kadambari Premaachi jaadu part 28 in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी - प्रेमाची जादू -भाग -२८ वा

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

कादंबरी - प्रेमाची जादू -भाग -२८ वा

कादंबरी – प्रेमाची जादू

भाग – २८ वा

--------------------------------------------------------------

१.

यशच्या हातावर ओठ टेकवून .त्याला “आय लव्ह यु “ म्हणणारी ..मधुरा ..

यशला आजचे हे ,तिचे असे रोमेंटिक रूप अचंबित करणारे होते .

त्याने आत्ता पर्यंत पाहिलेली मधुरा , त्याच्या घरी आल्यवर सगळ्यांच्या समोर

मर्यादेने वावरणारी ,वागणारी ,बोलणारी मधुरा ,आणि रोज नजरे समोर असणारी ..

आपल्या ऑफिसमध्ये स्टाफ म्हणून जॉब करणारी मधुरा “..

आतापर्यंत दिसलेली ही मधुरा ..आज मात्र ..

या क्षणी ..त्याच्या प्रेयसीच्या रूपात .त्याला .आय लव्ह यु यश ..! म्हणत होती.

त्याच्या नजरेसमोर त्याला रूपसुंदर मधुरा ..दिसत होती .

भान हरपून यश तिच्याकडे पहात राहिला ..तिला डोळ्यात आणि मनात साठवत राहिला ..

त्याची ही अवस्था पाहून ..मधुराला हसू तर आलेच ..पण..आपला हिरो गडबडून गेला आहे”

याची तिला मनातून मोठी गंमत वाटत होती.

मधुराने आजी आजोबाला घायला आलेल्या यशला पाहिले ..त्या क्षणा पासून तो तिच्या मनात

भरला होता . प्रथम दर्शनी प्रेम “ ते हे,असेच असावे ..असे म्हणत ..मधुरा यशवर मनापसून

प्रेम करू लागली .

आजी-आजोबांच्या आपलेपणामुळे , यशच्या आई-बाबांशी आपल्या घरातील सगळ्यांचे असेलेले

स्नेहाचे ,मैत्रीचे नाते ..आपल्या प्रेमाला आधार देणारेच आहेत ..ही भावना मधुराच्या प्रेमभावनेला

अधिक बळकटी देत होता.

मधुराला यश विषयी प्रेम वाटणे ..यात काही गैर आहे ..असे कुणालाही वाटले नसते ..कारण..

यशच्या परिवारात मधुरा विषयी एक खास अशी जिव्हाळ्याची भावना आहे “ हे मधुराला अनेकदा

जाणवले होते. त्यामुळे मधुराला वाटायचे ..आज ना उद्या ..यशला आपल्या मनातील त्याच्या विषयी

वाटणार्या “प्रेमाची कबुली द्यायची “ आणि नशिबाने तिला

आज चौधरी काकांच्या घरी ही संधी मिळाली , ती सोडून

चालायचे नाही.

नशीब म्हणजे ..खुद्द अंजली वाहिनी ..तिच्या बाजूने आहेत “ असे वाटावे अशाच

पद्धतीने त्यांनी आज मधुरा आणि यश ..यांना एकांत मिळावा “ असाच प्लान त्या करीत आहेत “

की काय ?

असेच त्या इथे आल्यापासून वाटत होते.

मधुराच्या तीनही मैत्रिणींना ..तर मधुरा आणि यश यांची आजची खास भेट “ होणे ..खूप आवडणारे

होते . मधुराच्या मनात यशबद्दल किती प्रेम आहे “ हे या मैत्रिणी रोजच मधुराच्या तोंडून ऐकत

असायच्या .

यशने मधुराच्या डोळ्यात पाहिले .तिच्या टपोर्या डोळ्यात ..त्याला ..

तिच्या मनातले प्रेम दिसत होते.

मधुराने त्याच्या हातावर ओठ टेकवले ..तिचा झालेला हा पहिला स्पर्श ..यशच्या मनातून सुखाची

जणू एक लेहर येऊन गेली .

