Jodi Tujhi majhi - 40 in Marathi Fiction Stories by Pradnya Narkhede books and stories PDF | जोडी तुझी माझी - भाग 40

Featured Books
Categories
Share

जोडी तुझी माझी - भाग 40

आज गौरवीला सृष्टीने बरिच काम दिलेली असतात, ऑफिस सुटायच्या वेळेपर्यंत पण गौरवी चं काम होत नाहीत म्हणून ती थांबते, सगळं ऑफिस खाली होत पण गौरवी एकटीच काम करत बसली असते.. ती निघाल्याशिवाय विवेक कधीच ऑफिसमधून निघत नसे, आज पण तो तिथेच होता, बराच उशीर झाला म्हणून तोच आज उठून तिच्याकडे जातो..

विवेक - गौरवी.. अग बराच उशीर झालाय सगळे निघून गेलेत तू एकटीच का बसलीय काम करत ?? राहू दे ते सगळं बाकीच उद्या कर चल आता..

गौरवी - बस विवेक थोडावेळ आणखी झालाच माझं, तुम्ही नका थांबू मी जाईल, तू निघा don't worry.. माझं झालं की मी पण लगेच निघते..

त्याच्याकडे ना बघताच ती बोलली..

विवेक - हे तुम्ही वगैरे काय ग? अग गौरवी आताच 9 वाजले आहेत आणखी बसशील तर रात्र होईल ना.. आणि भूक नाही का लागली तुला?? आणि तुला एकटीला सोडून मी नाही जाणार.. तुला थांबायचं तर थांब मी पण थांबतोय..

गौरवी - मी जा म्हणतेय ना मला नकोय तुम्ही इथे, मी माझं manage करुन घेईल.. आणि ऑफिसमध्ये बॉसला मान द्यावाच लागतो ना..

ती जरा रागातच बोलली..

विवेक - चिढते कशाला? मला काळजी वाटली म्हणून बोललो मी.. आणि तुझं माझं नात हे फक्त बॉस आणि एम्प्लॉयीचच आहे का? तू मला जशी बोलते तशीच बोलत जा ग..

गौरवी - हो माझं आणि तुझं नात काय आहे हे मी नाहीच विसरू शकत आणि त्यासाठीच तर तू मला या प्रोजेक्टसाठी hire केलाय ना की मी नेहमी तुझ्या समोर असायला हवी म्हणजे तुला माझ्या बद्दल माहिती मिळत राहील आणि तुला मला त्रास देण्याचे वेगवेगळे चान्स मिळतील.. पण विवेक एक लक्षात ठेव मी जरी काहिबबोल्ट नसले तरी मला माहिती आहे हे तूच करून घेतलाय ते आणि मी फक्त इथे माझी प्रोफेसईनल लिफे जगते आहे मला इथे माझी पर्सनल लिफे डीसकस करायला आवडणार नाही.. सोबटू माझ्यापासून लांब राहा..

विवेक - एक मिनिट गौरवी, तुझा गैरसमज होतोय मी नाही तुला घेतलं, मला पण तुझं नाव वाचून धक्काच बसला, मला तर हेही माहिती नव्हत की तू ज्या कंपनीमध्ये होती ती या कंपनी मध्ये समाविष्ट केलीय ते.. नंतर कळलं मला ते सगळं.. विश्वास कर मी खर बोलतोय..

गौरवी - विवेक तुला जे करायचं ते कर मला खरंच खूप काम आहे.. आधीच उशीर झालाय तुझ्याशी वाद घालून मला आणखी उशीर करायचा नाहीय. तुला जे पाहिजे ते कर पण मला माझं काम करू दे..

विवेक - ठीक आहे , पण आज मी सोडेल तुला घरी.. तू कर तुझं काम..

आणि तीच काहीच न ऐकून घेता तो तिथून निघून जातो..

गौरवी - (मनातच ) समजतो कोण हा स्वतःला, म्हणे मी सोडेल मला काय माझ्या घरी जाता येत नाही का?? मी सांगून जाईल तेव्हा सोडशील ना..
आणि तिच्या कामात लागून जाते.. थोडावेळातच तिच्या टेबल वर कॉफी चा कप येतो, विवेक ने कॅन्टीन मधून कॉफी बोलावली असते तिच्या साठी आणि स्वतःठी सुदधा.. तईच्याही नकळत ती कॉफीचा कप खाली करते.. थोड्यावेळात तीच काम संपते आणि ती घरी जायला निघते, एकड्या घड्यालीकडे बघेते तर 9:40 झालेले असतात.. आई बाबा वाट बघत असतील, फोन करत बसली उगाच उशीर होईल म्हणून ती सरळ घरी जायला निघते..

