kadambari jaadu premaachee - 26 in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी - प्रेमाची जादू - भाग - २६ वा

Featured Books
  • तमस ज्योति - 51

    प्रकरण - ५१मेरे मम्मी पापा अब हमारे साथ अहमदाबाद में रहने आ...

  • Lash ki Surat

    रात के करीब 12 बजे होंगे उस रात ठण्ड भी अपने चरम पर थी स्ट्र...

  • साथिया - 118

    अक्षत घर आया और तो देखा  हॉल  में ही साधना और अरविंद बैठे हु...

  • तीन दोस्त ( ट्रेलर)

    आपके सामने प्रस्तुत करने जा रहे हैं हम एक नया उपन्यास जिसका...

  • फाइल

    फाइल   "भोला ओ भोला", पता नहीं ये भोला कहाँ मर गया। भोला......

Categories
Share

कादंबरी - प्रेमाची जादू - भाग - २६ वा

कादंबरी - प्रेमाची जादू
भाग -२६ वा
----------------------
१.
------------
चौधरीकाकाकडे मदतीसाठी म्हणून मधुरा
दुपारीच गेली होती, आजी -आजोबांना
घरी घेऊन जायचे म्हणून ऑफिस संपले की चौधरिकाका पण निघून गेले.
त्यांना कबूल केल्याप्रमाणे यश तिकडे जाण्यासाठी निघाला, आणि घरी आल्यावर
आई-बाबा देखील तिकडेच आहेत हे कळल्यामुळे यश मनोमन खुश झाला,
चौधरिकाकांना तो म्हणाला होता की-
कुणाला सांगू नका, मी येतोय ",या बद्दल,
हे सांगणे मधुरा ला सर्पराईझ देण्यासाठी होते".
आता आई -बाबा दोघे ही तिकडेच ,म्हणजे
आपल्या तिकडे येण्यास सगळ्यांची मान्यता मिळाल्या सारखे आहे " हे बेस्टच झाले.
चौधरीकाकांच्या घरी जाण्याचे प्रसंग तसे फारसे आलेले नव्हते, उलट आज त्यांच्या कडे पहिल्यांदा जातो आहोत, असे यशाला वाटू लागले.
ही ओढ, ही अधीरता त्याच्या मनाला लावली ती मधुराने.
त्याला आठवली ती मोनिका, बाप रे, किती मागे लागली होती ती,तिला थोडा जरी प्रतिसाद दिला असता तर, तिने कधीच आपल्याला पागल बनवले असते, तिच्या तालावर नाचवले असते, यासाठी तिची मादक सुंदरता, वागण्यातला बिनधास्तपणा, स्वैरपणा याचा उपयोग केलाच असता.
तिचा तो धुंद करून टाकणारा स्पर्श, नजरेतील निमंत्रण, समजून देखील आपल्या मनाला का कुणास ठाऊक तिचे हे सगळे फंडे
मनाला भावलेच नाही कधी,
अंजलीवहिनीच्या जागरूकतेने मोनिकाच्या
जाळ्यातून सुटका झाली.
आणि आता गेल्या काही दिवसांपासून मधुराच्या सहवासात जाणवते आहे, की फक्त
आकर्षण हे वरवरचे असते, मनातून वाटणारी भावना ..हेच प्रेम असते"!
चौधरिकाकांच्या घराकडे जातांना यशच्या मनात हेच विचार येत होते.
अशा विचारातच चौधरिकाकांच्या घरासमोर त्याची बाईक थांबली.
पाच खोल्यांचे ते साधे घर, तीन खोल्यात ते,
बाजूच्या दोन खोल्या भाडेकरू साठी, सोबत होते, भाडे मिळते असा बाळबोध हिशेब होता.
या दोन खोल्यात मधुरा आणि तिच्या तीन मैत्रिणी, चौघीजणी राहायला येऊन फार दिवस झाले नव्हते पण काकूंना मात्र
मोठाच आधार या मुलींचा मिळाला, चौधरिकाकांची काळजी खूपच कमी झाली होती.
यश गेट उघडून आत गेला, समोरच्या हॉलचा दरवाजा उघडा होता, त्याला दिसले आजी-आजोबा, आई-बाबा, काका-काकू
सगळेजण सोफा आणि खुर्च्यांवर बसून मस्त गप्पा करीत, बोलत बसले आहेत.
त्याला आलेला पाहून काकांनी मोठ्या प्रेमाने त्याचे स्वागत केले.
आजोबांच्या शेजारी बसत यशने मनाशी अंदाज केला,
किचन ड्युटी एकटी मधुरा सांभाळत असणार, फारच कामाची आहे बुवा ही मुलगी",
तिचा हा गुण मनापासून आवडला आहे, हे तो स्वतःशी कबूल करीत होता .

