Reshmi Nate - 19 in Marathi Love Stories by Vaishali books and stories PDF | रेशमी नाते - 19

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

रेशमी नाते - 19

विराट घरात आल्यावर आजी बरसतेस..विराट,तुला घरातच बजावुन सांगितले होते ना,लग्न होईपर्यंत पिहु तिकडे आणि तु इकडे राहणार मग का गेलास..

तो एक नजर रागाने सूमनकडे बघतो..सुमनला त्याच्या नजर‌ेनेच कळालं हा आता शांत बसणारयातला नाही.

आजी पिहुच आणि माझ लग्न झालयं आणि ती माझी बायको आहे...हे तुम्हाला लग्नाच वेड लागलयं ना मग करा ना,मी काही बोललो का,पण पिहु मला उद्या ह्या घरात हवी तो ऑर्डर दिल्यासारखा बोलुन निघुन गेला.

अगं सुमन हा कोणाच ऐकत कस नाही,जीजी सुमनवर चिढते.

आई मी काय सांगु आता तो ऐकणार सुध्दा नाही,

ते मला माहित नाही कस समजावायच तु बघ,

आई मी काय म्हणते,(सुमन जवळ येऊन बसते)

तुला जेवढे सांगितले तेवढ कर जास्त शिकवु नकोस.सुमन शांतच बसते.

विराट फ्रेश होऊन खाली येतो...सगळे जेवायला बसलेच होते.शांतपणे सगळे जेवले तसा विराट ने परत तोच विषय काढला😂😂

मॉम पिहुला तु आणणार आहे का मी आणु जाऊन तो जितक शांत राहता येईल तेवढा शांत होता.

सुमन दोघींकडे न‌जर टाकुन विराट‌कडे बघते.विराट कुठलाही हट्ट करत जाऊ नकोस...दहा दिवसांनी काय होणार आहे.

रीयॅली ,मॉम काहीच होणार नाहीये पण तिच हक्काच घर आहे ना,मी आहे सगळी फॅमिली आहे तर ती तिकडे कशी राहु शकते.

हो हो माहीत आहे पण लग्न असच करतात बाळा,

ओके विराट शांत होत चेअर वरुन उठुन उभा राहतो...लग्नाच्या दिवशी मी आणि पिहु दिसणार नाही. मग तुम्ही आणि आलेले गेस्ट जेवण करुन भेट घेऊन निघून जावा‌.😁😁

🙄😳😳काय सगळे एकसाथच बोलतात‌.

विराट गालात हसत सगळ्यांवर नजर टाकतो.हो,‌...गुडनाईट तो त्यांना टेंशन देऊन झोपायला निघुन गेला😂😂😂

सगळे बराीक चेहरा करुन एकमेका‌ंनाकडे बघतात.

काय गं तुझा पोरगा असा का आहे जीजी ओरडुनच बोलते.सुमन तर डोकच धरून बसते आणि विराट बोलला तेच करणार हे ही माहीत होतं ..लग्नाच्या दिवशी तो खरच गायब होईल.
.
.
.
सकाळी सगळेजण नाश्ता करताना शांतच असतात.

मॉम मी काय बोलल कळालं ना,

सुमन खाली बघतच हो म्हणत मान हलवतात.कोणाच काहीच रीअॅक्शन नाही.म्हणुन आता तो विचारातच पडला होता.
मग काय विचार केला पिहुला आज आणायच ना,तो हसतच विचारतो.

नाही,सुमन नाश्ता करतच बोलते.

काय,(तो जोरातच बोलुन उठुन उभा राहतो.)

हळु मी काय वेगळ बोलले नाही..

मॉम मी खरच येणार नाही हहह तो चिडुनच बोलतो.

नको येऊ सुमन फरक न पडल्यासारख बोलत होती.(सुमन त्याला चांगलीच ओळखते😂😂आता पिहुला नाराज करण्याचा विचार करणारच नाही,पोकळ धमक्या देतोय आता)

मॉ..म...हे..तु मुद्दाम करतेस ना,

विराट नाश्ता कर,आजी त्याच्या हाताला धरत चेअर बसवते...आणि तुझ कसं आहे ना,एकच गोष्ट दहा वेळा बोलायला आवडत नाही.तस आमच ही आहे पिहु लग्नानंतरच येणार ह्या घरा‌त आता ह्या वर तु वाद घालत बसला तर आम्ही परत जाऊ मुंबईला आणि तु आणि पिहु काय करायच ते करत बसा.लग्न करा,नाही तर हनिमूनला जावा पण तुला घरात घेणार नाही मी एवढ लक्षात ठेव.आजी त्याला शांत भाषेत धमकी देत बोलत होती.

सगळे तोंड दाबुन हसत स्वतःला सावरत होते.

तसा तो ब्लँक होत सग्ळ्यांनाकडे बघत होता...माझ्यापुढे
एक,पाऊल निघाले कि हे सगळे तो मनातच बोलत उठुन निघून जातो.

कुठे चालला सूमन ओरडुनच बोलतात.

तो रागात वळुन बघतो.मॉम (तो दात ओठ खातच चिडतो,)

सुमन शांत होत हसतच त्याच्याजवळ येते,अरे...ते..ते आज पिहुची तूझी शॉपिंग करा‌यला जायच ना,म्हणून,विचारले...

मला नाही,यायच तूम्हीच जावा ...

अरे, असा का बोलतो‌य..

मामा झालं असेल तर निघायच का,तो सूमन ला इग्नोर करतच बोलतो.

ह..हो केशव पण तो चिडला म्हणून लगेच उठून त्याच्याबरोबर निघून जातात.

वहीनी‌ मला वाटत नाही विराट ऐकेल.सुधा चेहरा,पाडूनच बोलते.

बघु आता...काय होतेय.

अकराच्या दरम्यान मध्ये पिहुच्या घरचे आणि विराट घरचे डिझाईनर कडे येतात...पिहु सग्ळ्यांशी बोलते...पिहुची नजर विराटलाच शोधत असते...

विराट आला नाही का,रेवती नजर वळवुन बघते..

ह..हो.तो येईल थोड्यावेळाने आपण तो‌पर्यंत बघु सुमन कशीतरी हसत बोलते.

पिहुचा चेहारच उतरला.काल स्वतः बोलले येतो म्हणून आणि आलेच नाही.ती मनातच बोलु लागली.

पिहु ये बाळा सूमन तिला आत बोलवते.

सगळे पिहूसाठी संगीत, हळदी, मेंहदी साठी ऑऊटफिट बघत होते.लास्ट ला शालु बघणार होते.

विराट थोड्यावेळाने येतो...कारण त्याच्या रागापेक्षा आता पिहु म्हत्वाची होती..त्याला बघुन सगळे खुश होतात.तो एक नजर बघत पिहुकडे बघतो.पिहु हसून लाजुन दुसरीकडे बघते.

.(सूमन विराट जवळ येऊन कॉलर नीट करत) हस जरा,किती चिडलाय.

(विराट हलकी स्माईल क‌रतो)खूश आता जाऊ,

सुमन खुश होत😁 हसून हो म्हणुन मान हलवते.

सगळेजण दोघांसाठी संगीत साठी,सप्तपदी,रीसेप्शनसाठी एक एक बघत असतात.

पहिले विराट साठी बघायला चालु करतात..तो पिहुला विचारत होता..तिला आवडलं कि,रोहिणी त्यात नुक्स काढत होती.

दी तु बघणार आहे ना,जीजु ला मग तुझ्या आवडीच का घेऊ देत नाही,प्रांजल चिडुनच बोलते.

पिहु प्रा़‍ंजल डोळ्यानेच शांत बस म्हणते.

शेवटी रोहिणीला जे आवडले तेच घेतले ,कधी सुमनच चालु देत नाही तर पिहुच कधी चालु देणार😏 ..रोहीणी पिहु जवळ येते. बघ ह्याला म्हणतात चॉईस नीट विचार करुन सिल्केट करायच असते..चार लोक बघणार नाही ..तूम्हाला आणि तुला सवय ही नसेल असे कपडे बघायची.म्हणुन तुला जमणार सुध्दा‌ नाही.

पिहु डोळ्यातलं पाणी सावरतच रोहिणी कडे बघते.सूमन पिहुला हाक मारतात.पिहु पण रोहिणी च्या गोष्‍टीकडे दूर्लक्ष करते..तिच्या साठी फक्त आता विराट महत्वाचा होता.तो एवढा आपल्याला जीव लावतो..हेच तिला महत्वाच होते .पिहु हसत सुमनजवळ जाते‌

आता पिहुचे कपडे सिल्केट कारायचे होते.पिहु एक एक वेअर करुन दाखवत होती.तर विराट हे नको ते नको करत होता.सगळेच वैतागले होते...पिहुला ही काही कळेना एवढे सगळे छान असुन हा का नको म्हणतोय.ती वेअर करून कंटाळली होती.

विराट आम्ही ज्वेलरी शॉप मध्ये आहोत झालं कि ये रोहीणी हसत चिडूनच बोलते.

