Navadurga Part 4 in Marathi Mythological Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | नवदुर्गा भाग ६

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

नवदुर्गा भाग ६

नवदुर्गा भाग ६

जे अध्यात्म आणि आध्यात्मिक आनंदाची आस करतात त्यांना या देवीची उपासना करून
हे सर्व सहज मिळते.

जो मनुष्य भक्तीने आई ब्रह्मचारिणीची पूजा करतो, त्याला सुख, उपचार आणि आनंद मिळतो,
त्याला भीती वाटत नाही.

आई ब्रम्हचारीणीचे रुपात ओळखली जाणारी आयुर्वेदातील दुसरी वनस्पती ब्रह्मचारिणी म्हणजे ब्राह्मी
ब्राह्मी ही आयुष्य आणि स्मरण शक्ति वाढवणारी ,
रक्त विकारांचा नाश करणारी आणि स्वर मधुर करणारी आहे .
यामुळे ब्राह्मीला “सरस्वती” सुद्धा म्हणले जाते .
ही मन आणि बुद्धी दोन्हीसाठी शक्ति देते .
गैस आणि मूत्ररोगासाठी हे प्रमुख औषध आहे .
रक्त विकार मूत्राद्वारे बाहेर काढण्यासाठी अत्यंत उपयुक्त औषधि आहे .
म्हणून या रोगाने पीड़ित व्यक्तिने ब्राम्ही सेवन आणि देवी ब्रह्मचारिणीची उपासना केली पाहिजे.

====दुर्गा देवीचे तिसरे रूप देवी “चंद्रघंटा”====

आई दुर्गाच्या तिसर्‍या रूपाचे नाव चंद्रघंटा आहे .

नवरात्रातील पूजेमध्ये तिसर्‍या दिवशी पूजेचे महत्त्व असते आणि या दिवशी आपल्या देवतांची उपासना केली जाते.
या दिवशी साधकाचे मन 'मणिपूर' चक्रात प्रवेश करते.
या देवीच्या कृपेने साधकाला अलौकिक गोष्टी दिसतात,दैवी सुगंध अनुभवता येतात आणि बर्‍याच प्रकारचे आवाज ऐकू येतात.
त्या क्षणी साधकाने खूप सावधगिरी बाळगली पाहिजे.

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रुपाची आराधना केली जाते.
या रुपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात.
चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येतो .

चंद्राच्या कलांप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसारित होत असते.
या देवीची पौराणिक कथा अशी सांगितली जाते ....
राक्षसांचे अत्याचार नष्ट करण्यासाठी आई दुर्गेने चंद्रघंटा अवतारात जन्म घेतला होता .
त्या काळात राक्षसांचा राजा महिषासुर होता .
हा महिषासुर राक्षस देवराज इंद्राचे सिंहासन बळकावू पाहत होता .
आणि याच कारणासाठी राक्षस आणि देव यांच्यामध्ये भयंकर युद्ध चालू होते .
महिषासुराच्या अत्याचारामुळे देवदेवता अत्यंत त्रस्त झाले होते .
या गोष्टीवर काय उपाय करावा हे विचारण्यासाठी देवदेवता भगवान ब्रह्मा, विष्णु ,महेश यांच्याकडे गेले .
देवतांच्या तक्रारी ऐकुन तिघेही खुपच क्रोधित झाले .
आणि त्या तिघांच्या मुखातून एक ज्वाळा निर्माण झाली .
या ज्वाळेतुन एक देवता प्रकट झाली .
हीच देवी चंद्रघंटा होती .
या देवतेला भगवान शंकर यांनी आपले त्रिशूळ आणि भगवान विष्णु यांनी आपले सुदर्शनचक्र प्रदान केले .

याशिवाय इतर अनेक देवांनी सुद्धा आपापली अस्त्रे त्या देवतेला दिली .
देवराज इंद्राने एक घंटा दिली .
सूर्याने आपले तेज आणि तलवार दिली .
आणि वाहन म्हणून सिंह दिला .
या तेजासहित आणि प्रतापी अस्त्र-शस्त्र सोबत घेऊन देवी चंद्रघंटा महिषासुराचा वध करण्यासाठी निघाली .
देवीचे हे “अक्राळविक्राळ” रूप पाहून महिषासुराला आपल्या मृत्यूची जाणीव झाली होती .
परंतु आपल्या शक्तिचे प्रदर्शन करीत त्याने देवी चंद्रघंटा वर प्रहार केला .

एकीकडे देवी चंद्रघंटा आणि महिषासुर यांच्यात भयंकर युद्ध चालू झाले .
त्याचवेळी दूसरीकडे देव देवता सुद्धा राक्षसांचा वध करण्यासाठी युद्ध्दभुमीवर आले होते .
शेवटी देवी चंद्रघंटाने महिषासुराचा वध करून देवतांना राक्षसांच्या अत्याचारापासून मुक्त केले .
राक्षसांच्या विनाशासाठीच आई दुर्गादेवी चंद्रघंटा या तृतीय रुपात प्रकटली होती .
देवी चंद्रघंटाने भयंकर राक्षसांचा संहार करून देवतांना न्याय दिला .
देवी चंद्रघंटा हेच आई दुर्गाच्या शक्तिचे रूप आहे .
जे संपूर्ण जगाची पिडा नाश करते .
देवी चंद्रघंटाची पूजा करणाऱ्या भक्तांना इच्छित फलप्राप्ती होते .
म्हणूनच ही नवरात्रीच्या तीसर्या दिवसाची ही पूजा अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते .
या देवीचे रूप “दैदिप्यमान” असते .

