kadambari Premachi jaadu Part 27 in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी - प्रेमाची जादू भाग- २७ वा

Featured Books
  • तमस ज्योति - 51

    प्रकरण - ५१मेरे मम्मी पापा अब हमारे साथ अहमदाबाद में रहने आ...

  • Lash ki Surat

    रात के करीब 12 बजे होंगे उस रात ठण्ड भी अपने चरम पर थी स्ट्र...

  • साथिया - 118

    अक्षत घर आया और तो देखा  हॉल  में ही साधना और अरविंद बैठे हु...

  • तीन दोस्त ( ट्रेलर)

    आपके सामने प्रस्तुत करने जा रहे हैं हम एक नया उपन्यास जिसका...

  • फाइल

    फाइल   "भोला ओ भोला", पता नहीं ये भोला कहाँ मर गया। भोला......

Categories
Share

कादंबरी - प्रेमाची जादू भाग- २७ वा

कादंबरी – प्रेमाची जादू

भाग – २७ वा

------------------------------------------------------------

१.

चौधरीकाकांच्या घरी येण्याचा आजचा हा दिवस आपल्यासाठी खूपच लकी आहे असे

यशला वाटत होते . फराळ –चहा झाल्यवर चौधरीकाका सर्वांना म्हणाले ,

हे बघा ,आता आजचे रात्रीचे जेवण इथे आपल्या गच्चीवर चांदण्यात करायचे आहे .

आणि त्यानंतर आपलीच अशी एक छान संगीत मैफिल करू या , मगच आजचा कार्यक्रम संपेल .

यश म्हणाला – अहो चौधरी काका ..हे काय अचानक ठरवलंय ..संगीत मैफिलीचे ,

तुम्हाला माहिती आहे ,

बाबा छान गातात ,आई सुगम गीतं म्हणते ,आज्जीला जुनी गाणी म्हणता येतात ,

बाकी आम्ही म्हणजे ..अंजलीवाहिनी ,सुधीरभाऊ ,

मी पण त्यात आलो ..आम्हाला फक्त गाणे ऐकता येते .म्हणता बिनता येत नाही .

मधुरा आणि तिच्या मैत्रिणी यांचेबद्दल तर काही माहिती नाहीये .

आजोबा म्हणाले ..अरे यश , एक काम करु या

तुला बर्यापैकी तबला वाजवता येतो , तुझ्या मित्रांना फोन करून सांग ..दहा वाजेपर्यंत तबला –पेटी

घेऊन या ,तेव्हढेच दोन श्रोते आणि वादक मिळतील आपल्याला .

आज्जी म्हणाल्या – यश –

तुला अजून एक आश्चर्याचा धक्का बसायचा आहे ..

ही मधुरा –संगीत विशारद झालेली आहे , तिच्या बाबांच्या तालमीत , पण इथे आल्यापासून

तिच्यातील हा गुण झाकलेला राहिलंय , त्यात आपल्याकडे अशात एक ही मैफिल झाली नाही.

यश मनापसून म्हणला – बाप रे ..आजी ,ही तर कम्मालच म्हणायची ..

आपल्या नातवाच्या चेहेर्यावर खुललेला आनंद पाहून आजीना मनातून आनंद होत होता ,

त्यांना तर कधी पासूनचे हे असे व्हावे “असे वाटत होते .

यश आणि मधुरा अधिकाधिक जवळ आले तरच .

गरीब आणि साध्या मधुरा विषयी यशच्या मनात तिच्याविषयी काही भावना निर्माण

होऊ शकतील .

आजोबांना यश म्हणाला –

आजोबा , मी माझ्या मित्रांना तबला आणि पेटी घेऊन या असे सांगतो

तुम्हाला संगीत ऐकणे आवडते हे मला माहिती आहे. होऊन जाऊ दे आज एक मस्त मैफिल .

यशची आई म्हणाली ..

अहो आजोबा ..आम्हाला तर मधुराच्या आवाजात ऐकण्याची उत्सुकता लागली आहे .

वा ,मजा येणार आज.

