सकाळी सगळे शांत ब्रेकफास्ट करत होते.. विराट न्युज पेपरमध्येच बघत होता.. त्याने एक नजर सगळ्यांवर टाकली सकाळ पासुन कोणीच त्याच्याशी बोललं नव्हतं.
मॉम माझा शेक ,
गीता ....
ह.हो..हे धरा भैय्या.
दादा आज,कोणीही तुझ्याशी बोलणार नाही आजीची ऑर्डर आहे नमन हसत सांगतो.
ते दिसतच आहे ,विराट दात ओठांवर घासतच बोलतो.
मग कळतंय ना,मग तयार हो ना लग्नाला जीजी ओरडुनच बोलते.
जीजी लग्न काय दहा वेळा करायची गोष्ट आहे विराट चेअर वरुन उठुन हॉल मध्ये जातो.त्याच्यामागे सगळे येतात.
अरे,पोरा लग्न किती घाईगडबडीत केलं किती जणांना माहीत पण नाही तुझ लग्न झालं सगळ्या विधीने नीट लग्न कर म्हणतेय मी जीजी कंठ दाटतच बोलते.एकलुता एक नातु माझा आणि त्याच पण लग्न मी नको पाहु का जाऊ देत मी जाते गावाला आता तु मोठा झाला .ह्या म्हतारीच्या बोलण्याला काय किंमत आहे.
आत्ताच्या आता गावाला जा,तु विराट उठुन जवळ येत चिडुन बोलतो..
विराट ही कुठली पध्दत बोलायची सुमन चिडुनच बोलते..
हो मी बोललं तर राग येतो पण हे सगळी तुमची नाटकं काय बंद होत नाही...नाही ते बॅक्लमेल करत बसतात.
मी जाणार नाही माझ्या जावायचं घर आहे..हुहह.
हो का, मग बोलतेस कशी गं विराट चिडुन बोलतो.
विराट अस पण काही वेगळं मागितलं नाही.एवढ चिडायला सुधा जवळ येत बोलते.
आत्त्या अगं काम सोडुन हेच करू का..लोकांच हनीमून ऐकलं होतं सेकंद,थर्ड आणि इथे लग्नाच चाललं. अस म्हणु वाटत नाही विराट लग्न झाल्यापासुन पिहुला कुठे ही घेऊन गेला नाही जा तिला घेऊन फिरायला पण तस नाही तर अजुन तिला किती लांब ठेवायच हाच विचार करतात ...तो तर रागात काय बोलत होता त्याला ही कळत नव्हतं
सगळे शॉक होतच बघतात...आत्ता सगळ्यांना 😂😂 कळते ह्याला फिरायला जायची घाई आणि आपण एक मधेच घेऊन बसलोय.
विराटच्या लक्षात येत..जे बोलायच नव्हतं तेच रागायच्या भरात बोलुन गेलो.
जीजी जवळ येऊन त्याच कान पकडते...आता कळालं काय चालु आहे तुझ...
अहहह जीजी कान सोड मी काय लहान आहे का.
जीजी कान सोडुन नजर रोखूनच बघते...
आता काय झालं , मी ऑलरेडी माझे न्यु प्रोजेक्ट चालु केले .
हनीमुनसाठी 15-20 डेज सुट्टी काढणार ते सांगु नकोस.नमन हळुच कानात बोलतो..विराट त्याच्याकडे चकीत होत बघतो तूला कोण बोलल चुप आता काय बोलला तर बघ मग,तो त्याला धमकी देतच बोलतो...
तूमच्या दोघांच काय चालु आहे.आजी दोघांकडे बघुन म्हणते.विराट बोलणार कि,नमन बोलतो.दादा मी पण नव्हतो लग्नात प्लिज ना,दादा नमन डोळा मारतच त्याला म्हणतो😉
नमन sssविराट दातांवर ओठ घासतच बोलतो...😠
दादा मला सांगितले वीराने लग्न कस झालं. तुझ्याच लग्नात गेस्टसारखा आला होता...हे अस लग्नात करतात का....😕
विराटला आठवून चेहाराच उतरतो.लग्नाच्या आर्धा तास आधी तो मंडपात आला होता.सुमनच्या लक्षात येते.
दादा...नमन त्याला हलवुन भानेवर आणतो.
हह.
कुठे हरवलास,
नथिंग,तो स्वतःला सावरत बोलला.
विराट,लग्नात सगळ्या विधी पार पाडून नीट लग्न करुन घे.आयुष्यभर हळहळ लागणार नाही त्याची सुमन त्याला समजवत जवळ येते.
आजी जवळ येऊन बसते...विराट,पिहुचे ही काहीतरी स्वप्न असतील ना,जे ती लग्नात पुर्ण करु शकली नसेल.ते आत्ता पुर्ण कर.किती समजूतदार मूलगी आहे कधी काही मागत नाही..मग तुझ कर्तव्य नाही का तिला तिचे सगळे हक्क द्यायाचा.फक्त गळ्यात मंगळसुत्र घालुन सप्तपदी चालुन लग्न झाल अस नसते..लग्नाच्या आधी नंतर किती विधी कार्यक्रम असतात.
