इकडे विवेक घरी तर आला होता पण अतिशय टेन्शन मध्ये तो बसला होता... काय होईल काय नाही त्याची भीती मिनिट गणिक वाढत होती, गौरावीला फोन लावून विचारू का असा विचार करत कितीदा फोन हातात घेतला नं. ही लावला पण नको नको काही झालं तर तीच फोन करेल मला म्हणून ठेऊन दिला... त्याला त्याच्या बाबांचे शब्द आठवले.. आणि लगेच त्याच्या डोळ्यात पाणी दाटल..
"किती दुखवलय मी सगळ्यांना किती मूर्ख आहे मी.. इतकं सगळं चांगलं होतं माझ्याकडे पण मी कधी कशाचीच कदर नाही केली, ना कधी गौरवीची , ना कधी आई बाबांची.. एखादी धुंदी माणसाला कितपत वाईट बनवू शकते याचा खूप चांगला प्रत्यय आलाय मला.. पण आता यापुढे नाही कधीच नाही... पण आता पुढे काय होणार आहे देव जाणे.. मला कुणी माफ करेलही की नाही काय माहिती.. काय बोलत असेल गौरवी?? तिचा निर्णय सांगत असेल, पण तो कुणाला मंजूर नसला आणि तिने निर्णय बदलला तर.. नाही नाही विवेक think positive... अस नाही होणार.. गौरवी मी खरच खूप प्रेम करायला लागलोय ग तुझ्यावर , तुझ्याशिवाय मला नाही जगता येणार.. "
असच विवेकच स्वतःशी कितीतरी वेळ द्वंद्व आणि विचार सुरू होते, तेवढ्यात गाडीचा आवाज आला त्यांनी खिडकीतून वाकून बघितलं तर आई बाबांची गाडी होती.. तो लगेच दरवाजा उघडायला गेला.. आणि त्यांची घरात येण्याची वाट बघू लागला.. गौरवी काय बोलली हे त्याला माहिती करायचं होतं.. पण ते सांगतील की नाही हा ही प्रश्नच होता.. तो उगाच घरात आवरा आवर करत होता आणि आई बाबा घरात आले.. ते नाराज असल्यामुळे तसेच निघून गेले.. आई फ्रेश होऊन किचनमध्ये स्वयंपाक करायला गेली आणि बाबा tv बघत बसले, कुणीही काहीच बोलत नव्हतं, विवेकची पण हिम्मत नाही झाली काही विचारायची.. तो ही तसाच बसून राहिला.. आशेने वडिलांकडे बघत होता.. त्याच्या वडिलांना ते कळत होतं पण ते नाराज होते म्हणून काहीच बोलत नव्हते.. थोडी हिम्मत एकवटून त्याने विचारलच
विवेक - बाबा, गौरवी काय बोलली??
बाबांनी एक झणझणीत राग असलेला कटाक्ष त्याच्याकडे टाकला आणि आतल्या खोलीत निघून गेले.. थोडावेळणी उठून तो आईकडे गेला.. आणि आईलाही तेच विचारलं पण तिचीही तशीच काहीशी प्रतिक्रिया होती फक्त निघून ना जाता तिथेच स्वयंपाक करत होती.. त्याने थोडं थांबून पुन्हा प्रयत्न केला आता मात्र आई बोलली
आई - विवेक मला खर तर अजिबात एक शब्दही बोलायची इच्छा नाहीये, पण तुला हे खरच सांगणं खूप गरजेचं आहे..
विवेक खूप चांगली मुलगी भेटली रे तुला तुझं नशीब खूप चांगलं म्हणून तूला गौरवी मिळाली.. तिची अवहेलना करू नको.. कदर कर, respect कर.. ती काय म्हंटली हे महत्त्वाचं नाहीय, ती अजूनही तुला एक संधी द्यायला तयार आहे हे जास्त महत्वाचं आहे.. तू आज जातोय कधी येशील तुझं तुला माहिती.. पण गौरवीचा विचार कर.. बस यापुढे मला काही बोलायचं नाहीय...
हे ऐकून विवेकला थोडं बरं वाटलं की गौरवीचा निर्णय कायम आहे..
विवेक - हो आई.. माझ्या या चुकीच्या वागण्याचा मला आता खरच खूप पच्छताप होतोय ग पण चूक झाली माझी... कधी सगळं व्यवस्थित होईल काय माहिती .. होईलही की नाही..
विवेकच्या डोळ्यात पुन्हा पाणी होतं.. ते बघून आईला थोडस वाईट वाटलं.. आई आहे ती कितीही झालं तरी मुलाला असं बघणं जडच जाईल ना तिला..
आई - वेळ दे होईल सगळं नीट.. जा तुझं आवरून घे.. आणि जेवन करून घे..
त्याला थोडं बरं वाटलं आईने बोलल्यावर..
-----------------------------------------------
2 महिन्यानंतर
फोनवर...
विवेक - हॅलो, गौरवी मी भारतात आलोय काल रात्री... आणि आज रविवार आहे तर सुटिच असेल ना तुला, एकदा भेटायचं का आपण??
गौरवी - हो मला माहितीय तू आला ते, अ... अ... मला नाही जमणार थोडं काम आहे...
विवेक - तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा 15 मिनिटे फक्त कॉफी साठी??
गौरवी - मी पक्का नाही सांगत पण मला वेळ मिळाला की फोन करेल...
विवेक - ओके... थँक्स...😊
गौरवी - बाय..