सुमन विराट कडे रागाने बघते.विराट खुश होत स्माईल करत हो म्हणतो.सगळे निघुन गेल्यावर विराट हसतच पिहुला हग करतो.

अहो,पिहु चिडुन बाजुला होते.

आता काय झालं तूला..तो आट्या पाडतच म्हणतो.

शॉप....मध्ये आहो....त ती घाबरतच हळू म्हणाली.

कळालं तुझ एक वेगळच असते घरच्यासमोर तुला जवळ आलेले आवडत नाही म्हणून हे सगळ केलं तर आता बाहेरच ‌..

अ..हो,चिडु नका ना..ती बारीक चेहरा करतच बोलली.

तो गालात हसत तिला,एका हाताने जवळ घेत त्याला आवडलेले ऑऊटफिटस काढुन दाखवतो...

तूम्ही ना,खरच किती त्रास देता मगाशीच बोलला असता उगाच नाही तिथे डोक चालतं पिहु हसून मिरर मध्ये बघुन लावुन बघत होती...

(विराट मागुन मिठी मारतो) अस छान दिसते ना,म्हणून नाही सांगितले.

पिहु मिरर मधुन नज‌र मिळवत लाजून त्याच्याकडे बघते.काही,ही असते तुमच...

विराट तिच्या खांद्यावर साडीचा पदर टाकत तिला मागे घेऊन घट्ट मिठीत घेतो..हहह..बघ किती छान दिसतोय हा शालु माझ्यासोबत 😍

पिहु 🙈लाजुन इकडेतिकडे बघत होती.तिथला स्टाफ नजर चोरुन का होईना दोघांना बघत होते...

अ..हो..😣

विराट हसत तिला सोडतो...झालं एकदाच आता परत बोलू नकोस शालुचा कलर कुठला तो कॉलर नीट करत बोलतो.

पिहु हसुन हो म्हणते...

पिहु सगळे कपडे एकदा नीट बघत होती...विराट तिच्याकडेच बघत उभा राहीला होता...पिहु एक नजर बघुन हसते) अहो काय आहे...पिहु लाजुनच बोलते.

कुठे काय ,तु तुझ काम करते मी माझ काम करतो.

हम्म,अहो,

हहह,

ड्रेस खुप वाटत नाही का,त्यात विराट ने अजुन चारपाच ड्रेस अॅड केले होते .नंतर चेक करताना तिला कळाले.

तो ड्रेस बघतो,नाही का गं

अहो हे ड्रेस काय फंक्शनला घालणार आहे का मी ती शॉर्ट ड्रेस आणि गाऊन्स त्याला दाखवत बोलली.

विराट हसतच ते हातात घेतो मला आवडले म्हणुन घेतले..

पण उगाच का खर्च करायाचा ती चिडुनच बोलते..

पिहु मी तुझ्यावर नाही तर कोणावर खर्च करु ..आणि चिडायला काय झालं.तूला नाही आवडत मी काही घेतलेले हह तो तिच्या खांद्यावरुन हात घेत जवळ घेतो..

ती नजर वर करते)तस नाही.‌..पण,ती शांत होते.

तस नाही मग,कस वेडाबाई...(तो तिच्या कपाळाला हलकी टक्कर देतो)तु सगळ्यांचे प्राईझ बघितले ना,

‌ती त्याच्याकडे बघत मानेन‌ेच हो बोलते.

तुला कोण बोलल का.

नाही,ती नजर चोरुन बोलते.

ठिक ये नको सांगु पण एवढ लक्षात ठेव तुझा माझ्यावर पुर्ण हक्क आहे...आणि माझा ,मग दूसरयांसाठी जर तु मला हे नको ते नको म्हणत असशील तर सर्वात मोठी फुल तु आहेस.(ती त्याच्याकडे बघते) आणि तुला जे आवडलं ना,बिनधास्त सांग नको असेल तर. ते पण सांग मी काही तुला फोर्स करत नाही.. तो फंक्शन व्यतीरिक्त घेतलेले कपडे बाजुला काढतो.नको ना तुला ठिक ये नकोच घ्यायला .खुश

अ‌..हो.राहु दया ती परत घेते..

का आता तर नको होते ना,

ती काहीच बोलत नाही....

तुला काय हवं आहे ना काहीच कळत नाही तो चिडुनच बोलतो.

ती अजुन शांत असते...तो बिल पे करुन बाहेर जातो...

सर...तुमच कार्ड ‌..डिझाईनरची नजर पिहुकडे जाते.हे.धरा मॅम ‌.

पिहु कार्ड घेऊन,‌ बाहेर जाते..तो गाडीत पण जाऊन बसला होता.

(ती गाडीच डोर उघडुन आत येऊन बसते.)सॉरी ..ती हळुच बोलली‌.

तो कार स्टा‌र्ट करत होता कि पिहु उठुन पटकन त्याला मिठी मारते.सॉरी ना...

विराटने तिला घट्ठ धरले..तो‌ गालात हसत तिला‌ थोड बाजुला‌ करत गालावर किस करतो...

पिहु पण हसुन त्याच्या नाकाला नाक टच करते...परत नाही बोलणार,सॉरी ‌..

हम्म,आता बसतेस का,अशी कार मी चालवु शकत नाही ना,

पिहु लाजुन नीट बसते.

(कार चालु करुन तो तिचा हात‌ हातात घेतो.)पिहु अस काही तरी बोलुन सगळा मुड स्पाॅईल होतो...कधी तु मला माझ मानणार कळतच नाही अस वाटतं मीच कमी पडतोय कुठेतरी .तो बोलत होता तर ती बाहेर बघत होती.तो ही शांत होतो रडण्याच्या घाईतच आली होती ....

पिहु .‌‌..इकडे बघ रडलीस ना,आता गाडीतून उतरवेल तूला.

.अ..इ...थे ती त्याच्याकडे बघत डोळे‌ पूसतच बोलते.

हो,...

मी नाही उतरणार गाडी माझी आहे..तुम्ही उतरा उतरायच असेल तर ती गाल फुगवुनच बोलते...

काही बोलायच नाही,बोललं कि झालं रडण चालुच होतं.

ओरडायच नाही मला नाही आवडत ओरडल्यावर ती हळुच तोंडात पुटपुटते..

तो हसत तिच्या कडे बघतो. ...मग वागु नकोस ना,

तुम्ही...,त‌ो शॉर्ट ड्रेस का घेतला..

आज साठी आपण डीनर ला चाललो,आज...

काय‌ ,कधी ठरलं .

आ‌‌‌‌‌‌ता... बाहेर जायला,पण कोणाची परमिशन घेऊ का.

तुम्हाला वाटत नाही का ड्रेस ‌खुपच शॉर्ट आहे...😌

हो का,घालुन दा‌खव मग कळेल ना😉

अहो....मी कधी बाहेर नाही घातले एवढे शॉर्ट ड्रेस

मी आहे ना,एवढ काय त्यात लगेच टेंशन घ्यायच नंतर डिसकस करु. विराटने ज्वेलरी शॉप च्या इथे कार थांबवली‌.दोघेही आत गेले.

दादा ,मला वाटल तु येतो कि नाही,वीरा चिडुनच बोलते..

अग ट्रफिक जाम होते.विराट पिहुकडे बघत बोलतो‌.

पिहु ये बाळा बघ तुला आवडतात का,

सुमन आवडणारच तिला हो कि नाही पिहु ‌... रोहीणी हसतच बोलते.

पिहुला विराट बोलले आठवते...आई मला दुसर बघायच मला नाही आवडलं ती रोहिणी कडे बघतच बोलते.

विराट समोरच थांबला होता.कुठे तरी प्रकाश पडला तो तोंडतल्या तोंडातच पुटपुटतो.

ह..हो हो बघ ना,सूमन हसतचं‌ तिला दूसरे दागिने दाखवु लागली.
पिहुने तिच्या चॉईसचे दागिने घेतले..विराट साठी कंठीहार पण तिने बघितला.तिथे पण रोहिणी ची लूडबुड चालुच होती.

अहो ,हा छान दिसतोयं का ती हातात घेऊन त्याला दाखवु लागली‌.

पिहु दुसरा बघ तो सुट होत नाहीये,रोहिणी बोलतच होती कि विराटने तो हातात घेऊन न वेअर‌ करताच हाच घ्यायचा अस बोलून मोकळा झाला.

अरे विराट ट्राय‌ तरी करून बघ रोहिणी बोलते.

आई,पिहुला आवडला तर छान असणार तिला मी कुठल्या लुकमध्ये आवडतो तेच महत्वाच आहे ..‌ेवटी मी तिचाच आहे हो ना पिहु..😉

अ‌...ओहहह जीजु भारी,हहह प्रांजल हसतच बोलते..

सगळे पिहुकडे बघून ओठ दाबुन हसतच असतात...पिहुला तर एवढ लाजल्यासारख झाल होते काय करु नी काय नाही लाजुन लाल झाली होती...

रोहिणी वरवर हसते.ठिक ये झालं का विराट कार्ड बघु मी बिल पे करुन येते..

विराट वॉलेटमधये बघतच होता कि पिहु ने समोर कार्ड धरलं अहो‌.हे ....ते..... त्या शॉप.... लक्षातुनच गेलं द्यायच ती दचकतच बोलत होती...

