Sant Shrestha Mahila Part 18 in Marathi Spiritual Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | संतश्रेष्ठ महिला भाग १८

Featured Books
Categories
Share

संतश्रेष्ठ महिला भाग १८

संतश्रेष्ठ महिला भाग १८

यातील माहिती घेऊ संत अक्कमहादेवी यांची

अक्का महादेवी ह्या वीरशैव धर्माशी संबंधित एक प्रसिद्ध महिला संत होत्या .
कन्नड साहित्यात त्यांचे काव्य भक्ती करण्यासाठी मानले जाते .
अक्का महादेवी यांनी एकूण सुमारे ४३० श्लोक सांगितले होते
जे इतर समकालीन संतांच्या शब्दांपेक्षा कमी आहेत.
त्यांना बसवा , चेन्नई बासावा, किन्नरी बम्मैय्या, सिद्धार्थ, आलमप्रभू आणि दासीमैया अशा वीरशैव धर्माच्या इतर संतांनी उच्च स्थान दिले होते . ‘माझ्या शरीरावर माझा हक्क’ असे म्हणणारी ही संत कवयित्री. ह्या बाबतीत तिचे मीरेशी साधर्म्य आहे.
मलंगपण स्वीकारले की मग कसली फिकीर?

ह्या संत स्त्रीचे लिंगायत पंथात अद्वितीय स्थान आहे.
दक्षिणेतल्या विद्रोही साहित्याची परंपरा जेथून सुरु होते
ते ‘वचन साहित्य’ म्हणजे बसवेश्वर व अक्का महादेवी ह्यांच्या वचनांचा संग्रह आहे
बाराव्या शतकातील प्रख्यात कन्नड़ कवियत्री- अक्का महादेवी एक परम शिवभक्त होत्या .
पिता निर्मल शेट्टी और माता सुमतीच्या सुपुत्री असलेल्या अक्कमहादेवी यांचा जन्म
शिवमोग्गा जिल्ह्यातील शिकारीपुर तालुक्याच्या उद्रुतडी एका गावात साधारण ११३० ईसवी मध्ये झाला.
त्यांचे माता-पिता शिव भक्त होते .
१० वर्षे वयातच महादेवी यांनी शिवमंत्र दीक्षा मिळवली होती .
अक्का यांचे वडील श्री निर्मल यांनी संस्कृत शिकवले होते.
धार्मिक संस्कारांनी तिच्यापासून सामर्थ्य प्राप्त केले, तिची आध्यात्मिक उत्सुकता तिच्या मनात रुजली,
तिने यावर संशोधन करण्याचे ठरवले आणि परिणामी ती भक्ती, आध्यात्मिक अभ्यास आणि योगाभ्यासात गुंतली..
त्या एका लहान मुलीने वडिलांना आश्वासन दिले की
ती आजीवन ब्रह्मचारिणी राहील , भगवंताची उपासना आणि सामाजिक सेवेत काम करून आपला धार्मिक अभिमान वाढवेल.

त्यांनी स्वरचित अनेक कवितामध्ये भगवान शिव यांचे सजीव चित्रण केले आहे .
त्या प्रभुची सगुण भक्ति करत असत .
भक्ति भावाचे चार प्रकार असतात .
दास , सखा, वात्सल्य, आणि माधुर्य भाव
महादेवी यांच्या जवळ आपल्या दैवता बद्दल माधुर्य भक्ति होती .
त्या भगवान शिव यांना “चेन्नमल्लिकार्जुन” अर्थात “सुन्दर चमेलीच्या फुलाप्रमाणे श्वेत, सुन्दर प्रभु !”
असे संबोधित करत.
त्यांनी भगवान शिव यांनाच आपले पति मानले होते .
उत्तर भारतातील भक्तिमति मीराबाईच्या कृष्ण-प्रेमा सारखीच महादेवी यांची भगवान शिवावर प्रीती होती.
त्यांचे वैवाहिक जीवन सुद्धा थोडेफार मीराबाईच्या जीवना सारखेच होते .
तारुण्यात अक्कमहादेवी अत्यंत सौंदर्यवती होत्या .
त्यांचे सौंदर्य त्यामध्ये अनन्य होते, त्यावर तेज आणि पुण्य यामुळे झळाळी आली होती .
त्यांच्या सौंदर्याची तुलना राजकन्यांशी केली जाऊ लागली.

