Kashi - 10 - Last Part in Marathi Moral Stories by Shobhana N. Karanth books and stories PDF | काशी - 10 - अंतिम भाग

Featured Books
  • स्वयंवधू - 31

    विनाशकारी जन्मदिन भाग 4दाहिने हाथ ज़ंजीर ने वो काली तरल महाश...

  • प्रेम और युद्ध - 5

    अध्याय 5: आर्या और अर्जुन की यात्रा में एक नए मोड़ की शुरुआत...

  • Krick और Nakchadi - 2

    " कहानी मे अब क्रिक और नकचडी की दोस्ती प्रेम मे बदल गई थी। क...

  • Devil I Hate You - 21

    जिसे सून मिहींर,,,,,,,,रूही को ऊपर से नीचे देखते हुए,,,,,अपन...

  • शोहरत का घमंड - 102

    अपनी मॉम की बाते सुन कर आर्यन को बहुत ही गुस्सा आता है और वो...

Categories
Share

काशी - 10 - अंतिम भाग

प्रकरण १०

 सकाळ पासून आजीची तब्येत नाजूकच वाटत होती. खोकल्याची उबळ आली कि थांबतच नव्हती. त्यामुळे तिला श्वास घ्यायलाहि फार जड वाटत होते. त्यामुळे डॉक्टरांनी तिला ऑक्सिजनवर ठेवले होते. आजी डोळे उघडून कोणाच्या तरी प्रतीक्षेत होती असे तिच्या चेहेऱ्यावरच्या हावभावावरून वाटत होते. म्हणून नर्सने फोन करून सरांना बोलावून घेतले.

 सर येताच तिच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता दिसली. "  आर तू असलास कि मला खूप धीर आल्यासारखा वाटतो. तू माझ्या बाजूलाच बसून राहा---माझं लक्षण काही ठीक दिसत नाही तरी सुद्धा ज्ञानूला पाहिल्या शिवाय मी डोळे मिटणार नाही---" 

 हे ऐकून नर्स म्हणाली " सर, हा ज्ञानू यांचा मुलगा आहे कां---त्यांचा सगळा जीव त्यांच्या ज्ञानूमध्ये अडकला आहे---"

 " आजीला असं तडफडत ठेवणंहि योग्य नाही तिची शेवटची इच्छा मला पूर्ण करायलाच हवी. तिला खरं काय ते आजच सांगायला हवे---परंतु ती मला सोडून जाईल हे दुःख मी पचवू शकणार नाही---किती वर्षांनी मला माझी काशी मिळाली आहे. वाटलं होत कि तिला मी बरं करेन---तिला नं मिळालेलं सुख तिच्या पायाशी लोळवीन---आयुष्यभर नाही पण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तरी तिची मला सोबत मिळेल असे वाटले होते---परंतु आमची जोडी नशिबाने बांधलेलीच नव्हती---बिचारीने किती सोसले आहे. त्या शेवंता बाईने तिचं तारुण्य पार कुस्कुरून टाकलं. आमची ताटातूट झाल्यावर बिचारी एकटी पडली होती. मी सुद्धा एकटा पडलो होतो. परंतु मला माझ्या नशिबाने साथ दिली. म्हणून तर मी बँकेत वाईस प्रेसिडेंट बनून रिटायर्डच्या नंतर हा आश्रम उभा करू शकलो. नाहीतर माझे सुद्धा हाल काय झाले असते याची कल्पना सुद्धा करू शकत नाही काशीच्या माय-बापूला  त्यावेळी काशीची किती चिंता लागून राहिली असणार---? त्या चिंतेतच ते आजारी पडून जीवाची हाय-हाय करून त्यांनी प्राण सोडला असणार---माझ्याही माय-बापूनी माझा किती शोध घेतला असेल---त्यांच्या म्हातारपणाला मी त्यांना आधार देऊ शकलो नाही. काशीची सुद्धा शिकायची आवड असूनही शिकू शकली नाही. आमची सारी स्वप्न पायदळी तुडवली गेली. खरंच, गरिबी हि फार वाईट आहे. मी आणि काशीने जे सोसलं ते दुसऱ्या कोणाही ज्ञानू-काशीच्या वाट्यास येऊ नये. काशीची पूर्ण कहाणी ऐकायला मिळाली नाही तरी मी तर्क लावू शकतो---जोपर्यंत काशी यौवनात होती तोपर्यंत शेवंता बाईने तिचा फायदा घेतला असणार. जस जसे यौवन सरत गेले तसे भांडी घासायला, जेवण बनवायला जुंपले असणार.---ते हि काम होईनासे झाल्यावर कुठेतरी रस्त्यात तिला फेकून दिले असणार---बिचारी भुकेने तडफडली असेल---थंडी-वाऱ्यात कुडकुडली असेल---उन्हा-तान्हात भीक मागत दिवस ढकलला असेल---हे सर्व कल्पनेच्या बाहेर आहे---" सर आजीकडे शून्य नजरेने एकटक बघत होते.  

   " सर--सर तुम्ही कुठल्या विचारांत गुंग झालात---? नर्स सरांना हलवत म्हणाली.