मधुरा त्याच्या “बाहुपाशात आलेली होती “, यशने मोठ्या आवेगाने ..मधुराला घट्ट मिठीत घेतले .

मधुरा मनातून सुखावली . किती आतुरतेने तिने या दिवसाची ,या क्षणांची वाट पाहिली होती .

मनात ती देवाला म्हणत होती ..

देवा ..माझी ही इच्छा ..स्वप्न ठरू देऊ नकोस ..

यशच्या मिठीत तिच्या देहाला आज पहिल्यांदा पुरुष –स्पर्श “होत होता . त्याच्या स्पर्शाने

तिच्या सर्वांगातून सुखाची जणू वीज संचरली होती . त्याला बिलगत ती म्हणाली..

यश ..घे अजून जवळ मला ..माझ्या अंग अंगावरून तुझा हात फिरव..ही मधुरा तुझी ,

तिचा हा देह फक्त तुझा आणि तुझ्यासाठीच आहे.

यशचा हात तिच्या छातीवर होता ..तिने त्याच्याकडे पाहिले ..तिच्या उन्नत स्तनांचा उबदार

स्पर्श यशला बेभान करीत आहे..हे तिला जाणवले ..आणि ती त्याला म्हणाली..

ऐक माझ्या हृदयाची धडधड ..

यशने तिच्या छातीवर कान ठेवले .त्याचवेळी त्याच्या ओठांना ,गालांना मधुराच्या

गोल गोल टणक स्तनांचा सुखद स्पर्श होऊ लागला ,

मधुराने त्यला छातीशी घट्ट धरीत म्हटले ..

यश तुझ्या प्रेमाची मोहोर उमटव माझ्या या देहावर ,ओठ्वर ..!

ही आजची चांदणी रात्र ..जणू तुझ्या माझ्यासाठी सर्वांनी भेट म्हून दिली आहे.

यशने माधुराकडे पाहिले ..दोन्ही हातांच्या ओंजळीत ..तिचा चेहेरा धरीत ..मधुराला

जवळ घेत ..तिच्या गुलाबी ओठ्वर ..ओठ ठेवीत ..यशने मधुराचे पहिले चुंबन घेत म्हटले..

मधुरा ..तू मला खूप आवडलीस , आय लव्ह यु ..!

मला तुझ्या प्रेमात बांधून ठेव.. आता मला सांभाळणे ही तुझी जबादारी आहे.

प्रोमीस दे मला ..

यशच्या मिठीत सुखावलेली मधुरा म्हणाली..

तुला माझ्या पासून कुणी हिरावून घेऊ शकणार नाही..

आणि तुझ्या घरातले सारेजण ..

आपण एकत्र यावेत अशी इच्छा करीत आहेत.

हे ऐकत यश म्हणाला ..मधुरा ..खरे तर मला या गोष्टीतले काही कळत नाही ,

कुणाच्या मनात काय ? मी फारसा खोलपणे कधी विचार केलाच नाही.

पण एक गोष्ट मात्र मला जाणवत असे..

तू ज्या ज्या वेळी आमच्या घरात आलीस ..त त्या वेळी बाहेरून आलेल्या मुलींनी

केलेला गोंधळ , ते प्रोब्लेम ..सोडवण्यास सगळ्यांनी तुझी मदत घेतली होती.

माझ्या आजी-आजोबांना तू खूप आवडतेस ..त्यांच्या मनातील त्यांची ..नात-सून “तूच

आहेस ..”हे आज मला जाणवले आहे.

मधुरा ..तू आम्हाला सर्वांना हवी आहेस.

फक्त .आपण..अजून काही वेळ घेऊ ..एकमेकांना समजून घेऊ ..

प्रेमाचा हा झटका ओसरून गेल्यावर ..तू पुन्हा विचार कर , मी विचार करेन ..

आपण एकमेकांना अनुरूप आहोत का ?

