मग तो आयेशाने कस त्याला घरा बाहेर काढलं आणि पुढचं सगळं तिला सांगतो.. ते ऐकून तिलाही थोडं वाईट वाटतं, त्यादिवशी पूर्ण न ऐकताच तीला भोवळ आली होती आणि अर्धवट ऐकून त्याच गैरसमजात ती निघून गेली होती...
गौरवी - अरे पण त्यादिवशी तर ती तुझी गर्लफ्रेंड असल्याचा मोठा आव आणत होती ना मग अस अचानक..
विवेक - अग त्यादिवशी ती हेच सांगायला आली होती की 2 दिवसात तू घर खाली कर... ती आली नि माझी वाट लावून गेली त्या दिवंसापासून आजपर्यंत माझं आयुष्य नरक होऊन बसलंय..
गौरवी - मला वाटलं मी निघून आल्यावर ती पुन्हा तुला मिळवण्यासाठी प्रयत्न करेल.. मला तुमच्याबद्दल पुराव्या सकट सांगणं म्हणजे मला तुझ्यापासून दूर करण्याचा प्लॅन असेल तीचा अस मला वाटलं.. मी त्या दिवशी तुमचं पूर्ण बोलणं नाही ऐकू शकली पण जेवढं ऐकलं ते खूप धक्कादायक होत माझ्यासाठी..
विवेक - मी समजू शकतो... हे सगळं तुला अस माहिती पडेल अस मला कधी वाटलंच नव्हतं.. त्यामुळे तू जास्त दुखावली गेलीस...
गौरवी - त्या निमित्ताने माहिती तर पडलं मला, मी किती मूर्ख होती ते, नाहीतर कधी कळलंच नसत मला..
विवेक - तस नाहीय गौरवी, तू जेव्हापासून बोलली मला माझ्याशी मैत्रिणीसारखं एकदा बोलून बघ त्यादिवशीच मी तुला सगळं काही खरं सांगण्याचा निश्चय केला होता... मी तुला बाहेर फिरायला जायचं बोललो होतो आठवते, तेव्हा मी तुला सगळं खरं खरं सांगणार होतो ग... विश्वास कर... तुला माझा सगळं भूत सांगूनच मला आपलं नात पुढे न्यायचं होतं, तुला अंधारात ठेवलं मी आधी पण जेव्हा मला माझी चूक कळली तेव्हाच मी ती चूक सुधारून पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता... पण
गौरवी - आयशा सोडून गेली म्हणून तुला तुझी चुकी कळली, ती गेलीच नसती तर किती दिवस मला तू असाच अंधारात ठेवलं असत ना... आणि माझा असाच छळ केला असता...
विवेक - गौरवी मी जे वागलो तुझ्यासोबत त्यासाठी परत एकदा माफ कर...मला माहिती आहे की ते इतक्या सहज माफ करण्यासारखं नाहीय पण तरी... मी खूप चुकीचं वागलो या गोष्टीचा खूप पच्छताप आहे ग मला... हवं तर मी प्रायश्चित्त करायलाही तयार आहे... पण गौरवी तुला एक गोष्ट लक्षात आली का? म्हणजे बघ ना लग्नाच नातं किती मजबूत असतं म्हणजे मी तुझा नसताना देखील नियतीने असे काही फासे पालटले की मी तुझा झालो... जे लग्न मला ओझं वाटायचं आज मला तेच लग्न, त्या लग्नाच नात हवंहवंसं वाटतंय... त्याच्यासाठी मी आज काहीही करायला तयार आहे...
गौरवी - हो पण एक विसरलास ज्या नात्याची सुरुवातच खोटं आणि फसवणुकीने झालीय ते नात पुढे टिकेल कसं? समोर चालेल कसं?? विश्वास नात्यातली खूप महत्त्वाची गोष्ट आहे मी तर म्हणेल प्रेमापेक्षाही महत्वाची... आणि तू जे लग्नाच नातं सांगतोय ना त्या नात्यात हीच महत्वाची बाब नाहीय...
विवेकला बोलायचं होत तिला परत मनवायच होत, फक्त एकदा विश्वास कर सांगायचं होत पण आताही तो काहिच बोलू शकला नाही... त्याने तो विषय टाळला.. आणि
विवेक - ते सगळं नंतर बोलूयात तुझ्या औषधीची वेळ निघून जायची, फार उशीर होतोय तुला आराम करायला पाहिजे आता... उद्या तुझे बाबा आले आणि तू फ्रेश दिसली नाही तर माझी वाट लागायची...
