She __ and __ he - 18 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | ती__आणि__तो... - 18

Featured Books
  • ભાગવત રહસ્ય - 149

    ભાગવત રહસ્ય-૧૪૯   કર્મની નિંદા ભાગવતમાં નથી. પણ સકામ કર્મની...

  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

Categories
Share

ती__आणि__तो... - 18

भाग__१८


रणजीत आणि राधा दोघेही मस्त फ्रेश झाले...राधा तिला भेटलेले गिफ्ट्स ओपन करून पाहत होती...रणजीत मोबाईल मध्ये डोक खुपसुन होता...राधाने एक एक करून सगळ्यांचे गिफ्ट्स ओपन करून पाहिले...पण रणजीतच गिफ्ट अजुन ओपन नव्हतं केल...(अस रणजीतला वाटल..😅.)



रणजीत__ पाहिलेस का गिफ्ट्स...?



राधा__ हो...कंटाळ आला आता ओपन करून😃



रणजीत__ काय काय दिलय मग सगळ्यांनी....



राधा__ (सगळे गिफ्ट्स दाखवत).....आ..रम्या ताई आणि राहुल दादानी मिळून सोन्याचा हा हार दिलाय...अन रेवाने तो वनपीस मी आज घातला होता तो दिलय..अजुन माधवी काकू आणि महेश काकानी पैठणी,ठुशी दिले...अन आई,बाबानी लक्ष्मी हार दिलाय....आजीनी त्यांचे कड़े दिल्यात परंपरागत असलेल्या...खुप आवडल्या मला...



रणजीत__ अजुन काय काय भेटलय...



राधा__ आणी....🙄 हो माझ्या ग्रूपने माझी पेंटिंग बनवून दिलय....तू पाहिलेस न मगाशी...माझ्या आई बाबानी पण रिंग दिली मला....



रणजीत__ अजुन...काही



राधा__ आ....🙄🙄🙄🙄



रणजीत__ (मनात)....अग माझ गिफ्ट ओपन तरी कर..केल की नाही काय माहित☹️



राधा__ अरे हो...ते विसरलेच.....



रणजीत__ ह काय काय😃



राधा__ रुताने स्वतः बनवलेल ग्रीटिंग कार्ड...ओह खुप गोड़ बनवलेय तिने😃



रणजीत__ हम्म्म्म☹️



मग रणजीत उठून बालकनीमध्ये जातो...त्यांला जरा वाईट वाटल होत...मागून राधा ही बालकनीमध्ये आली...



राधा__ आ तू दिलेली चैन सुद्धा खुप गोड आहे😃मी तर मज्जा घेत होते रे तुझी🤣 सॉरी...



रणजीत__ ईट्स ओके...तुला आवडली ना झाल तर मग



राधा__ हो...आज खुप मस्त वाटल...माझा वाढदिवस असां स्पेशल केलात ना तुम्ही सर्वानी...खुप भारी वाटल...



रणजीत__ ह्म्म्म...तू खुश तर आम्ही पण खुश...



दोघे आज कुठे नव्हेतर गप्पा मारत होते तोवर पाऊस सुरु झाला....रणजीत राधा बालकनीमधुन आत गेले...मग काहीवेळाने दोघेही निद्रेच्या स्वाधीन झाले...


असेच दिवस गेले....राधा आणि रणजीत त्यांच्या रुटीनमध्ये बिझी झालेले...पण यादरम्यान दोघेही नकळत हळूहळू एकमेकांच्या जवळ येत होते...जेव्हा दोघेही एकमेकांसोबत असायचे तेव्हा त्यांच हृदय धड़धड़ करायच..ते एकमेकांवर चिडायचे..रूसायचे,हसायचे..जेलिस सुद्धा व्हायचे...पण त्यांना अजुन त्यांच्या प्रेमाची जाणीव नव्हती झाली...पण दोघानाही माहित होत की काहीतरी स्पेशल फिलिंग नक्कीच आहे..



***************************



आज राधा घरीच होती...म्हणून सगळ्या महिला मंडळने मिळून घर झाडून साफ केल..टकाऊ वस्तु काढल्या अन जमा करून ठेवल्या..आणि आता सगळ्या आपआंपल्या खोल्या साफ करत होत्या....राधाही त्यांची खोली साफ करत होती...साफ करतांना तीच लक्ष कपाटा वर गेल म्हणून तीने वरील सगळा समान काढला...वरती फक्त एक पेटी होती...ती पेटी घाण नव्हती झाली पन तरीही राधाने ती झाड़ली अन साइडला ठेवली....