कर्नाटकचा तत्कालीन राजा कौशिकला जेव्हा अक्का महादेवीच्या अनोख्या सौंदर्याबद्दल कळले तेव्हा त्यांच्या रुपावर मुग्ध झाले .
त्याने तिच्यासोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला.
सामान्य लोक हे अक्कामहादेवीचे मोठे भाग्य आहे मानत असत .
परंतु अक्कामहादेविंनी हा मोह ईश्वराच्या उपस्थितीत अनुभवला.
त्याकडे विचारपूर्वक पाहिले - जगत्व आणि धार्मिक सेवा दोन्ही एकत्र काम करू शकत नाहीत.
आपल्या संस्कृतीत जीवदान द्यायचे असेल तर सांसारिक सुख वाढवता येणार नाही.

माता पिता दोघांना अक्कमहादेवी यांनी भक्ति-मार्गावरच आपली प्रगती करावी असे वाटत होते .
अक्कमहादेवी यांचा विवाह त्यांना करायचा नव्हता .
त्याने अक्काच्या आई-वडिलांना बंदिवान केले व पुन्हा एकदा निरोप पाठविला.
"आता संबंध स्वीकार कर नाहीतर तुझे आईवडील मारले जातील." "

राजाच्या धमक्यांना घाबरून आणि विवश होऊन अखेर अक्कमहादेवी यांनी होकार दिला .
आईवडिलांनी अक्कमहादेवी यांचा विवाह राजा कौशिकसोबत करून दिला .
अक्कामहादेवी तर मनाने पुरेपूर फक्त आपल्या “चेन्नमल्लिकार्जुन” च्या आराधनेमध्ये रहात ज्यांना त्या आपला पती मानत होत्या .
राजा कौशिक अनेक प्रकारे प्रयत्न करून अक्कमहादेवी यांच्या समोर आपले प्रेम प्रकट करत.
परंतु त्यांचा प्रत्येक प्रयत्न विफल होत होता .
अक्कमहादेवी राजाला आपल्या जवळ येऊ देत नव्हत्या .
त्या फक्त इतकेच सांगत राहिल्या कि माझे पती तर “चेन्नमल्लिकार्जुन” आहेत .
अक्कमहादेवीचे हे वागणे राजाला बिल्कुल पसंत नव्हते .
आपल्या पत्नीच्या मुखातून कोणा परक्या व्यक्तीचे नाव येणे आणि तिने त्याला पति संबोधणे
ही गोष्ट राजाला क्रोधित करीत होती .
त्या काळात असे आचार-विचार अपराधजनक होते .
अक्कमहादेवीने राजाशी लग्न तर केले, परंतु त्याला शारीरिकदृष्ट्या दूर ठेवले होते .
एक दिवस राजाच्या मनात असा विचार आला की अशा बायकोला जवळ ठेवण्यात काही अर्थ नाही.
एखाद्या अदृश्य आणि अज्ञात व्यक्तीशी लग्न केलेल्या अशा बायकोसह कोणीही कसे जगू शकते.
त्या दिवसांमध्ये औपचारिक घटस्फोट नव्हता
आता मात्र राजा अस्वस्थ होऊ लागला.
काय करावे हे त्याला समजेना .
या विषयावर निर्णय घेण्यासाठी राज्य-सभा बोलावली गेली .
त्याने अक्कमहादेवीला आपल्या राज्यसभेत बोलावून घेत राज्याला याचा निर्णय घेण्यास सांगितले.
जेव्हा सभेत अक्कमहादेवी यांना विचारले गेले तेव्हा ती म्हणाली की तिचा नवरा कुठेतरी आहे.
राजा आणखीनच संतापला, कारण इतक्या लोकांसमोर त्याची बायको म्हणत होती
की तिचा नवरा कोठेतरी आहे.
आठशे वर्षांपूर्वी एखाद्या राजाला हे सहन करणे सोपे नव्हते.
समाजात अशा गोष्टींचा सामना करणे कठीण होते .
राजा म्हणाला, "जर तू कोणाशी लग्न केले असशील तर तू इथे काय करीत आहेस?
जा निघून येथून .
राजाच्या आदेशावरून अक्का महादेवी निघून गेली.
राजाने पाहिले की अक्कमहादेवी त्याला कोणताही त्रास न देता सोडत आहे,
तो भडकला आणि म्हणाला, “तू जे काही घालतेस, दागदागिने, कपडे, सर्वकाही माझे आहे.
हे सर्व इथेच ठेव आणि मग जा.
"सतरा-अठरा वर्षांची तरुण मुलगी अक्का महादेवीने तिचे सर्व कपडे,कपडे काढून ठेवले
आणि तेथून नग्न चालण्यास सुरु केले .
आणि मग त्या दिवसानंतर कधीच कोणतीच वस्त्र-आभूषण अंगावर घातली नाहीत .

