अंजली किती ही धाडसी असली तरीही कोणत्या ही मुली ला तिच्या चारित्रयावर असे शिंतोडे उडवलेले पाहून वाईट वाटेलच ना ? अंजली ते सर्व पाहून रडू लागली ..सरु तिला समजावत होती तेवढ्यात तिच्या इतर मैत्रिणी ही आल्या..
सरु : अंजली रडू नको ना प्लीज तुझी काही चूक नाही आणि तू अशी नाही हे आम्हाला माहीत आहे मग का रडत आहेस तू ?
निशा : अंजली रडू नको आम्ही सगळं पुसून टाकतो ..आणि कोणी केलंय ना हे सर्व त्याला चांगला धडा शिकवू ..
निशा ,रेखा व सरु तिघी मिळून बॉटल मध्ये पाणी घेऊन ते लिहलेले सर्व पुसतात.
रेखा : ये पणं हे सर्व कोणी केलं असेल ?
सरु : काय माहित कोण मूर्ख आहे ?
निशा : लाज ही वाटत नाही मुलांना अस करायला ..अंजली भाव देत नाही ना कोणाला त्यामुळे यांना पचत नाही ते..
सरु अंजली ला पाणी देते ती ही पाणी पिते व शांत होते..
अंजली : हे सर्व ज्याने केलय त्याला मी अजिबात सोडणार नाही..
रेखा : पणं आपल्याला कळणार कस की कोणी केलं आहे हे ?
सरु : काल तर अस काही नव्हत म्हणजे शाळा सुटल्या नंतर च कोणी तरी असल काम केलं असणार ..
रेखा : सुमित ने च तर केलं नसेल ना ?
निशा : तो कसं करेल ? म्हणजे तो स्वतः च नाव कसं लिहिलं ? आणि तस्स ही तो कधी असल्या फालतू गोष्टी कडे लक्ष ही देत नाही ...
रेखा : तुला बर माहित ग?
निशा : माहित असायला कशाला हवं ? तो नाहीच करत अस ..
अंजली : तो नाही करणार अस काही ..
सरु : मग कसं शोधायचं ?
अंजली : शिपाई काका च घर शाळे जवळ आहे ...त्यांना आपण विचारू संध्या काळी त्यांना शाळेच्या आस पास कोणी दिसलं होत का ते ?
निशा : त्यांना विचारण्यात पेक्षा आपण बट्टू ला विचारू ?
अंजली : शिपाई काका चा बट्टू ना पाचवीला आहे तो ना ?
निशा : हो तोच ..
अंजली : हा ..चला पहिल वर्गात बॅग ठेवून येऊ..
अंजली व सरु आप आपल्या वर्गात बॅग ठेऊन पुन्हा बाहेर येतात ..निशा,रेखा ,सरु आणि अंजली अशी चौकडी बट्टू ला शोधायला लागतात तो शाळे पाठीमागे असलेल्या मैदानात आपल्या मित्रांन सोबत लपा छपी खेळत असतो.अंजली त्याला पाहून आवाज देते.
अंजली : बट्टू , इकडे ये ना जरा.
बट्टू : दीदी आवाज देऊ नको अग त्याला कळेल ना मी इथे आहे ते .
अंजली : बट्टू , नंतर खेळ ना आम्हाला तुझ्या सोबत बोलायचं आहे ..तुला आम्ही गम्मत सांगणार आहे..तुला माहित आहे का आपल्या शाळेत उद्या जादूगार येणार आहे.
बट्टू तिचं बोलणं ऐकून पळत येतो.
बट्टू : खरंच दीदी ? जादूगार येणार आहेत उद्या आपल्या शाळेत ?
अंजली : हो ..खर उद्या तूच बघ ना..
बट्टू : ये मग उद्या खूप मज्जा..
अंजली : हो ..बर बट्टू काल तुला शाळा सुटल्या नंतर शाळेजवळ कोणी दिसलं होत का रे ?
बट्टू : शाळा सुटल्या वर ? नाही तर..पणं का ग ?
अंजली : काही नाही असच बर तू जा खेळ..
अंजली व तिच्या फ्रेण्ड्स नाराज होऊन जाऊ लागतात ..तेवढ्यात बट्टू पुन्हा अंजली ला आवाज देतो.
बट्टू : दीदी..
अंजली : काय रे ?
बट्टू : शाळा सुटल्या नंतर नाही पणं रात्री कोणी तरी मुल शाळे जवळ आली होती काही तरी करत होती ..मी कोण आहे म्हटल्यावर पळून गेली..
अंजली : होय का ? बट्टू तू पाहिलं स का ? कोण होत ते ?
बट्टू : अंधार होता नीट दिसलं नाही पणं हा त्यातला एक नसीर भैय्या होता..अस मला वाटत..
निशा : तू त्याला पाहिलं होतास का ?