सगळी सफाई झाली मग राधा फ्रेश होऊन रूममध्ये बसली...तेव्हा तीच लक्ष पुन्हा त्या पेटीकड़े गेल..म्हणून तिने तीं पेटी उघडून पाहिली...तर त्यात काही सामान होत पण ते सामान जास्त घाण नव्हतं झाल...त्यात मुलींच घड्याळ होत(बंद पडलेल)...लाल रिबिन होती...मोरपीस होता...आणि मोठी डायरी होती....राधाला हे सगळ पाहून अश्चर्या वाटल...



राधाने ती डायरी घेतली आणि बाल्कनीमध्ये जाउन बसली...ती डायरी उघड़ताच दुसऱ्या पानावर दोन फोटो होते...एका फोटोत लहान मुलगी आणि त्यासोबत एक मुलगा होता...दुसऱ्या फोटोतही सेम पोज मध्येच एक मुलगी आणि सोबत रणजीत होता...त्यांनी असे गावाकडचे कपड़े घातले होते...राधाला हे बघून जरा धक्काच बसला....त्या फोटो खाली रणजीत ♥️ सोनाक्षी...अस लिहिला होत....



राधा__ रणजीत आणि एका मुलीसोबत...पण रणजीतच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये मी हिला कधीच पाहिले नाही...मग ही सोनाक्षी कोन आहे...??? आणि रणजीत हिच्यासोबत का...??मला ही डायरी वाचायला हवी...अस खरतर वाचू नये कोणाची डायरी पण माला आता राहवेना....

मग राधा डायरी ओपन करते आणि वाचू लागते....



📔...[डायरी...]...📔


Date- 12 November 2012

माझ गाव कोल्हापुर...जन्म माझा याच गावी झाला...इकड़च वातावरणच मला फार आवडत... बेधुंद करणार...माझ गाव मला खुप आवडत याची दोन कारण आहेत...एकतर माझा जन्म या मातीत झालाय म्हणून माझ माझ्या गावावर प्रेम आहे आणि दूसर म्हणजे....सोना...सोना माझ पहिल प्रेम... My first truee Love....♥️


मी आणि सोना लहनपनापसुन मित्र आहोत खुप घट्ट आणि खरी मैत्री आहे आमच्यात..अन तीं कायम राहणार...मला सोना आधिपासुन खुप आवडते अगदी समजायला लागल्यापासुन....आधितर तिला रोज पाहण्यासाठी काहीतरी कारण काढण...तिच्याशी खुप गप्पा मारण...तिच्यासोबत खेळन, फार आवडायच मला हें सगळ... आता आम्ही बरयापैकी मोठे झालोत प्रेमाचा खरा अर्थ आता कळला आहे मला...माझ सोनावर फक्त प्रेम आहे... निष्पाप,पवित्र अस प्रेम...खुप प्रयत्न केले तिला खर सांगण्याचे पण काय करू धाडसच नाही होत ना...तिच्या प्रेमात पुरता बुडालोय मी....

Love uu सोनाक्षी...♥️🌸



राधाला हे वाचून आता अटैक यायचा बाकी होता...तिला तर काही कळत नव्हतं आपण खरच हे वाचतोय का..ती कन्फर्म करायला पुन्हा डायरीवर नाव बघते तर रणजीतच होत...



राधा__ रणजीतचा जन्म त्याच्या गावी झालाय....आणि सुरुवातीला तो तिकडेच शिकत होता...आणि म्हणजे तीं सोनाक्षी रणजीतच पहिल प्रेम आहे...हे कधीच बोला नाही तो...☹️🙄...2012 म्हणजे रणजीत डायरी लिहिताना १८ वर्षाचे होते...मला तर काही कळत नाही आहे...पण पुढे काय झाल असेल त्यांच...?.....(डायरी वाचत).....




📔...[डायरी...]...📔


Date- 15 November....

आज बरच धाडस करून मी सोनाला माझ्या मनातल्या फीलिंग्स चिठित लिहून दिल्या आहेत...मला आता टेंशन येत आहे की तीं उत्तर देईल का..? आणि काय देईल..?? माझ प्रेम जर तिने नाकारल तर....पण खरच मी नाही राहु शकणार तिच्याशिवाय...पण हो तीच जे उत्तर असेल ते मला मान्य असेल...त्यावरुन मी तिच्यावर रागवनार तर नाही....


