Yours is my friend - 3 in Marathi Women Focused by vidya,s world books and stories PDF | तुझी माझी यारी - 3

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

तुझी माझी यारी - 3

आज परत शनिवार होता ..अंजली शाळेतून येऊन अभ्यास करत बसली होती तेवढ्यात तिला आठवल की अरे उद्या तर ऑगस्ट चा पहिला रविवार म्हणजे उद्या फ्रेंडशिप डे आहे.. ह ..उद्या सरु नक्की येणार सरु साठी फ्रेंडशिप बॅंड घेऊन यायला हवं..तिने मम्मी ला आवाज देणून सांगितलं की ती दुकानात जात आहे .

मम्मी : अंजली लांब कुठे जात बसू नकोस इथल्याच त्या रफिक भाई च्या दुकानातून घेऊन ये ..आणि लवकर परत ये..

अंजली : हो मम्मी तिथेच जाणार आहे ..आणि लगेच येते.

रफिक भाई च जन्नत स्टोअर अंजली च्या घरा पासून जवळ होत काही ही लागलं की अंजली तिथून च आणत असे आणि रफिक भाई ला ती चांगलं ओळखत ही होती ..त्यामुळे ती नेहमी त्यांच्या च शॉप मध्ये जात असे.अंजली पैसे घेऊन शॉप मध्ये आली पणं आज तिथे रफिक भाई नव्हते कोणी तरी दुसरा च मुलगा होता..

मुलगा : क्या चाहिए ?

अंजली : फ्रेंडशिप ब्यांड दिखा ओ..आज रफिक भाई का हा गये ?

मुलगा : जिजाजी घर गये खाना खाने..

तो मुलगा आल्या पासून अंजली ला सारखं घुरुन घुरुन पाहत होता अंजली ला थोड विचित्र वाटलं पणं तिने तो विचार झटकला व त्याला ब्यांड दाखवायला सांगितलं ..तिथे इतर गिऱ्हाईक ही होते ..अंजली आधी येऊन ही तो तिच्या कडे दुर्लक्ष करून इतरांना आधी साहित्य देत होता..

अंजली : कबसे खडी हुं ? पेहले मुझे दिखा ओ बाद में दुसरो को जो चाहिए दो.. तब तक में ब्यांड पसंद कर लेती हुं..

त्या मुलाने ही मग अंजली ला एक बॉक्स काढून दिला पणं बॉक्स ठेवताना त्याच्या हातचा ओझरता स्पर्श अंजली च्या हाताला झाला ..अंजली ला वाटलं चुकून झाला असेल म्हणून तिने दुर्लक्ष केलं..अंजली एक एक पाहत विचार करत होती सरु ला कोणत छान दिसेल तो पर्यंत दुकानातील गर्दी ही कमी झाली होती ...अंजली ने दोन ब्यांड हातात घेतले व त्यातील एक कोणतं तरी ठरवत होती तेवढ्यात त्या मुलाने ब्यांड घेण्याच्या नादाने पुन्हा तिच्या हाताला स्पर्श केला..

मुलगा : अरे मॅडम ये लिजिये ये ज्यादा आच्छा हैं..

अंजली ने पटकन आपला हात मागे घेतला व त्याला थोड रागात च बोलली ..

अंजली : मैं खुद देख लूंगी..

तिने पटकन एक ब्यांड पसंद केलं व त्याचे पैसे दिले ..उरलेले पैसे घेताना पुन्हा त्या मुलाने डायरेक्ट अंजली चा हात पकडला ..त्या सरशी अंजली जोरात त्याच्या एक कानसुलीत ठेवून दिली..

अंजली : तुम्हे पढ ना आता हैं क्या ? रागात तिने त्या मुला ला विचारले ?

तो तर गालावर चपराक बसलेल्या च धुंदीत होता अजून एक हात गालावर ठेऊन तो भित भित च हो बोलला..

अंजली : तो देखो .. उधर क्या लिखा हैं ?

