विवेक आशेने तिच्याकडे बघत होता, पण ती शांत होती काय बोलावे तिलाही सुचत नव्हतं, मनाची परिस्थिती सावरायच्या ऐवजी आणखीच बिघडली होती.. थोडा वेळ दोघेही शांत बसले होते... थोडावेळणी गौरवीनी बोलायला सुरुवात केली..
गौरवी - तुझं बोलणं सगळं ऐकलं मी विवेक पण मला सद्धे काहीच निर्णय करता येत नाहीये.. पुन्हा तीच मनःस्थिती आहे तुझ्यावर विश्वास ठेवू की नको... मी थोडं स्पष्टच बोलते, होऊ शकते तुला वाईट वाटेल पण मी तुझं ऐकलं ना थोडं तू ही ऐकून घे..
विवेक पलटून तिच्याकडे बघत असतो, त्याच्याकडे बघून तिला समजतं की हा ऐकायला तयार आहे आणि मग ती बोलायला सुरुवात करते...
बघ ना विवेक आधी तुला वाटत होतं की तू आयशा शिवाय जगू शकणार नाही, आता तुला माझ्याविषयी तस वाटतंय.. आयशा सोडून गेली तिने तिची लायकी दाखवली तेव्हा तुला मी दिसली, ती तस वागली नसती तर माझ्याशी कायम तू असाच वागत राहिला असतास ना आणि समजा उद्या जर का आपल्यात कधी काही भांडण झालं तर तुला आणखी कुणी दिसेल?? तू माझ्याबरोबर प्रामाणिक राहाशीलच याची मला काहीच शाश्वती नाही विवेक... आयशाची धुंदी होती म्हणून तू तीच ऐकत गेलास खर तर तिच्यात अडकत गेलास, फसत गेलास जर ती पुन्हा कधी काही कारण घेऊन पुन्हा तुझ्याकडे सांथवना मागायला आली तर कदाचित तू तिला उभं ही करणार नाही बरोबर ना??
विवेक फक्त होकारार्थी मान हलवतो...
का?? कारण तिने तुला फसवलंय तुझा वापर करून घेतलाय.... मग मला सांग तू सुद्धा माझी फसवणूक केलीयेस ना मग मी तुझा विचार का करू आणि पुन्हा तुझ्यावर विश्वास का ठेऊ?? मला मान्य आहे की तू तिच्या बोलण्यात येऊन माझ्याशी लग्न केलंस , पण उद्या तू आणखी कुणाच्या बोलण्यात येऊन मला सोडणार नाहीस याची काय शाश्वती?? इतकं सहज आहे का रे कुणी आपली फवसवणूक केली आहे कळल्यावर त्याला माफ करणं?? विवेक मी ही एक माणूस आहे मलाही मन आहे आणि मलाही यातना होतात.. आणि दुसऱ्याच्या यातना कळायला स्वतःच मन शुद्ध असायला हवं.. तू जे सांगितलं जे वागला मला सगळं मान्य आहे तू मला सांगणार होतास पण परिस्थिती अशी झाली की तुला नाही सांगत आलं.. तुला तुझी चूक लक्षात आली, निदान अस तू मला आता सांगतोय... पण या सगळ्यात माझा स्वाभिमानही बरेचदा दुखावल्या गेलाय खरं विचार केला तर माझं एक मन म्हणतं की अजिबात तुला माफी देऊ नये आणि कुठलीच संधीही नको द्यायला... पण पुन्हा थोडा विचार केल्यावर अस वाटत खरच जर तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली असेल तर तुलाही पच्छाताप होत असावा आणि चुकीचा पच्छताप जास्त त्रासदायक असतो मला माहिती आहे... पण मी खूप दुखावली आहे रे मला इतकं सहज तुला माफ करायला नाही जमणार, मला वेळ हवा आहे..
