नवदुर्गा भाग ८
महर्षि कात्यायन यांनी सर्वप्रथम या देवीची पूजा केली
या कारणाने देवीला कात्यायनी म्हणून ओळखले जाते .
अशी पण कथा सांगितली जाते की महर्षि कात्यायनच्या मुलीने म्हणजे आई दुर्गेने आश्विन कृष्ण चतुर्दशीला जन्म घेऊन शुक्ल सप्तमी, अष्टमी आणि नवमी तिन्ही दिवशीपर्यंत
कात्यायन ऋषींची पूजा स्वीकार करून नंतर दशमीला महिषासुराचा वध केला होता .
असा विश्वास आहे की आईची कृपा झाल्यास सर्व कामे पूर्ण होतात .
वैद्यनाथ नावाच्या ठिकाणी ती प्रकट झाली आणि तिथेच तिची पूजा केली जाते.
देवी कात्यायनी भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करते.
द्वापारयुगात भगवान श्रीकृष्ण हे पती म्हणून मिळावे अशी गोपींची इच्छा असल्यामुळे कालिंदी यमुनेच्या काठावर ब्रजच्या गोपींनी तिची पूजा केली होती .
तिची पूजा ब्रजमंडळाची प्रमुख देवता म्हणूनसुद्धा केली जाते.
या देवीचे स्वरूप खूप भव्य आणि दिव्य आहे.
तिचे चार हात आहेत आणि ते सोन्यासारखे चमकत आहेत.
उजव्या बाजूचा हात अभयमुद्रामध्ये आहे आणि डावा हात वरच्या आसनात आहे.
डाव्या बाजूला वरच्या हातात तलवार आणि तळाशी कमळाचे फूल आहे.
देवीचे वाहन सिंह आहे.
असा विश्वास आहे की आईची कृपा झाल्यास सर्व कामे पूर्ण होतात .
वैद्यनाथ नावाच्या ठिकाणी ती प्रकट झाली आणि तिथेच तिची पूजा केली जाते.
देवी भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करते.
असे मानले जाते की जो माणूस पूर्ण भक्तिभावाने आणि खऱ्या मनाने माता कात्यायनीची उपासना करतो त्याला अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष मिळतो.
त्याच वेळी त्याचे सर्व त्रास नष्ट होतात.
याच कारणास्तव असेही म्हणतात की, कात्यायनी देवीची उपासना केल्यास त्याला परम दर्जा प्राप्त होतो.
देवी कात्यायनीचा आवडता रंग लाल आहे.
कात्यायनी देवीला नैवेद्यात मध अर्पण केल्यास ती खूप आनंदित होते.
देवीचा मंत्र असा आहे
चंद्रहासज्ज्वलकर शार्दुलवारवाहन।
कात्यायनी शुभम ददयाद्देवी दानव घाटीनी
या देवीला आयुर्वेदात अनेक नावाने ओळखले जाते जसे अंबा अंबिका अंबालिका .
याशिवाय या देवीची वनस्पती म्हणून मोईया ,माचीका किवा अंबाडी म्हणून ओळखली जाते.
कात्यायनी देवीला पूजेत ही वनस्पती वाहिली जाते .
ही वनस्पती कफ, पित्त, अधिक विकार आणि कंठरोग याचा नाश करते .
या रोगांनी पीड़ित असलेल्या रोग्याने याचे सेवन व सोबत कात्यायनीची उपासना केली पाहिजे .
=====दुर्गा देवीचे सातवे रूप देवी “कालरात्री” ====
शारदीय नवरात्रीच्या सातव्या दिवशी आदिशक्ती देवी दुर्गाचे सातवे रूप असलेल्या देवी कालरात्रीची पूजा केली जाते.
माता दुर्गाची सातवी शक्ती म्हणून कालरात्री ओळखली जाते.
दुर्गापूजनाच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची पूजा करण्याचा नियम आहे.
या दिवशी साधकाचे मन 'सहस्र' चक्रात स्थित आहे.