आता फक्त तिच्या एका होकाराची वाट बघतोय...


"बस अब एक हा के इंतजार में रात यूँही गुजर जाएगी,
अब तो बस उलझन है साथ मेरे नींद कहा आयेगी,
सुबह की किरण जाने कौनसा संदेश लायेगी,
रिमझिम सी गुनगुनायेगी या प्यास अधूरी रह जायेगी..."



Date- 16 November.....

ओहो....!!! आजची डेट माझ्या कायम लक्षात राहणार आहे....आज मी खुपपप खुश आहे....कारण सोनाने होकार दिलाय माझ प्रेम कबूल केलाय आणि तिलाही मी आवडतो हे तिने मान्य केलाय... वाव!! मला कधीच वाटल नव्हतं की सोनाही लहनपनापसुन माझ्यावर प्रेम करते...माझ आयुष्य आता कस कम्प्लीट झाल्यासारख वाटत आहे....


म्हणतात ना...सगळ असत आपल्याकडे पण तरीही काहीतरी कमी आहे आयुष्यात अस वाटत...ते हेच...आपल्या आयुष्यात आपल मानुस असन त्याच प्रेम आपल्याला मिळन खुप मोठी गोष्ट आहे....मला ते मिळाल आहे....मी खुप लकी आहे...☺️


राधा त्याची डायरी वाचत गेली...त्यात सगळ त्याने लिहिले होते...ते रोज भेटायचे...गप्पा मारायचे..तिच्यासोबतचे क्षण.. सगळ अस डिटेलमध्ये लिहिला होत...३ तास जवळ जवळ राधा ती डायरी वाचत होती....



Date- 21 January 2015

कशी वर्षे उलटली समजले नाही...सोना माझ्या आयुष्यात आली मी आनंदी राहायला लागलो...पण आता मला बिझीनेस मेनेजमेंट करायला U.S ला जाव लागणार आहे...त्यात ३,४ वर्ष तरी जातील....कस राहु मी सोनाशिवाय मलाच कळत नाही आहे...पण जाव तर लागणार ना कारण माझ भविष्य त्यावरच अवलंबुन आहे...मी तिकडूंन आलो की सोनाशी लग्न करनार...हं त्यादिवसाची मी आतुरतेने वाट पाहतोय....
BYE Bye Kolhapur....Miss uu सोना...♥️



राधाने पान पलटले पण त्यानंतर पुढे काहीच नव्हतं लिहिला....सगळी पाने कोरी होती....



राधा__ काय झाल असेल पुढे...☹️ सोनाक्षी...कुठे असेल??



सुमन__ (आवाज देत).....राधा...ए राधा...रणजीत आला ग....झाली का खोली आवरुन...



राधा__ आआ हो आई...झाले...
अरे बापरे रणजीत आला त्याने जर पाहिले तर वाट आहे आपली...राधा जल्दी कर...



राधा ती पेटी बंद करून...पटकन कपाटावर जशी होती तशी ठेवते....पण डायरी तिच्या हातातच राहते...तोवर रणजीत खोलीत येतो...राधा डायरी पटकन स्वतः मागे लपवते...



रणजीत__ अरे...रेडिओ...वा...! छान सफाई केले तुम्ही महिला मंडळने...Very good......(रूमकडे बघून)



राधा__ (खोट हसते).....हहहह थांक्यु😅😬😬



रणजीत__ काय झाल...मानकाप्या बघितल्या सारख काय उभी राहिलेस....😂



राधा__ अबबब हहहह कुठे काय.....😬



रणजीत__ राधा....घाम का फुटतोय तुला..(तिच्या जवळ येत)



राधा__ अबबब थांब...हात नको लावू....म्हणजे अरे काम आताच झाल ना म्हणून घाम येतोय...आणि मला फ्रेश पण व्हायच्य...बर तू जा आधी फ्रेश हो...मग मी होते....जा जा....



रणजीत__ अग...बर ठीके......(बाथरूममध्ये जात)



रणजीत फ्रेश व्हायला जातो तोवर राधा डायरी लपवायला जागा बघते...पण तिला कुठेच जागा भेटत नाही...मग ती डायरी पुन्हा पेटीत ठेवायच ठरवते...वरती चढून पेटीत डायरी ठेवत...आणि पेटी वरती ठेवली तोवर रणजीतने पाहिले....राधा घाबरली म्हणून तिचा तोल गेला आणि ती टेबलवरुन खाली पडली....रणजीतने पटकन उचलून तिला बेडवर बसवल...