दिपाच लग्न बघुन तिला वाटलं नसेल का आपलं ही लग्न अस झालं असते तर.मूलींची स्वप्न खुप असतात पण पिहु ने कधी तुला म्हणा ,तिच्या आईवडीलांना आम्हाला कधीच दोष दिला नाही..तुम्ही माझ्या लग्नात अस का केलं नाही.तिच्या आईवडीलांना ही वाटलेच असेल पण तुच नव्हता इथे म्हणून ते ही काही बोलू शकले नाही...आता ती संधी तुला मिळते तर का नको म्हणतोस.
विराट आजी कडे एकदा आणि जीजीकडे एकदा बघतो.
विराट बोल ना,
विराट उठतो.ओके फाईन ठिक आहे...पण लवकरात लवकर काय आहे ते करा,मला पिहु लवकर ह्या घरात हवी तो चिडुनच बोलुन निघुन जातो.
ते गेल्यावर सगळे हसायला लागतात.रोहीणीला काही एक इंटरेस्ट नव्हता.पण आता सगळ्यांमध्ये ती ही शामिल होते.
रोहिणी विराटच्या रुममध्ये येते.विराट ऑफिसला जाण्यासाठी आवरतच होता...आई ,ये ना काय काम होते का?
काही नाही सहजच आले.
विराट गालात हसत परत आवरायला घेतो.
विराट,
.हह
तु नमनला अजुन ऑफिस जॉईन करायाला सांगितले नाही...येऊन किती दिवस झाले तो तर कधी स्वतःहुन येणार नाही आणि तुझे बाबा तर कही मनावर घेत नाही.
विराट जवळ येत आई त्याची इच्छा नाहीये बिझनेस मध्ये त्याला थांबवते.
काय ,अरे विराट तो लहान आहे काही ही बोलेन मग तु त्याच ऐकणार आहे का.पुर्ण आयुष्यभर पेंटींग काढत बसणार का तो रोहीणी चिडुनच बोलते.
अग पण आई,...
विराट मला नमन लवकरात लवकर बिझनेस जॉईन करायला हवा ते आता तु ठरव माझ ऐकायच का नमनच .
आई,पण...
रोहिणी त्याच न ऐकताच निघुन जाते.
विराट विचारातच पडतो.
रोहिणी चिडुनच रुममध्ये जाते.विराट अस कस काय बोलू शकतो.नमनला तर कधी अक्कल येणार काय माहित...लवकरात लवकर नमन रांकेला लागला तर बर आहे.नाही तर ह्या विराट च्या मागेपुढे करत बसाव लागेल आता पिहुने काय जादु केली काय माहीत दुसर काही दिसतच नाही...बघता बघता मुलं होतील.मग काय सगळ त्यांच्या नावावर करायला बसलाय हा विराट..रोहिणी एकटीच स्वतःशीच बडबडत बसली.
सुमन भिमरावांना फोन करतात.
हा बोला ताई,पिहु ही शेजारीच बसली होती.
भिमरावांना ऐकुन आश्चर्य ही होत होते आणि आंनद ही होत होता..ते फोन ठेवतात.
अहो काय म्हणत होती सुमन रेवती भिमरा़ंवाचे हाव भाव बघून विचारु लागली.
पिहु ही अतुर झाली होती.
सुमनताई म्हणत होत्या विराटच्या जीजीची इच्छा आहे ..
हहह ,काय पिहु पटकन बोलुन गेली...तिला कळताच ती दुसरी कडे बघु लागली
भिमराव हसत पिहुला जवळ घेतात...पिहुला परत नवरीच्या रुपात बघयाच आहे...
रेवती हा म्हणुन परत कळ्याल्यावर काय शॉक होतच बोलते.
पिहुतर ब्लँक होत बघते...पप्पा म्हणजे
अगं माझी चिऊ,तुझ आणि विराटच लग्न बघायच आहे त्यांना .
पिहुला तर काय रीयॅक्ट करावं कळतच नव्हते...मनाची चलबिचल वाढली होती..लज्जा,भिती,हसु सगळे भाव संमिश्र झाले होते.ती लाजुन पटकन रेवतीच्या कुशीत शिरली.
रेवती तिच्या डोक्यावरून हात फिरवु लागली..डोळ्यातुन आंनद अश्रु येतच होते.
प्रांजल कपाळालाच हात लावते. मम्मी माझ्या लग्नात रडायाला थोड पाणी ठेव ...
तिघे ही तिच्यकडे बघतात..
प्रांजु तुझ्या लग्नात मी तरी रडणार नाही जो करुन घेणार असेल ना त्याची आई रडत बसेल कुठली आफत घेऊन आला घरी रेवती डोळे पुसत बोलु लागल्या...
व्हा कोणाची आई असेल का,अशी...हूहह..मी एवढ्या लवकर तर लग्न नाही करणार अजुन मला तुला त्रास द्यायचा आहे.
भिमराव हसत प्रांजलला हात करून जवळ बोलवतात...प्रांजल पटकन पळत जाते..पप्पा फक्त मला लाड करतात...पप्पा माझी ही सावत्र आई तर नाही ना,
रेवती उठुन तिला जोरात धपाटा मारते...