यासाठी, विश्वाच्या सर्व प्राप्तीची दारे उघडतात
पौराणिक कथांनुसार, देवीच्या या स्वरूपाची उपासना केल्यास दुष्टांचा नाश होतो.
देवीचे हे रूप शौर्य आणि धैर्याचे प्रतीक मानले जाते.
आदिशक्तीने दुष्टांचा नाश करण्यासाठी हा अवतार घेतला होता .
देवी कालरात्री भक्तांसाठी नेहमीच शुभ असते.
या कारणास्तव, देवीचे नाव 'शुभंकारी' देखील आहे.
असे मानले जाते की देवी कालरात्रीच्या कृपेने, भक्त नेहमीच भयमुक्त असतो,
त्याला अग्निची भीती, पाण्याचे भय, शत्रूची भीती, रात्रीची भीती इत्यादी कधीही नसतात.
काल म्हणजे वेळ,समय.
काळामध्ये या विश्वामधील सारे काही सामावले आहे
आणि काल सर्वाचा साक्षी आहे.
रात्री म्हणजे गाढ विश्रांती,शारीरिक, मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती.
विश्रांती शिवाय आपण ताजेतवाने होऊ शकत नाही .
कालरात्री म्हणजे पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती.
कालरात्रीची उपासना केल्यामुळे विश्वाच्या सर्व सिद्धिंचे दरवाजे उघडले जातात
आणि सर्व आसुरी शक्ती आईच्या नावाच्या उच्चारणाने घाबरून पळ काढण्यास सुरवात करतात.
काळरात्र ही अशी शक्ती आहे जी अंधकारमय परिस्थितींचा नाश करते.
ही काळापासून संरक्षण करण्याची शक्ती देखील आहे.
देवी कालरात्रीचे स्वरूप
कालरात्री देवीचे शरीर रात्रीच्या अंधार सारखे काळे आहे.
गळ्यात विद्युत माला आहे आणि केस विखुरलेले आहेत.
देवीचे चार हात आहेत, त्यापैकी एका हातात गंडसा आणि एका हातात वज्र आहे.
तसेच देवीचे दोन हात अनुक्रमे वरमुद्रा आणि अभय मुद्रामध्ये आहेत.
देवीचे वाहन गर्दभ आहे.
देवी स्वत:ची शक्ती निर्माण करणारी आहे.
देवीचे स्वरूप भयानक आहे.
घशात विजेसारखी चमकती माला आहे.
या देवीचे तीन डोळे आहेत.
तिन्ही डोळे विश्वाप्रमाणे गोलाकार आहेत.
त्यांच्यामधून सतत आग बाहेर येत असते .
देवीचे शरीर जड अंधाराप्रमाणे आहे.
देवी काळरात्री भयाण परिस्थितीचा नाश करते.
देवी वेळोवेळी आपल्या भक्तांचे रक्षण करते .
देवी आपल्या उजव्या हाताने भक्तांना आशीर्वाद देते.
त्याच वेळी, उजव्या हाताची खालची बाजू अभय मुद्रामध्ये आहे.
आईच्या डाव्या हातात वरच्या हातात लोखंडी काटा व खाली हातात पाळणा आहे.
उजवीकडे उंचावलेल्या हाताने आई भाविकांना आशीर्वाद देते .
खालचा उजवा हात हात अभय मुद्रेमध्ये आहे.
म्हणजेच, भक्तांनी नेहमी निर्भय, निर्भय असले पाहिजे.
देवीचे स्वरूप भयंकर असू शकते, परंतु नेहमीच चांगला परिणाम देणारी ही देवी आहे .
म्हणूनच तिला “शुभंकारी” म्हणतात.
म्हणजेच, कोणत्याही प्रकारे भक्तांना घाबरुन जाण्याची गरज नाही.
पुराणिक कथेनुसार जेव्हा शुंभ-निशुंभ आणि रक्तबीज या तिन्ही राक्षसांनी जगात अत्याचार माजवला होता. आणि देव देवता आणि सामान्य लोकांना खूप त्रास दिला..