वि‌राट गालात आई ते बघ तिच्याकडे आहे घे...

रोहिणी तिच्या कडे बघतच राहते..पिहु घाबरतच तिच्या समोर धरते हे.....ते चूकुन‌..ती बोलतच होती कि रोहिणी ने रगााने कार्ड घेतलं आणि बिल पे करायला गेली.आतुन तर ती जळालीच होती....आता हिच्यापुढे हात पसरायचे का,मी ती मनातल्या मनातच पेटली होती....

ते मी.... देणार.....चुकुन माझ्याकडे..

विराट कपाळालाच हात मारतो,अगं मी काही विचारलं का,आणि माझ जे आहे तूझच आहे,...ना मग,तो बोलतच होता कि रोहिणी समोर येत,विराट कडे कार्ड देत होती...हे धर विराट

आई पिहुलाच दे ...तो पिहुकडे बघत बोलला..

अ......न...को म....ला कश्याला ती ब्लँक होतच घाबरतच बोलते .तो नजर रो‌खुन बघतो तशी ती शांत होते...‌

बरोबर आहे विराटच पिहु घे. सुमन हसत रोहिणीच्या हातातुन कार्ड घेत तिच्या हातात देते..आणि हो ,फक्त पर्समध्ये ठेवु नकोस ..नको नको करुन सोड ,आता हक्कची बायको आल्यावर तर त्याला टीप्पट त्रास दे ...


पिहु एक,नजर विराट कडे बघुन कार्ड घेऊन पर्समध्ये ठेवते.विराटला ही बर वाटते .

शॉपिंग एकदाची झाली .वीरा रीलॅक्स होत बोलते...संध्याकाळ झाली होती.

सगळे घरी निघायला लागतात...पिहु तिच्या वडीलांच्या गाडीत बसत होती..

पिहु मी सोडतो..

पिहु एकदा विराट कडे एकदा भिमरावांनाकडे ‌बघते..

विराट , तुला उलट होईल आम्ही जातो .भिमराव हसत बोलतात.

विराट ही वरवर हलकी स्माईल देत ओके म्हणतो.

पिहु त्याच्याकडे बघते विराट डोळ्यानेच जा म्हणतो... आता कुठे दोघे जाणुन घेत होते आणि त्यांना असा निवांत वेळच मिळत नव्हता नीट‌ बोलायला 😔😔म्हणुन दोघांचे चेहरे पडलेच होते.

विराट त्याच काम करुन घरी येतो..पिहुला कॉल लवतो .

📞हॅलो

📞हह बोला,मी अजुन आवरलं नाही 😥

📞(विराट हसतो),आज नको जायला.

📞का,तुम्हाला राग आला का

📞नाही गं वेडाबाई,आज ‌खुप फिरलीस ,उगाच तबियत बिघाडायची

📞हहं खरच मी कंटाळले होते 😌

📞मग बोलता येत नाही का ,माहीत होत मी चल बोललो असत‌ी तर लगेच तयार होऊन आली असते‌...

📞(पिहु गालात हसते)..

📞कॉलेजच लक्षात आहे की नाही,तो तिला आठवण आहे कि नाही,म्हणुन विचारतो...ऑलरेडी कॉलेज चालु होऊन पंधरा दिवस झाले होते.

📞माहीत आहे गुंजनला बोलले मी,ते....

📞कोण गुंजन 🤔

📞माझी फ्रेंड आहे .

📞ओके आणि ती काय करणार तिला सांगायला...

📞ते..मी आदीला पण बोलणार होते
.

📞 काय,फुल आहेस ..एक नंबरची त‌‌ो थोड रागवतच बोलतो.

📞का...काय झालं सांगव तर लागणार ना,कॉलेजला येता येणार नाही म्हणुन..

📞मग ह्याला त्याला कशी काय बोलू शकतेस ,मला बोलता येत नाही का चिडुनच बोलतो.

📞ह.....हो ...मी बोल....णार होते.ती हळूच बोलली.

📞कधी ,

📞ते...मी..(ती शांत होते)

📞ऑलरेडी ,मी प्रिन्सिपलला लेटर दिलं आहे .

📞तुम्ही,कधी ...

📞कधी काय म्हणजे मला काळजी असणारच ना तुझी ,पिहु तु सांगितले नाही तरी मला कळतंय तुला काय हवं काय नको..

📞पिहु गालात हसून लाजते...

📞लाजु नकोस ,विचीत्र खरच कधी तरी बोलत जा मी चार वर्डस बोल्यावर एक वर्ड तोंडातुन निघतो.एवढी गोष्ट तूझ्या लक्षात येत नाही का, मी ट्रस्टी आहे कॉलेजचा मला बोलावे पण नाही,कोण तर गूंजन आदी ह्यांना सांगते.केलं का त्यांनी काम...

📞ते...ते मी आदी नाहीये ना,तो कुठे तरी बाहेर आहे गुंजन बोलली..फोनसुध्दा बंदच आहे त्याचा एकदा कॉल केला होता.

📞हा तो कामानिम्मत बाहेर गेला आहे.आणि नंबर चेंज झाला आहे .लग्नाला येणार आहे ..

📞हो का...मी गुंजनला पण बोलवु ..

📞विचारते काय बोलव ना,पिहु हे अस इरेटेड साऊंड होते हा सगळ विचारुन करते ते..

📞अ.‌हो...तूम्ही ट्रस्टी आहात ,पिहु खुश होत विचारते.

📞🙄पिहु सिरयसली तुला माहीत नव्हते.

📞नाही,आज कळालं कोण बोललच नाही मला ,खरच

📞🤦🏻.आख्या कॉलेजला माहीत असेल तु कोण आहे पण बघा मॅडमला आत्ता कळतेय 😂 ओन्लि न्यु कमर्स सोडून बाकी सगळे ओळखत असतील.

📞एवढ कोणाला माहीत नाही मी कोण आहे..क्लासमध्येच माहित आहे..माझ सरनेम

📞ओहह गॉड ,पिहु( तो हसत बोलतो.) तुझ अस झालं ती एक म्हणं आहे ना..बघ,मांजर डोळे झाकुन दुध पिते म्हणजे तिला कोण बघत नसल्यासारखे ..

📞आ..😮 खरच ...

📞येस बेबी,कॉलेज मधले वीराला सगळे ओळखतात आणि तू तिच्याबरोबर येते ,आपल्या कारवरुनच लक्षात येते .आणि माझ्त्राबरोबर किती तरी वेळा बघितलं असेल.

📞पिहु हसते.

📞चल झोप आता,मेडिसीन घेतल्या का.

📞हो,ती आळस देतच बोलते.

📞ठेवु का फोन

📞अहं हं .....ती लाडातच बोलते.

📞मग काय,विराट हसून विचारतो.

📞व्हीडीयो कॉल करा ना,.

📞पिहु मला काम आहे ,.

📞हम्म,ती नाराज होतच बोलते.

📞तो फोन कट करुन व्हिडी‌यो लावतो

📞पिहु हसून मोबाईल घेऊन बेडवर झोपते...तो समोर मोबाईल ठेवुन लॅपटॉप घेतो...पिहु बोलायच आहे का,तो लॅपटॉप मध्ये बघतच बोलतो.

📞अ..हह‌‌...ती डोळे झाकुनच बोलली.

📞तो एक नजर वर करून बघतो तर झोपतच होती...

📞तो ही शांत बसला.

.💖💖💖

.
.
.
रात्री विराट पिहुला घेऊन डिनरला जाणार होता...सकाळीच त्याने मॉमला सांगितले

रात्री इकडे नाही आणायच ,डीनर झाल कि लवकर घरी सोडुन ये‌.

हो माहीत आहे विराट न बघताच बोलतो.

सुमन विचारातच पडते काय चालु आहे डोक्यात काहीच कळत नाही‌...

विराट आवरतच होता कि,

दादा डान्सची रीहर्सल कधी करायची...म्हणजे कोरयोग्राफरला बोलवायला...

नमन मला वेळ नाहीये,आता राहीलेत. ८ दिवस त्यात काम संपवा‌यच आहे मला

अरे मी कस विसरलो ,तु तर हनीमूनला जाणार आहेस नमन त्याच्या गळ्यात हात घालुन बोलतो..

हह ,...तर बोला साहेब कस कळलं तूम्हाला विराट त्याचा हात काढुन विचारतो...


अरे तुझा भाऊ आहे .खूप काही माहीत असते मला

हो पण कस,जासुस लावलेत का माझ्यामागे.हहह.

काय दादा तु ,अरे तु ..ते....ते...

विराट त्याच्या कान पकडतो..कोणाला आत्ताच सांगु नकोस मला माहित आहे तुला कुठुन खबर कळाली...रीषभ ला एक काम नीट जमत नाही,शांततेत कुठल काम होत नाही.

दादा तुला खरच वाटते ती प्लेस चांगली आहे..नमन चेहरा कसतरीच करत बोलतो‌.