असे बोलून ..यशने जणू मधुराच्या मुडचा पार कचरा करून टाकला होता.

तरी स्वतःला सावरत ती म्हणाली ..यश ..माझ्या प्रेमात काही बदल होणार नाही.

तुझी मी वाट पाहीन ..पण एक लक्षात ठेव..तू बदललास तर माझ्या प्रेमाचा मोठा अपमान

असेल.

आज किती विश्वासाने मी तुला माझ्या मिठीत घेतले ..माझ्या ओठांचा ,माझ्या देहाला स्पर्श

करू दिला ..या फुलाचे निर्माल्य होऊ देऊ नकोस.

तिच्या बोलण्यातील बदलता स्वर ऐकून ..यशला तो काही तरी चुकीचे बोलून गेलाय ..

याची जाणीव झाली आणि मधुराला जवळ घेत म्हाणाला ..

मधुरा ..असे काही मनात आणू नकोस . मी तुला आधीच म्हटले ,..मला या प्रेमातले काही

कळत नाही , सुचत नाही ..त्यामुळे असा घोटाळा झाला .

मधुरा ..तू फक्त माझीच आहेस ..माझीच राहशील ..

आय लव्ह यु ..असे म्हणत त्याने मधुराला त्याचे चुंबन घायला लावले ..

आणि तिच्या कडे पाहत म्हणाला ..आता तरी पटली ना खात्री ..?

मधुरा लाजून म्हणाली ..होय रे माझा राजा ..

*************

२.

मधुराने त्याला आठवण करून देत म्हटले ..

ओ महाशय , सगळ्यांनी आपल्याला इथे वर जेवणाची तयारी आणि मैफिलीची तयारी

करायला पाठवले आहे.. आणि आपण ..

यश म्हणाला ..बघ ..हे सगळ तुझ्यामुळे झालाय मधुरा ..

तुझ्या प्रेमाची जादू ..बाकी सगळ विसरून गेलो .

मधुरा म्हणाली ..

बर बर ..माझ्यामुळे तर माझ्यामुळे ..

पण आज जे मिळाले ..त्याचा आनंद झाला कि नाही तुला ?

यश म्हणाला ..आता तर चातक लागेल या स्वीटची . चान्स मिळाल कि घेणार ,

तू पण द्यायचे अधून मधून ..न मागता ..

मधुरा म्हणाली ..चार-चौघात , ऑफिसमध्ये चावटपणा अजिबात नाही करायचा .

एरव्ही तर.मलाच राहवणार नाही यश ..तुझ्या जवळ आल्याशिवाय .

याष्ण म्हाणाला ..

मधुरा ..आता पटापट सांगितलेले काम करून टाकू या .

अंजली वाहिनी फार चतुर आहेत ..त्यांच्या नजरेतून काही सुटणार नाही..

त्या आपल्याला बरोब्बर टोमणे मारीत राहणार .बघ तू ..

मधुरा म्हणाली ..मी तर त्यांना सांगणार ..वाहिनी..तुम्ही जे जे सांगितले ,

मी सेम तसे केले . आता तुम्ही यशला विचारा .मग ठरवा .पास की नापास

कोण झाले आहे .

गच्चीवरची तयारी करून झाली ....यशला फंक्शनची तयारी ,मैफिलीची तयारी करण्याची

सवय होतीच , आणि गावाकडे ..मधुरा तीच्य बाबांच्या कार्यक्रमाची तयारी करून त्यात तयार

झालेली होती . मैफिल माहौल बनला होता .

अपेक्षेप्रमाणे ..अंजलीवाहिनी ,आणि मधुराच्या मैत्रिणी मोत्याने बोलत गच्चीवर आल्याच.

माधुराकडे पहात त्या म्हणाल्या ..

वर वर पाहता.मी विचारते तुला मधुरा –

तुम्ही वर येऊन फक्त हीच तयारी करण्यात वेळ घालवला की काय ?

