Jodi Tujhi majhi - 36 in Marathi Fiction Stories by Pradnya Narkhede books and stories PDF | जोडी तुझी माझी - भाग 36

Featured Books
Categories
Share

जोडी तुझी माझी - भाग 36

विवेक जेवण करतो आणि आपल्या खोलीत निघून जातो..
इकडे गौरवी च सुद्धा जेवण होतं.. आणि ती तिच्या खोलीत जात असते की तिचे बाबा तिला बोलावतात....

गौ बाबा- बेटा... कस वाटतंय??

गौरवी - आता बरं आहे बाबा... उद्यापासून आता ऑफिसला पण जाणार आहे मी..

गौ बाबा - हो ते कळलं मला, तुझी काही हरकत नसेल आणि तुला काही काम नसेल तर थोडं फिरायला जाऊयात का ? थोडं बोलायचं होत बाळा तुझ्याशी..

गौरवी ला आता मात्र फार धडधडत.. तरी पण ती तिच्या बाबांसोबत जाते.. घराच्या पुढे छान छोटासा गार्डन सारख केलेल असत तिथे ते दोघे फिरायला जातात..

बाबा - तू पुन्हा जॉब करणार आहेत ऐकून मला खरच खूप बरं वाटलं.. बर मला सांग तू कधी आलेली इकडे??

गौरवी - एखादा महिना होईल बाबा..

बाबा - अच्छा , बरं एक गोष्ट विचारली तर खरं खरं सांगशील??

गौरवी - विचारा ना बाबा...

बाबा - बेटा आम्हाला एवढं परक का केलंस ग??

गौरवी - बाबा काय बोलतंय तुम्ही हे?? तुम्हीं तर माझ्या सर्वात जवळचे मी तुम्हाला कस परकं करेल..

बाबा - मग इकडे येऊन पण घरी ना येता तू रुपाली कडे थांबली आणि आमच्यापासून बऱ्याच गोष्टी लपवत आहेस?? नाही मी फोर्स नाही करत आहे सांग म्हणून पण अग अस मैत्रिणीकडे राहणं, आमच्यावर इतकाही विश्वास नव्हता का बाळा की आम्ही तुझ्यावर कुठलीच सक्ती करणार नाही, तुला नसेल सांगायचं तर नको सांगूस अस तुला म्हणू.. तुला अस तर वाटलं नाही ना की माहेरात राहील तर तुला 4 दिवसात सासरी पाठवू...

गौरवी मात्र आता हळवी झाली ,काय बोलावं तेच तिला कळत नव्हतं..

गौरवी - नाही बाबा तस काहीच नाहिये, मी अशी अचानक आली कुणालाही कसलीच पूर्वकल्पना ना देता म्हणून तुम्हाला थोडासा धक्का बसला असता ना आणि माहेरत राहतेय काहीच सांगितलं नाही... म्हणून विवेकच्या आई बाबांनी पण प्रश्न केला असता.. बाबा माझ्याकडे तेव्हा खरच कुणाच्याच प्रश्नच काहीच उत्तर नव्हतं हो... खरतर मला तेव्हा कुणाला काही उत्तरचं द्यायचं नव्हतं.. खरच तेव्हा काय बोलावे, काय करावं काहीच सुचत नव्हतं मला.. म्हणून मग मी थोडा वेळ मिळावा म्हणून मी रुपालीकडे राहिले.. मी सांगणारच होते बाबा... लवकरच येणार होते घरी...

बाबा - बेटा, विवेक आणि तुझ्यात भांडण झाले हे तर मला विवेकने सांगितलं फक्त कारण नाही सांगितलं आणि मला माहिती आहे तू इकडे येण्याचा निर्णय घेतला म्हणजे नक्कीच कारण क्षुल्लक नव्हतं... काय झालं सांगू शकशील का?? तुझी इच्छा असेल तरच सांग नाहीतर तुम्हा दोघे नवरा बायकोच्या मधात नाही बोलायचं मला... फक्त तुझी काळजी वाटतेय..

गौरवी - बाबा आज नको, उद्या मला लवकर जायचंय ना झोपायला उशीर होतोय, आपण नंतर बोलूया का??