विराट हसत जवळ घेतो...ते तुझ्यासारख्या लोकांना भूलवण्यासाठी मी अस केल‌ं....तु आत्ता पर्यंत वीराला आत्याला मॉम ला बोलला असणार मी कागदावर लिहून देतो...

दादा , नमन तोंड पाडुनच बोलतो‌..

तिकडे ही जाणार आहे माझ काम आहे तिथे .. पण अजुन एक प्लेस आहेत..

म्हणजे तु दोन ठिकाणी जाणार आहेस..

हो,का काही प्रोब्लेम आणि मी नसल्यावर ऑफिसकडे लक्ष दे...

दादा ते मला जमत नाही उगाच तो विषय काढु नकोस तो चिडुनच जातो.

नमन लिसन,अवघड आहे....समजवायच नमनला तो गंभीर होत बोलतो.

(विराट निघतच होता कि वीरा बघुन थांबला.)वीरा कुठे चालली ‌विराट तिला आवरुन चालले बघुन विचारतो.

मी आणि,प्रांजल बाहेर चाललो .

नमन ऐकुन नजर वर करत वीराकडे बघतो...वीरा,मी पण येऊ का...मला ही बोर होतेय...

आम्ही शॉपिंगला चाललो,

हह...हा.....ते मला पण शॉपिंग करायची आहे .

ओके चल वीरा इरेटेड होतच बोलते...

येस.sssस,आलोच वन सेंकंद‌ हा...नमन खुश होऊन आवरायला गेला.

पिहु पण येणार आहे का,

नाही दादा ,संध्याकाळी बाहेर जायच म्हणून ना,ती डोळा मारतच बोलली.आता आम्ही थोडी शॉपिंग आणि मुव्ही ला पण जाणार आहे..उशीर होईल मग तुमची डेट कॅन्सल होईल..

विराट तिला नजर रोखुन बघतो...

ह...हो जास्त बोलले सॉरी ती बाहेर पळतच निघुन जाते.

नमन,आणि वीरा प्रांजल घ्यायला घरी येतात.

प्रांजल स्काय ब्लु करलरचा टॉप डार्क ब्लु कलरची थ्री फोर्थ जीन्स घालुन खाली आली नमन तिच्या कडेच बघत राहीला....

चला सॉरी हा...उशीर झाला‌..

नाही नाही,नमन हसत बोलतो.

प्रांजल एक नजर बघून हसते.

ब्रो,निघायच वीरा चिडवत बोलते..

ह..हो...हो...बाय वहिनी,..पिहु सगळ्यांना बाय करून आत आली.

नमन पुढे आणि दोघी मागे बसल्या होता...

दोघींना थांबवत नमन बोलला.गर्लस बोलण थांबवुन मला सांगाल का,कुठे जायच तस मी ड्रायव्हर अंकल सांगतो हो ना अंकल

ड्रायव्हर हसतो..

ओहह सॉरी,प्रांजल कुठे जायच तुलाच माहीत असेल जास्त करुन,

ह..हो प्रांजल मॉलचा अॅड्रेस सांगते ....तिघेही मॉल मध्ये येतात...
मग काय काय ठरलं लग्नाच पॅलिंग प्रांजल दोघांकडे बघुन बोलली.

आमच का,ब्रो तु कॉरोग्राफरला बोलणार होता ना,काय झालं

हो उद्या येणार आहे...

व्वा मी सोलो करते,प्रांजल खुश होत बोलली

नमन तिच्याकडे बघत तुला येतो का डान्स,

हो मी तर डान्स क्वीन आहे💃 प्रांजल एक्साईटेड होतच बोलली..

हो ,प्रांजू ..आपण दोघी एकसाथ करू...सॉन्ग मस्त सिल्केट करु.दोघीच्या गप्पा ज्या चालु झाल्या़ इकडे नमनला पुर्णपणे दुर्लक्ष,😂😂😂

पिहु एक्साईटेडचं‌ होती...आज पहिल्यांदा विराट तिला अस डेटला घेऊन जात होता...☺ पण सकाळपासुन एक फोन आला नव्हता😔हे विसरले तर नसतील , तिने एकदाच लावला तर त्याने उचलला नाही,..कामाच्या नादात राहुन राहुन हेच डोक्यात येत होते.

विराटच तर काम कधी पुर्ण होते.आणि कधी कॉल करेन अस झालं होते...पण काय एकवर एक व्हिडीओ कॉन्फरन्स चालुच होत्या.🤦🏻
संध्याकाळचे सहा वाजले तरी अजून फोन आला नव्हता.

पिहु आवरुन घे तो पर्यंत फोन येईलच ना.रेवत‌ी बोलते

मम्मी पण,एक कॉल साधा करता येत नाही का,पिहु चिडुनच बोलते

पिहु कामात असेल भिमराव तिला समजवात होते....

पप्पा तुम्ही पण त्यांचीच साईड घ्या,पिहु गाल फुगवुन बोलते.

अरे चिऊ किती बि‌चारा एकटाच फिरत असतो, मुंबई, पुणे, लोणवळा, कोकण,दिल्ली सगळीकडे लक्ष द्याव लागतं त्याला आता नविन नविन प्रोजेक्टचे पण काम चालु साईटवर जायच .हाताखाली माणसे असली तरी सगळ त्यालाच बघाव लागतं..मग आपण ही थोड समजुन घ्यायच ना..

हम्म,😔पिहु अजुन रुसुनच असते.

प्रांजलला सोडवायला दोघे घरीं‌ येतात...वहिनी तू आवरली नाही,अजून...

ह..ते..ये ना बस पिहु कसतरी हसून दोघांना बसायला लावते.

दादा कामात असेल करेल फोन नमन पाणी पित बोलला...

पिहु हसुन हो म्हणते.

दी आवर ना,दहा ला जाणार आहेस का...

अ..नको फोन येऊ देत मग आवरते

अग वहिनी तु आवर ,दादा विसरणार नाही मी सकाळीच त्याला आठवण करुन दिली होती...चल वहिनी मी तयार करते....ब्रो तुला जायच आहे का‌‌‌..

घरी जाऊन काय करु, सग्ळया लेडीज तर लग्नाच्या गोंधळात पडल्या हे करा ते करा...मुंबईत असलो कि बोर होत नाही इथे कोण आहे. रीषभ पण आता दादा कधी ये बोलणार तेव्हा येणार..आणि फ्रेंड्स तर फंक्शन चालु झाल्यावरच ..तो चेहरा पाडतच बोलतो.

नमन ,बस बाळा... फ्रेश होतोस का मी कॉफी करते काही स्नॅक्स करु का ...रेवती हसत बोलते....

नाही नको कॉफी चालेल आम्ही उशीराच लंच केलं मी फ्रेश होतो..

हो..हो.

वीरा ,प्रांजल पिहुच्या रुममध्ये होत्या.पिहुचे ड्रेस बघण्यात बिझी होते..पण त्यांना कुठे माहीत ऑलरेडी विराट ने ड्रेस घेतलाय😂आणि वीरासमोर तिला ऑकवर्डच वाटत होते..लास्ट टाईमला त्याने फक्त तिलाच ड्रेस घेतला होता‌..तेव्हा ती मजेत बोलली होती...पण आता काय बोलेल म्हणून ती शांत बसली होती.

पिहुने विराटला कॉल केला....त्याने उचलला

.सॉरी ..सॉरी खरच बिझी होतो..

हम्म,ती फुगुनच बोलली.

पिहु अगं आता ही बिझीच आहेत..

वहिनी हा ड्रेस ट्राय करुन बघ वीरा मध्येच येऊन बोलली..

हह एक मिनीट हहह

हम्म

वीरा आली आहे का,

हो..नमन पण आहे..आत्ताच आलेत फ्रेश होऊन बसलेत

हम्म,आवर पिहु मी निघतो होतच आलं माझ काम ,.

अ‌..हो..

हहह

ते...दुसरा घालु का ड्रेस

नो मी काल घेतलेला तोच घाल ‌..बाय...

दी काय बोलले जीजु येत आहेत ना,

हो येतात..

मग आवर ना,अजुन काय घालणार ते सूध्दा सांगितले नाही..अणि साडी वैगेर काही डोक्यात असले ना,बघ मग-प्रांजल

ह..हो वहिनी काही तरी वेस्टन मध्ये घाल माहित आहे तु जास्त घालत नाही..

वीरा ती सगळ घालते आता लग्न झाल्यावर बंद‌ केले घालायच .

पिहु प्रांजलकडे रागाने बघते..

सिरयसली वहिनी,तु वेस्टन पण घालते..

न...नाही गं ते कधी तरीच घालत होते..मला एवढ आवडत नाही.

वहिनी तुला माहित आहे का दादाची सेक्रेटरी आहे ना सोनिया..

हह .काय पिहु दोन मिनीट ब्लँक होत विचारते..

ह...हो.तुला माहित नाही का ‌‌ वीरा पिहुच रीअॅक्शन बघुन वीरा विचारते..

पिहुला अजुन काय काय माहीत नाही हे आता डोक्यात प्रकाश पडायला लागला🤣🤣🤣

हा तिच काय झालं प्रांजल‌ पिहु विचारत आहे बघुन बोलली.