काम आवरून बऱ्याच उशिरा गौरवी घरी जायला निघते.. विवेक बोलला असतो मी सोडतो म्हणून पण ती त्याला काही न सांगताच निघून येते. पण विवेकच लक्ष असतं.. त्याने सगळं आवरून ठेवलेलंच असत. तो लगेच तीच्या मागे निघतो.. गौरवी तिच्या घरी फोन करायची विसरली असणार म्हणून विवेकच फोन करून दोघांच्याही घरी उशीर होणार अस सांगतो..

गौरवी एवढ्या रात्री घरी जाते आहे आणि तिच्या घराकडे जाणारा रस्ता थोड्या भागात सुनसान आहे म्हणून त्याला तिची काळजी वाटत असते.. तीने त्याच्या बरोबर घरी जावं अस त्याला खूप वाटत असतं पण ती येणार नाही हे ही माहिती असतं.. तो तिच्या गाडी मागेच गाडी घेऊन निघतो.. रस्त्यात एक ठिकाणी सामसुम असल्यामुळे गौरवी थोडी घाबरते.. आणी पुढे काही टुकार मुलं ही दारुचौ नशेत डोलताना दिसतात.. त्यांना बघून ती दोन मिनिटं गाडी उभी करते, तीच जॅकेट घालते केस वरती बांधते त्यावर हेल्मेट आणि स्कार्फ सोडून ठेऊन देते.. पर्स मध्ये काही तरी स्प्रे सारख टाकते , गाडीवर बसताना जरा पसरून बसते.. आणि गाडी सुरू करते आणि जोरात पिटाळते.. विवेकही तिच्या मागेच असतो तो हे सगळं बघतो आणि पुन्हा तिच्या मागे निघून जातो.. पण त्याला कळतच नाही तिने अस का केलं?? नंतर माघून तिला बघून त्याच्या लक्ष्यात येतं की ती अस करून त्या मुलांना भुलवण्याचा प्रयत्न करत होती , ती स्वतःला मी मुलगा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत होती.. त्याला एकदम हसू येतं या तिच्या निरागस प्रयोगावर..
रस्त्यात काहीही भीतीदायक न घडता ती सुखरूप घरी पोचते.. विवेकही तिच्या मागेच असतो.. तीच घर आल्यानंतर तो लांबूनच तिला घरात जाताना पाहतो आणि मग गाडी फिरवून त्याच्या घरी निघतो..

गौरवी - (घरात जात) सॉरी आई बाबा आज जरा उशीर झाला आणि सांगायचं पण राहून गेलं कामात लक्षातच नाही आलं आणि निघायच्या वेळेला उगाच फोन करत बसन्यात वेळ जाईल म्हणून मग राहून गेलं..

आई - अग आम्हाला माहिती होत तू उशिरा येणार आहे ते.. विवेकचा फोन आला होता मला..

गौरवी - काय ?? त्याने तुला फोन केला??

आई - हो आणि बराच झालं ना , नाहीतर आम्ही उगाच काळजी करत बसलो असतो ना.. बर तो नाही आला का?? तो म्हंटला होता की मी गौरवीला पोचवतो आज म्हणून..

गौरवी - काय?? अग पण मी तर त्याला ना सांगताच निघून आलीय... तो मला बोलला होता मी सोडतो आज म्हणून पण मला त्याचा राग आला होता म्हणून मग..

आणि गौरवी घराच्या बाहेर येऊन बघते तर तिला विवेकच्या गाडी जाताना दिसते.. म्हणजे हा माझ्या मागेच होता.. खरच माझी एवढी काळजी करतो हा?? ती मनातच बोलते..

आई - अग गौरवी तू अस कस करू शकते, अस रात्री च्या वेळेला एकटीने नको येत जाऊ ग त्यात मधात रस्ता पण थोडा सुनसान आहे.. अश्या वेळी तरी ..

आईच वाक्य मदतच कापत बाबा..

बाबा - ठीक आहे आलीय ना ती सुखरूप घरी.. आता त्यावर चर्चा नको.. आणि गौरवी कडे वळून बेटा कितीही काम असू देत पण घरी वेळेत ये, दुसऱ्या दिवशी लवकर जा हवं तर पण रात्र होऊ देवूू नको आणि झालीच तर मला बोलावून घेत जा.. जा फ्रेश होऊन ये आम्ही जेवायचं थांबलोय, सगळे सोबतच जेऊयात..

गौरवी निघून जाते..


क्रमशः