Lahan pn dega deva - 6 in Marathi Fiction Stories by Adv Pooja Kondhalkar books and stories PDF | लहान पण देगा देवा - 6

Featured Books
Categories
Share

लहान पण देगा देवा - 6

भाग ६

अरे माझ्या पट्ठ्या कुठे आहेस लहानपणी ची मैत्रीण भेटली तर म्हतार्याला विसरलास काय?

अथर्व- नाही हो आजोबा तुम्हीच आजी ला मदत करायला गेलात ना मग तो पर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो.

हिला म्हणालो चल लंडन ला तिथे छान प्रॅक्टिस करशील मेडिकल ची आणि ते पण मोठ्या हॉस्पिटल मध्ये तर नको म्हणाली.

का रे आता तिला पण आमच्या पासून लांब घेऊन जायचा विचार करतोस काय? असुदे कि इथे तिला तेवढाच आधार आम्हाला.

अथर्व- साक्षी आजोबा पटकन बोलून गेले पण खरं बोलले, आता कळलं त्या दोघांना काय त्रास होत असेल .

साक्षी- अथर्व माझ्या कडे एक प्लॅन आहे, आता गणपती पण आले आहेत आणि त्या नंतर आजोबांचा ७५ वा वाढदिवस देखील, गेले कित्येक वर्ष आम्हीच फक्त साजरा करतो, या वर्षी बाकी सगळी जबाबदारी माझी पण सर्व घरचे इथे आले पाहिजे हि जबाबदारी तुझी.

साक्षी- इथे गणपती साठी हे कोणी यायला तयार नाही आणि आजोबांच्या वाढदिवसाला येणार, माझे घरचे पण ना !!!!!!!!

साक्षी- पण काही तरी उपाय शोधलाच पाहिजे जेणे करून सगळे इथे आले पाहिजे. आपण दोघे मिळून विचार करू काही तरी उपाय नक्की मिळेल. चल मी निघते आता क्लिनिक मध्ये जायचं आहे .

अथर्व- संध्याकाळी येऊन भेटतो तुला आपण विचार करू OK .

अथर्व- ये माझी cute baby doll काय करते आहेस, व्वा काय छान सुगंध पसरला आहे ग काय करते आहेस ?

आजी- अरे चिवडा बनवते आहे. तू आला आहेस ना मग जाताना सगळ्यांसाठी घेऊन जाशील एक एक.

अथर्व- अगं म्हतारे तुला आराम कर म्हणतो तर तू काम वाढून घेतेस. आणि त्यांना एवढाच खायची इच्छा झाली तर करून घेतील काम वाल्या बाई कडून नाहीतर आंतील विकत. तू का करतेस?

आजी- लगेच तुझ्या त्या डॉल ची म्हातारी झाले का रे मी? आणि मला आवडत माझ्या लेकरं साठी करायला म्हणून केलं ठीक आहे ना

अरे तिला करू दे जे करायचं ते इतक्या वर्षात माझं नाही ऐकलं तर तुझं ऐकणार ती वाट बघ, ये चल इथे कॅरॅम काढला बघ मी मस्त डाव रंगू या.

अथर्व- क्या बात हे आजोबा, किती वेळे नंतर खेळणार आहे मी, पण आजोबा चीटिंग नाही करायची हा....

अरे तुला खेळता येत नाही असं म्हण मला म्हणतो चीटिंग नाही करायची. खेळायच्या आधीच सुरुवात तुझी.

.............

अथर्व- आज खूप वेळे नंतर समजलं कि माणूस एकटा नाही राहू शकत, आणि माझी फॅमिली एवढं सगळं असून याना काही किंमत नाही काय करू असं कि याना समजेल घरातले मोठे आणि त्यांचे आशीर्वाद खूप महत्वाचे असतात.

शंभू काका इकडे या हो मला एक सांगा सगळ्या घरातल्यान एकत्र आणायचं असेल तर काय केलं पाहिजे.. म्हणजे त्यांनी अशी कारण दिली नाही पाहिजे लगेच निघून इथे आले पाहिजेत.

शंभू- अहो खूप सोपं आहे तुमचं लग्न, तुम्ही सांगा तुम्ही लग्न करत आहात, आणि ते पण इथे आजी आजोबांकडे ज्याला आशीर्वाद त्याला यायचं असेल त्याने इथे या बघा सगळे येतील.

अथर्व- क्या बात हे शंभू काका एक च नंबर उपाय सांगितलं तुम्ही. thank you so much .

साक्षीला फोन करतो,, साक्षी कुठे आहेस ग तू ?

साक्षी फोन वर- अरे क्लिनिक मधून, तुला काही उपाय सुचला का ? काय आहे ?

अथर्व- माझं लग्न .....

साक्षी- काय तू काय बोलतो आहेस तुला कळतंय काय ? हे कास शक्य आहे.

अथर्व- तू मला भेट आधी मग मी तुला सांगतो....