अंजलीवाहिनी यशच्या बाबांना म्हणाल्या .

बाबा – अहो ,आम्ही तसे उशिरा आलोत ,फराळ झाला , आणि

आता लगेच जेवण ..?

बाप रे ..खूप होईल ..मी फक्त संगीत मैफिलीसाठी इथे थांबण्यास तयार आहे ..

आणि जेवणाच्या वेळी मी सगळ्यांना सर्व्ह करीन .

चौधरीकाकू म्हणाल्या ..यशचे आजी आजोबा मी खूप आनंदात आहे आज .

माझा आजार विसरून गेले आहे मी .

आज माझ्या घरात मोठा सण साजरा होतो आहे ,असे आनंदी वातावरण आहे .

अंजली वाहिनी -तुम्ही नका काळजी करू ,

आग्रह वगेरे काही होणार नाही. तुम्हाला हवं तसे करावे.

त्यांच्याकडे पहात अंजली वाहिनी म्हणाल्या -

एक काम करते मी .

.मधुरा आणि टीम यांना सपोर्ट करते मी किचन मध्ये जाऊन.

असे म्हणत अंजली वाहिनी किचन मध्ये गेल्या .

बाहेर सारेजण इकडच्या तिकडच्या गप्पा करीत बसले .

त्यात यशला वाटले ..या सगळ्या मोठ्या माणसात आपण “एकटे एकटे पडलो आहोत “.

या मधुराने रात्रीच्या जेवणाचा खटाटोप घातला नसता तर, ,

इथे बाहेर छान बसून बोलता आले असते . आता किती वेळ लागेल कुणास ठाऊक .?

यशने घड्याळात पाहिले ..साडेआठ वाजत होते ..जेवण होईपर्यंत १०वाजवणार हे सारे लोक

तो पर्यंत काही मधुरा फ्री नाही होणार ....! यशचे मन कशातच लागेना .

जणू त्याला कोपर्यात बसवून चुपचाप बसून राहण्याची शिक्षा केली आहे की काय ?

त्याच्याकडे पाहून असे नक्कीच वाटले असते .

आपल्या मनाची ही अशी अवस्था होणे ..यशला नवीन वाटत होते ..इतके दिवस झालेत

ही मुलगी रोज आपल्या ऑफिसमध्ये समोर असते ,पण, कधी काही वाटलेच नाही या आधी .

की चौधरीकाकांना काही जाणवले आहे का तिच्या मनतले ? म्हणून त्यांनी हा सगळा कार्यक्रम

घडवून आणलाय ?

की असे तर नाही ना की आपले आजी –आजोबा यांनीच त्यांच्या मनातल्या काही आयडीया ,

चौधरीकाकंना सांगितलयात आणि म्हणून हा सगळा खेळ चालू आहे का ?

कारण मधुरा विषयी आजी-आजोबांच्या मनात खूप आपलेपणा आणि जिव्हाळा आहेच .त्यांना

तिच्याविषयी नाकीच काही विशेष वाटत असणार ,ही शंका विनाकारण नाहीये.

तरी बघू या .आगे आगे होता है क्या क्या ....!

आपल्याच नादात बसून असलेल्या यशला अंजलीवाहिनी बोलवत आहेत हे ऐकूच आले नाही

हे पाहून ..आजी म्हणाल्या ..

कोणत्या तंद्रीत हरवलीय स्वारी ..? तुझी वाहिनी आवाज देते आहे ,

जा बघ ,काय हवे आहे त्यांना , मदत कर .

यश किचनमध्ये जाऊन उभा रहात म्हणाला

बोला अंजलीवाहिनी कशासाठी आवाज देत होता ?

काय प्रोब्लेम आहे का ?

अंजली वाहिनी म्हणाल्या ..इथे आम्ही पाचजणी असतांना ..प्रोबेमची काय बिशाद आहे ?

यहा सब ओके चल रहा है बाबू ..

अंजलीवाहिनी असे हिंदीबोलू लागल्यात म्हणजे

मैडम खूप छान मूड मध्ये आहेत असे समजावे.

