( भाग 10 )
क्षणभरात सर्व शांतता पसरली. मग मी थोड्या वेळाने त्याला समजावलं आणि विश्वास दिला, तुला काहीच त्रास होणार नाहि याचा ! मग तो सांगु लागला, ती मला खुप आवडायची, ती सतत कोणाला तरी मदत करत असायची, तिच्या अशा वागण्याने तिचे सौंदर्य अजून खुलून दिसायचं. एकदा मी ठरवलं आज काहीही करून तिला आपल्या मनातील भावना व्यक्त करून दाखवायच्या ! ती त्या दिवशी क्लास मधून निघाली, मी तिला पुढे जाऊन दिले आणि मग मी तिच्या मागून निघालो. ती पुढे जात होती पण सतत मागे, इकडे, तिकडे बघत होती. मग मीच थोडा पुढे गेलो आणि तिला थांबावलं. ती मला बघून का खुश झाली होती ते कळत नव्हतं. नंतर आम्ही दोघे गप्पा करत निघालो. तितक्यात जोरजोरात कोणीतरी हॉर्न वाजवत असल्याचे जाणवले पण ती बोलली मागे बघू नको. मला थोड संशयास्पद वाटत होतं तितक्यात आमच्या समोर एक गाडी आडवी आली. गाडीमध्ये जो मुलगा गाडी चालवत होता त्याने मला इशारा करून पुढे बोलवलं आणि मी गेलो, मी एकदा तिला मागे वळून बघितल तर ती वेगात जात होती. तितक्यात मला समोर बघ ! अस आवाज आला. मी बघितलं तर समोर गाडी मध्ये असणारा मुलगा मला तिच्याबरोबर पुन्हा दिसायचं नाहि अशी धमकी देऊन निघून हि गेला.
मला तिचा खुप राग आला होता कारण तिच असं काही असेल अस कधी वाटलं नव्हतं. मी ठरवलं हिच्या पासून दूर राहायचं. दुस-या दिवशी क्लास मध्ये मी तिच्याकडे बघितलं ही नाहि पण ती सतत बोलण्याच प्रयत्न करत होती हे समजलं. काही वेळातच क्लास झाला आणि ती बाहेर गेली. मी थोड्या वेळात गेलो. नंतर मला पुन्हा त्या मुलाची गाडी दिसली पण ती माझ्या जवळ न थांबता तिच्याजवळ थांबली. हे सर्व बघून मी रस्ता बदलून पुन्हा क्लास मध्ये गेलो. हे सर्व बोलून तो खुप रडू लागला. तो पुढे बोलत होता, त्या दिवशी मी तिच्या तिथे गेलो असतो किंवा तिच बोलण ऐकून घेतलं असतं तर मी तिला वाचवू शकलो असतो. आता स्वतः रडत स्वतःला मारू लागला. मी त्याला थांबवल आणि पुढे मदत करणार का विचारलं ? आणि त्याने हि लगेच होकार दिला. मी त्याला विचारलं तु त्या गाडीवाल्या मुलाला ओळखशील का ? हे विचारल. तो बोलला हो, मग मी त्याला त्या मुलाचं चित्र तयार करण्यासाठी घेवून गेले. तो वर्णन जितक जमेल तितक करत होता. खूप जास्त प्रयत्न करून आठवत होता आणि सांगत होता. शेवटी चित्र पुर्ण झालं आणि मला बघण्यासाठी बोलवलं. चित्र पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी त्या मुलाला हे खरं वर्णन आहे का ? असं सतत विचारत होते. तो ठाम होता. मी त्याला तारीख कोणती होती आठवायचं प्रयत्न कर बोलले. त्याला तारीख माहित नव्हती पण दोन महिने झाले असेल असं बोलला. मला आता सर्व कळलं होतं. मी त्या मुलाला जाण्यासाठी सांगितले.