रणजीत__ राधा...जास्त लागल का ग...हा...



राधा__ आआआआ....ससस पाय मुरगळलाय रे....दुखतय😣😖😖😖



रणजीत__ थांब मी स्प्रे मरतो......(स्प्रे मारून)....आता बर वाटतंय...ठीके...



राधा__ ह्म्म्म....



रणजीत__ (थोड़ उदास होऊन)...अग पण तू वरती का चढली होतीस....पेटीला का हात लावत होतीस...?



राधा__ आआआआ...ब ते...मला नंतर लक्षात आल की वरती साफ नाही केल म्हणून पटकन करत होते..पण करायच्या आधी पडले...



रणजीत__ ह्म्म्म...पुन्हा त्या पेटीला हात नको लावुस...आणि साफ ही नको करू...



राधा__ का...?



रणजीत__ सांगतोय तेवढ कर...😡😡पुढे नको बोलूस...समजल....



रणजीत रागातच उठून रूमबाहेर जातो...राधाला त्याच हे वागन जरा वेगळच वाटल...



राधा__ अरे..याला काय झाल...बॅगच नाव काढताच किती चिड़तो...आजवर अस वागला नाही तो..ह चिड़तो मझ्याशी भांडतो...पण आजच त्याच हे चिड़न वेगळच वाटल...मला आता रणजीतला विचाराव लागेलच...



राधा विचार करतच बसते...प्रश्नाची गर्दी तिच्या डोक्यात चालू होती...काहीवेळाने सुमन राधाला खोलीत बोलवायला येतात...



सुमन__ राधा....अग..काय ग झाल पायाला..?



राधा__ आई..आई...मी ठीके...थोड़ा दुखत होता आता बरा आहे...तुम्ही बोला ना काय झाल...काही काम होत का..?



सुमन__ हो ग...खाली शिवा आणि त्याची बायको आलेत त्यांच्या बाळासह....अग आता मागच्या महिन्यात शिवाला मुलगी झाली ना...तुला माहित नसेल...



राधा__ आहे..म्हणजे कानावर आल होत तस...



सुमन__ हो तर ते दोघे आलेत खाली...चल मग तू ही भेट त्यांना...



राधा__ हो हो..चला..



दोघी खाली येतात...तर सगळे मस्त गप्पा मारत बसले होते...



राधा__ अरे...शिवा दादा...कसे आहात......(सोफ्यावर बसत)



शिवा__ मी मस्त आहे बाईसाहेब...



राधा__ शिवा दादा...तुम्ही सर्वात आधी तर बाईसाहेब बोलना बंद करा..आणि राधा ताई बोला ते चालेल मला...



माधवी__ हो रे शिवा बरोबर बोलते राधा...



शिवा__ हो काकू...चालेल राधा ताई...



राधा__ हा...☺️



शिवा__ बर राधा ताई ही माझी बायको गौरी...तुम्ही ओळखत नसाल ना...



राधा__ अच्छा...नाही न...



गौरी__ नमस्कार ताई...!



राधा__ नमस्कार...बर बघू बाळाला...



गौरी__ ह....(बाळाला देत)



राधा__ ओव...किती गोड आहे ही...अगदी गौरी सारखी दिसते😃



सुमन__ हो न...



शिवा__ बर मी आणि गौरी इकडे आलो कारण...माझी अशी इच्छा आहे की माझ्या पोरीचा नाव तुम्ही सगळ्यांनि ठेवावे....



महेश__ अरे अस काय शिवा...



शिवा__ राहुदया ना..महेश काका...आहो माझ्यासाठी एवढ केलाय तुम्ही...तुमचे उपकार फिटता फिटनार नाहीत...घरच्यासारख वागणूक देता तुम्ही आम्हाला..आता फक्त एक एवढा करा की...



राहुल__ बर...बाबा,काका, होऊदे त्याचे मनासारख...चला पटकन सगळे नाव सूचवा...कोणतेही अक्षर चालेल न शिवा,गौरी..



गौरी__ होय....



शिवा__ चालल...



सदाशिव__ आ....नुतन कस आहे..?



