Tujhi Majhi yaari - 6 in Marathi Women Focused by vidya,s world books and stories PDF | तुझी माझी यारी - 6

Featured Books
  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

  • તલાશ 3 - ભાગ 21

     ડિસ્ક્લેમર: આ એક કાલ્પનિક વાર્તા છે. તથા તમામ પાત્રો અને તે...

Categories
Share

तुझी माझी यारी - 6

अंजली आज पहाटेच उठून तयार झाली होती .ड्रेस ला तर रात्रीच कडक इस्त्री करून टका टक करून ठेवला होता..ब्राऊन कलर चा पंजाबी ड्रेस त्यावर व्हाईट कलर ची ओढणी..असा ड्रेस होता त्यांच्या शाळेचा..ड्रेस घालून ती मम्मी कडून केसाची वेणी घालून घेत होती...ती मम्मीच्या पुढ्यात बसली होती आणि मम्मी तिची केस विंचरत होती.

अंजली : मम्मी हळू ना...किती जोरात ओढते स केस..

मम्मी : हो झालं झालं..काय तुम्ही आज कालच्या पोरी अजिबात केसाची निगा राखायला नको .सारखं ते केस मोकळेच सोडलेले ..काय तर फॅशन म्हणे..

अंजली हळूच हसत मम्मी कडे मागे वळून पाहते ..

अंजली : तो गजरा ही लाऊन दे..

मम्मी मग तिच्या केसात तो गजरा ही माळून देते..त्यानंतर आरशा समोर उभा राहून अंजली चेहऱ्यावर पौडर लाऊन छानशी टिकली लावते..गळ्यात छोटंसं फुलांच पेंडन्ट असलेला हार घालून ..ड्रेस च्या डाव्या बाजूला छोटासा झेंडा पिन अप करून लावते...एका हातात ब्राऊन कलर च्या बांगड्या ..दुसऱ्या हातात एक छोटंसं घड्याळ ..झाली अंजली तयार.मग तिने चहा पीला... घरातील देवाऱ्या जवळ जाऊन देवाला नमस्कार केला..आज बॅग नव्हती त्यामुळे ..तिने फक्त रुमाल घेतला..ती तयार होऊन बसली होती पणं सरु अजून आली नव्हती..तिला बसलेलं पाहून मम्मी विचारते.

मम्मी : काय ग काय झालं ?जायचं नाही का?

अंजली : अजून सरु नाही ना आली.. काल सांगून आले होते ..लवकर ये म्हणून पणं ही पोरगी ना कधी वेळेवर यायची नाही..ती अस बोलू पर्यंत सरु दरवाज्यात उभी होती..जीभ काढून दातात धरत ..

सरु : सॉरी..

तिचा आवाज आला तस्स अंजली ने दारा कडे पाहिलं ..

अंजली : आलात मॅडम ..इतक्या लवकर कशाला आलात ? डायरेक्ट प्रभात फेरी वेळीच गेली असतो ना मधून च लाईन मध्ये घुसत..

मम्मी : असू दे ग आली ना ती ..बर तिच्या साठी चहा आणते मी थांब थोडा वेळ ..

अंजली : मम्मी लवकर आण..आणि तू ही ये पटकन..

मग ती सरु कडे पाहत बोलते..

अंजली : सरु छान दिसतेय स..

सरु ही हसून तिला ..

सरु : ती तर मस्त दिसतेस अंजली..रोज पेक्षा थोडी वेगळी ..भारी ती आपल्या तीन बोटांनी तिला छान अस ऍक्शन करत च सांगते.

अंजली : बर ऐक तू चहा पित पित माझं भाषण ऐक बघू चुकत तर नाही ना कुठे..

तेवढ्यात मम्मी ही कप मध्ये चहा घेऊन येतात.. व चहा देऊन जाऊ लागतात ..तेव्हा अंजली त्यांना थांबवते .

अंजली: मम्मी तू ही थांब भाषण ऐकून जा ..तू काय आता शाळेत येणार नाहीस..त्यामुळे इथेच ऐक..

मग मम्मी ही थांबून ऐकतात ..अंजली न चुकता पूर्ण भाषण छान पद्धतीने बोलून दाखवते..सरु व मम्मी ही तिला छान बोलली म्हणून सांगतात..अंजली मम्मी च्या पाया पडते व सरु सोबत शाळेत जाते.