हा,... ती ना, दिसायला खुप सुंदर आहे..आणि तिचे कपडे बघुन समोरचा घायळच होत असेल‌..असे तिचे शॉर्ट ड्रेस असतात ना....मला तर तिचा खुप राग येतो ..
.
अ🙄 आणि ह्यांच्यासमोर दिवस भर फिरत असेल ..,पिहु मनातच बोलली.

पिहु विचारतच होती वीरा प्रांजल तिच्याकडे बघुन ओठ दाबून हसत होते.

दि ....प्रांजल तिला हलवते...

अ..हं काय

विचार करुन झालं असेल तर आवरतेस का ...जीजु ला आवडेल अस घाल ....

माहीत आहे मला तु सांगु नकोस पिहु चिडुनच विराट ने घेतलेला ड्रेस घेऊन चेेंज करायला गेली..

बघ आता वहिनी घालेल नाही तर विचार करत बसली असते .कस घालु आणि लाबलाब....वीरा हसत बोलते

वीरा खरच बोलते‌ का तु प्रांजल चाचरत विचारते..

हो गं पण दादा कधी कुठल्या मुलीला घास टाकत नाही,आणि सोनिया चांगली आहे .दादा समोर तिचा आवाज पण निघत नाही.

पिहु ड्रेस घालुन बाहेर आली ...दोघी शॉक होतच बघतात....
पिहुने पर्ल पिंक कलरचा सॅटीनचा ऑफ शोल्डर शॉर्ट ड्रेस घातला होता...

दी कधी आणला ड्रेस तू मला दाखवली नाही...

ते ह्यांनी घेतला.पिहु वीराकडे बघत बोलली..

वॉव वहिनी,किती क्युट दिसतेस तु...मस्त दादा तर पुर्ण हँगच होणार आहे...

पिहु लाजुन मिरर मध्ये बघते...

दोघी जणी तिला छान आवरतात.पिहुला आता हुरहुर लागली होती.आणि विराट ‌चा चेहरा डोळ्यासमोर ‌येऊन अंगाला गोड शहारा येत होता😍. ,

विराटच्या गाडीचा आवाज आल्याने पिहुने विंडोमधुन बघितले...
त्याने स्लीम फीटचा नेवी ब्लु कलरचा ब्लेझर घातला
होता...

आधीच तो दिसायला गोरा,त्यात डार्क कलर‌ मध्ये अजुनच हॅन्डसम दिसत होता..‌पिहुने लाजुन नजर ‌खाली घेतली...

दी आता इथुनच बघणार आहे का..एन्जॉय यूअर डेट माय स्वीटहार्ट प्रांजल तिला हसून मागून हग करत बोलते.पिहु हसून तिच्या डोक्यावरुन हात फिरवते.

पिहु खाली येते...विराट बाहेरच फोन वर बोलत गाडीला टेकून उभा होता..पिहु गेटमधुन बाहेर येत होती कि विराटच लक्ष गेलं तो तर कोणाशी बोलत होता. तो हेच विसरुन गेला.पिहुला त्याने फस्ट टाईम असे बघितले होते...केस मोकळे सोडुन वन राईड घेतले होते, न्युडकलरची लिपस्टिक ,कानता छोटे डायमंड टॉप ,गळ्यात छोटेसे डायमंड स्टोन असलेले मंगळसुत्र...हलका मेकअप...त्याला बघुन नेहमीप्रमाणे थरथर कापणारे तिचे ओठ ..ती नजर चूकवुनच पटकन गाडीत बसली.

जो फोनवर बोलत होता तो हॅलो हॅलो बोलुन कंटाळुन त्यानेच फोन ठेवुन टाकला...विराट स्वतःला सावरत मोठा श्वास घेत गाडीत बसला.पिहुची तर हिम्मतच होत नव्हती.ती समोरच बघत हातातला क्लचला उघडझाप करत बसली. आणि,हा,तर टक लावुनच तिच सौंदर्य डोळ्यात भरुन घेत होता.

अ...हो...

हहह😍

च..ला ना (तो खुप वेळ तिला बघत होता तर पिहुने त्याला भानावर आणले).🙈

ह....हो त्याने तिच्या हातातला क्लच काढुन समोर ठेवला तिने त्याच्याकडे बघितलं

लागेल बोटाला म्हणुन ठेवले..

पिहु लाजुन बाहेर बघु लागली.

निघायच का,मिसेस देशमुख तो लाडात येत बोलतो.

ती हसुन हह☺ म्हणते.

विराट ने अलगद तिचा हात धरुन बोटांमध्ये गुंफवला


आता किती लाजणार बघ माझ्याकडे,विराट कार चालवतच तिच्याशी बोलु लागला.

ती हसुन एक नजर बघुन परत नजर खाली घेते...☺

हाय,sss बघयाच पण अस कि बस्स...,😍😍

पिहु खुदकन हसते...

विराट हात काढुन तिच्या केसांवरुन हात फिरवतो.

ती त्याच्या हाताला विळखा घालुन जवळ जाते...

मला वाटल आज जवळ यायच नाहीये का,विराट ‌गालात हसत बोलतो.

मी रुसले आहे ती गाल फुगवुन बोलते...

ओहह 😅कराण कळेल ..मला तर दिसलच नाही इतकावेळ चेहारच टॅमोटो सारखा लाल झाला आहे राग आहे का तो😜😜

तुम्ही आज एक पण फोन केला नाही,आणि ...ते

हह..ते वीरा काय बोलली का त्याने अंदाज बरोबर लावला.

हो...

विराट हसतो..

ती थोड बाजुला होत त्याच्याकडे बघते...हसता काय,अस करतात का कस वाटतं ते तुम्ही घरच्यांशी भांडत बसताय मला घरी घेऊन ‌ या म्हणुन...पिहु किंचीत चिडुनच बोलते..

हह..हो गं सगळे मुद्दाम करतात..मला त्रस देण्यासाठी

अ...हो तसच असते ,लग्न झाल्यावरच जायच असते.

पण आपलं लग्न झालं आहे ते त्यांना हौस आहे म्हणुन ते परत आपलं लग्न करतात ..मग ,

अहो,हह ती चिडुनच बोलते‌.

तो गाडी थांबवतो आणि तिच्या कडे बघतो...आता खरच‌ माझा़ मुड भांडायचा बिलकुल नाहीये...हेच असलं बोलायच असेल तर घरी जाऊ ...

ती त्याच्या हात काढुन शांत होत गाडीच्या बाहेर बघते.तो एक नजर बघत कार स्टार्ट करतो...

पिहु नेलपेंट बिलकुल खराब करु नकोस तो थोड ओरडुनच बोलतो...ती चिडली कि नेल्सची नेलपेंट काढत बसते हे माहीत होता आणि तेच ती करणार कि तो बोल्यावर ती शांत बसली.

बोलणार नाहीयेस का ....

ती मानेनेच नाही बोलते.

तुला आत्ता घरी यायच नाही का ,तो शांतपणे तिला विचारतो.

ती त्याच्याकडे बघते,तस नाही पण ...इतके दिवस राहलोत ना,मग आठ दिवसाने काय फरक पडतो...तसही घरी येऊन काय फायदा तुम्ही कुठे असता घरी हुमम्म...

हम्म,ठिक. मी आता काही बोलणार नाही कोणाला बस्स,खूश का आता तर स्माईल कर...

ती काहीच बोलत नाही बाहेरच बघत होती...तो ही शांत बसला ...

हॉटेल आल्यावर त्याने कार मेन एन्टरन्स समोर थांबवली..पिहु हॉटेलवर नजर टाकत होती...विराट बाहेर येऊन तिच्या साईडचा डोर ओपन करुन तिला हात देतो..पिहु हलक हसून बाहेर येत सगळी कडे नजर फिरवते..विराट ने किज वॉचमन कडे दिली.
हॉटेल इतक सुंदर होते...पूण्यात असुन ती कधीच ह्या साईडला आली नव्हती...ती चकीत होत बघतच होती...त्याने तिला जवळ घेत भानावर आणलं मॅडम हे तूमचच आहे.निंवात बघा...आता आपण एका रोमँटीक डेटला आलोत...तो हळूच तिच्या कानाजवळ येत बोलतो..

तशी एक नजर त्याच्याकडे टाकत गाल फुगवुनच बघत होती..

त्याने एक भुवई वर करत ओके चला घरी...

अ...हहं ती चिडुनच बघते.तुम्ही मनवत सुध्दा नाही फक्त ऑर्डर सोडतात.मग आता तुमच्या मुडनुसार मी चिडायच का,
ती लटक्या रागातच बोलते.

विराट गालात हसत तिला जवळ घेत सॉरी माय सनशाईन,त्याने हलके ओठ तिच्या गालावर ठेवले..ती दचकुन मागे सरकली..आणि इकडे तिकडे बघु लागली...

अ...हो..ती बारीक आट्या पाडतच बोलली...

अग तुला मनवत‌ होतो...

काही मनवु नका..ठिक आहे माझा मुड ती घाबरतच हसून बोलली...कस वाटत बाहेर..