राहुल__ काका जून झालेय हे नको...



महेश__ मग.....🙄 कामिनी...



रेवा__ नको बाबा...



माधवी__ शमा...



रेवा__ आई आता तू मला शमा कर...पन काहीही नाव नको सूचवु तुझ्या जमानयाची...आमच्या जमान्यातली सांग जरा...



सुमन__ ह्म्म्म....दिव्या...कस आहे..?



रेवा__ हम्म..ठीके..ऑप्शन असुदे...नेक्स्ट...



रम्या__ रिद्धिमा...



राहुल__ गप्प बस...😂



रेवा__ अरे नाव अस हव ना जे त्या दोघांच्या नावाला सूट करेल...



राहुल__ कार्तिकी...



रेवा__ नको दादा...



आजी__ मग....शांता...कस आहे..



रेवा__ आजी अशी नाव सांगणार अशील तर शांत रहा😂😂😂



आजजी__ काय ग नाटकी कुठली सगळ्यांच्या नावात चूक काढ़ते...तूच सांग आता...



रेवा__ तन्मयी...कस आहे....



राहुल__ बकवास...गप्प बस आता.(डोक्यात मारून)



राधाला मधेच काहीतरी सूचत ती रुताच्या कानात कायतरी बोलते....



रुता__ मी पन एक नाव सूचवु का...



माधवी__ अरे वा बबडू नाव सूचवते...सूचवा बाळा...



रुता__ सोनाक्षी....



हे नाव ऐकताच रणजीतच्या चेहऱ्यावरील भावच बदलले...राधाला तेच पहायच होत...म्हणून तिने अस केल...



रेवा__ छान आहे...बट नको हें नाव बबडू...


राहुल__ हम्म..जीत आणि राधा बोला काहीतरी नाव...



रणजीत,राधा__ (एकाच वेळी)......दुर्वा....



दोघानी एकच नाव घेतल म्हणून सगळे त्यांच्याकडे बघू लागले...त्या दोघांना पण याच नवलच वाटल...



शिवा__ वा...हे नाव छान आहे..आम्हाला शोभेल अस...



गौरी__ हो...आणि आपली बाप्पावर पन खुप श्रद्धा आहेच...



माधवी__ मस्त ह...दोघांची निवड चांगली जुळते...



सुमन__ हो ना...



रेवा__ ह्म्म्म....ते बोलतात ना...."कितने भी दूर दूर हो उन दोनों के रास्ते..मिल जाते है जो बने एक दूजे के वास्ते.." आहाहा...माशाल्लाह...😂😂



रम्या__ वा...नंदूबाई...😂



रेवा__ तर तसाच या दोघांच आहे...एकमेकांसाठीच बनलेत ते....म्हणून निवड जुळतेच....😂



माधवी__ गप कारटे...नुसती बडबडत असते😂 हिचा पन लवकर लग्न लावून देऊ...काय ओ...



महेश__ हो हो लवकरच लावू...



रणजीत__ पन हिच्यासाठी मुक़ा मुलगा पाहावा लागेल..कारण हिचीच किती बड़बड़ असते..त्यांला बोलायला मिळणारच नाही..त्यापेक्षा मुकाच शोधलेला बरा😂😂🤣



रेवा__ भाई......सुमन काकू.....😣



सुमन__ जीत....गप रे...🙄🤣



रणजीत__ बर😂🤣


रात्री राधा बाल्कनीमध्ये उभी होती....तिच्या मनातून सोनाक्षी कुठे असेल? तीच काय झाल?? हें प्रश्न काहूर माजवत होते....रणजीत मात्र आज लवकरच झोपला होता...राधा ही मग विचार करतच झोपी जाते....




क्रमशः

(आला नवीन ट्विस्ट...आता कुठे दोघे जवळ येत होते तर ट्विस्ट आलाच...लव्ह स्टोरी मध्ये ट्विस्ट नाहितर मजा नाही😃या ट्विस्टमुळे खुप गोष्टी क्लियर होतात...आता सोनाक्षी कुठे असेल???पुढे काय झाल त्यांचा.??आणि रणजीत त्याबद्दलच दुःख कधीच दाखवत का नाही?? नक्की काय आता हें पुढे समजेल...आणि डायरीचे मी फक्त मेन पार्ट्सच लिहिलेत...Ok Stay tuned....☺️)



©प्रतिक्षा__🌸