शाळते गेल्या नंतर सरु ,अंजली व इतर मुली मिळून झेंड्या भोवती रांगोळी काढतात..फुलांनी थोडी सजावट करतात..थोड्या च वेळात ढोल वाजू लागले तसे सर्वजण लाईन करून आप आपल्या लाईन मध्ये उभे राहिले..प्रमुख पाहुणे च आगमन झाल्यावर .त्यांच्या हस्ते झेंडा वंदन होते....झेंड्या च्या बाजूला अर्ध गोल करून मुली जण गण मन गातात ..त्यात आपली अंजली ही असते ह..नंतर झेंडा गीत ही गायीले जाते .. सर्व जण झेंड्या ला सलामी देतात.

ढोल वाजत ..दोन दोन मुली व मुलांची जोडी करून लाईन मध्ये प्रभात फेरी निघते ..त्यात मध्ये मध्ये घोषणा देण ही चालू च होत..

एक दोन तीन चार ..
गांधीजींचा जय जय कार..

छोटी मुले ही घोषणा देत होती तर मागची मोठी..

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या विजय असो..

असे मोठ मोठ्याने ओरडत घोषणा देत होते ..सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते..प्रभात फेरी गाव ला वळसा घालत ग्राम पंचायती समोर आली .. त्यानंतर तिथे ही झेंडा वंदन झाले व पुन्हा सर्वजण शाळे कडे वळले ..गावात ठीक ठिकाणी देश भक्ती पर गाणी वाजत होती..

मेरे
श की धरती..हो..
मेरे देश की धरती..
सोना उगले .. उगले हिरे मोती..
मेरे देश की धरती..

तर काही ठिकाणी ..

ये मेरे वतन के लोगो...
जरा आंख मे भरलो पाणी...
जो शहीद हूये हैं..उनकी
जरा याद करो कुरबानी..

गीत ऐकुन रोमारोमात नवीन जोश संचारत होता..सरु व अंजली ही एक मेकीचा हात धरून चालत होत्या..मध्येच सरु कोणाला तरी पाहून हसली..अंजली ने तिच्या कडे पाहिलं..

अंजली : कोण होत ग ? हसली स का?

सरु थोडी बावरून च ..

सरु: अ..कुठे कोण ..कोणी नव्हत..ते असच हसले..

पुन्हा शाळेत आल्यावर प्रमुख पाहुणे च भाषण झालं ..मग शाळेतील विद्यार्थ्यांन ची भाषण सुरू झाली..अंजली ने ही छान भाषण केलं .. भाषणं नंतर मागील वर्षीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला..म्हणजे १० ला बोर्ड मध्ये नंबर काढणारे विद्यार्थी, इतर विविध स्पर्धा न मध्ये विजयी झालेले असा सर्वांचा सत्कार झाला..त्यानंतर सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम म्हणजेच ग्राम पंचायती कडून मिळालेल्या गोळ्या बिस्कीट वाटपाचा कार्यक्रम झाला..दोन चार गोळ्या हातावर मिळताच छोटी चिल्ली पिल्ली तर फारच खुश झाली होती..इतका वेळ मैदानात बसून उन्हामुळे लागणारे चटके क्षणात गायब झाले..कार्यक्रम संपला अस जाहीर होताच सर्व जण आप आपल्या घरा कडे धावले..सरु व अंजली मग सर्वांन सोबत बोलून घरी आल्या.

अपेक्षे प्रमाणे चव्हाण सरांनी घेतलेल्या टेस्ट मध्ये अंजली ला आउट ऑफ आउट मार्कस मिळाले व त्यांच्या हातून बक्षीस म्हणून पेन ही मिळाला..अंजली खुश झाली.
आता पहिली युनिट टेस्ट चालू झाली आणि सर्व जण आप आपल्या स्टडी मध्ये गुंतून गेले.
पहिल्या पेपर दिवशी सर्व जण आप आपले नंबर शोधून ..एक मेकांना बेस्ट लक विश करून..आप आपल्या जागेवर बसले....अंजली च्या पाठीमागच्या बँच वर त्यांच्या वर्गातील एक मुलगा त्याच्या नंतर रेखा चा नंबर होता ..रेखा नंतर स्नेहा होती..त्यानंतर लास्ट नंबर होता निशा चा..पेपर सुरू झाला तस्स सर्वांनी आगोदर येत ते पटपट सोडवून घेतल..त्यानंतर..मात्र सरांच लक्ष नसलेलं पाहून सर्व एक मेकांना खुनवून ..याच उत्तर काय त्याचं काय अशी विचारपुस करू लागले..अंजली मात्र नेहमी सर्वांना सांगायची..अंजली रेखा ला खुनवून सांगत असे ..हाताच्या बोटांनी..पहिल्याच दुसरं ..रेखा ते मागे ..स्नेहा ला ..स्नेहा ..निशा ला अशी त्याची साखळी चाले... आधे मध्ये कोणी ती खुणवा खुनवी पाहिली की मग त्याचा ही चान्स लागत असे.