मम्मीईईई.....पप्पा ते बघा सावत्र आईची लक्षण,
पिहु पण तिच्या,दंडाला मारते तोंड किती चालवतेस गं पागल.
रेवती तु करेतस भेदभाव ते चालते हहह सारख माझ्या परीला ओरडत असतेस ते प्रांजलच्या डो्क्यावरुन हात फिरवत म्हणतात...
हो तुमची मूलगी किती आगाऊ आहे दिसत नाही का .फक्त मला त्रास कसा द्यायचा तेच डोक्यात चालु असते...
तुझी लेक तर काही त्रासच देत नाही .प्रांजल पिहुकडे बघुन बोलते..
ये मी कधी त्रास दिला ...हहह पिहु पण चिडुन बोलते.
हो का माझ्यापेक्षा तु त्रास दिला आहे...हुहहह.
मम्मी तिला सांग हा,माझ्या नादी लागु नकोस...
दोघी शांत बसा काय विषय आणि कुठे चालला तुम्ही ..अहो मग अजुन काय म्हणाली..
तसे सगळे शांत होतात.
पंधरा दिवसानंतरची तारीख निघाली आहे....दोन दिवसात सगळ फायनल करुन सांगतात म्हणाल्या.
.
.
.
.
पिहु जेवण करून रुममध्ये गेली...नऊ वाजले तरी विराट चा कॉल आला नव्हता.आणि सकाळी पणं त्याने केला नव्हता.तिने कॉल केला दोन तीन वेळा तिने ट्राय केला पण त्याने उचललाच नाही.
पिहुने परत एकदा कॉल केला..त्याने मेसेज केला घरी गेल्यावर. कॉल करतो .
तिने ही हो म्हणुन रीप्लाय दिला.
अकराचे बारा कधी वाजले कळलेच नाही वाट बघुन पिहु झोपुन गेली.
सकाळी त्याने फोऩ लावला तर स्विच ऑफ होता...त्याने घरात लावला ..तर ती अजुन झोपली होती.
तो ही ऑफिसला निघुन गेला लग्नाच्या आधी सुमन ने त्याला सात आठ दिवस सुट्टी घ्यायला लावली होती....म्हणुन तो काम कमी करण्यासाठी आत्ताच संपवायच चालु हहोते.
पिहु उठुन आवरुन परत मोबाईल घेऊन विराटला कॉल करु लागली.सात आठ मिसकॉल पडल्यावर त्याने उचलला..
पिहु बोलणार कि विराट बोलला.
पिहु ,एकदा फोन उचलला नाही तर मी कामात आहे हे कळतच ना,तो शांततेच पण चिडुनच बोलतो.
ते....ते...
आता नंतर बोल.मी करेल फ्रि झाल्यावर तो ऐवढ बोलून फोन ठेवुन देतो...
पिहुला वाईटच वाटते.ती डोळ्यांच्या कडा पुसत मोबाईल टाकून टीव्ही लावते.
पिहु आवाज किती ,कमी कर रेवती किचन मधुन बोलते...
पिहु टीव्हीचा आवाज कमी करते.ती विराटचाच विचार करत बसली दोन दिवस झाले फोन करतेय पण वाटतच नाही स्वतःहुन बोलाव.
विराट फ्रि झाल्यावर दुपारुन कॉल लावतो..पिहुची इच्छा नव्हती तरी तिने कॉल उचलला...हा बोल आता फ्रि झालो.
पिहु एक नाही दोन नाही..
हॅलो,....
हहहह.
हहहत काय ,सकाळी किती फोन करत होती..आणि आता बोलत नाहीये,
............
पिहु,शांत का आहे.बोल ना,
तुम्हाला आवडत नसेल तर मी परत फोन करणार नाही तस सांगा तुम्ही पिहु चिडुनच बोलते.
आता हे काय नविन..
दोन दिवस झाले ,बोलण नाही,तुम्ही तिकडे जाऊन मला विसरून गेलात पिहु कंठ दाटुनच बोलते..
पिहु,अग विसरलो नाही..आणि हे काय नविन आहे का, तूझ्यासाठी आधी तर एक,फोन करायाला जीवावर येत होता..आणि आता फोन वर फोन तो हसतच बोलतो.
हो नविन नाही...माझ्यासाठी,पण तेव्हा आणि आता फरक आहे...ती मुसमुसतच बोलु लागली.
पिहु डोन्ट क्राय ना,मला ही बोलायच असते पण टाईमिंग जुळत नाहीये...
हहह ती डोळे पुसतच बोलली
हहह नाही..काही तरी बोल,
काही नाही सॉरी
तु का सॉरी बोलते.
ते ..ते..का...ही नाही, परत नाही फोन करणार..उगाच मी त्रास देत असते ना,
पिहु आता तु अती बोलतेस मी तुला फोन नाही करु म्हटलंच नाही तो चिडुनच बोलतो.
ती त्याचा आवाज ऐकून घाबरुनच फोन ठेवते.
तो ही फोन कडे रागाने बघत ठेवतो..डोक उठवलं सगळ्यांनी एकीकडे मॉम,तर मधेच आईच एक ,तर आता पिहुचीच कमी होती.तो स्वतःशीच बडबडत होता.