बट्टू : मी पाहिलं नाही पणं कोणी तरी म्हटलं नसीर..भाग ..मी ऐकलं
अंजली : थँक्यु बट्टू ,आणि हो लक्ष ठेवत जा ह ..आपल्या शाळेच्या बागेतील फुल चोरायला येत असतील कोणी तरी रात्रीच ..आता तू इतका strong boy आहेस तुला बघुन पळून गेले ना ते ..बर जा आता खेळ.
बट्टू : हो मी लक्ष ठेवेन ..
अस म्हणून बट्टू खेळायला पळून जातो.
सरु :त्याने तर फक्त नसीर च नाव ऐकलं पणं नसीर ला पाहिलं नाही मग आपण डायरेक्ट कसं त्याला विचारायचं ?
अंजली : ह..पणं मला ही वाटतं ही कर्तुत नसीर ची च असणार .. या वेळेस जाऊ दे पुन्हा काही केलं ना मग मी त्याला अजिबात सोडणार नाही.चला आता वर्गात जाऊ.
चार पाच दिवस असेच जातात ..पणं अंजली ने नोटीस केलं होत की नसीर तिला पाहून गालात हसतो .. मित्रा ना टाळ्या देतो..ती दिसली की ..तिच्या कडे पाहणं मात्र त्याने अजून ही कमी केलं नव्हत.
शाळा सुटल्या नंतर अंजली व सरु घरी जात होत्या.
अंजली : सरु चव्हाण सर शनिवारी इतिहास ची टेस्ट घेणार आहेत ..आणि त्यांनी सांगितलं आहे ज्याला आउट ऑफ आउट मार्कस पडतील त्याला ते पेन देणार आहेत..मी तर अभ्यास चालू केला आहे आणि मला पेन हवा आहे ..चव्हाण सर पेन देणार म्हणजे..तो मिळवायला हवा च ...तू ही अभ्यास कर ते दोन्ही वर्गाची एकत्र च टेस्ट घेणार आहेत ..
सरु : हो मी करते अभ्यास पणं मला पेन मिळणार नाही हे तुला ही माहित आहे..
अंजली : हा तुझं चालू झालं आता पासून च ..
सरु : अग खर तेच सांगितलं ..ये अंजली पणं तुला पेन मिळणार आणि पुढच्या टेस्ट मध्ये ही मिळाला की त्यातला एक मला दे बर का?
अंजली : हो ..देते बाई.. ऐक ना उद्या घरी ये लवकर सोबत जाऊ शाळेला...आणि उद्या बुधवार आहे तर रंगीत ड्रेस आहे तुझा तो पांढरा आणि निळा कलर मिक्स ड्रेस आहे तो घालून ये त्यात छान दिसतेस तू..नाही तर विसरून पुन्हा शाळेचा ड्रेस च घालून येशील.
सरु : हो ,जस तू म्हणशील ..आणि तू इतकं सांगितलं आहे तर नाहीं विसरणार.. चल बाय..
अंजली : बाय..
अंजली च घर येत अंजली घरी जाते व सरु पुढे तिच्या घरी इतर मुलीनं सोबत जाते .
दुसऱ्या दिवशी सरु जरा उशिरा च येते..अंजली तिची वाट पाहत असते सरु दिसते तस्स अंजली बॅग अडकाऊन बाहेर येते ..
अंजली : सरु किती उशीर चल ..लवकर ..लवकर नाही गेलो तर पाऊस येईल आणि भिजू ..पावसाचं वातावरण झालं आहे..
सरु : हो ग सॉरी थोडा उशीर झाला..पणं अंजली या व्हाईट ड्रेस वर खूप छान दिसत आहेस तू आज ..
अंजली : हो तू पणं ...बघ आज तू ही व्हाईट मी ही व्हाईट सेम सेम ना...
दोघी गडबडीत जायला लागतात तेवढयात अंजली ची मम्मी अंजली ला ओरडून थांबवते.
मम्मी : अंजली छत्री घेऊन जा ..उगाच भिजू नकोस पाऊस आला मध्येच रस्त्यात तर..
अंजली : अग मम्मी नको ..नाही येणार पाऊस.
मम्मी : सांगितलं तेवढ ऐक ..एका छत्रिने काय तुझ्या डोक्यावर ओझ होत नाही..
मम्मी ओरडल्या मुळे अंजली ही मग गपचूप छत्री घेऊन निघते...सरु आणि अंजली अर्ध्या रस्त्यात येतात तेव्हा त्यांना एका दुकानात जवळ नसीर दिसतो ..अंजली दिसताच तो त्याच्या मागे येऊ लागतो ..तो ही शाळेला चालला होता..अंजली सरु पुढे पुढे आणि नसीर मागे ..बर चालला आहे तर शांत तरी चालेल की नाही ..अंगात मस्ती दुसर काय ? नसीर अंजली ला पाहून शीळ घालत त्या दोघींच्या मागे येत होता..मध्येच हसत होता..इतका वेळ शांत बसलेली अंजली आता चांगलीच खवळली..