त्या म्हणाल्या -.सुनो यश भैया -

या आहेत आजच्या शेफ आणि त्यांचे पदार्थ असे आहेत -

माधवी ..खानदेशी भरीत , आणि भाकरी

सारिका –मसाला पुलाव ,मुगाची भजी

रुपाली – सोलापूर शेंगदाणा चटणी आणि कडक भाकरी

मधुरा – नागपुरी कढी गोळे .आणि पोळ्या

आणि मी स्वतहा – पुणेरी , आम्रखंड आणि पोळ्या

भाकरी आणि पोळ्या दोघी -दोघींनी मिळून करायच्या ..

भरपूर कराव्या लागणार आहेत पोळ्या , हे मी आत्ताच या पोरींना सांगितले ..म्हटले

यशला विचारून मग फायनल करू ..किती करायचे ?

आपण सगळे किती ? हे माहिती आहे मला ,

पण या यशचे मित्र ते दोन-चार थोडेच असणार ? त्यामुळे आपण त्यालाच विचारून घेऊ या .

यश -जरा विचारून घे आणि सांग नेमके किती जण येत आहेत .

ते कळू दे आम्हाला ,म्हणजे सर्वांना पुरेल असा स्वयंपाक होईल ..

आणि काही कमी पडला तर ? मग मात्र --

तुला तर माहिती आहे यश ,

..बाहेर एक सोडून .चार चार हेडमास्तर बसलेले आहेत ..

आजी-आजोबा ,आई –बाबा ,आणि नेमक्या अशा वेळी बोलणारे तुझे सुधीरभाऊ

आम्हाला किती ओरडा खायला लागेल ? कल्पना आहेच तुला या गोष्टीची .

अंजलीवाहिनीच्या बोलण्यातली सत्यता यशला पटली ..या सगळ्यानची फजिती होणे बरोबर

नाही .

त्याने मित्रांना फोन करीत म्हटले ..

ए बाबांनो ..संगीत मैफिली आधी तुम्हाला मस्त भोजन पण मिळणार आहे .

तुम्ही किती जण येणार आहात ते नक्की आणि पक्के सांगा बेट्यांनो !

तिकडून मित्रांनी आनंद व्यक्त करीत म्हटले ..

हे बघ यश .. तबला सेट – त्यासाठी दोन जण,

हार्मोनियम धरणारे दोन जण , दोन तंबोरे – त्यासाठी दोन जण ,

आणि मिनी साऊंड सिस्टीम सांभाळणारे तीन जण.. आणि हे सगळ तुझ्या घरून मोठ्या गाडीत

टाकून आणयचे ..ही गाडी चालवणारा आपला एक मित्रच .

बस ..मोजून बारा जण..म्हणजे फक्त एक डझन ..!

आणि हक्काचे श्रोते तर आहोतच की आम्ही .

आणि हो जेवण म्हटल्यावर ..वेळेआधी आम्ही पोंचणार आम्ही .काळजी नको करू .

यशने फोनचा स्पीकर ओन करून ठेवल्यामुळे..किचन मधील सगळ्यांना मित्रांचे बोलणे

ऐकायला मिळाले ..

अंजलीवहिनी म्हणाल्या ..फक्त एकच डझन ..काहीच नाही ..आम्ही पाच जणी मिळून रेडी करतो

सगळा मेनू.

यश ऐक ना , यात तुझी मदत हवी आहे ..

मधुरा ..फक्त कढीचे गोळे करीन ..तिच्या वाटच्या पोळ्या आम्ही बाकीच्या मिळून करूत.

तू आणि मधुरा दोघे मिळून वरच्या कार्यक्रमाची तयारी करा ..

गच्ची झाडून पुसून स्वच्छ करा , लाईट लावा ,सतरंज्या टाका , खालून -वरती सगळी भांडी

प्लेटा घेऊन जाणे ..हे सगळे सेक्शन तुम्ही दोघांनी मिळून करावे अशी माझीच नाही ,

तर या माधवीची ,सारिकाची आणि रुपालीची पण इच्छा आहे.