  सरांचे डोळे पाणावलेले होते. हे नर्सच्या नजरेतून चूकले नाही. आपल्या डोळ्यातील पाणी लपवण्यासाठी ते उठून बाहेर गेले. सर एवढे गंभीर का झाले---? या गोष्टीचे नर्सला आश्चर्य वाटले. सर आजपर्यंत आश्रमातील प्रत्येक वृद्धाशी मायेने बोलत असत. परंतु एवढे भावुक झालेले कधी बघितले नव्हते. म्हणून नर्सही सरांच्या पाठोपाठ गेली.

 " सर, तुमची तब्येत तर ठीक आहे नं---? कि डॉक्टरांकडे तुम्हाला घेऊन जाऊ---?

 " नाही---नाही, तसं काही नाही. जरा आज जुन्या आठवणी आठवल्या गेल्या. त्यामुळे मन जरा उदास झाले एवढेच---बाकी काही नाही.

 तेवढ्यात डॉक्टरही आले.त्यांच्या पाठोपाठ सरही आले. डॉक्टरांनी आजीला तपासले. त्याचवेळी आजीला खोकल्याची मोठी ढास लागली. तशी आजी धाप टाकत टाकत ज्ञानूचे नाव घेत होती. सरांना कळून चुकले होते कि काशी आता थोड्या क्षणाची सोबतीण आहे. सरांनी आजीला ढास लागल्याबरोबर तिला अलगद उचलून आपल्या बाहूत घेऊन थोडे बसवले. आजी जोर जोरात श्वास घेऊ लागली आणि उशीखाली ठेवलेला ताईत काढून दाखवू लागली. हे बघून सरांनी सुद्धा आपल्या खिशातून ताईत काढून काशीला दाखवला. " काशी , तुझा ज्ञानू मीच आहे---हा तुझा चिखलात पडलेला ताईत बघ---तुला खात्री होईल कि मीच तो ज्ञानू आहे---"

   " ज्ञा---नू---असे म्हणून आजीने आपल्या हाताने आपल्या ज्ञानूला चाचपडले---त्याला मिठी मारली---तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.    

   " तू केवढा मोठा झालास ज्ञानू---तू शिकून नाव कमावलेस---आपल्या सारख्या ज्ञानू-काशीला सहारा दिला.माझ्या सारख्या वृद्धांना छत्र दिले---केवढे मोठे काम केलेस ज्ञानू---आता हे आपल्या माय-बापूने बघितले असते तर त्यांना किती आनंद झाला असता---ज्ञानू, मी मात्र माझे शिकायचे स्वप्न पूर्ण करू शकले नाही. या मंजुळाने माझे स्वप्न चक्काचूर करून टाकले. माझ्या नशिबाने मला धोका दिला. ज्ञानू, आता मी तुला डोळेभरून बघितले---माझे हे स्वप्न देवाने पूर्ण केले---मी आता खुश आहे. माझा अडकलेला जीव आता मोकळा झाला. हा ताईत आता माझ्या गळ्यात बांध ज्ञानू---मी शांतीने डोळे बंद करेन--- असे म्हणून आजीने ताईत सरांच्या हातात दिला. त्यावेळी सरांनी त्यांच्या काशीला घट्ट मिठी मारली आणि लहान मुलाप्रमाणे ढळढळा रडू लागले आणि कित्येक वर्षाचे अडवलेले अश्रू मोकळे केले..तेवढ्यात नर्सने सरांना सावरले. सरांनी तो ताईत काशीच्या गळ्यात बांधला आणि कपाळाला कुंकू लावले. सरांनी काशीला आपल्या बाहूत बराच वेळ पकडून ठेवले होते. दोघांच्याही डोळ्यातून अश्रू वहात होते. तोपर्यंत आश्रमाचे सर्व सदस्य जमा झाले होते. हे सारे दृश्य बघून सर्वांचे डोळे पाण्याने भरून आले होते. काशीने मात्र आपल्या ज्ञानूच्या बाहूत आपला अडकलेला जीव कधी सोडून दिला कळलेच नाही. तिच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता दिसत होती. या आश्रमाला काशी नाव का दिले हे सर्वांना कळून आले. सरांची हि हृदयद्रावक प्रेम कहाणी बघून सर्वांना एक प्रकारचे कुतुहूल वाटत होते.

 तेवढ्यात आश्रमची सर्व मुलं आजी भोवती जमा झाली. चंदू आणि लक्ष्मी सरांच्या जवळ येऊन त्यांचा हात पकडून आजीकडे बघत होती. सरांनी चंदू व लक्ष्मीला जवळ घेऊन कुरवाळले. काशी जणू बोलत होती कि ज्ञानूसारख्या या चंदूला व काशीसारख्या लक्ष्मीला खूप शिकवून मोठं कर---त्यांच्या वाटेला मजदुरी आणून देऊ नकोस---हि बालमजदुरी आपल्या देशाची कीड आहे. ती संपूर्ण देशाचे भवितव्य पोखरून टाकणारी आहे-------