कारण ..या यशचा मला भरवसा नाही.. त्याला काळात नाही ..संधी , वेळ पुन्हा पुन्हा

येत नसते ..

आलेली संधी दवडणे “ याला काय म्हणतात ? तर हा म्हणेल

काय की बुवा ?

यश म्हणाला .. अहो वाहिनी ..मला का टार्गेट करताय ? तुम्ही मला काही बोलला नाहीत

की सांगितले नाहीत .तरी फायरिंग सुरु ..

अंजलीवाहिनीना हसू आवरले नाही ..त्या म्हणाल्या ..

जय हो बाबा भोलेनाथ की !

मधुरा ,याला नको विचारायला ..तू सांग

..आम्ही सांगितल्या प्रमाणे तू यशच्या मदतीने होणार्या कार्यक्रमाची तयारी केलेली आहेस

हे तर आम्हला दिसते आहे ..म्हणजे पहिल्या पन्नास मार्कांचा पेपर तुम्ही दोघांनी सोडवलाय

हे एकदम मान्य ,,म्हणून तुम्ही यात दोघे ही पास.

मधुराच्या मैत्रिणीनी सामुहिक आवाजात विचारले ..

अंजलीवाहिनी ..दुसर्या पेपेरचे काय झाले ? बहुतेक पेपर झालाच नाही असे वाटते .

वहिनीनी मधुराला विचारले ..

ए काय झाले ? सांग ,पेपर झाला ? तो किती सोडवला ? त्यावर रिझल्ट लावू आम्ही.

तुझ्य्वर भरवसा जास्त आहे ..या दुसर्यावर अजिबात नाही.

यशला सगळा अंदाज आला ..आणि ही मधुरा आता कशी आणि काय काय सांगते ?

याची त्याला भीती वाटू लागली ..

मधुरा वहिनींना म्हणाली ..

वाहिनी ..परीक्षा आणि पेपरबद्दल ..फक्त चर्चा झाली ..माझा अभ्यास पूर्ण असला तरी

दुसरा विद्यार्थी यात फारच कच्चा आहे “ तुमचे हे निरीक्षण अगदी बरोबर आहे..

तरी ..ही परीक्षा पास होण्यास ..अजून काही वेळा सराव परीक्षा “ दिल्या तर तुम्हाला अपेक्षित

अशी तयारी झाली के नाही ,यासाठी पुन्हा परीक्षा घ्यावी लागेल ..आम्हाला द्यावी लागेल .

दोन्ही विदार्थ्याच्या वतीने मी हे सांगते आहे.

अंजली वाहिनी मधुराला शब्साकी देत म्हणाल्या ..

तू मेरीटची विद्यार्थिनी आहेसच . मोनिकाच्या वेळी , गीतांजलीच्या वेळी मी तुझ्यातील ही

समयसूचकता ओळखली ..त्या दिवसापासूनच तू मला खूप आवडायला लागली.

म्हणून तर तुला हा ..मठ्ठ विषयाचा पेपर दिलाय ..

तो तूच सोडवायचा आहेस.

आज जितका सुटला असेल पेपर ..त्यासाठी तूच मदत केली असेल याला ..

मला महिति आहे मधुरा .

चला..आता जमिनीवर या ..दोघे ही ..

आता आधी डिनर मग मस्त संगीत मैफिल ..

मधुरा ..आजची सगळी गाणी ..फिल्मी ..तू म्हणायचीस ..प्यारवाली ..

तुझ्या समोरच्या सगळ्यांना कळू दे आज तुझ्या मनातले .

जे या सर्वांच्या मनात आधीपासूनच आहे.

बघू या ..आमचा हा भोला नाथ काय काय बोलतो सगळ्यांच्या समोर ..

अंजली वाहिनी ,मधुराच्या मैत्रिणी .म्हणाल्या ..

हिप हिप हुर्र्ये ..

मधुरा बेस्ट लक राणी ..

-------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात

भाग -२९ वा लवकरच येतो आहे .

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाची जादू

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------