काल सारखे आता मला नव-याचे फोन येऊ लागले. मी फोन उचलयाचे नाहि असं ठरवलं. आज काहीही झालं तरी आईला भेटायचंच होत. मी गाडी घेवून गावाला निघाले . गावामध्ये जे घर होत त्याला पण लॉक ! आता मला मदन आणि आईची खुपच काळजी वाटू लागली. हे खरचं सुरक्षित असतील ना हे विचार करून डोक जड झालं. मी तिथे चौकशी केली पण ते तिथे आलेच नाहि असं समजलं. आता मी गाडी घेवून पोलिस स्टेशनला गेले. ईथे एक दोन ऑफीसरला आई बद्दल आणि मदन बद्दल सर्व सांगून त्यांचा शोध घेण्यास सांगितले. नव-याचे फोन चालुच होते म्हणून मी एक मॅसेज पाठवला - ' मी केस संदर्भात बाहेर चालले, दोन दिवस बाहेरच असणार !' काही प्रत्युत्तर येण्याआधीच फोन बंद करून ठेवून दिला आणि मी आईच्या शहरातल्या खोलीवर गेले. आई आणि मदन कुठे असतील ? काही कळत नव्हतं.आमचे कोणी नातेवाईक ही इथे नाहि मग कुठे जाणार. आम्ही खोलीवर पोहचलो, घराला कुलूप होतं पण आता आतमध्ये जाऊन बघणं गरजेचे होतं. मग एकाने कुलूप फोडला आणि आम्ही आतमध्ये गेलो. सर्व जागच्या जागी होतं, संशयास्पद काहीच नव्हतं तरीपण आम्ही सर्व घर व्यवस्थित बघून घेतलं. तेव्हा कॅलेंडर वर आई ज्याच्याकडे कामाला जायची त्याचा फोन नंबर मिळाला, मी त्यावर फोन केला तर नंबर बंद होता. मग मी सर्वांना घेवून त्याच्या घरी गेले.दरवाजाची बेल वाजवली आणि त्यानेच उघडला. तो मला बघून विशेषतः माझ्या वर्दीमध्ये बघून थरथरत होता. याला काहितरी माहित असावं याची खात्री झाली. माझे सहकारी घरात जाऊन तलाशी घेवू लागले, हा ईतका घाबरला की 'सतत मी काही नाहि केले, सर्व सांगतो असं बोलायला लागला. ' मग मी त्याला माझ्या समोर खुर्चीवर बसवलं आणि एक आय.पी. एस. ची नजर दिली तसं त्याने पाय धरून बोलायला सुरूवात केली. तो बोलू लागला,' मला माफ करा, तुमच लग्न एक कारस्थान होत, सर्व ठरवून झालं होत. तुमचे सासरे त्यांचे गुन्हे लपवण्यासाठी माझ्याकडे आले होते तेव्हा तुमच्या आईला त्यांनी इथे बघितले आणि त्यांच्या मोठ्या मुलाचे आधीच एक लग्न झालं असून तुम्हाला फसवायला सांगितले. नंतर मी तुमच्या आई समोर त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व बोललो आणि तुमची आई माझ्यावर असणा-या विश्वासामुळे तयार झाली, जर तुमच लग्न उशीरा झालं असतं तर त्यांची केस तुम्ही लवकर सोडवली असती म्हणून त्यांनी मुद्दामहून घाई करून लग्न केलं आणि नंतर ही एक महिना तुम्हाला रजा घ्यायला लावली. एक आठवड्यानंतर तुमची आई घरामध्ये काम करत होती तेव्हा तिने माझ आणि तुमच्या सास-याचा सर्व बोलण ऐकलं. लगेचच तुमच्याकडे सांगायला निघाल्या होत्या म्हणून तुमच्या सास-याने आई आणि मदन दोघांना एका खोलीवर ठेवलं आहे !' मला हे सर्व अनपेक्षित होतं, मला असं अडकवलं होतं, आता यांना कोणालाच सोडणार नव्हते. आधी या माणसाला घेवून आई आणि मदनला सोडवण्यासाठी घेवून गेले.