माझ्याच हॉटेलमध्ये थांबुन माझ्यावर नजर टाकायची कोणाची हिम्मत आहे का तो रुबाबात म्हणाला...

पिहु खुदकन हसते खरच तुम्ही ना...अवघड आहे.

आत तरी चल इथेच बोलत बसणार आहेस का..

हम्म..दोघेही आत आले तसे मॅनेजर आणि थोडाफार. पिहुच्या स्वागतासाठी थांबलाच होता....

मॅनेजरने पिहुच वेलकम करत तिच्या हातात बुके ठेवला...पिहुने एक नजर विराट कडे टाकुन छान स्माईल करत बुके घेतला.

मॅनेजरने विराटला इशारा केला तसा तो चाललाच होता कि पिहुने त्याचा कोटची भाई हळुच पकडली..मानेनच नाही बोलली.

अगं आलोच थांब ,....जेनी...त्याने स्फाट मेंबरला हाक मारली..

yes sir.ती समोर येऊन थांबली,

पिहु मी दोन मिनीटात आलो..तो पर्यंत पुढे जा...

‌mam, जेनी हसत तिला बोलली...

पिहु वरवर हसत तिच्या बरोबर गेली...लिफ्टमध्ये पिहुने तिच्या वर नजर टाकली....हॉटेलमधल्या सगळ्याच मूली सुंदर होत्या.आता पिहुला तिच्या कडे बघुन राग ही येत होता...वीराच डोक्यात ‌येताच विराटचा पण.. 😂

तिने़ तिला 12th फ्लोअरवर आणले...एन्टरंन्सवरच गुलाबाच्या पाकळ्याच्या पायघडया होत्या..पिहुचा चेहराच खुलला...मागुन विराट आला तिचा हात धरला...विराट ने जेनीवर नजर फिरवली ती समजून लगेच एक्सक्युझ करून गेली...



विराटने डोळ्‌यानेच तिला चालायला लावले...ती हळु हळु एक एक पाऊल पुढे टाकत होती....विराटने हसत डोर उघडलं ...

पिहु सगळ अंचबित होतच बघत होती.सगळी कडे व्हाईट कर्टनवर लाईट्स सोडले होते....गुलाबच्या पाकळ्याच्या पायघड्या होत्या...त्यावर गॅप गॅप ने सेंटेड कॅन्डल्स लावले होते....
टेबल चेअर मस्त अरेंज केला होता..पुल साईडला...एकीकडे काऊच होता..तो ही मस्त पाकळ्यांनी भरला होता..

पिहु डोळे बंद कर ना,तो हळुच तिच्या कानात बोलला....पिहुने अलगद डोळे बंद केेले.....त्याने तिचा हात धरुन पुढे घेऊन गेला..पिहुची धडधडच चालुच होती...अजुन काय आहे सरप्राईज...

हम्म ओपन युअर आईज हनी😍😍😍पिहुने हळुच डोळे उघडले...

तर समोर फ्यूजन लाईट्सने मोठ्या अक्षरात लाहले होते..

will you marry me?? पिहु तोंडालाच हात लावते...इतक सूंदर दिसत होते..सगळ स्वप्नात असल्यासारखे वाटत होते....विराट गुडघ्यावर बसुन तिच्या समोर झुकला होता...पिहु..

पिहुने नजर वळुन त्याच्याकडे बघितलं ..त्याने रींगचा बॉक्स समोर धरला...पिहु विल यु मॅरी मी???

पिहुच्या डोळ्यातुन आंनदअश्रु च निघत होते...ती मानेनेच हो बोलत‌ हात पुढे करुन त्याला उठवुन त्याच्या मिठीत शिरली..
विराट गालात हसत तिचा हात त्याच्या छातीवर होता...अलगद तिच्या बोटात त्याने रींग सरकवली..पिहु त्या रिंगकडेबघत होती...
आय लव्ह यु मिसेस देशमुख त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले...

आय ल...व्ह यु ...टु....ती परत त्याच्या मिठीत शिरत नकळतपणे कधी बोलुन गेली तिलाच कळलंच नाही...

विराट हसत तिच्या केसांवरुन हात फिरवत केसांवर ओठ ठेवतो....

तिने वर त्याच्याकडे बघितले...का करता ऐवढ सगळं ती निरागसपणे त्याला विचारु लागली..

बिकॉज आयलव्ह यु..तो हसत तिला तिच्या प्रश्नानच उत्तर देतो...

पण मी अस कधीच काही करत नाही....मी अजुन साध गिफ्टपण कधी दिलं नाही.आवाज ही जड झाला होता‌.ती कडा पुसतच बोलु लागली‌..

मी तु कराव म्हणुन करतो का...नाही ना(त्याने समोरच्या टेबलावरचा ट्युशु घेऊन तिचे डोळे नीट पूसले....)तो तिच काजळ नीट करत होता त्याच लक्ष नसताना,तिने त्याच्या ओठांवर ओठ ठेवून हळुवार किस करु लागली...त्याने ही तिला प्रतीसाद देत हलकच बाईट् केलं. अहहहंsssतेव्हा ती विवहळत बाजुला झाली...

तो हसत तिला जवळ घेऊ लागला..

अस का करता तुम्ही,ती ओठ धरतच लट्‌क्या रागात बोलु लागली...

त्याने तिला घट्टं मिठीत घेतलं मला माहित आहे .तु हे का, केलं .. कधी स्वतःहुन किस केली सांग आज करायला लागली.त्याने हलकेच तिच्या गालावर मारले.

ते ..असच ती नजर खाली करुन बोलु लागली..

असच,हहंह..त्याने तिला उचलुन घेतलं ..तिने त्याच्याकडे बघितलं
आय लव्ह ..यु टु.....🙈 ती लाजुन त्याच्या ब्लेझर ओढून चेहारा लपवु लागली. विराटने हसतच तिला थोड वर घेत गालावर किस‌ केलं...

त्याने पायाने चेअर बाजुला करत तिला बसवले..स्वतः दुसरी चेअर. ओढुन तिच्या जवळ बसला...त्याने तिचे हात हातात घेऊन बोट गुफवंत हातांना,रींगला किस करुन लागला..‌

अ...हो...बस ना किसेस ने पोट भरणार नाही माझ ती हळुच बोलली..

विराट गालात हसत डिनर ऑर्डर करतो...समोर वाईनची बॉटल होती...तिने त्यावर नजर‌ टाकली..तिचे किंचीत हावभाव बदलले...
विराटला जाणवताच त्याने वाईनची बॉटल बाजुला काढुन ठेवली..मी ड्रींक करण‌ार नाहीये...तो तिला प्रश्न पडलेला जाणवताच उत्तर देऊन मोकळा झाला..

मग का ठेवली..

आता ते डेकोरेट करताना ठेवतात...तु एक ड्रींक करत नाही हे त्यांना कुठे माहीत आहे ...तो हसतच बोलतो.

तूम्ही करता ना..मी बघितलं ती हळुच त्याला विचारु लागली...

हो करतो..पण दररोज केल्यासारखं विचारतेस..तो नजर रोखुनच बोलतो...

पण करता ना...ती दुसरीकडे बघतच बोलली.

तुझा आज भांडायचा मुड आहे अस का वाटतयं मला...

तुम्ही माझ काहीच ऐकतच नाही,ती चिडुनच बोलत होती...

आता काय केलं मी ...तो श‌ांत पणे सूपचा स्पुन तिच्या समोर धरत बोलला.तिने पित त्याच्याकडे बघितलं

तो डोळ्यानेच सांग बोलत होता.

मी खाली बोललं होत ना,नका जाऊ...

अरे काम होतं म्हणुन बोलवलं मला...

अम्म,ते...तो मोबाईल बंद करुन ठेवा..तो ही सारख वाजतच असतो...ती गाल फुगवुनच बोलते..

हे काय नविन आता...तो हसत तिचा हात धरुन उठवत स्वतःच्या मांडीवर बसवतो...

ती त्याला बिलगते...मला बोलायच असते..पण शब्द सुचतच नाही...आणि जेव्हा‌ खुप आठवुन बोलावं म्हटलं कि काही ना काही होतच मग मी पण काय बोलायच ते विसरुन जाते...

तु घाबरत बोलते म्हणून सुचत नाही..हे बोलल कि कोणाला राग येईल ,वाईट वाटेल का....हेच डोक्यात असते मग असा गोंधळ होणारच ना...

हह..तस...नाही,पण नाही होत माझ्याकडुन बोलण...पण मला तुुम्हाला जाणुन घ्यायच आहे खुप काही विचारायचे असते...पण...होतच नाही,ती त्याच्या‌ डोळ्यात बघत बोलते.

हम्म,तु बोलायची गरज नाही मला तुला काय हवं नाही हे बोलके पाणीदार डोळे आहेत ना सगळं सांगुन जातात.

ती लाजुन हसते...सांगा आता मला काय हवं .

तुझ माहीत नाही,पण मला डान्स करायचा. डीनर येईपर्यंत चल ......तो‌ तिला उठवत तिचा हात पकडून गाण लावतो...