पण, एक लक्षात ठेवा ..तुमचे कान इकडे खाली असू द्या ,म्हणजे आमचे आवाज ऐकू येतील

तुम्हाला .

अंजली वहिनींची ही कल्पना आहे की मनातली इच्छा ?

मधुरा आणि यश दोघे ही हे ऐकून चमकले खरे ,पण, मनात खूप छान वाटत आहे “

हे थोडेच लपून रहाणार्री गोष्ट होती .

यश आणि मधुरा गच्चीवर आले ,

क्या मौसम है ..!दोघांनी शब्दात न सांगता नजरेतून सांगितले .

निराभ्रा आकाशात चमचमत्या चांदण्या , शीतल चंद्रमा , मंद मंदसे वारे ..अशा मदहोश

वातावरणात..मधुरा आणि यश पहिल्यांदा असे इतके जवळ आले होते .

काही वेळ दोघे एकमेकांच्याकडे भान हरपून पहात राहिले , जणू एकमेकांना नजरेने पाहत

मनात साठवून घ्यावे अशी इच्छा होत असावी .

यशने मधुराला म्हटले –

मधुरा – आजचा हा दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. तुझ्याकडे पाहण्याची ही नवी

नजर या आजच्या भेटीने दिली आहे.

मधुरा म्हणाली – यश , मला माझ्या नशिबाचा हेवा वाटतो आहे ..आपण असे जवळचे होऊ

असे कधी स्वप्नात ही वाटू देत नव्हते ..कारण आपल्या परिस्थितीत जमीन –अस्मानाचा

फरक आहे, त्याचा विसर पडण्य इतकी मी वेडी नाहीये .

पण ..केवळ गावी असलेल्या आपल्या दोन घरातील घरोब्याने .आणि आजी-आजोबांच्या

आपलेपणाने तुमच्या घरात येण्याचे भाग्य तरी माझ्या वाट्याला आले “यातच मी आनंद

मानला .

यश तुझ्या मानाने ,सर्वांच्या समोर सगळ्या अर्थाने मी एक सामन्य आणि साधारण मुलगी आहे .

तरी पण म्हणतात ना सहवासाने प्रेम होते ..तसे काहीसे माझ्या मनात नक्कीच झाले आहे .

तुझे विश्व , त्यातील तुझा मित्र परिवार , तुझे सोशल वर्क ..तुझ्या सुंदर आणि मनमोकळ्या

मैत्रिणी पाहून मी चार पावले मागेच राहणे पसंत केले .

पण ..मोनिकाच्या निमित्ताने झालेला गोंधळ ,त्या त्या वेळी तुझ्या घरात माझे असणे ,

सगळ्यांना खूप आवडले ..ही जाणीव मला धीर देणारी ठरली .

आणि जाणवले ..आजी-आजोबांच्या मनातली ,कल्पनेतली त्यांची सुनबाई “ ते माझ्यात

पहात आहेत.

पण मला भीती वाटते ..तुझ्या मनात असे काहीच नसणार ,मग कसे ?

तुझे आई-बाबा , भाऊ –वाहिनीयांच्या दृष्टीने तुझ्यासाठी मी एकदम अयोग्य हे ऐकवले तर ?

मग मी आतल्या आत या इच्छा दाबून टाकल्या.

यशने मधुराला जवळ घेत म्हटले ..

मधुरा ..तुझ्या साधेपणाने ,निर्मल मनाने मला “प्रेम “कसे असते हे दाखवले ..

मला तू आवडतेस ..पण, अजून थोडा वेळ जाऊ दे ,मनाची तयारी होण्यास.

तुझ्या मनात तर माझ्या विषयी प्रेम नक्की हे कसे समजू ?

मधुराने यशचा हात हातात घेत ..त्यवर ओठ ठेक्वत म्हटले ..

यश ..आय लव्ह यु ..!

--------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात

भाग – २८ वा लवकरच येतो आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाची जादू

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

9850177342

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------