आज्जीने आत आवाज देत म्हटले -
अग मधुरा, अजून एक पाहुणे आलेत,
अचानकच,
पाणी घेऊन ये त्यांच्यासाठी !
आज्जींचा आवाज कानावर पडला आणि मधुरा एका ट्रे मध्ये पाण्याचे ग्लास घेऊन हॉल मध्ये आली,
तिचा तिच्या डोळ्यावर विश्वासच बसेना -
आजोबांच्या शेजारी सोफ्यावर बसलेला पाहुण्याला पाहून आनंदाचा सुखद धक्का आपल्या मनाला बसलाय, असे तिला वाटले,
आजींच्या आवाजातला मिस्कीलपणा जाणवून मनोमन तिला हसू आले.

यशच्या समोर तिने ट्रे धरला, त्याने ग्लास घेतांना तिच्याकडे पाहिले, यशाला भास झाला,
जणू नजरेतून मधुरा त्याला म्हणत होती-
'तू आलास, खूप खुश झाले आहे मी ..!

गुलाबी रंगाचा ड्रेस, तशीच ओढणी,मधुरा खूप छान दिसत होती, तिच्या उजळ रंगाला सगळेच रंग खुलून दिसायचे, आणि आज तर
मूड भी अच्छा और माहौल भी अच्छा..

चौधरी काकू समोर बसलेल्या सर्वांना सांगत होत्या ..
आज्जी, गेले कितीक वर्ष घरात आम्ही दोघे, हे दिवसभर यशच्या शो रम मध्ये, घरात दिवसभर मी एकटी,म्हणायला किरायेदार होते,पण दोघेही नोकरीवले, मलाच त्यांच्या बंद घराकडे लक्ष ठेवावे लागे..
आता दोन महिने होत आहेत पहा..
बाजूच्या खोल्यात ही मधुरा आणि तिच्या मैत्रिणी आल्यापासून ,घरात या चिमण्यांची चिवचिव सुरू झाली, तेव्हापासून मी एकटी "
ही माझी भीती पळून गेलीय.
कॉलेज झाले की, या पोरी घरातच, मला आधार असतो, मधला दरवाजा उघडा ठेवतात, लक्ष देतात माझ्याकडे,
नात्याच्या ना गोत्याच्या, पण पोरींनी जीव लावला हो भारी..
मधुरा गुणी , तिचा या गुणांचा वाण सोबतच्या पोरींना लागलाय.
काकूंनी ओलावले ले डोळे पुसत मधुराच्या कौतुक सगळ्यांना सांगितले..
यशच्या आजी खुर्चीतून उठल्या, पलंगावर पडून असलेल्या आजारी काकूंच्या जवळ बसत म्हणाल्या ..
देवाला असते काळजी, पटलं की नाही,
या पोरींना दिले बघा पाठवून तुमच्या सेवेला.
माणसाला एकटेपणाची शिक्षा भोगायला लागणे, खूपच वाईट हो ।!
आमच्या पंडितजींच्या दोन्ही पोरी खरेच खूप सालस आहेत, आई- बापाचा सात्विकपणा
उतरलाय पोरीच्या वागण्या-बोलण्यात.

आल्यापासून पहाते आहे ना मी, मधुरा नि तिच्या मैत्रिणी किचनमध्येच आहेत,बरे वाटले हे पाहून.
काकूंनी आजींच्या बोलण्याला मान डोलवत जणू सहमत आहे मी पण असेच म्हटले होते.