विवेक आणि गौरवी पूर्ण 2 महिन्यांनंतर बोलत होते.. जेवढी ओढ विवेकला वाटत होती भेटायची तेवढीच गौरवीला पण होती... पण तस न दाखवता ती शांत होती ..
तिने संध्याकाळी विवेकला फोन करून कॉफी शॉप मध्ये बोलावलं.. आणि आईला सांगून बाहेर पडतच होती की बाबांनी अडवलं..
गौ बाबा - बेटा, तू त्याला माफ केलंय का??
गौरवी - नाही बाबा, अजून तरी नाही..
बाबा - मग त्याला भेटायला जातेय?? त्याने काही चुकीचा अर्थ घेतला तर..
गौरवी - नाही बाबा अस नाही होणार... मी फक्त सहज भेटते आहे, राग असला तरी नात संपलेलं नाही आहे ना बाबा.. आणि त्याला एकदा तरी संधी द्यायला हवी ना.. फक्त 15 - 20 मिनिटे बसणार आहे मी आणि लगेच बहाणा सांगून परत येईल..
बाबा - जस तुला योग्य वाटेल.. काळजी घे..
गौरवी निघून जाते.. आणि कॉफी शॉप मध्ये येते तर विवेक आधीपासूनच तिथे हजार असतो तिची वाट बघत बसलो असतो.. तिला आश्चर्य वाटत जरा नेहमी मला तात्काळत ठेवणारा आज चक्क लवकर आलाय.. चांगलं आहे.. ती त्याच्या कडे जाते..
दोघेही आज खूप छान दिसत असतात.. तिला बघून तो उठतो आणि तिच्याकडे बघतच राहतो.. गौरवी आज त्याला नव्याने आवडली असते.. खूप सुंदर दिसत असते ती .. गौरवी सुध्दा 2 क्षण त्याच्यात गुंतून जाते पण लगेच स्वतःला सावरत इकडे तिकडे बघते आणि तिच्या हातातल्या ब्रेसलेट च्या घुंगराचा आवाज करते.. त्याने तो ही भानावर येतो.. लगेच खुर्ची मागे ओढून तो तिला बसायला सांगतो.. आणि तिच्या पुढे जाऊन तो बसतो.. तो चोरून लपून तिला न्याहाळत असतो, त्याची नजरही आज त्याच ऐकत नसते... गौरवी च्या ते लक्षात येतं.. पण त्याच असं लपून चोरून बघणं तिलाही आवडत असतं..
गौरवी - अ.. अ.. ऑर्डर दिलीय का?? नसेल तर माझ्या साठी एक नॉर्मल कॉफी सांग..
विवेक - तो जरा भानावर येत अ.. हो .. हो सांगतो... आलोच हा...
म्हणून तो ऑर्डर द्यायला जातो..
गौरावीला त्याला भेटायचं तर असतंच पण त्याला काही गोष्टी क्लिअर सांगायच्याही असतात त्यामुळे ती आज आलेली असते..
तो ऑर्डर देऊन येतो , कॉफी यायला थोडा वेळ असतो..
विवेक - आज खूप सुंदर दिसतेय..
गौरवी - थँक्स...
पुन्हा डोफहंमध्ये शांतता तो अजूनही चोरून लपून तिला बघताच असतो आणि ती मात्र अकुठंतरी नजर खिळवून शांत बसलेली असते... तेवढ्यात कॉफी येते..
कॉफीचा एक घोट घेत..
गौरवी - विवेक मला तुला काही गोष्टी स्पष्ट सांगायच्या होत्या, खरतर म्हणून मी इथे आलेय..
विवेक - बोल ना गौरवी,
गौरवी- विवेक आतापर्यंत तू तिकडे होता आणि आपला काही कॉन्टॅक्ट नव्हता... आता तू इकडे आला आहेस.. विवेक मला सांगायचं होत की मी नेहमी नेहमी अशी भेटायला नाही येऊ शकणार, मला पूर्वीसारखं अगदी सहज तुझ्याबरोबर नाही वागत येणार ... त्यामुळे अस भेटायला वगैरे नको बोलवत जाऊस.. आज आले ते हेच सांगायला.. कुठल्या प्रकारचा गैरसमज नको करून घेऊस.. बाकी जर निसर्गाने कधी समोरासमोर आणलंच तर मग ठीक आहे..
विवेक - अग मग मी तुझा विश्वास कसा जिंकायचा?? मला संधी देणार होती ना ग तू??
गौरवी - संधी दिलीय विवेक पण त्याचा अर्थ असा नाही होत ना की आपण भेटलो तरच तू माझा विश्वास कमवू शकशील... उलट मला अस वाटत राहील की तू पुन्हा मला तुझ्या जाळ्यात अडकवण्यासाठी अस सगळं वागतोय..
विवेक - मग मी काय करू सांग... तू म्हणशील तर मी जीवही दयायला तयार आहे..
गौरवी - तुझा जीव घेऊन मला काय मिळणार आहे विवेक... तू तेवढच कर जे मी सांगितलं.. यापुढे मी तुला अस भेटायला येणार नाही...
एवढं बोलून आपली पर्स उचलून ती झपझप पावलं टाकत पुढे निघून जाते.. आणि विवेक तिला जाताना मागून बघतच राहतो.. ती बाहेर गेल्यावर अलगद त्याच्या डोळ्यातला थेंब त्याच्या गालावर पडतो..
--------------------------------------------------------------
क्रमशः