विवेक - गौरवी जे झालाय त्याचा विचार कर ना जर तरच विचार का करतेय??-आणि जरी ती सोडून गेली नसती तरी एक ना एक दिवस तीच सत्य पुढे आलच असत ना? ते कधी लपून राहिलं नसतं...आणि अग तिला जर नाती टिकवता आली असती तर तिने माझ्याशी लग्नच केलं असत ना आज नाहीतर उद्या ती सोडून जाणारच होती मला, कारण ती स्वार्थी लालची होती, गेली ती जाऊ दे ना ग माझ्या आयुष्याची खुप मोठी साडेसाती गेली... आणि पच्छताप तर होतोच आहे ग मी स्वतः जळतोय त्या पच्छतापाच्या आगेत... ही शिक्षा आधीच मी भोगतोय.. एकाच गोष्टीची नियतीने किती शिक्षा द्यावी आधी माझा अकॅसिडेंन्ट, नंतर तुझं मला सोडून जाणं, मग तुझ्या अकॅसिडेंन्ट आणि त्यातच माझी अपराधीपनाच्या भावना . खूप शिक्षा झाली ना ग आता.. तरी पण तुला आणखी कुठली शिक्षा द्यायची असेल तर तू देऊ शकतेस.. मी तयार आहे... पण फक्त एक संधी दे मला..
आणि तुझ्या प्रार्थनेत आणि आपल्या लग्नाच्या बंधनात किती शक्ती आहे ते बघितलं का, नियतीने अपल्याला एक करायलाच हे अस काही घडवून आणलं असावं बहुतेक...
गौरवी मी वचन देतो तुला मी खरच पुढे अस काहीच करणार नाही, अस कधीच वागणार नाही.. तुला लगेच नाही मला माफ करता येणार तर तुला हवा तेवढा वेळ घे पण प्लीज गौरवी माझ्याकडे वापस ये... अग जे मला आता तुझ्याबद्दल वाटतेय ते कधीच कुणाबद्दल नाही वाटलं ग, ही ओढ एवढी तीव्र कुणाचं साठी भासली नाही मला कधी... गौरवी एकदा पुन्हा विश्वास करून बघ ना माझ्यावर.. मी कधीच तुझ्या विश्वासाला तडा नाही जाऊ देणार... इतके दिवस झाले मी तुझ्या अवतीभोवती वावरतोय, गौरवी प्रामाणिकपणे सांग तुला माझ्यात काहीच फरक नाही जाणवला का?? एकदाही माझ्या डोळ्यातलं तुझ्यासाठी असलेलं प्रेम नाही दिसलं का?? एकदाही तुला माझ्या प्रेमाची जाणीव नाही झाली का??
गौरवी - झाली ना विवेक मला जाणवलं तुझं प्रेम पण पुन्हा तेच विश्वास करू की नको, पुन्हा कुठला गैरसमज किंवा कुठली फसवणूक तर नसेल ना ही जशी लग्नाच्या आधी झाली होती ,असे प्रश्न माझ्या मनानी विचारलेत मला आणि माझ्याकडे त्याची उत्तर नव्हती.. लग्न आधी देखील तू माझ्यावर प्रेम करतो असच वाटायचं मला..
विवेक - त्यावेळीही मला तू आवडलीच होती पण आयशाच्या धुंदीने मी माझ्या मनातल्या त्या भावनांना कधी अनुभवूच शकलो नाही.. पण आता ना कुठली धुंदी आहे ना कुठला गैरसमज मी खरच तुझ्या वर प्रेम करू लागलोय ग गौरवी.. I really love you... Loves you a lot... please trust me... एकदा विश्वास करून बघ ना ग...
विवेकचे हे शब्द पहिल्यांदा तिला ऐकायला मिळाले होते, त्यामुळे ती भारावून गेले होती, एका क्षणासाठी तिला वाटलं की पटकन जाऊन त्याच्या मिठीत शिरावं सगळं काही विसरून पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करावं पण तिने स्वतःला थांबवलं, सावरलं.. पुन्हा भावनेमध्ये वाहत जाऊन तिला कुठली चूक करायची नव्हती...
गौरवी - विवेक लगेच विश्वास करायला आणि जून सगळं विसरायला नाही जमणार मला, मला त्यासाठी तू थोडा वेळ दे.. आणि तू शिक्षेच बोलत होतास ना..
विवेक - (थोडस घाबरून) अ... अ ... हो सांग काय शिक्षा आहे ?
गौरवी - (थोडस हसून) घाबरू नकोस, शिक्षा अशी नाही काही मी तुला एक संधी देईल माझा विश्वास पुन्हा मिळवण्याची पण माझ्या काही अटी आहेत... खर तर प्रेमात कुठली अट नसावी पण या नात्यात कदाचित अटी असाव्या लागतील...