पिहु हसुन त्याच्या छातीवर डोकं ठेवते.विराटने तिच्या कमरेभोवती हातांचा विळ घातला.

हम तेरे बिन अब रह नहीं सकते
तेरे बिन क्या वजूद मेरा
हम तेरे बिन अब रह नहीं सकते
तेरे बिन क्या वजूद मेरा

तुझसे जुदा गर हो जाएंगे
तो ख़ुद से ही हो जाएंगे जुदा

क्यूंकि तुम ही हो
अब तुम ही हो
ज़िन्दगी अब तुम ही हो
चैन भी, मेरा दर्द भी
मेरी आशिक़ी अब तुम ही हो

तेरा मेरा रिश्ता है कैसा
एक पल दूर गवारा नहीं
तेरे लिए हर रोज़ हैं जीते
तुझ को दिया मेरा वक़्त सभी
कोई लम्हा मेरा ना हो तेरे बिना
हर सांस पे नाम तेरा..

क्यूंकि तुम ही हो
अब तुम ही हो
ज़िन्दगी अब तुम ही हो
चैन भी, मेरा दर्द भी
मेरी आशिक़ी अब तुम ही हो

तुम ही हो..
तुम ही हो..

तेरे लिए ही जिया मैं
खुदको जो यूँ दे दिया है
तेरी वफ़ा ने मुझको संभाला
सारे गमो को दिल से निकला

तेरे साथ मेरा है नसीब जुडा
तुझे पा के अधुरा ना रहा
हम्म..

क्यूंकि तुम ही हो
अब तुम ही हो
ज़िन्दगी अब तुम ही हो
चैन भी, मेरा दर्द भी
मेरी आशिक़ी अब तुम ही हो

क्यूंकि तुम ही हो
अब तुम ही हो
ज़िन्दगी अब तुम ही हो
चैन भी, मेरा दर्द भी
मेरी आशिक़ी अब तुम ही हो

दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघुत हरवले होते....

वेटर येताच पिहु घाबरुन हात काढतच होती कि,विराट ने तिला कुशीत घेतलं...इथे नजर‌ वर करुन बघयाची हिम्मत‌ नाहीये कोणाची तो हुळच कानात बोलला.तिने वेटरवर नजर फिरवली ते खाली बघुनच सगळ ठेवुन निघून पण गेले..तशी ती रीलॅक्स होत त्याच्याकडे स्माईल करत बघु लागली....

चल डीनर कर तुझ पोट थोडी भरणार आहे किसेस ने तो नाटकी चेहरा करतच बोलला.

पिहु हसून चेअरवर बसली...भुक़ लागल्याने तिच ‌खाण्याकडेच लक्ष होतं..विराट तिच्याकडेच बघत हसत होता..

यम्मी ,किती मिस केलं मी बाहेरच जेवण ती स्वाद घेतच बोलु लागली ..

म्हणुनच आणलं बोर झालं होत ना,तुला घरच ‌खाऊन ..

हो...मम्मी काही खाऊच देत नव्हती...

बरोबर आहे...आईंच मेडीसीन चालु आहेत बाहेरच खायच...तो बोलतच होता...कि बोलते.

अ..ह‌ं हह खाऊ द्या ना,

बरं ..तो ग‌ालात हसत शांत बसतो.

मला डेजर्ट पण हवयं ...ती खाता खाताच बोलली.

ते संपव ..मस्त स्पेशल आहे .मला माहित आहे तुला स्वीट खुप आवडते...

😊☺तुम्हाला खुप काही माहित आहे ...पण मला जास्त माहीत नाही ,तूमच्या बाबतीत...

तुझ लक्ष नाहीये माझ्याकडे म्हणुन माहीत नाही,

अ...ती खायच सोडुन त्याच्याकडे बघते...अ...हो..मी

तो जोरात हसतो....पिहु मी मस्तीत बोललो...लगेच तु मना‍वर घेतेस...

पण खर आहे...मला जास्त नाही माहीत...मला जाणून घ्यायच आहे,पण वेळच नसतो बोलायला..रात्री थोड बोलतो..ते पण तुम्हाला वेळ असेल तर..ती नाराज होतच बोलते..

ऑ...हनी,तो तिची हनुवटी वर करत स्वःकडे करतो.हे लग्न झालं ना,मी स्वतः तुला वेळ देणार आहे...

ती नजर वर करत त्याच्याकडे बघते...रीयली

यस हनी, तो हसतच बोलतो..

आणि काम,

ते मी बघतो तु नको काळजी करु,...आपण हनीमुनला खुप दिवस जाणार आहोत ..ति‌थे वेळचवेळ आहे तो थोड जवळ येतच बोलतो..

पिहु लाजुन लाल होत मागे सरकते...अ..काही ही तुमच,

काही काय, सिरीयसली बोलतो मी,सगळं प्लॅन केलयं मी लगनाच्या दोनदिवसानंतर आपण दोघे चाललो आहोत..
.
.अहो...ती शॉक होतच बोलते..

यस बेबी तो मान हलवत डोळे मिचकावतच बोलतो.

ते..मी..कुठे तिचा गोधंळच उडाला होता.

तु ‌‌ला सरप्राईझ‌ आहे...नंतर सांगेल ,

सांगा ना,ती लाडातच येत बोलली.

न..नो बेबी..तो हसतच बोलला.

ती गाल फुगवुनच जेवण करु लागली...

त्याने तिच्या मेडीसीन काढुन समोर धरल्या ...

तुमच्याकडे कस काय,

आईंनी दिल्या ...म्हणजे मी मागून घेतल्या..तु अजून वरच होती...तेव्हा...😁

😏मला वाटलं आज सुट्टी तर काय तुम्ही घेऊन आलात हुहहह...

धर घे,.😅

नको झोप येतेय मला..😣

मग झोप‌ ना‌..त्याने पाण्याचा ग्लास समोर धरला..तिने तोंड वाकड करतच घेतल्या..

विराट ने डेजर्ट मागवलं ..रेड वेल्वेट पूडींग.


पिहु आणि विराट कप घेऊन काऊच वर जाऊन बसले...

वॉव ...पिहु एक स्पून खातच स्वाद घेऊन बोलली. ..अहो मला रेसीपी हवी आहे,शेफ ला सांगा,

नको,तु दररोज करत खात बसशील

अ.हह नाही,ओ...पिहु हसतच बोलते.

नाही तर काय करत काय असतेस किचनमध्ये तु हह...

ते मला आवडतं नवनविन रेसीपी ट्राय करायला...मला अजुन हवयं

वन मोर पिहु तो थोड जोर देतच बोलतो...

का..आपलच तर आहे बिल थोडी पे करायच आहे..

विराट हसतो.... हो गं पण त्यात किती कॅलेरीज असतात.

🙄 ,कॅलेरीज ...

270 कॅलेरीज असतात .आणि तेवढे बर्न करायला किती एक्ससाईज करायला लागते तो गंभीर होतच बोलतो...

अहो,मी फक्त अजुन एक मागितलं आणि तुम्ही डायरेक्ट कॅलेरीज..ती पोट धरुनच हसू लागली...

सिरीयसली पिहु तुला ना,फिटनेस थोड पण गांभीर्य नाहीये....

पिहु स्वतःच हसु आवरत मला नको कुठे तरी उद्या एक्सासाईज कर. म्हणून मागे लागसाल...

ते तर मी मागे लागणारच आहे,तुझा हात बरा झाला ना,...तेव्हा बघ...

अ..😒 मला बोर होते...एक्ससाईझ

ते आपण नंतर..तो बोलतच होता कि,ते त्याचा फोन वाजतो....
ती रागाने बघतच होती आत्ता कुठे बोलायला चांगली सुरवात झाली कि मोबाईल वाजला...😣विराट तिला अर्जंट आहे म्हुणन थोड लांब गेला...पिहु चिडुनच त्याच्याकडे बघु लागली.
विराट थोड्यावेळाने कॉल संपवुन मागे वळुन बघतो तर पिहु नव्हती...त्याने तिला हाक मारली...पिहु....
ती काहीच बोलली नाही,...

त्याने नजर डोरकडे फिरवली लावला होता.म्हणजे पिहु कुठे गेली नाही ईथेच आहे ..तो रीलॅक्स होत लाडात तिला हाक मारू लागला...पिहु सॉरी,...सॉरी,परत नाही उचलणार तो पाऊल एक एक टाकतच इकडेतिकडे बघु लागला. ,

ती एक नाही दोन नाही,शांत एका पिलर मागे थांबली होती...

पिहु....माय सनशाईन,कम ना...

पिहु माझ्या हातात मोबाईल आहे आणि माहीत आहे तु कुठे सीसी टीव्ही कॅमेरेत दिसतयं मला...

ती घाबरतच येत काय ,अ..हो....ती इकडेतिकडे बघु लागली..पण कुठेच दिसत नव्हते..

विराट हसतो....

तुम्ही खोट बोलला...ती तोंड फिरवुनच बोलली.