चेन्नमल्लिकार्जुनची प्रिया अक्कमहादेवीने आपला देह आपल्या लांबसडक केसांनी झाकला आणि
राजमहालातुन बाहेर पडली .
त्या दिवसापासून अक्का महादेवीने कपडे घालायला नकार दिला.
बर्‍याच लोकांनी त्यांना कपडे घालावे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला, कारण यामुळेच त्यांना त्रास होऊ शकतो, परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही.

निर्वस्त्र अक्कमहादेवी ला समाजाकडून खुप दुषणे मिळाली .
समाजाने त्यांना खुप अडवले पण त्यांनी एक ऐकले नाही .
त्या हेच सांगत राहिल्या देवाला भेटायला वस्त्र काय करायची आहेत .
जंगले पार करीत अनेक प्रकारचा संघर्ष करीत समाजाची निर्भीकता व दृढ़ता याचा सामना करीत करीत
त्या कल्याणमंडप येथे पोचल्या .
कर्नाटक मध्ये बिदर जिल्ह्यातील हे नगर शिव-भक्तिचा प्रसिद्ध गड होता .
“अनुभव-मण्डप” मध्ये त्यांनी खुप दृढ़तापूर्वक आपले विचार मांडले .
बाराव्या शतकात जेव्हा स्त्री घराबाहेर पडत नव्हती .
त्यांना शिक्षण घेण्याची परवानगी नव्हती .
त्या काळात अक्कमहादेवी निर्वस्त्र सन्यासी होऊन आध्यात्मिक ज्ञानाच्या चर्चेत सहभागी होत होत्या .
त्यांच्या आध्यात्मिक विचारधारेला खुप प्रशंसा मिळाली .
बासव, अल्लमप्रभु, हे इतर संत पहिल्यांदा अक्कमहादेवी यांना समर्थन देऊ शकत नव्हते .
आणि त्यांच्या निर्वस्त्रपणामुळे अस्वस्थ होते .
अक्कमहादेवी च्या विचारधारेमुळे प्रभावित होऊन त्या सर्वांनी त्यांना आध्यात्मिक पथावर सहमति दिली .
आणि “अनुभव-मण्डप” येथे प्रवेश दिला .
त्यांचा साधेपणा , ईश्वर-निष्ठा , प्रेम, दृढ़ता व नम्रता यामुळे सर्व प्रभावित झाले .
त्यांना आता - “अक्का” सम्बोधन अर्थात “बड़ी दीदी” या नावाने सम्मानित केले गेले .
अशा प्रकारे त्या “अक्का महादेवी”बनल्या .