विवेक - मान्य आहेत तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत... तू मला एक संधी द्यायला तयार आहेस हेच खूप खूप मोठी बाब आहे माझ्यासाठी...
तो खूप आंनद होऊन जवळ जवळ तिला मिठीच मारायला जाणार तोच ती त्याला अडवत मागे करते
गौरवी - तू मान्य करणार असला तरी आधी अटी ऐकून घे.. नंतर सांगीतलं नाही असं नको म्हणायला.. हवं तर रेकॉर्ड करून घे.. म्हणजे विसरलास तर ऐकता येतील परत...
विवेक - तुझी कुठलीच गोष्ट मी नाही विसरणार आता.. तू सांग..
गौरवी - पहिली अट.. आपण ... आपण म्हणजे तू यु. के मधून इकडे भारतात राहायला यायचं... त्या जॉब मध्ये बदली मिळणार नसेल तर तो जॉब सोडून दे, इकडे आल्यावर दुसरा बघ.. तुझ्याकडे अनुभव आहेच लगेच मिळून जाईल तुला दुसरा जॉब..
विवेक - मंजूर... खरं तर मी आधीच तसा अर्ज दिला आहे पण लगेच नाही मिळणार बदली म्हणून 2 महिने तरी लागतील...
गौरवी - दुसरी अट... भविष्यात माझ्यापासून कुठलीच गोष्ट लपवणार नाही कितीही क्षुल्लक असली तरी.... कितीही चूक व बरोबर असली तरी...
विवेक - मंजूर... ओके...
गौरवी - तिसरी आणि शेवटची अट... जोपर्यंत मी तयार होत नाही पुन्हा तुझ्यावरचा माझा विश्वास प्रबळ होत नाही तोपर्यंत तू मला वेळ देशील, मला ज्या दिवशी वाटेल की मी आता तुझ्यावर विश्वास करू शकते.. त्यादिवशी स्वःताहून येईल मी तुझ्या कडे... हा कालावधी कितीही असू शकतो.. 1 वर्ष , 2वर्ष, 4 वर्ष... आहे का मंजूर?? तू इतके दिवस वाट बघू शकशील माझी...
विवेक - तुला वेळ देईल मी तू पुन्हा आपल्या नात्याला संधी दिली ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्या साठी.. पण प्लीज जास्त वेळ नको ना ग घेशील.. तुझ्याशिवाय राहणं हीच माझी शिक्षा आहे खरं तर..
गौरवी - तू वेळ द्यायला तयार आहेस ना मग मला हवा तेवढा वेळ मी घेईल...
विवेक - तुला हवा तेवढा वेळ घे.. तू जेव्हा परत येशील ना मी तेव्हाही तुझाच असेल...
गौरवी - आता आणखी एक प्रश्न आहे तो म्हणजे आता आपल्यात काही झालंय ते घरच्यांना कळलंय पण नेमकं काय हे त्यांना माहिती नाही.. तर त्यांना हे सगळं कसं सांगायचं हे तू बघ.. मी फक्त माझा निर्णय सांगेल..
विवेक - निर्णय??? कसला निर्णय?? त्यांना हे सगळं सांगितलं तर माझं काही खर नाही ग ते तर मला घरात पण घेणार नाही..
गौरवी - निर्णय हाच की मला वेळ हवाय म्हणून.. आपल्या नात्याातून काही दिवस ब्रेक हवाय हे.. आणि हे सगळं करताना हा विचार नव्हता ना केला मग आता घाबरू पण नकोस..
विवेक - गौरवी पण तू येशील ना ग परत..
गौरवी - ते सगळं तुझ्या वर आहे विवेक.. तुला माझा विश्वास परत मिळवायला किती वेळ लागणार आहे ते.. आणि तू तुझ्या वचनाशी किती प्रामाणिकपणे वागशील ते ही...
विवेक - (तिच्या डोळ्यात बघत ) मी आयुष्यभर तुझी वाट बघेल..
गौरवी - निघायचं का आता?? बराच वेळ झालाय ना घरी वाट बघत असतील सगळे.. आणि कस आणि केव्हा सांगायचं त्याचा विचार करून ठेव..
क्रमशः