देवी चंद्रघंटाच्या शरीराची कांती सोन्याप्रमाणे तेजस्वी आहे .
तिच्या मस्तकी घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे .
म्हणूनच तिला चंद्रघंटा म्हणले जाते .
तिला दहा हात आहेत .
आणि दहाही हातात अस्त्र-शस्त्र आहेत .
देवीच्या हातात कमल, धनुष्यबाण, कमंडल, तलवार, त्रिशूळ आणि गदा अशी शस्त्रे आहेत .
देवीच्या गळ्यात सफेद पुष्पमाला आणि डोक्यावर रत्नजड़ित मुकुट विराजमान आहे .
देवी चंद्रघंटा भक्तांना अभय देणारी तसेच परम कल्याणकारी आहे .
तिच्या रुप आणि गुणांच्या अनुसार तिची पूजा केली जाते .
देवी चंद्रघंटाचा मंत्र

पिण्डजप्रवरारूढा चण्डकोपास्त्रकैर्युता।
प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता।।

देवी चंद्रघंटाच्या पूजेचे महत्व

देवी चंद्रघंटा शक्तिच्या पूजा आणि साधनेमुळे मणिपुर चक्र जागृत होते .
या देवीची पूजा करण्यामुळे वीरता-निर्भरता यासोबत सौम्यता व विनम्रता याचा पण विकास होतो .
देवीच्या पूजेमुळे मुखमंडल, डोळे तसेच संपूर्ण शरीराची कांती तेजस्वी होते .
आवाज दिव्य आणि मधुर होऊ लागतो .
देवीच्या पूजेनंतर शांती आणि सुखाची जाणीव होऊ लागते .
आई चंद्रघंटाच्या कृपेने अनेक प्रकारची पापे आणि सर्व अडचणी दूर होतात.
भक्तांच्या संकटांचे शीघ्र निवारण होते.
देवी चंद्रघंटाच्या कृपेने पराक्रम वाढतो .
आई दुर्गाच्या चंद्रघंटा रूपाची पूजा अशी केली जाते .

प्रथम देवघरात माता चंद्रघंटाचा फोटो किंवा मुर्ती स्थापित करावी .

त्यानंतर गंगाजल अथवा गोमूत्र याने शुद्धिकरण करावे .

चांदी, तांबे किंवा मातीच्या घड्यात पाणी भरून त्यावर नारळ ठेऊन कलश स्थापना करावी .

पूजेचा संकल्प सोडुन वैदिक आणि सप्तशती मंत्रांनी चंद्रघंटा देवी सहीत सर्व स्थापित देवतांची षोडशोपचार पूजा करावी .

यामध्ये आवाहन, आसन, पाद्य, अध्र्य, आचमन, स्नान, वस्त्र, सौभाग्य सूत्र, चंदन, रोली, हल्दी, सिंदूर, दुर्वा

बिल्वपत्र, आभूषण, पुष्प-हार, सुगंधित द्रव्य, धूप-दीप, नैवेद्य, फल, पान, दक्षिणा, आरती, प्रदक्षिणा, मंत्र पुष्पांजलि इत्यादी करावे.

त्यानंतर प्रसाद वाटप करून पूजा संपूर्ण करावी .
सिंहावर स्वार असलेल्या या देवीला युद्धासाठी उभे रहावे लागते.
भुते देवीच्या भयानक आवाजाने तासनतास थरथरतात.

या देवीची उपासना केल्याने साधकामध्ये शौर्य व निर्भयता तसेच सौम्यता आणि नम्रता वाढते.
म्हणून आपल्याला मन, शब्द आणि कर्म यांच्यासह शरीराचे विहित नियमांनुसार शुध्दीकरण केले पाहिजे.
चंद्रघंटा देवीची पूजा करून साधक सर्व त्रासांपासून मुक्त होऊन सहजपणे उच्चपद प्राप्त करू शकतात .
ही देवी कल्याणकारी आहे.
नवदुर्गाच्या या तीसऱ्या रूपात चंद्रघंटा या वनस्पतीला महत्व दिले जाते .
या वनस्पतीला चन्दुसूर अथवा चमसूर असेही म्हणतात .
हे असे एक रोप आहे जे कोथिंबीरी सारखे आहे .
या रोपाच्या पानांची भाजी केली जाते जी लाभदायक असते .
ही शरीराची जाडी कमी करण्यासाठी लाभप्रद आहे .
म्हणून या वनस्पतीला चर्महन्ती सुद्धा म्हणतात .
शक्ति वाढवणारी , हृदय रोग बरा करणारी चंद्रिका औषधि आहे .
म्हणून या रोगाने पिडीत असणाऱ्याने चंद्रिका औषधाचे सेवन आणि चंद्रघंटा देवीची पूजा केली पाहिजे .

====दुर्गेचे चौथे रूप देवी “कुष्मांडा”====

नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीच्या रूपाची पूजा केली जाते.
या दिवशी साधकाचे मन 'आधाट' चक्रात वसलेले आहे.
आपल्या मंद आणि हलक्या स्मिताद्वारे अण्ड म्हणजे ब्रह्मांडाची उत्पत्ती केली .
याच कारणाने या देवीला कुष्मांडा नावाने ओळखले गेले .
जेव्हा ही सृष्टीच नव्हती आणि चोहोकडे फक्त अंधकारच अंधकार होता .
तेव्हा या देवीने आपल्या इषित हास्याने ब्रह्मांडाची रचना केली होती .
यामुळे या देवीला सृष्टिची “आदिस्वरूपा” अथवा “आदिशक्ति” म्हणले गेले आहे .
कुष्मांड म्हणजे कोहळा.
कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बी मध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते.हे पुनरुत्पादनाचे,निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे.
हे विश्वच कोहळ्याप्रमाणे आहे.
कुश्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावले आहे.

क्रमशः