गौरवीने सांगायचं टाळलं होतं, तिला माहिती होत हा प्रश्न येणारच.. पण तिला काहीही सांगायचं नव्हतं. बाबांना पण ते लक्षात आलं की हिला सांगायचं नाहीय.. त्यांनी पण जास्त फोर्स ना करता ठीक आहे म्हणून ते दोघेही घरात निघून आले.. आई बाबांना good night म्हणून गौरवी खोलीत आली तर फोन वाजत होता.. विवेकचा फोन होता.. तिलाही त्याच्याशी बोलायचं होतंच.. म्हणून मग तिने फोन घेतला..

विवेक - हॅलो, झोपली होती का ग??

गौरवी - नाही नाही , आताच जेवण करून बाबांसोबत शतपावली करून आले..

विवेक - गौरवी तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, ते आज आई विचारात होती की गौरवी आपल्याकडे पुन्हा कधी येणार आहे राहायला..

गौरवी - मग तू काय सांगितलं??

विवेक - काहीच नाही तूच विचारून घे अस बोललो..

गौरवी - काय?? कमाल आहे तुझी मी काय सांगू आता?? आणि विवेक तुला माहितेय मी तिकडे आता लागेच तर राहायला नाहीच येणार मी तुला माफ केल्यानंतर च तिकडे येऊ शकेल, त्याच्याशिवाय मी तिकडे नाही राहणार..

विवेक - हो ग पण मी तिला काय सांगणार होतो.. म्हणून मग..

गौरवी - मग सांगून द्यायचं ना खर काय ते.. आज बाबा पण मला विचारात होते काय झालाय तुमच्यात म्हणून .. तू सांगणार नाही तोपर्यंत असे प्रश्न येतच राहतील..

विवेक - मग तू काय सांगितलं??

गौरवी - काही नाही मी टाळलं त्या प्रश्नाला, पण मला वाटत विवेक तू आधीच सगळ्यांना खर ते सांगून मग जा तिकडे..

विवेक - अग पण मला अस लगेच... क...स बोलू ग... आणि मी उद्याच निघतोय माझी बुकिंग झालीय..

गौरवी - उद्या केव्हा निघणार आहेत ??

विवेक - रात्रीची आहे flight.. येशील का मला एअरपोर्ट वर सोडायला??

गौरवी - म्हणजे रात्री पर्यंत वेळ आहे ना मग तू उद्या सांगून टाक ना सगळ्यांना आणि रात्री निघून जा.. कारण तू परत येईपर्यंत मला किती तरीवेळा या प्रश्नाला समोर जावं लागेल.. आणि प्रत्येकवेळी नाही टाळता येणार मला...

विवेक - गौरवी अग अस अचानक कस सांगू... मला थोडी तयारी करावी लागेल ना ग .. मनाची आणि तुला काय वाटत मी जाताना सगळ्यांचा राग सोबत घेऊन जाऊ??

गौरवी - हो म्हणजे कदाचित तू परत येईपर्यंत तो निवळला असेल.. आल्यावर सांगितलं तर तुला त्या रागाबरोबर घरी राहावं लागेल तुला रोज तो समोरासमोर face करावा लागेल..

विवेक - हम्म , तुझं बरोबर आहे.. बघतो मी .. उद्या जमलं तर सांगतो..

गौरवी - हम्म ठीक आहे, चल बाय, good night..

विवेक - बाय पण?? बोलणार नाहीयेस का थोडंसं?? मग उद्या मी निघून जाईल ना..

गौरवी - काय बोलू?? जे बोलायचं होत ते झालं माझं बोलून..

विवेक - उद्या येशील का ग मला सोडायला?? मागे तुझी इच्छा होती पण मी नाही म्हंटल होतं..

गौरवी - नाही विवेक उद्या ऑफिस आहे माझं आणि ऑफिसमधून आल्यावर मी थकून जाईल.. सो मला नाही जमणार.. btw केव्हा निघणार आहेस??

विवेक - रात्री 12 वाजता निघेल इथून.. सकाळी 6 वाजताची flight आहे..

गौरवी - ओके.. उद्या मी ऑफिसमधून आल्यावर सांगायचं का सगळ्यांना?? तोपर्यंत तू तुझं आवरून ठेव सगळं.. आणि तयारी पण करून घे.

विवेक - उमम चालेल.. बघतो

गौरवी - ठीक आहे , चल बाय मला झोपायचं आहे, बाय

विवेक - हम्म बाय गुड night..

-------------------------------------------------------------------क्रमशः