विराट,सोनियाची तु सुट्टी कॅन्सल केली.का मानव आत येत बोलु लागला...(विराट ची सेक्रेटरी)
विराट त्याच्याकडे नजर रोखून बघतो...हो केली
का, पण तिला हवी आहे दोनच दिवस...
एक काम कर तिला म्हण कायमचीच सुट्टी घे .
अरे..ते..
मानव तु तिची वकिली करतोय का,विराट रागानेच बोलतो
अरे विराट चिडायच काय आहे तिच काम मी हॅ्न्डल करतोय ना..मग काय प्रोब्लेम आहे...
मानव माझ डोक आधीच गरम आहे तु आता तडका मारू नको..तुझ काम कर जा....तो ओरडूनच बोलतो..
तुझ डोक कधी गरम नसते तो तोंडातच पुटपुटत निघून जातो.
विराट थोड्यावेळ विचार करुन एकाला फोन लावतो.
.
.
.
पिहु फ्रेश होऊन खाली आली....रेवतीच लक्ष गेलं ,पिहु तु रडली का,
नाही ,पिहु नजर इकडे तिकडे करतच बोलते.
प्रांजल कॉलेजवरुन येते...(रेवती आणि,प्रांजल. एकमेकींकडे बघतात.)दी सॅड सॅड का आहेस,
काही नाही एकच प्रश्न का विचारता तुम्ही.
ठिक ये नको सांगु शांत हो...तुला काय खायच का,दुपारीपण नीट जेवली नाही तु...काही त्रास होतोय का,रेवती तिचा चेहरा बघुन एक एक प्रश्न करत होती.
मन नाहीये काही खायच,पिहु हळुच म्हणाली.
दी चल बाहेर जाऊन येऊ पाणीपुरी खाऊन मुड फ्रेश होईल.
बाहेरच काही नको प्रांजु आता कुठे बर वाटतं...फक्त फिरायला जायच असेल तर घेऊन जा...रेवती बोलते.
ठिक फिरुन तरी येऊन चल दि.
जा पिहु बाहेर फिरुन ये किती दिवस झाले बाहेर सूध्दा गेली नाही.
उद्या मी कॉलेजला जात नाही ,मस्त शॉपिंगला जाऊ हहह.
पिहु दोघींकडे बघुन हसते...तुम्ही दोघी काय लगेच घाबरता..काही नाही झालं.पिहु बोलतच होती कि बेल वाजली.
प्रांजु उठुन दार उघडते..कोण,
good evening mam,हे विराट सरांनी पाठवले आहे...प्रा़ंजल पार्सल घेत पिहुकडे बघते. ...
पिहु जवळ येऊन उघडुन बघते...विराट ने तिच्या साठी पाणीपुरी,रसगुल्ला,आणि चॉकेलेट्स पाठवले होते.पिहुचा चेहराच खुलतो....
वॉव दी ईईईई...प्रांजल जोरातच किंचाळते.
पिहुला विराटचा कॉल येतो.प्रांजल आत घेऊन जाते...प्रांजल हात लावणार कि रेवती हाताला फटका मारते.पिहुसाठी आहे...
ती एकटी खाणार आहे का एवढ हुहहह😏
पिहु कानाला फोन लावते.
सॉरी,माय प्रिंसेस....विराट हसत बोलतो.
पिहु लाजुन चेहरयावरच हात ठेवते.☺
ओहह,काय लाजतेस...😻
अहहं तुम्हाला कस काय कळलं .पिहु बाहेर बघत बोलली
मला तुला बघायची गरज नाहीये,लगेच फिल होते...तू कशी रीयॅक्ट करतेस😁
तुमच एक काहीतरीच...काम करा तुम्ही😏
विराट हसतो....जा,पाणीपुरी खाऊन घे.,जास्त नाही पण थोडसच ... रात्री झोपु नकोस मी फोन करतो..
किती बारा वाजता ....ती टोमणा मारतच बोलते.
नाही गं ...लवकर जातो आज आणि पहिले तुला फोन करतो..ओके...
हम्म मी वेट करेन...
ठेवु फोन...किती रडली ते पण नंतर डिसकस करु तो हसत बोलतो
तुम्ही ना,
बाय,लव्ह यु....😘😘😘
अहं. पिहु लाजुन बोलते...🙈
अहं अहं...च म्हण कधी म्हणू नकोस तु ...
अहो ...हह....पिहु लाडात येऊन बोलते...
ठिक ये मी ही वेट करेन.
पिहु फोन ठेवून आत जाते...दी किती वेळ मम्मी मला हात पण लावु देत नाहीये...😫😫
पिहु हसुन तिला पाणी पुरी भरवते..काय मम्मी तु पण..
अग आता पर्यंत सगळ खाऊन मोकळी झाली असती..
दोघी मस्ती करतच खातात.आता पर्यंत पिहुचा चेहरा पडला होता..आता खळखळुन हसु लागल्यावर रेवती खूश होत तिच्या कडे बघत बसली.
.
.
.
विराट त्रिशाची केस सॉल्व झाली आत्ताच लॉयरचा फोन आला.ती नॉर्मल नाहीये हे सिध्द झालं आहे .तिला पोलीस कस्टडीत मधून तिच्या वर ट्रीटमेंट दिली जाईल...
