतो...लाथा बुकक्यानी त्याला मरतो...राधा फक्त आवाक होऊन बघत होती...😮😮मग रणजीत त्याची कॉलर धरून त्यांला बाहेर आंतो...तेवढ्यात कमिशनर येतात आणि पोलिस त्यांला ताब्यात घेतात....



रणजीत__ (हात मिळवून)....थांक्यु कमिशनर अंकल....



कमिशनर__ थैंक्यू काय जीत तुझ्यासाठी मी कधीही हजर आहे....(तिच्याकडे बघून)....बेटा तू ठीक आहेस ना....



राधा__ आ ह हो सर....



कमिशनर__ अग सर कशाला अंकलच बोल मला...मी तुझ्या Father in law चा बालमित्र बर का...



राधा__ ओह......(पाया पड़त)....नमस्कार करते.....



कमिशनर__ god bless u both....चलो मी निघतो....याच काय करायचा मी बघतो....बाय..



रणजीत__ बाय अंकल....



राधा__ बाय....




रणजीत__ चल कायतरी खाऊन घे...हम्म आणि घाबरु नकोस आता....



राधा एक शब्द सुद्धा बोलात नाही...ती थोड़ी घाबरली होतीच...पण नवल तिला वाटत होत रणजीतच्या या नवीन रूपाच...तिला साधा वाटनारा रणजीत असाही असेल तिला कधी वाटल नव्हतं....त्यात हे सगळ इतका पटकन घड़ल की तिला काही समजलच नाही....


***************************



जेवन करून ते पुन्हा प्रवासाला निघाले....राधा काहीवेळाने झोपली....रणजीत ड्रायव्ह करत होता...सकाळी ५ वाजता ते लोक त्यांच्या फार्म हाउसवर पोहोचले...



रणजीत__ राधा....राधा....ए राधा....उठ पोहोचलो आपण....




राधा__ आ ह....ह्म्म्म...



रणजीत__ तू हो पुढे मी बॅग घेऊन येतो...



राधा__ ह्म्म्म...



राधा खाली उतरते तर समोर मस्त बंगला होता...बाग होती...छान वातावरण होत...गार हवा..सगळ अगदी आवडेल अस होत....मग रणजीत बॅग घेऊन खाली आला...दोघेही बंगल्यात गेले...तर बंगल्यातले नोकर समोर उभे होते.....



राजेश__ नमस्कार...ये रणजीत...ये सुनबाई....रमा ए रमे...दोघ बी आलेत लवकर ये बाहेर....दया सामान मी तुमच्या खोलीत घेऊन जातो....



रणजीत__ थैंक्यू राजेश काका...



रमा__ ये रणजीत कसा आहेस...



रणजीत__ मस्त काकू...ही राधा...



रमा__ होय...ये सुनबाई...



राधा__ नमस्कार..!!



राजेश__ नमस्कार!! ये बाळा...



रमा__ ये सुनबाई...रणजीत...तुम्हाला काय खायला बनवू...



रणजीत__ नको आम्ही खाऊन आलोय...आता जरा आराम करतो...



रमा__ बर जावा आराम करा...काय लागल तर सांगा ह...



राधा__ हो...



मग दोघेही खोलीत जातात...फ्रेश होतात...राधा ही आता नॉर्मल झाली होती...रात्री जेवण करून मग ते खोलीत आले रणजीत तर आला आणि बेडवर पडताच झोपला....राधा ही नंतर बसून बसून झोपी गेली...


****************************



सकाळी राधा उठली...रणजीत अजुन झोपला होता...फ्रेश होऊन नग राधा खोली बाहेर आली किचनमध्ये रमा नाश्ता करत होत्या...राजेश झाडाना पाणी घालत होते...तेवढ्यात राधाला समोरच्या बालकनीमधुन कसला तरी आवाज आला म्हणून तीं पाहायला गेली तर तिकडे सफेद रंगाची नेटची साड़ी घातलेली मुलीची सावली तिला दिसली...तिला पाहून राधा जोरात ओरडली...



राधा__ (ओरडत)....आआआआआआ भूतततत....रणजीतत.......................😖



आणि राधा बेशुद्ध पड़ते....काहीवेळाने डोळे उघड़ते तर समोर रमा,राजेश, रणजीत होते...मग तीं हळू उठून बसते....



रणजीत__ राधा काय झाल होत...



राधा__ अरे एक मुलगी होती कि भूत काय समजल नाही मला...मी खुप घाबरले रे...तिला पाठमोरीच पाहून...😕



रमा__ ती भूत नव्हती...




राजेश__ होय की😂



रणजीत__ मग कोणाला पाहिले हिने काका..?



राजेश__ रणजीत तुला नाही माहित पण सदाशिव साहेब अन महेश साहेबाना माहित आहे...ती पोरगी इकड मदतीला येते आम्हाला...



रणजीत__ पण कोन आहे ती...



रमा__ छान मुलगी आहे रे ती...चांगली आहे खुप...इकडच राहते आंपल्या बंगल्या मागे..अनाथ आहे ती विधवा आहे...पण शिकलेली आहे चांगली...कोल्हापुरला एका ऑफिसात काम करते आणि आमची आता ओळख झाले तर वेळ मिळाला की आम्हाला मदत करायला येते...मगाशी पण ती बालकनी पुसून काढत होती...



रणजीत__ आछा....बोलवा तिला आणि राधाला दाखवा नाहीतर ही घाबरत राहिल....



राधा__ नको रे...



रणजीत__ गप तू...



रमा__ ए पोरी ये ग आत...



राधा डोळे मिटते आणि रणजीतच्या कुशीत तीच तोंड लपवते...रणजीतला तिच्या अश्या या वागण्याचा हसू येत होत...ती मुलगी आत आली...



रणजीत__ (राधाकडे बघून).....बघ ना वरती राधा...अग तू तर गब्बर आहेस माझी...बग तिला ती मूलगीच आहे....



राधा डोळे हळूच उघड़ते वरती बघते आणि डोळे मोठे करून बघतच बसते....मग रणजीत ही त्या मुलीकड़े पाहतो आणि त्याला धक्काच बसतो....



क्रमशः