“वेल, ते जर आपण असू तर ती चांगली गोष्ट नाही का? तो मला आपल्यापर्यंत पोहोचण्याचा एक रस्ता वाटतो. आपण नेहमी म्हणत असतो की आपण आपल्या स्वतःशी बोलायला हवं. आपण स्वतःला आपल्यात शोधायला हवं आणि इथेतर आपल्याला एक आयती संधी चालून आली आहे, जिच्यात आपण आपल्या स्वतःला खरोखरच फिजिकली, मेंटली पाहू शकतो आणि जाणून घेऊ शकतो. देवा..... काय हे?” हंसीका उद्विग्नतेने म्हणाली.
सक्षमने निलीमाला उठवलं आणि हॉलमध्ये घेऊन आला. तिला डायनिंग टेबलच्या एका खुर्चीवर बसवत म्हणाला, “एंजॉय यॉर पार्टी नीलिमा...”
ती थॅंक्स म्हणत बसली आणि सर्वांच्या चिंताग्रस्त चेहर्याकडे बघू लागली. तिला त्यांच्या चेहर्यावर आधीसारखा उत्साह दिसत नव्हता. तोच तिचं लक्ष वाईन कडे गेलं आणि तीच हात सहजच बॉटल कडे वळला. तोच तिचं लक्ष बाजूलाच पाडलेल्या बॉक्स, फोटो, मार्कर आणि पुस्तकाकडे गेलं. तिने प्रश्नार्थक नजरेने एकामागून एक सर्वांचे चेहरे बघितले पण कुणाच्याच चेहर्यावर तिला समाधानकारक भाव दिसला नाही. शेवटी तिने न राहवून विचारलं, “मला कुणी सांगेल का तुमचे सर्वांचे चेहरे का पडलेत आणि हे फोटो का जमा केलेत इथे? काही प्रॉब्लेम झालाय का?”
“बघ तसं बघायला गेलं तर काहीच झालेलं नाहीये आणि बघायला गेलं तर भरपूर काही झालंय. मी समजावते तुला.” असं म्हणत आर्या नीलिमा जवळ बसली आणि तिला शांतपणे घडलेल्या घटना क्रमाने सांगू लागली. तिला अनि, सारंग, रचना आणि हंसीका मदत करू लागले.
ते सर्वजण निलीमाला घडलेला प्रकार सांगत आहेत असं बघून सक्षमने शौनकला एका बाजूला ओढले आणि हॉलच्या एका कोपर्यात घेऊन गेला. त्यांच्यात खल्याच्या आवाजात काहीतरी कुजबूज सुरू झाली.
“अनिच्या कार मधून ते पुस्तक त्यांना मिळू नये यासाठी माझ्याकडे एक कल्पना आहे.” सक्षम कुजबुजला.
“तुला म्हणायचंय तरी काय? पटकन सांग.” शौनक चोरटी नजर चहूकडे फिरवत म्हणाला.
“मी त्या घरी जातो आणि मला स्वतःला ब्लॅकमेल करतो. मी तिथल्या सक्षमसाठी एक नोट सोडून जातो. ज्यामुळे आपण त्यांना कारमधून पुस्तक न काढण्यासाठी दबाव आणू शकू.” सक्षम एका दमात बोलून गेला.
“तुला नक्की काय सांगायचं आहे? ब्लॅकमेलिंग नोट म्हणजे? स्पष्टपणे सांग.” शौनकच्या डोक्यात अजून प्रकाश पडला नव्हता.
“काहीतरी आहे जे या घरात फक्त मलाचं माहिती आहे. मी ते रहस्य उलगडायला जातोय.” सक्षम नीलिमाकडे बघत म्हणाला.
“तू कशाबद्दल बोलतो आहेस?” शौनकने सक्षमचे खांदे हलवत विचारले.
“नीलिमा बद्दलची गोष्ट. आम्ही अकरवीत कॉलेजला कॉलेजला असतानाची गोष्ट.” सक्षम भुवया उंचावत म्हणाला.
“नाही, नाही सक्षम ही गोष्ट एक रहस्यच राहू दे. प्लीज. ऐक माझं. असं काहीही करू नकोस. हवं असल्यास मी अनिला समजवतो गाडीतून पुस्तक काढण्याबद्दल.” शौनक अचानक चिंताग्रस्त होऊन बोलला.
“नाही, तू काळजी करू नकोस. कारण ही नोट माझ्यासाठी लिहिलेली असणार आहे. त्यामुळे ती नोट वाचून तिथला मी ब्लॅकमेल होईल आणि कुणाला काहीही समजणार नाही. ट्रस्ट ऑन मी. धिस इज अॅन ग्रेट आयडिया.”
“नो सक्षम, सक्षम नोऽ.....” शौनकने सक्षमला अडवण्याचा शेवटचा प्रयत्न केला पण तो सफल झाला नाही.
सक्षम हॉलच्या दुसर्या बाजूला मार्कर आणि कागद घेऊन गेला. शौनकने डोक्याला हात मारून घेतला. सक्षम ऐकत नसल्याचं पाहून शौनक डायनिंग टेबलवर असलेल्या घोळक्यात समाविष्ट झाला आणि जणू काही झालंच नाही अशा आविर्भावात नीलिमाला घडलेल्या घटना समजावण्यात मदत करू लागला. नीलिमाने शांतपाने सर्वकाही ऐकलं आणि एकटकपणे त्या बॉक्सकडे बघू लागली.
“तुला आता बरं वाटतंय का?” रचनाने विचारलं.
“हो, कदाचित त्या ड्रॉप्समुळे झालं असेल.” नीलिमा जांभई देत म्हणाली.