ओह,..ग्रेट देवेशचं काय रिअॅक्शन यावर
विराट मला वाटतयं आपण थोडे दिवस हे प्रोजेक्ट थांबवु .हातात आपल्याच आहे ना,मग घाई का...वातवरण थोड गरम आहे...मी काय म्हणतो कळतयं ना,तुला
मला ही हेच वाटतयं ...देवेश काही करणार नाही हे ही माहीत आहे मला वाटतयं देवेश स्वतःहुनच मागे सरकून पार्टनरशिप तोडेल...
मानव हसत हो बोलतो.
सोनियाला सांग दोनच दिवसच फक्त विराट हसून बोलतो..
ते मी ऑलरेडी केलं आहे काम मानव डोळा मारत बोलतो..
बॉस मी आहे का तु...विराट नजर रोखून बघतो...
अरे यार काय तु पण...माझ्या लवलाईफमध्ये तु का विलन बनतोस रे बिचारी किती अॅक्टीव असते कामात दोन दिवस रजा देऊ शकत नाही का,
दिसतय मला कश्यात जास्त अॅक्टीव असते...तुमच हे लव वैगेरे ना ऑफिसच्या बाहेर ठेवायाच.विराट धमकीच्या स्वरातच बोलतो.
हो रे तुला कधी काय त्रास झालाय का,
हम्म....
आठ नऊच्या दरम्यान विराट घरी येतो..जेवताना सगळ्यांच चाललंच होतं काय करायच काय नाही रोहीणी शांत बसली होती...विराट जेवण करुन रोहीणी जवळ बसतो.
आई,
हा बोल ,रोहीणी एक नजर टाकुन दूसरीकडे बघते.
आई,एवढ लग्न होऊ देत मग मी स्वतः त्याला ऑफिस जॉईन करायला सांगतो...एन्जॉय करु देत पंधरा -वीस दिवस.
ठिक आहे पण नंतर तु स्वतः त्याला समजवायच .त्याच एक सुध्दा ऐकुन घ्यायच नाही..
हम्म,आता तर हस...मी असल्यावर का टेंशन घेतेस...
रोहिणी हसुन त्याला हग करते.तिच्या मनासारख झालं आता..
विराटला आता नमन च टेंशन आलं होते..कारण त्याला बिझनेस मध्ये काडीमात्र इंटरेस्ट नाहीये...त्याची स्वप्न वेगळी आहेत..
सगळे बोलतच बसले होते..कि विराटच्या लक्षात आले...त्याने वॉचमध्ये बघितले .दहा वाजुन गेले होते.तो रुममध्ये चालला़ होताच कि नमन मागुन आला.
दादा हे बघ मी वेडींगकार्ड सिलेक्ट केले ह्यातले कुठल चांगले आहे...तो एक एक दाखवु लागला..
नमन,नंतर बघु मला काम आहे..
दादा ओन्लि फिफटीन डेज राहिलेत....कधी बघणार आहेस,
तुझ्या वहिनीला सेंड कर,तिला जे आवडेल तेच चुस कर,.आता जाऊ तो नजर रोखुनच बघतो..
ह..हो जा,आम्हाला गरज आहे..असा वागतोय नमन तोंड वाकड करुनच निघून गेला.
विराट रुममध्ये आला...फ्रेश होऊन पिहुला व्हीडीयो कॉल केला.पिहु तर वाट बघतच बसली होती...
किती वेळ, ती चक्क करतच बोलली..
अगं घरातले माहीत आहे ना,कसे आहेत लग्न लग्न म्हणुन डोक उठवुन ठेवलं आहे.
अशी का बघतेस...पिहु त्याच्या चेहरयाकडे एकटक बघत होती...म्हणुन त्याने विचारलं.
तुम्ही थकला आहात आराम करा...
तो गालात हसतो नाही गं...तुझ्याशी बोलून फ्रेश झालोय...तो बेडवर आडवा पडत बोलतो..
सॉरी,
आता का सॉरी ,
उगाच मी दुपारी चिडले ना,
तु कुठे चिडली मी चिडलो होतो..त्यासाठी माझी पिल्लु किती रडली असेल.
ना...ही..मी... कुठे रडले ती अडखळत बोलू लागली.
हो का,ठिक ये जाऊ दे ..तु खुश आहेस,परत लग्न आपलं हहह😇😇
हो,🙈
ओहहह😘...हह..मग काय काय करायच ठरवलं लग्नात
मला नमन ने ..आपले वेडींग कार्डचे पिक्स सेंड केलेत..
हो मीच सांगितले सांग तुला कुठलं आवडलं...
मला नाही जमणार सिलेक्ट करायला तुमच्या आवडीच बघा ना,
का तुला का नाही जमणार.
अहो..माझी चॉईस आणि तुमच्या चॉईस मध्ये खुप फरक आहे...त्यात घराच्यांना आवडले नाही तर...ती चेहरा उतरच बोलू लागली..
पिहु चॉईसचा संबध नाहीये. इथे तुला काय हवं ते म्हत्वाच आहे .दुसरयांना आवडण्यापेक्षा तुला आवडलं ते महत्वाच आहे...