त्यांच्या प्रबळ शक्तीमुळे आणि त्यांना प्राप्त असलेल्या काही वरदानांमुळे त्यांचा वध करायला देव
सुद्धा असमर्थ ठरले होते .
अशा परिस्थितीत त्यांना देवाधिदेव शिवशंकर यांच्याकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता .
तेव्हा चिंताग्रस्त झालेल्या सर्व देवतांनी शिवाकडे जाऊन संरक्षणासाठी प्रार्थना केली.
भगवान शिव यांनी माता पार्वतीला राक्षसांचा वध करून आपल्या भक्तांचे रक्षण करण्यास सांगितले.
शिवाच्या आदेशाचे पालन करून देवी पार्वतीने दुर्गाचे रूप धारण केले.
दोन्ही राक्षसात आणि देवीमध्ये अत्यंत घनघोर युद्ध झाले .
अखेर देवीने त्रिशुळाच्या सहाय्याने शुंभ-निशुंभ राक्षसांचा वध केला.
यानंतर देवीने रक्तबीज राक्षसाशी युद्ध करून त्याच्या छातीत त्रिशूळ खुपसले
जेव्हा देवीने रक्तबीज राक्षसाचा वध केला तेव्हा त्याच्या शरीरातील रक्ताच्या थेंबा थेंबातुन कोट्यावधी राक्षस निर्माण होऊ लागले .
अशा वेळी देवीला अनेक राक्षस मारत रहाणे त्रासदायक होऊ लागले
आणि शिवाय रक्तबीज राक्षस परत जिवंत होऊ लागला .
कारण रक्तबीजाला हे वरदान होते की त्याचे थेंबभर रक्त जरी जमिनीवर पडले तर त्याच्यासारखा दुसरा एखादा राक्षस जन्म घेईल.
अशा या वरदानामुळे कोणीही त्याला ठार करू शकत नव्हते . हे जेव्हा आई दुर्गेच्या लक्षात आले तेव्हा
तिने तिच्या चमत्काराने स्वतःला कालरात्री देवीच्या रुपात बदलुन घेतले .
आणि आईने स्वतःला पुन्हा सामर्थ्य मिळवून दिले.
यावेळी आईचा चेहरा खूप भयानक झाला.
तिने आपली जीभ खुप लांब केली होती .
ती एका हाताने त्याच्यावर वार करीत होती .
आणि लगेच त्याच्या अंगातून पडणारे रक्ताचे थेंब जिभेने चाटत होती .
रक्त जमिनीवर पडू देऊ नये अशा प्रकारे आईने या राक्षसाचा वध करून निप्पा:त केला .
आई काळरात्रीचा जप असा आहे
कालरात्रि एकवेणी जपकर्णपुरा नागना खरस्थिता, लंबोष्टी कर्णिककर्णी तैलाभ्यक्तशरीरीनी’.
वामपादोल्लासल्लाहलताकांतक भूषण, वर्धनमुर्धध्वजा कृष्णा कालरात्रिभ्यकारी॥
कालरात्रीची उपासना केल्यामुळे विश्वाच्या सर्व शक्तींची दारे उघडली जातात
आणि सर्व आसुरी शक्ती तिच्या नावाच्या उच्चाराने भीतीने पळून जातात.
म्हणून भुतेसुद्धा तिच्या नामोच्चाराने पळून जातात.
ही देवी सर्व अडथळे दूर करते.
हिच्या उपासनेमुळे भक्त आग, पाणी, प्राणी, शत्रू आणि रात्रीच्या भीतीवर मात करतो.
त्याच्या कृपेने, भक्त सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्त होतो.
मंत्र:
एकवेणी जपकर्णपुरा नग्न खरस्थिता।
लंभोष्टी कर्णिककर्णी तैलभ्यक्तश्रीराणी॥
वामपडोलसल्लालोहलकांतक भूषण।
वर्धनमुर्ध्वजा कृष्णा कालरात्रिभ्यंकारी॥
क्रमशः