गौरवी - ठीक आहे घेते आता औषधी..
विवेक तिला औषधी देतो आणि
विवेक - शांत झोप.. काहीही लागलं तर प्लीज कुठलाच संकोच करू नकोस... निदान आता तरी..
औषधी घेऊन ती झोपी जाते तिला लगेच झोपही लागते औषधींचाच असर असावा कदाचित.. विवेक तिच्या निरागस चेहऱ्याकडे कितीतरी वेळ एकटक बघत असतो... कातीतरी विचार त्याच्या मनात घोळत असतात... थोड्यावेळाने त्यालाही गुंगी येते आणि तो तिथेच गौरवीच्या बेडवर डोकं टेकवून झोपी जातो...
सकाळ उजाडते... रात्री बराच वेळ जागी असल्यामुळे आणि रात्री शांत झोप न लागल्यामुळे विवेक अजूनही झोपलेला असतो पण गौरवीची झोप मात्र झाली असते आणि ती उठते... तर तिला विवेक तिथेच असा खाली बसल्या बसल्या झोपलेला दिसतो.. ती त्याला उठवते... तो ही लगेच उठतो आणि खूप conciously तिला काही हवाय का विचारत असतो...
गौरवी - मला काही नकोय, तू शांत हो... तू असा झोपला होता म्हणून उठवलं... तिकडे बाजूच्या बेडवर नीट जाऊन झोप जा , असा तर अकडून जाशील, अंग दुखेल...
विवेक - ओहह अस आहे का अच्छा... अ... पण झाली माझी झोप... मी आलोच फ्रेश होऊन 2 मिनिटात...
तो चेहऱ्यावर पाणी घेऊन चेहरा पुसतच बाहेर येतो... तेवढ्यात फोन वाजत असतो... गौरवी च्या आई बाबांचा फोन असतो... ते निघत असतात घरून तर काय हवं नको ते विचारायला फोन करतात... आता गौरवी त्यांची एकुलती एक लाडाची लेक हॉस्पिटलमध्ये असल्यावर त्यांना तरी शांती कुठे असणार... सकाळी सकाळीच लवकर उठून सगळं आवरून निघाले ते...
विवेक - आई बाबा निघालेत गौरवी, तू पण फ्रेश होऊन जा, चल तुला मदत करतो..
गौरावी फ्रेश होते आणि पुन्हा आपल्या बेडवर येऊन बसते.. तोपर्यंत आई बाबा येतात.. आणि विवेकला घरी जायला सांगतात... तो ही मग घरी निघून जातो... इकडे डॉक्टर सगळं नॉर्मल आहे सांगून संध्याकाळी सुटी मिळेल म्हणून सांगतात. संध्याकाळी तिला पुन्हा आपल्या घरी आणावं म्हणून विवेकच्या आई बाबा पण येतात पण गौरवीची आई त्याना विनंती करून आपल्या घरी घेऊन येते...
दोन दिवस आराम करून पुन्हा ऑफिसला जायचा तिचा विचार असतो, पण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आणखी आठवडा भर तरी घरी आराम करावा लागणार असतो.. या आठवड्याभरात विवेक तिला रोज भेटायला येतो तिला कंटाळा येऊ नये म्हणून वेगवेगळे नवीन नवीन पुस्तक आणून देतो बरेचदा वाचूनही दाखवतो... विवेक मधला बदल गौरावीला हळूहळू जाणवत असतो... पण तरी विश्वास ठेवावा की नको या द्विधा मनःस्थितीत ती असते.. मोठी हिम्मत करून तो आठव्या दिवशी म्हणजे तिच्या आरामाचीे शेवटच्या दिवशी गौरावीला विचारतो
विवेक - गौरवी, तुझी काही हरकत नसेल तर आपण बाहेर जायचं का थोडं फिरायला??? तुलाही कंटाळा आला असेल ना घरात बसून बसून... आणि... म्हणजे आपलं बोलायचं अर्धवट राहील होत ना ते पण बोलता येईल...
गौरवी वाटच बघत होती खरं तर की हा परत कधी विषय छेडतो.. ती लगेच तयार झाली.. तिचे बाबा तेवढे खुश नव्हते तिला त्याच्यासोबत जाऊ द्यायला पण आईच्या सांगण्यावरून त्यांनी 'हो' म्हंटल होतं..
---------------------------------------------------------