अंजली : याला खूप शिट्टी वाजवू वाटते ना ? थांब आता ..याची शिट्टी च काढते..
रागात ती मागे वळून नसीर कडे पाहू लागली..
सरु : अंजली जाऊ दे ना सोड उशीर होत आहे ..
अंजली : काय जाऊ दे ? चार पाच दिवस झाले याच खूपच चाललं आहे सरु तुला नाही माहीत ...शांत बसलेलं याला पाहत नाही..
नसीर जसा जवळ येतो तस्स अंजली त्याला ओरडते..
अंजली : क्यू बे नसीर..तुझे क्या अभी स्कूल जाना था ? हमारे पीछे क्यू आ रहा है ?
नसीर अंजली थांबलेलं पाहून थोडा घाबरतो पणं पुन्हा एकदम धीट होत बोलतो .
नसीर : मे काहा तुम्हारे पीछे आ रहा हुं? मे तो रस्ते से जा रहा हुं ना?
अंजली : तो चूप चाप जा ना ..हमारे पीछे क्यू ?और रस्ते पे सिटी क्यू बजा राहा हैं ?
नसीर : सिटी बजावू या नाचू ..रस्ता क्या तुम्हारे अब्बा का हैं ?
आता अंजली ला खूप राग आला ती त्याच्या समोर जाऊन उभा राहते व बोलते ..
अंजली : हो माझ्या पप्पांन चा च आहे रोड ...बोल आता काय बोलतो ?
नसीर : इधर तो नाम नहीं दिख राहा ना ..?
अंजली : मुझे कमीने लोगो की तरह नाम स्कूल के बोर्ड के पीछे.. पेडो .. दिवा रो पे..सडक पे लिखने का शौक नही हैं ना..
नसीर ला कळत ती त्यालाच बोलत आहे ..आता तो थोडा गोंधळ ला होता..
नसीर : कमिना किसको बोल रही हो ?
अंजली : जिस ने मेरा और सुमित का नाम लीखा था उसको... तूने तो न ही. .. लीखा ना तो तुझे क्यू बुरा लग राहा हैं ?
नसीर आता पूर्ण गडबडला ... नहीं तो मुझे क्यू बुरा लगेगा..मुझे क्या पता किसने लीखा था...
अंजली : ठीक है अब चूप चाप आगे जा..
नसीर : मैं क्यू जाऊ ..तू जा ना..
अंजली मग पुन्हा सरु चा हात धरून जाऊ लागते ..पणं परत नसीर तिच्या मागे शीळ घालत येऊ लागतो तस्स ती आपल्या हातातल्या छत्री ने नसीर च्या डोक्यात मारायला चालू करते..
अंजली : खूप मस्ती आहे ना तुला ? सांगितलं गप्प जा तर शिटी वाजण बंद होईना ना तुझी ? आणि हो मला माहित आहे ..ते नाव तूच लिह ल होतास...या वेळेस सोडलं ..पणं पुढच्या वेळेस अस काही केलंस ना डायरेक्ट हेड मास्टर कडे घेऊन जाणार आहे मी तुला...अंजली त्याला फट के मारत च बोलत होती...नसीर आपल्या डोक्यावर हात मध्ये घेऊन तिचा मार चुकवत ओरडत होता..
नसीर : अबे पागल है क्या ? मार क्यू रही है ?
सरु अंजली ला मागे खेचत होती ...अंजली सोड बास जाऊ दे त्याला..पणं अंजली तिचं ऐकत नव्हती ..नसीर ने अंजली ला ढकलल व तिथून जोरात पळ काढला..त्याला तस्स पळताना पाहून सरु ला जाम हसू आल..
सरु : अंजली शांत ,शांत हो.. अग गेला तो पळून आता तो नाही तुझ्या सोबत भांडणात कधी..
अंजली : आता तो काही करू तर दे मग त्याच काही खर नाहीच ..बघ..
अंजली मोठ्याने श्वास घेत बोलली..
नसीर ला घाबरून पळत येताना पाहून त्याच्या मित्रांनी त्याला विचारल..
क्या हुवा नसीर ?
नसीर मागे पाहत होता परत पुढे पाहत होता..
नसीर :अरे वो अंजली ..पागल हो गयी है .. मारी मेरे को..
त्याचे मित्र..तुझे कितनी बार बोला मत पंगा ले उस से पर तू काहा सुनता हैं..? उस ने अगर हेड मास्टर को बताया तो वो बोह त पि टेगे..तुझे पता हैं ना ?
नसीर : ना बाबा वो तो पागल हो गयी है.. अब से मैं तो उसका नाम भी नहीं लूंगा कितना मारती हैं.. दे ख..मेरे कान पे याहा लगि हैं..
नसीर चा कान चांगला च लाल झाला होता.
क्रमशः