यश मनापासून मधुराच्या कौतुकाचे शब्द मनात साठवून घेत होता. आतापर्यंत ज्या वातावरणात तो मुलींना भेटला होता, बोलत होता, त्या ओळखीच्या होत्या, अनोळखी होत्या, पण या घोळक्यात महत्व होते
असण्याला आणि दिसण्याला , रूप आणि
पैसा जीच्याजवळ ,ती चा रुबाब सर्वांवर,
पैसा नाही पण रूप आहे, अशी पोरगी रूपाच्या अस्त्राचा स्वतःच्या फायद्यासाठी पुरेपूर वापर करून घेते " हा अनुभव यशाला अगदी सुरुवातीपासून येत गेलेला, अगदी
अलीकडे मोनिका नावाच्या रुपसुंदर, पैसेवालीने त्याच्यावर जाळे टाकले होते,
पण घरच्यांच्या पाठबळाने यश मोनिकाच्या जाळ्यातुन सहीसलामत बाहेर पडला,
यशला हे आठवले
नकळतपणे सुटकेचा निश्वास सोडला त्याने.
******
2.
हॉल मधल्या सेंटर टेबलावर मधुरा आली,तिच्या हातातल्या ट्रे मध्ये डिश होत्या
त्यात वाफा निघणारे गरमागरम पिवळे धम्मक कांदे पोहे होते,
मधुराच्या पाठोपाठ तिच्या रूम मेट्स हातात
ट्रे घेऊन आल्या,
दोघींच्या हातातल्या ट्रे मध्ये-
साजूक तुपातला शिरा, त्यात बदामाचे काप,
तिसरीच्या हातातल्या आणखी एक ट्रेमध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवीगार कोथिंबीर, लिंबाच्या फोडी,नारळाचा खिस, दिसत होता
आणि चौथ्या मैत्रिणीच्या हातात
ग्लासेस, पाण्याचे जग,असे होते..
हे सगळं पाहून यशच्या आज्जी म्हणाल्या
बाप रे..!
काय ग पोरींनो, हे काय एवढे ?
इतकं सगळा खटाटोप कशाला केलात उगाच,
चहा-पाणी ,गप्पा टप्पा पुरेशा झाल्या असत्या.
चौधरिकाका सगळ्यांना म्हणाले -
आज कधीनव्हे तो तुम्ही सगळे आमच्या घरी आलात, मग, करू द्याना आम्हाला आमच्या मनासारखे,
जे करू , ते गोड मानून घ्या, हीच विनंती.
चौधरिकाकांच्या पाठीवर हात ठेवीत यशचे
आजोबा म्हणाले -
तुमच्या भावना समजू शकतो मी, यशच्या बाबांनी तुमच्यासाठी जे केलं, त्याविषयी तुमच्या मनात कृतज्ञता आहे, श्रद्धास्थान आहे सर तुमच्यासाठी.असो
आज तुमचा पाहुणचार आनंदाने घेउत आम्ही
तुम्ही निश्चिन्त असावे.

फराळ खुपच रुचकर झालाय बरे का मधुरा,
तुझ्या मैत्रिणींनी आणि तू सगळ्यांनी मिळून टेस्टी बनवलय सगळ्या गोष्टी.
यशचे बाबा असे म्हणाले ,ते ऐकून समोर उभ्या असलेल्या मधुराला आणि तिच्या मैत्रिणींना खूप बरे वाटते आहे "हे यशने
पाहिले..
मधुराकडे पहात त्याने एकदम बेस्ट झालंय असे थम्स अप " करून खुणेने तिला सांगितले,मधुराने हसूनच त्याला नजरेने थॅंक्यु म्हटले.
फराळ झाला, चहा झाला, बोलणे सुरूच होते,
यशच्या आई म्हणाल्या..मधुरा, अग ,तुझ्या
मैत्रिणींचा परिचय करून दे, त्यांनाही वाटले पाहिजे की आपण यांच्याशी बोललो,नाहीतर त्यांना वाटेल ..
आम्ही फक्त वेटरच झालो ..
हे ऐकून मधुरा म्हणाली .काकू रियली
सॉरी,
लक्षात नाही राहिले हे माझ्या ..
आता करून देते या तिघींची ओळख -
आम्ही चौघीजणी वर्गमैत्रिणी ,आणि स्वभाव जुळत गेले तशा घट्ट मैत्रिणी झालोत.