एकदाचे पेपर झाले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास घेतला...चला आता निदान पुढची परीक्षा येई पर्यंत तर थोड कमी टेन्शन असणार.

आज सुट्टीचा दिवस सरु आज ही अंजली च्या घरी आली होती..अंजली ची मम्मी सकाळी सकाळी च शेजारच्या काकू कडे काही तरी काम होत म्हणून गेली होती..मम्मी ने अंजली ला सांगितलं होत की किचन कट्यावर चपातीच पिठ मळून ठेवलं आहे कपडे धुवून झाले तर चपात्या येतात का करायला बघ..अंजली ला इतर घरातली सर्व कामे येत होती पणं अजून भाकरी व चपाती करता येत नव्हत.सरु आली पाहून अंजली खुश झाली.

अंजली: बर झाल सरु तू आलीस.. अग मम्मी शेजारी गेलीय आणि मला चपाती करायला सांगितलं आहे.. पणं मला येत नाही..तू करु लाग चल..

सरु ही थोड गोंधळते..

सरु:चपाती?अंजली मला चपाती फक्त भाजता येते लाटता येत नाही..मी भाजू लागते तू लाट..

अंजली:ठीक आहे चल बघू येत तरी का..

दोघी मैत्रिणी किचन मध्ये घुसल्या ..अंजलीने कणकी चा गोळा करून तो पिठात घोळवून पोळ पाटावर ठेऊन लाटायला सुरवात केली..पणं तिला जमेना एकदा कणिक लाटण्याला चिकट असे तर एकदा पोळपाटाला ..सरु ते पाहून आपल हसू दाबत होती..अंजली तिच्या कडे रागाने पहाते..

अंजली: सरु,खूप हसू येत आहे तर तूच कर बघू तुला येत असेल तर..

अंजली अस बोलली तशी सरु हसायचं थांबली..

सरु:नाही नाही... तू कर मी नाही हसत...

अंजली: ह्म्म

अंजली ने मग चपाती लाटायला चालू केली.. कधी ऑस्टरेलिया...तर कधी भारत असा चापतीचा आकार होऊ लागला..अंजली जिकडे लाटायच तिकडे पोळपाट फिरवायची पणं तरीही चपातीचा आकार काही गोल होत नव्हता..शेवटी खूप प्रयत्न करून ..अंजली ने एकदाची चपाती लाटली...आणि गॅसवरील तव्यावर टाकली आता बारी होती...सरूची .....सरू ला तर कुठे येत होत तिने तर असच सांगितलं होत की तिला येत..तिने चपाति चा करपवून धुरळा केला...अंजलीने पाहिलं तस्स लगेच गॅस बंद केला...

अंजली: अशी चपाती भाजतात काय?

सरु आता खाली मान घालून बोलली..

सरु: अंजली मला नाही येत चपाती भाजता...मी तर अशीच बोलले मला येत..

तेवढ्यात अंजलीच्या मम्मीचा आवाज येऊ लागला तस्स अंजलीने कणकी वर परत प्लेट झाकली व पोळ पाट जागेवर ठेवला.. व सरु ला बोलली..

अंजली : सरु ,ती चपाती लवकर लपव कुठे तरी...

सरूने ही मग चपाती एका प्लेट खाली लपवून ठेवली...

मम्मी तेवढ्यात आली...

मम्मी: अंजली ,किचन मध्ये काय चपाती बनवत आहेस का?

अंजली: चपाती?नाही तर मम्मी ...सरु आलीय ना मग आम्ही पाणी प्यायला आलो होतो किचन मध्ये...होय ना सरु?

मम्मी: बर बर जा तुम्ही मी करते चपात्या...

अंजलीने सरु ला ईशाऱ्यानेच लपवलेली चपाती घ्यायला सांगितलं व सरूने ही आपल्या ओढणीत चपाती लपवत बाहेर नेली...बाहेर येऊन त्यांनी ती चपाती शेजारच्या आजीच्या शेळीला खाऊ घातली..आणि एकदाची ती चपाती शेळीन खाल्ली...अंजली व सरु पुन्हा घरात आल्या ..

अंजली:बर झाल मम्मीने चपाती नाही पाहिली नाहीतर आज खूप ओरडली असती..अस म्हणत तीने एक मोठा श्वास घेतला..

सरु: होय की...

अस बोलून दोघींनी एक मेकिकडे पाहिलं व जोरजोरात हसू लागल्या..

क्रमशः

(काय मग कशी वाटली अंजली व सरु ची चपाती...😝...)