अगं पिहु माझ्याऐवढे डोक लावायला अजुन वेळ आहे,एवढ कळत नाही का हा प्रायव्हेट ऐरीया,इथे लावतात का नाही,लगेच घाबरत बाहेर आली.तो तिच्या जवळ जात होता...तर ती पळत पूलच्या त्या साईडला गेली...

पिहु,...कम तो हातानेच तिला बोलवतो...

ना..नाही,...तुम्ही फक्त घाबरवायच काम करता..

पिहु पुल खोल आहे ,तो तिच्या कडे पाऊलं टाकतच बोलतो.ती ही पळतच पुढे जाते ..

ओके माझ्या हातात आली ना,मग मी....सोडणार नाही हह तो रोमँटीक अंदाम मध्ये तिच्या डोळ्यात नजर रोखुन बघत बोलला..

ती लाजुन ‌खाली बघते....तो तिच लक्ष नाही बघून पळणारच कि ती दूसरया साईडला गोल फिरवुन येते....

शीट,तो दातवर दात घासतच बोलतो...

पिहु जोरजोरात हसते...मिस्टर देशमुख अशीच हातात येणार नाही मी,ये...ई ती जीभ दा‌खवत गोल गोल चालत होती...

पिहु,कम ना बाबा,तो तिला लाडीगोडी लावतच बोलत‌‌ होता..

अहहं तुम्हाला काय बोललं होतं मी मोबाईल बंद करा,एक तरी ऐकता का...

परत नाही ,करणार...तुझ ऐकेल.ओके...तो ब्लेझर‌ काढतच बोलतो...

हे....तु....म्ही...काय..करताय...ती त्याच्याकडे बघतच होती...

त्याने ब्लेझर काढला आणि चेअर वर ठेवुन स्लिव मागे फोल्ड करत पळतच तिच्याकडे जाऊ लागला...पिहु घाबरुन पळतच होती कि त्याने तिच्या कमरेला पकडत घट्ट पकडुन स्वतःकडे ओढलं....ती सोडवण्याचा प्रयत्न करत होती...

हो ,हह आता कुठे पळणार,हहह.तो तिचे हात मागे फोल्ड‌ करुन डोळयात बघत बोलु लागला...

हहह ती...त्याच्या डोळ्यात हरवत...ते....मी...सॉरी,

विराट ने तिचे केस कानामागे घेत गळ्यावर नजर टाकली..त्याची नजर गळ्यावर पडताच पिहुच्या अंगावर गोड शहारा येत होता...तिची चलबिचल होऊ लागली.ती थोडी मागे सरकली....त्याने अजुन जवळ खेचले,...पिहुच्या अंगाला सरकन काटा आला..त्याने अलगद बोट गालाव‌रुन कानावरुन फिरवत गळ्याभोवती फिरवली....श्वासाची गती ही वाढली होती...तिच डोक पुर्ण सून्न झालं होते....

अ....हो...ती थरथरतच बोलु लागली..

ती बोलतच होती कि त्याने तिचे केस मागेच घेऊन शोल्डरवर ओठ ठेवले...ती पुढे काहीच बोलली नाही ...तिने अलगद डोळे घट्ट मिटुऩ‌
घेतले.विराट ने शोल्डर ओठ फिरवले...तिच्या नसनसता रोमांच भरुभरुन वाहु लागला...

हह ,काय बोलल होत मी हातात सापडली कि सोडणार नाही...तो हळुच ओठं फिरवतच बोलु लागाला...

तिच मन स्थिर नव्हते..त्याचा स्पर्श तिला काहीच सुधारू देत नव्हता...तिचे हात ही त्याने एका हाताने फोल्ड केले होते ,ती सुटण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती...पण काहीच त्याच्या फायदा नव्हता...विराटने एका हाताने तिची मान वर करत गळ्याच्या खाली किस करु लागला...

तिने हात सोड‌ण्याचा प्रयत्न सोडुन दिला..त्याने ही तिचे हात सोडुन त्याचे ओठ कधी शोल्डरवर तर कधी गळ्यावर फिरु लागले...विराट तिच्या गंधात वाहत चालला होता...

पिहुने त्याच्या पाठीवर घट्ट पकड करत जवळ आली...त्याचे ओठ ‌खुप वेळ तिच्या गळ्यावर थांबले होते....

अ..होsss....ती किंचत विवहळतच बोलली..

विराटने तिचा चेहरा दोन्ही हातानी धरत तिच्या नाजुक ओठांवर ओठ ठेवले....किती तरी क्षण विराट ने सोडलेच नाही,...
तिनेच जोर दे‌‌त हाताने दोन तीन वेळा ढकल्यावर तेव्हा कुठे तो भानावर येत बाजुला झाला.....

तिने त्याला मागुन मिठी मारली....त्याने गालात हसत तिला पुढे घेत जवळ घेतले..ती घाबरली होती हे कळताच त्याने तिला उघलुन घेतलं...

वेडाबाई,चला घरी बारा वाजुन गेलेत ...त्याने तिला काऊचवर ऊभे करत तिच्याकडे बघितलं .

मला नाही जायच,ती गळ्यात हात गुंफवुन जवळ गेली..

मग घाबरली का,तो तिच्या गुडघ्यांना विळखा घालत उचलुन घेतो...

ती त्याच्याकडे एकटक बघत होती...त्याने भुवया वर करतच विचारले....

ती मानेनेच नाही म्हणते...

मी घाबरलो बस्स, तो हसतच बोलतो..

पिहु लाजुन हसत त्याच्या खांद्यावर डोक ठेवते.

आता उतर,खुप लेट झाला आहे...त्याने तिला खाली उतरवले.
.
अहो...थांबु ना...ती काऊच वर बसतच बोलली..

पिहु,गारवा किती आहे,चल घरी आता दोन दिवसांनी फंक्शन चालु होतील...परत आराम करायला वेळ मिळणार नाही...त्याने त्याच्या ब्लेझर तिचा क्लच उचलला.

ती चे‌हरा पाडतच उठली...

धर..,तो तिच्या‌‌‌कडे क्लच देत बोलला...

नको मला ती गाल फुगवुनच पुढे चालत बोलली.

आज फक्त रुसायच चालु आहे किती नखरे करतेयेस आज,तो तिच्यामागे चालत हसतच बोलु लागला.

ती ओठ दाबतच हसू लागली....

दोघेही लिफ्टमधुन खाली येत होते.....पिहु लगेच त्याच्या मिठीत शिरली...त्याने एका हात‌ कमरेवर ठेवत जवळ घेतलं ..त्याने तिच्या कडे बघितलं तर गळ्यांवर लव्हबाईट दिसत होते.त्याने लिफ्ट थांबवली..

अ..काय झालं,‌पिहु ब्लँक होत त्याला विचारु लागली...

त्याने ब्लेझर तिला घालुन दिला...

मला थंडी वाजत नाही‌ेये...

हो माहीत आहे,...पण असु देत तिच्या लक्षात आले नाही म्हणुन विराट हसतच बोलला

दोघे बाहेर आले .पिहु प्रांजलला फोन करतच पुढे गेली..

मॅनेजर हसत जवळ येत गुडनाईट बोलत होता...तर त्याची नजर विराटच्या हाताकडे गेली..

विराटला कळताच त्याने क्लच मागे लपवत दुसरा हात मिळवुन वरवर हसतच गुडनाईट बोलुन पुढे गेला‌..

दोघेही गाडी‌त बसले..धरा मॅडम आता तरी ,स्टाफ काय म्हणत असेल ...बायकोच्या मागे पर्स घेऊन फिरतो हॉटेलचा मालक...

पिहु हसुन त्याच्याकडुन घेते..काही काय,तुमच...

हो...सगळे तसेच बघत होते...माझ्याकडे

पिहु गाडीतच डोळे झाकु लागली...औषधांची गुंगी चढतच होती...

पिहु घरी जाऊन झोप तो तिचा हात ध‌रत तिला जाग ठेवतच बोलु लागला...

हम्म ,तरी ती झोपलीच...

घर आल्यावर त्याने प्रांजलाला फोन केला.प्रांजल झोपेतून उठुनच खाली येऊन दार उघडते.....

विराट ने तिला अलगद उचलुन घेतलं ..

झोपली ....प्रांजल हळुच बोलली...जीजु गुडनाईट प्रांजल दार लावुन निघुन पण गेली‌‌.

हम्म,त्याने तिला रुममध्ये बेडवर झोपवलं...आणि हळुच ब्लेझर ,सॅन्डल्स काढले...

त्याने मॉमला कॉल केला...

हा बोल विराट एक वाजुन गेला अजून आला नाही,‌

ह..हो ते...आत्ता पिहुच्या घरी आलोय..तिकडे यायच बोललं कि एकतास लागेल.....

हम्म ठिक ये,सकाळी ये लवकर..गुडनाईट

ओके गुडनाईट...त्याच लक्ष ऐसी कडे गेलं त्याने पिहुवर नजर टाकत हसतच ऐसी‌ ऑन केला..

तो फ्रेश होऊन पिहुला ब्लँकेट नीट ओढुन तिला जवळ घेतलं .
पिहु ही त्याला बिलगुन झोपली...

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कसा वाटला भाग नक्की कळवा😊

क्रमशः