कल्याणमंडप येथे काही काळ राहिल्यावर त्यांनी संत व अन्य भक्त यांच्यात आध्यात्मिक उन्नति केली .
काळानुरूप त्यांना जाणीव झाली की भगवंत-मिलनामध्ये
फक्त जिज्ञासा, आत्म-ज्ञान व संयम इतकेच पुरेसे नाही.
भगवंतासोबत एक होण्यासाठी निष्काम प्रेम व अनन्य श्रद्धा-भक्ति आवश्यक आहे .
खुप तपश्चर्येनंतर सुद्धा त्यांचे भगवान “चेन्नमल्लिकार्जुन” बरोबर मिलन झाले नाही .
तेव्हा अल्लमप्रभु ची आज्ञा मिळाल्यावर श्रीशैल येथे निघून गेल्या .
श्रीशैल मध्ये भगवान चेन्नमल्लिकार्जुनचे मंदिर होते .
श्रीशैलच्या घनदाट जंगलामध्ये कदली नावाच्या स्थानावर एक गुफा होती .
अक्कमहादेवी यांनी या गुफेत आश्रय घेतला आणि एकाग्रचित होऊन तप केले .
तपाच्या प्रभावामुळे त्यांच्या अंतर्मनात निर्गुण-भाव प्रकट झाला .
आणि त्यांना सगळीकडे एकच भगवंताचा अनुभव झाला .
इतक्या लहान वयात त्यांना आत्म-अनुभव झाला .
“लिंगैक्य” अर्थात भगवान चेन्नमल्लिकार्जुन मध्ये त्यांचे एकाकार झाले .

या महान कन्नड़ कवियत्री ने आपल्या कविता भगवान चेन्नमल्लिकार्जुन सोबत
प्रेम व आध्यात्मिक कल्याण यावर लिहिल्या आहेत .
त्यांच्या कविता “वचन” या रुपात लिहिल्या गेल्या आहेत .
सहज भाषा आणि विचारांची गहनशीलता यामुळे आजही त्या कविता लोकांमध्ये प्रिय आहेत .
त्यांनी एकूण ४३० वचने कन्नड भाषेत लिहिली .
ज्यांचे कन्नड़ साहित्यात विशेष महत्त्व मानले जाते .
काही साहित्यीकांनी त्याचा इतर भाषेत अनुवाद केला आहे .
त्यांनी सतपुरुष संग यावर खालील वचन लिहीले आहे .

बिना संग होती नहीं उत्पन्न अग्नि’
बिना संग बीज होता नहीं अंकुरित,
बिना संग खिलते नहीं फूल,
बिना संग मिलता नहीं सर्वसुख,
चेन्नमल्लिकार्जुनय्या,
तुम्हारे महानुभवियों के संग से,मैं परमसुखी बनी। “

याशिवाय त्यांनी काही लघु कृति पण लिहिल्या आहेत .
जसे योगांग त्रिविधि, स्वर वचन, मंत्रगोप्य, सृष्टि के वचन इत्यादि।

अक्का महादेवी, बसव, अल्लमप्रभु यह भक्त लिंगायत धर्म या वीरशैव धर्माच्या अनुयायी होत्या .
समाजाच्या उन्नतिमध्ये आणि और लोकांमध्ये अध्यात्म गोडी वाढवण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले .

त्यांच्या म्हणण्या नुसार त्या फक्त नावाने एक स्त्री आहेत
परंतु त्यांचे शरीर, मन आणि आत्मा ही सर्व शिव आहेत .
अक्का महादेवी आयुष्यभर नग्न राहिल्या आणि एक महान संत म्हणून ओळखल्या गेल्या .
लहान वयातच त्यांचे निधन झाले.
परंतु अल्पावधीतच त्यांनी शिव आणि त्यांच्यावरील भक्तीविषयी शेकडो सुंदर कविता लिहिल्या .

क्रमशः

.