आईला आणि मदनला एका खोलीमध्ये बंद करून ठेवलं होत, आम्ही तिथे गेलो. आई ने मला बघितलं, तोंडावर पट्टी असूनही ती मला काही तरी सांगायला लागली. मी जवळ जाऊन आईची पट्टी काढली आणि बाकीच्यांनी मदनला सोडवले. माझी आई मला मिठी मारून रडत होती आणि बोलत होती माझ्या मुलीला मी फसवलं. मी तिला शांत केल आणि तिला सर्व नंतर बोलू आधी आपल्याला गुन्हेगारांना पकडायचं आहे असं समजावलं. आईच्या मालकाला गुन्ह्याला प्रोत्साहन दिल्याबद्दल आधीच अटक केली नंतर आम्ही सर्व माझ्या सासरी गेलो.सासर बोलण्याच्या लायकीच राहिले नव्हते पण बोलावं लागलं. तिथे सासरची माणसं हवी होती तर तिथे गुन्हेगारांची टोळी झाली होती. मी तिथे गेले तर एक सुन म्हणून नाहितर एक आय.पी. एस. ऑफीसर म्हणून गेले. पोहचल्याबरोबर सासरा समोर उभा होता पण हा दुसरा गुन्हेगार होता मला प्रमुख गुन्हेगार हवा होता जो एक बलात्कारी होता, एक निरागस मुलीचा जीव घेतला आणि त्या गुन्हेगारीला लपवण्यासाठी दुस-या मुलीला आधीच लग्न झालेल्या मुलाच्या गळ्यात बांधली आणि तितक्यात त्या नराधमाने प्रवेश केला. माझा संयम आता संपला होता मग आता तो आल्याबरोबर मी एक अशी जोरदार लाथ मारली की तो माझ्या समोर आडवा झाला. मला त्याचा तिथेच जीव घ्यायचा होता पण गुन्हाची कबुली पाहिजे होती.
मी दोन तीन लाथा मारल्या त्याच्या, मी हे कधीच विसरून गेले होते की हा माझा दिर आहे कदाचित त्याच रागात मी त्याला पटापट गुन्ह्याची कबुली दे बोलले. तो सर्व सांगु लागला,'मला ती मुलगी आवडायची, मी तिला ब-याचदा विचारलं पण ती माझ्याकडे बघायची नाही, एकदा तर तिचा मित्र आमच्यामध्ये येतोय असं वाटलं म्हणून मी त्याला धमकावून लांब केल, याचा तर तिला राग आला तिने माझ्या कानाखाली लावली मग मी ठरवलं आता हिला सोडायचं नाहि, मी तिला गाडीमध्ये ओढलं एक आठवडाभर तिला सर्वांपासून लपून, डांबून ठेवलं. कोणालाच ती सापडणार याची काळजी घेतली पण नंतर मला, माझ्या मित्रांना मोह आवरला नाहि आम्ही तिच्या शरीरावर तुटून पडलो, आम्ही भान हरपलो होतो जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा तिची शुद्ध हरपली होती मग आमचा नाईलाज होता, आम्ही तिला एका ठिकाणी फेकून दिले. मी केलेलं सर्व बाबांना एका पोलिसाकडून समजलं मग इज्ज़त वाचवण्यासाठी त्यांनी तुमचं लग्न दादाबरोबर लावलं, माझ्या वहिनीला गावाला पाठवून ! तुमच्या आईला हे सर्व समजलं मग आम्हीच तिला गायब केलं.' हे ऐकताच मी माझी बंदूक बाहेर काढली, मी चालवणारचं होते तितक्यात आईने अडवलं आणि बोलली,' आधी याला त्या मुलीच्या आई बाबा समोर उभे कर मग ते ठरवतील काय करायचं!' माझ्या नव-याला एक पत्नी असून दुसरा विवाह केल्याबद्दल एक वर्षाची कोठडी तर, सासू आणि सास-याने गुन्हेगाराला लपवून ठेवून अजून एक निरागस मुलीच आयुष्य उध्वस्त केल्यामुळे दोन वर्षाची कोठडी तर एक निरागस मुलीवर अत्याचार करून जीव घेतल्यामुळे फाशीची शिक्षा सुनावली गेली. आज मी दुःखी नव्हते तर खुप आनंदी होते, आज मी एका मुलीला न्याय मिळवून दिला. काकांच आणि माझं राहिलेल स्वप्न पुर्ण केलं. सकाळी पेपरमध्ये पहिल्याच पानावर फक्त आणि फक्त माझीच बातमी !
आणि त्याच्यासोबत ही माझी मुलाखत ! धन्यवाद !!