अहो..पण,तुम्ही पण सिलेक्ट करा ना..
मला फक्त तुझ्या आवडीच हवयं .मला उद्या पिक्स सेंड कर बस...😘
तुम्ही कधी येणार आहे.
मी पाच सहा दिवसांनी...म्हणजे सगळेच येणार आहेत .मॉम ने तर वॉर्निंगच दिली आहे सेवन डेज काम करायच नाही..
फक्त सात दिवसच ,
हा,पाच दिवस लग्नाच्या आधी आणि दोन दिवस लग्नानंतर
लग्नानंतर तूम्ही दोन दिवसच राहणार माझ्यासोबत पिहू चेहरा उतरत बोलते.
हो ..काम करु नको का,तो लाडात येत म्हणतो.
त..स नाही...पण
पण काय,तो रोमँटीक आवाजात म्हणतो.
काही नाही,ती चिडुन दूसरी कडे बघते...
हह स्वतःहुन कधी बोलणार विराट हसत बोलतो.
मला तुमच्याशी बोलायचच नाहीये,तूम्ही मुद्दाम छळता ना,हुहह...
तु बोलल्याशिवाय मी तूला कुठेही घेऊन जाणार नाही ये,विराट भाव खातच म्हणतो..
नका घेऊन जाऊ,😣
ठिक ये 😎
अहहंह😣😣 तुम्ही बोलला होता. जाऊ म्हणुन...पिहु चिडूनच बोलते.
जाणार आहे पण मला काहीतरी हवयं मगच ,
काय,पिहु बारीक डोळे करुन बघते..
सांगेल तिकडे आल्यावर हहंह😉.
पिहु लाजुन खाली बघते....
पिहु लाजली मग तुझे गाल मला चावायची इच्छा होती ..प्लिज अशी लाजु नकोस ना😘😘😘
आ...😮काही काय तुमच पिहु चेहरा झाकुन घेते.
मग किती गोड दिसतेस,तु उम्हहह😘😘
अहो,🙈
अजुन एकदा बोल,
काय,पिहुला न कळल्याने तिने विचारले..
हेच गं तु म्हणतेस ना,अहो खुप छान वाटते कानाला..
पिहु लाजुन लाल झाली होती...
आणि तुझ्या ओठांच्या खालच तीळ तर उफ्फ..,😘
अ..हो... शांत बसा ना,पिहु हळुच बोलली,तो बोलत होता तर तिच्या अंगावर गोड शहारा येत होता...
विराट गालात हसत शांत बसतो...पिहु त्याला बघत झोपी गेली. झोपल्यावर विराट कॉल कट करुन झोपी जातो...
लग्नाची तयारी सगळ्यांची चालुच असते...लग्नाच्या दहा दिवस आधी सगळे पूण्याला आले होते...पूणयातल्या हॉटेल मध्ये लग्न करायच ठरले होते...आता फक्त विराट आणि पिहुच्या कपड्यांची दागिन्यांची शॉपिंग राहीली होती.
विराट पूण्याला आल्यावर पहिले त्याने गाडी पिहुच्या घरी वळवली....
दादा आपण कुठे चाललो...नमन त्याच्याच गाडीत होता म्हणुन त्याने विचारले..
पिहुकडे,
ओहह....वहिनीला बघायची किती घाई....नमन चिडवत म्हणाला..
विराट गालात हसतो,..दहा ते बारा दिवस भेटुन झाले होते..त्यात फोनवर दोन दिवसा आड बोलण...आता पुण्यात आल्यावर त्याची कार तिकडे च वळणार,😂😂
पिहुला त्याने सांगितलच नव्हतं.त्याने पाच दिवस आधी येणार बोलला होता पण तो दहा दिवस आधीच आला होता.
दोघेही पिहुच्या घरी आले...संध्याकाळची वेळ होती...दार उघडेच होते..विराट नमन आत आले..प्रांजल आणि रेवती बसल्याच होत्या...विराट ये ना...रेवती खुश होऊन बोलते...प्रांजलपण हसत जवळ येते..जीजु दी बोलली नाही येणार म्हणनु...
तिला माहित च नाही सरप्राईज आहे...विराट गालात हसत बोलतो.
ओहहह..हुहह.😁प्रांजल उडी मारतच ओरडते.
प्रांजु काय हे रेवती डोळ्यानेच दटवते.तशी ती शांत होते.
नमन तर कधीच हँग झाला होता..प्रांजलला बघुन 😍😍तिचे ते बोलके डोळे, नटखटपणा चहेरयावरुन स्पष्ट दिसत होता.
नमन ये बाळा,रेवती त्याला बसायला सांगते
तो ही दबकतच बसतो...इकडे तर विराट वर पण निघाला.नमन ला सोडुन😂
प्रांजु पाणी आण...
ह..हो प्रांजल हसतच आत जाऊन पाणी आणते..
प्रांजल नमनच्या समोर ग्लास धरते...तो एक. स्माईल देत ग्लास घेतो...
प्रांजल त्याच्या समोर बसून मोबाईल मध्ये बघत बसली.रेवती बोलायला लागली तसा तो भानावर येत बोलु लागला.