“ड्रॉप्स, कोणते ड्रॉप्स?” रचनाने विचारलं.
“तेच जे आर्याने माझ्या वाईनमध्ये टाकले होते.” नीलिमा संथपणे उच्चारली.
“मला माफ करा, मी इथे जर काही चुकीचं बोलत असेल तर आणि मी जर काही तुम्हाला आश्चर्य वाटेल असं अयोग्य बोलणार असेल तर.....
तू आमच्या अन्नात काही मिसळले होते का?” हंसीकाने स्पष्टपणे शंका उपस्थित केली.
“येऽऽस, दॅट्स एक्सप्लेन अ लॉट. म्हणजे हे सर्व आपल्या मनाचे खेळ आहेत तर.” अनिने वादात उडी टाकली.
“आर यू क्रेझी?” आर्या थोड्या चढया आवाजात उच्चारली.
“मी फक्त विचारलं आर्या,” हंसीका शांतपणे म्हणाली.
“तिने मला थोडं केटमाइन टाकायला लावलं आणि मी तिच्या वाईनमध्ये काही ड्रॉप्स टाकले. बस्स इतकंच. थोडक्यात मी तुमच्या अन्नात ड्रग्स मिसळले असं तुम्हाला म्हणायचं आहे का?” आर्याचा आवाज अजून वरच्या पातळीवर गेला होता.
“न, नाही तसं नाही. पण म्हणजे...” हंसीका काहीतरी बोलण्याच्या प्रयत्नात असतानाच आर्या ओरडली,
“वन सेकंद, मी दाखवते तुम्हाला. इतकं करूनही वरून तुम्ही म्हणतात की मी ड्रग्स मिसळले. चला माझ्यासोबत किचनमध्ये.” असं जोररत ओरडत आर्या सर्वांना किचनमध्ये घेऊन आली आणि तिने फ्रिजर मधून एक बाटली काढली. तीचा फक्त पाऊण टक्के भाग भरला होता.
“बघ, हे थोडंस मी निलीमाला तिच्या सांगण्यावरून दिलं अँड आय ऑलरेडी टोल्ड यू. धिस इज जस्ट अ हाय ग्रेड फार्मा...”
“पण काहीही झालं तरी ते एक ड्रग आहे आणि माझ्या माहितीनुसार ते सर्वांत घातक ड्रग्सपैकी एक आहे. ते जे थोडसं नीलिमाला दिलेलं आहे ते आपल्या सर्वांच भान हरपवण्यासाठी पुरेसं आहे.” अनिने शंका उपस्थित केली.
“नाही, तुझी पूर्ण शुद्ध हरपून जाण्यासाठी तुला ती संपूर्ण बाटली एकाच वेळी प्यावी लागेल.” आर्याने स्पष्टीकरण दिले.
“ते ठीक आहे. पण हे घेतल्याने भान हरपते हे तर खरं आहे ना?” हंसीका म्हणाली.
“हो, पण इतक्या प्रचंड प्रमाणात शुद्ध हरपण्यासाठी तुला एकाच वेळी सर्व बॉटल घ्यावी लागेल आणि आपल्या सर्वांना भ्रम झालाय असं जर तू म्हणत असशील तर ते पुर्णपणे चुकीचं आहे.” आर्याने परत तिची बाजू मांडली.
“आर्या, आमचा तुझ्यावर विश्वास आहे. यू डोन्ट वरी.” हंसीकाने थोडा विचार करून आर्याला समर्थन दर्शवले.
“ओह थॅंक्स, हंसीका.” आर्या हंसीकाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.
“सॉरी आर्या. पण मला जे वाटलं ते बोललो. रियली व्हेरी सॉरी. पण जरा कल्पना कर, हा जर खरंच भ्रम असता तर किती चांगले झाले असते. कधीकधी नशेत असणंसुद्धा चांगलं असतं.” अनिने आर्याची माफी मागितली.
“या, दॅट्स सो.” आर्याने झालेल्या विषयाला तिलांजली देण्याच्या उद्देशाने म्हटले.
किचनच्या खिडकीत असलेलं छोटंसं बोन्सायचं रोप हातात घेत नीलिमा आर्याला म्हणाली, “वॉव, धिस इज क्यूट.”
आर्याने थॅंक्स म्हटलं आणि हातात असलेल्या केटामाईनच्या बॉटल मधून एक इंजेक्शन भरलं. तेच इंजेक्शन तिच्या वाईन ग्लासमध्ये खाली केलं आणि बघता बघता तो ग्लास रिकामा केला कारण त्या घरातले वाईन ग्लास फुटले नव्हते.
हे सर्व बघून हंसीकाला आश्चर्याचा धक्का बसला. कारण जेव्हा ती आली होती, तेव्हा थेट किचनमध्ये आली होती आणि तिने तिचा फुटलेला मोबाइल दाखवला होता. त्यानंतर लगेचच नीलिमाने किचनच्या खिडकीत असलेलं बोन्सायचं रोप हातात घेऊन आता जे बोलली तेच बोलली होती. पण निलीमच्या लक्षात हे नव्हतं की आपण हे रोपटं काही तासांपूर्वी पहिलं आहे ते. तिच्या चेहर्यावर तसले काही हावभाव नव्हते. जणू ती पहिल्यांदाच बघत होती ते रोपटं. मुख्य म्हणजे त्या घरातले वाईनचे ग्लास जसेच्या तसे होते. जे धूमकेतू पास होत असताना फुटले होते. हे बघून मात्र हंसीकाची बोबडी वळली. तीला गरगरायला झालं. ती किचनच्या एका भिंतीला टेकून उभी राहिली. तिला समजून चुकलं की आपण आता दुसर्या रियालिटीमध्ये पोहोचलो आहोत.