आमच्यातली कॉमन गोष्ट म्हणजे आम्ही
साधारण फॅमिलीतल्या आहोत, नोकरदार
आई-वडील त्यांच्या इच्छा, आपल्या मुलींनी
खूप शिकावे, मोठे व्हावे ,म्हणून मग आम्ही
या मोठ्या महानगरात आलोत..
ही माधवी ..खान्देशातून आलीय
हिचे नाव सारिका ..नगर च्या जवळच्या एका
लहानश्या गावाकडची,
ही रुपाली.. उस्मानाबाद कडची..
आणि मी तुमच्या गावाकडची
मराठवाडा -विदर्भ सीमेवरच्या गावातली
पण ..इथे आल्यावर ,रोज येणाऱ्या प्रसंगातून
शिकलो, सावरलो आणि आता सरावलो सुद्धा.
माझ्या आई-बाबांच्या आणि तुमच्या स्नेह संबंधामुळे मी इथे स्थिर होऊ शकले,
तुम्ही आधार दिला नसता तर ही मधुरा इथे टिकली नसती ,कधीच गेली असती परत.

यशाची आज्जी म्हणाली- तू आलीस आमच्या बरोबर, तुला वाऱ्यावर कसे बरे सोडू आम्ही.
या पुढे अशी उपकाराची भाषा अजिबात बोलायची नाही. तू मेहनती आहेस, अभ्यासू आहेस, प्रयत्न करीत रहा.
आमचे आशीर्वाद आहेतच.
आजोबांचा फोन वाजला, त्यांनी हॅलो म्हटले,
पलीकडून अंजलीवहिनी बोलत होत्या,
म्हणाल्या..
मी सारखा ट्राय करते आहे, पण आईंचा फोन लागत नाहीये, म्हणून तुम्हाला केला शेवटी फोन.
आजोबा म्हणाले - एक काम कर,
तू आईशीच बोल..
यशच्या आई अंजलीवहिनीशी बोलू लागल्या..

"सॉरी अंजली, आग माझा फोन समोरच आहे, रिंग पण नाही वाजली, मला वाटते इथे रेंज प्रॉब्लेम आहे,
बरे बोल ..
अंजलीवहिनी सांगू लागल्या-
अहो आई, आज मिटिंग खूप वेळा झाल्या,
सुटका होईल की नाही याचीच काळजी वाटत होती
थँक गॉड, आता आम्ही दोघेही फ्री झालोत,
सकाळी आम्हाला चौधरी काकांचा फोन आला, म्हणत होते
सगळे येणार आहेत आज, तुम्ही पण या
संध्याकाळी
मिटिंग आणि वर्क लोड मुळे मी येईन असे म्हणाले नव्हते, उगीच वाट पाहायला लावणे बरे नाही.
आता मला सांगा, आम्ही तासाभरात तिकडे
आले तर चालेल का ?
मग जातांना आपण मिळूनच घरी जाउया.
यशच्या आई म्हणाल्या -
अरे वा, बरेच झाले की,
या या तुम्ही, आपले सगळे घरच आज इथे आहे.
फोन ऑफ करीत आई चौधरिकाकांना म्हणाल्या..
सुधीरभाऊ आणि अंजलीवहिनी आता फ्री झालेत, तुम्हाला नाही " कसे म्हणायचे ?
म्हणून घरी न जाता आता तासाभरात येत आहेत इथे.
काका -काकू दोघांनाही खूप आनंद झाला.
त्यांच्याकडे पाहत मधुरा म्हणाली--
चौधरिकाका, असा योग नेहमी नेहमी येत नसतो.
या मंडळींना आपण रात्रीचे भोजन केल्यावर पाठवू या,
आपल्या गच्चीवर करू चांदण्यात भोजन.
आम्ही चौघी मिळून सगळं करतो.
चालेल का ?
आजोबा म्हणाले -
मधुरा - आज चौधरी फमिलीला त्यांच्या इच्छेनुसार वागू द्याचे असे ठरवूनच आलोय,
आता त्यांनी सांगावे ,आम्ही ऐकावे..
चौधरिकाका म्हणाले..
मधुरा ..मोजकाच पण छान स्वयंपाक करा.
आजोबांच्या रोजच्या वेळी आपल्या सर्वांची जेवणे होतील..
आणि मग .
आजी म्हणाल्या..
ही मधुरा, आपल्याला छान गाणी ऐकवेल
त्यानंतरच आपण जायचे.
सर्वानुमते हा कार्यक्रम ठरला..
यश विचार करू लागला..
मधुरा गाणे पण म्हणते ..?
कमाल आहे या पोरीची ..
---------------------------
बाकी पुढच्या भागात
भाग - 27 वा
लवकरच येतो आहे
------------------------------
कादंबरी - प्रेमाची जादू
ले- अरुण वि.देशपांडे- पुणे.
9850177342
------------ ------------------