पिहु कबोर्ड आवरत होती..तिच्या,हातात कपडे होते...विराट हुळच दबक्या पावलांनी रुममध्ये आला..
पिहुची पाठ त्याच्याकडे असल्याने तिला कळालं नाही.विराट ने पटकन जाऊन मागुन तिला स्वतःकडे वळवत ओठांवर ओठ ठेवले..
एवढ्या लवकर सगळं झालं कि पिहुला कळलंच नाही.उम्म..अम्म,😳...तु..म्ही...ती डोळे मोठे करूनच बघु लागली.
ती बोलतच होती...त्याने परत तिची मान पकडुन जवळ खेचुन ओठांवर ओठ ठेवुन घट्ट पकडुन किस करु लागला..पिहुला ही माहीत होतं.🙈 त्याच मन शांत होत नाही तो पर्यंत तो बोलु ही देणार नाही आणि सोडणार ही नाही....तिने ही त्याला साथ दिली.डीप किस करुन किती तरी क्षणांनी विराट ने तिला सोडले.दोघेही जोरजोरात श्वास घेत एकमेकांच्या डोळ्यात बघत होते...विराट ने कपाळाला कपाळ टेकवले...आय मिस यु सो मचचsss...तो मोठे श्वास घेतच बोलु लागला...
पिहुला दम लागल्याने बोलता ही येत नव्हते..तिने त्याला घट्ट मिठी मारली..थोड्या वेळाने ती त्याच्या पाठीवर मारते किती घाबरले मी,...अस करतात..
विराट हसत तिला घट्ट आवळतो...आता मीच असाणार,ना...त्यात काय घाबरायच..😉
हा पण ,ती मिठीतुन बाहेर येत त्याच्याकडे बघते...तूम्ही सकाळी बोलला नाही येणार म्हणुन...
सरप्राईज द्यायच होत मला 😘तो ओठांच्या खाली तीळावर किस करुन बोलतो.
पिहु 😚हसुन,टाचा उंचावुन त्याच्या गालावर किस करते...
विराट तिचा चेहरा ओजळींत घेतो..खुप मिस केले हे दहा बारा दिवस त्याच्या डोळ्यात पाणी तरळत होते..
मी पण,पिहुचे ही डोळे पाणवले...विराट तिच्या दोन्ही डोळ्यांवर किस करून मिठीत घेतले.
खुपवेळाने विराटने तिला सोडतो..
अहो,तूम्हाला काय कळतं हे अस करतात ,ती ओठांना हात लवत ओठ त्याने दातात थोड्यावर धरल्याने लाल झाले होते. लटक्या रागातच बोलते..
विराट हसुन तिचे गाल ओढतो .,हो का आवडल्याशिवाय रीसपॉन्स देतेस का..तो हळूच कानात बोलतो.
पिहु लाजुन खाली बघते...
विराट तिच्या कमरेला पकडुन बेडवर आडवा पडतो..
अहो,पिहु चिडुनच बोलते.
तो तिचे केस मागे घेतो..अहो..काय हह.मला किती त्रास होतोय.तुझ्यापासुन रहायाचा पण काय कोणाला कळजीच नाही..मधेच हे लग्नाच काढुन ठेवलं ...आत्ता पर्यंत हनीमुनला गेलो असतो..हुहह विराट गाल फुगवुन बोलतो..
पिहु लाजुन त्याच्या छातीवर डोक ठेवुन हसते...तुमच ..ना
काय माझ.....तुला वाटत नाही हे सगळ टाईम वेस्ट आहे...हहह तो तिच्या शोल्डर धरुन तिचा चेहरा वर करतो...
अहो,पिहु दोन्ही हातांनी चेहरा झाकुन लाजुन परत त्याच्या छातीवर डोक टेकवते.
विराटचा मोबाईल वाजल्याने पिहु त्याच्या अंगावरुन उठुन बसते...
विराट कॉल रीसीव करत एका हाताने पिहुला जवळ घेतो..
विराट कुठे आहेस आम्ही सगळे कधीच आलोच सुमन चिडुनच बोलते.
आलोय गं पुण्यातच आहे..
पूण्यात कुठे,पिहुकडे का...हहह.
हो, विराट पिहुच्या कानाला नाक घासतच म्हणतो .पिहु दचकुन पटकन उठुन उभी राहते...(त्याने तिचा हात पकडुन ओढले आणि डोळ्यानेच शांत बस म्हणत तिला मोठे डोळे दाखवुन म्हणतो..ती पण शांत बसली.)
विराट काय हे आल्या आल्या न सांगताच गेला का...आता ये लवकर आजी जीजी ओरडतील हहह.
का,
अरे सगळ सांगायच का तुला, सूमन चिडुन बोलते.
मी पिहुला घेऊन येणार आहे..पिहु चकित होतच बघते...
अरे,लग्न झाल्यावर आणायच आहे ना,अस कस सगळ उलट करतोस रे,तु ये पहिले घरी आणि पिहुला आणु नकोस...
बट मॉम,तो चिडुनच बोलतो..
मी जेवढ सांगितले तेवढ कर..एका तासात तु मला घरी हवाय..सुमन रागातच बोलते.
तो रागातच फोन कट करतो..
का....य,झा....लं तो रागात होता म्हणुन पिहुने त्याला हग करत विचारले..
तो ही तिला घट्ट पकडत उचलुन मांडीवर घेतो....काही नाही,(
त्याला पिहुला घेऊन जायच होत पण आता मॉमपुढे त्याच चालणार नाही म्हणुन तो चिडला होता.)
अ...हो..
हहह तो डोळे मिटुन तिचा सुंगध घेत होता.
अ....हो घरात सगळे आहेत खाली चला ना,काय म्हणतील...
तो तिला दुर करत बोलतो मी तुझ्यासाठी आलोय,...तो आवाज चढवतच बोलतो
ती शांत बसुन परत त्याला बिलगते...
थोड्यावेळाने तो ही शांत होतो...तिच्या कपाळाला किस करून तो उठतो...चल खाली जाऊ,तो शांततेत बोलतो...
तु..म्ही चिडला नाही ना ती हळुच बोलते....
तो गालात हसत नाही म्हणुन मान हलवतो...
(ती हसते.)हम्म ,एक मिनीट पिहु मिरर मध्ये बघुन केसांवरुन ब्रश फिरवून क्लच नीट लावत होती. ...विराट पॉकेटमध्ये हात घालुन तिलाच निहाळत होता.
पिहु एक नजर बघून लाजुन दुसरीकडे बघते.
मिसेस देशमुख झालं का,तो हळुच तिच्या जवळ येत पूढे झुकुन बघतो ...
पिहु हसुन लाजुन हो म्हणुन मान हलवते.
तु लिप बाम लावु नकोस जाताना मला डीप किस हवीय ..तो समोरचे लीप बाम हातात घेत बोलतो..
का...ही काय, तुमच सरका पिहु लाजून बाजुला होते...
हहह काही काय म्हणजे ,मला हवयं.. नाही तर मी रात्री इकडेच येईन झोपायला. तो हसत तिच्याजवळ येत बोलतो.पिहु पटकन पळत बाहेर दारपर्यंत जाते .आता काही नाही लग्नानंतर ती हसून बोलते..
काय तो शॉक होतच बोलतो अजुन टेन डेज आहेत....
हो...ती पळतच बाहेर जाते..
आणि मी ऐकणार अस वाटतयं तो ही हसून बोलतच तिच्या मागे जातो.
नमन कसा आहेस पिहु जवळ येत बोलते.विराट ही नमन जवळ बसतो...
विराटच्या येण्याने पिहुचा चेहराच खुलला होता...थोड्यावेळ बसून
दोघे निघतात...पिहु गाडीपर्यंत त्याला सोडवायला जाते..तो तिला हग करतो..
अ...हो सोडा नमन आहे...पिहु इकडे तिकडे बघत बोलते.
(विराट तिचा चेहरा दोन्ही हातात धरुन ,)उदया तयार राह...आपण तुझा शालु घ्यायला जाऊ,ते ही माझ्या चॉईसचा हहह तो हसत तिच्या डोळ्यात बघत बोलतो.
पिहु हसुन मानेनेच हो बोलते..
दादा आज राह इथेच नमन वाट बघुन कंटाळुन म्हणतो..तो त्याला लुक देतो तो लगेच दुसरीकडे बघतो त्याच वर लक्ष जाते...प्रांजल वर टेरेसवर असते...ती फोन वर जोरजोरत हसत गप्पा मारत होती.तो तिलाच बघत राहतो...ती ओळख नसल्याने त्याच्याशी बोललीच नव्हती...फक्त जीजु जीजु करत होती तो स्वतःशीच बडबडत चिडत बोलतो..
वेड नाही लागलं ना,विराट गाडीत बसुन म्हणतो.
अ..काही नाही,ते...ते.असच,चल शाम नमन विषय बदलत ड्रायव्हरला बोलतो.
पिहू विराटला बाय करुन आत येते...
रेवती हसत पिहुला जवळ घेते...बघ विराट कसा तुला जीव लावतो.माझी चॉईस माझ्या मुलीसाठी कधीच चुकणार नाही.मला टेंशन होते.कसा विराट असेल तु खुश राहशील का पण आता सगळ टेंशन गेल .रेवती तिच्या कपाळाला पप्पी देत म्हणते.पिहु लाजुन कुशीत शिरते.तिला ही अनएक्सपेक्टेड होते..
विराट तिला एवढा जीव लावेल. त्याचा पिहु श्वास झाली होती...😍
विराट गाडीत विचारातच असतो.दादा काय झालं मन होत नाही का,वहिनी पासुन दुर राहायला..
विराट नमनकडे बघतो,एकाच सीटीत राहून वेगळ कस राहायच तो चिडतच बोलतो..
मग तुझ्या डोक्यात काय शिजतयं नमन बारीक डोळे करतच बोलतो.
सिंपल आहे उद्या मी तिला घेऊन येणार.
पण आजी ऐकेल,का तुला घरातच किती सगळ्यांनी वॉर्निंग दिली होती.
सगळे कसे मला बॅक्लमेल करतात तस तो नमनला डोळा मारून म्हणतो.
💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓
( कसा,वाटला भाग नक्की कळवा )
क्रमशः