अंजली ने दुकानात लावलेल्या एका पोस्टर कडे बोट दाखवलं ?

त्यावर लिहल होत ग्राहक भगवान का रूप होता हैं..

अंजली : ग्राहक भगवान का रूप होता हैं..अस वागतात का मग भगवान सोबत ? लाज नाही वाटत का ? मगा पासून बघितली तुझी नाटक ..वाटलं चुकून झालं असेल पणं तुला तर खूपच फोर्स चढला की लगेच ? असच करत राहिला तर कोणी सुद्धा तुमच्या दुकानात येणार नाही.. रफिक भाई येऊ देत मी त्यांना तुझं नाव सांगणार आहे..अंजली च्या आवाजाने थोडी फार गर्दी जमली होती ..मुलगा तर खजील होऊन खाली मान घालून उभा होता.. तेवढ्यात अजून एक मुलगी तिथे येऊन बोलली..

मुलगी : अंजली दीदी छान केलंस ..या ने सकाळी माझा ही हात धरला होता..आणि मुली दुकानात आल्या की असच करतो हा..नालायक ..शी..

आता इतर लोक ही त्याला ओरडू लागले..
ती मुलगी अंजलीच्या शेजारची च होती पूर्वा .. अंजली ने सगळ्यांना शांत करून घालवलं ..तेवढयात रफिक भाईही आले अंजली पूर्वा सोबत जाऊ लागली होती रफिक भाई तिला पाहून बोलले ..

रफिक भाई : अरे दीदी आप ..कुछ लेने आयी थी क्या ?

अंजली : रफिक भाई आपके दुकान मे ऐसें लोग होंगे तो मैं फिर आपकी दुकान मे नही आउगी ..

रफिक भाई : अरे दीदी क्या हूआ?

अंजली : आपके इ स..नये काम वाले से ही पूछ लो..
इतकं बोलून अंजली तिथून निघून जाते घरी आल्यावर अंजली मम्मी ला दुकानात ला प्रकार सांगत नाही सांगितलं तर मम्मी ओरडे ल .. व कशाला भांडत बसली स हे ही बोलेल हे तिला चांगलं माहित होत ..त्यामुळे तिने गप्प राहणंच पसंत केलं .

दुसऱ्या दिवशी अपेक्षे प्रमाणे सरु खरच घरी आली .. हा मग अंजली तिला ओळखत च होती ना तितकं ..

अंजली : हा मला माहित होत तू येणार म्हणून मी ही कालच ब्यांड आणून ठेवलं ..

सरु : खरंच ? बघू ना ..

अंजली : नाही आधी तुझं दाखव ..

सरु मग तिने आणलेलं ब्यांड अंजली च्या समोर धरते..अंजली लगेच ते तिच्या हातून घेते व खूप उस्तुक्तेने बोलते..

अंजली : वा सरु हे किती छान आहे ? कुठे मिळालं तुला हे ..मस्त यावरची डॉल तर किती छान आहे यार..मस्त सरु मला खूप आवडल..

ते ब्यांड कलरफुल होत आणि त्याच्या मधोमध एक अंगठ्याच्या आकार इतकी छोटी डॉल होती ..अंजली ला डॉल खूप आवड त होत्या म्हणून च सरु ने शोधून आणल होत ते स्पेशल ..

सरु खुश होऊन बोलली..

सरु : अंजली आवडल तुला ?

अंजली : हो खूप ..घाल ना माझ्या हातात ..

सरु ने ते अंजली च्या हातात घातलं अंजलीच्या गोऱ्या हातावर ते फार शोभून दिसत होत ..

अंजली : सरु मी शोधलं पणं मला इतकं छान नाही भेटलं ..अस म्हणत ती आपल्या बॅग जवळ गेली व त्यातून तिने ते मण्यांच ब्यांड काढलं त्यावर बेस्ट फ्रेन्ड अस लिहलेले होते ते सरु च्या हातात घातलं .

सरु : अग हे पणं खूप छान आहे ..

मग त्यांनी एक मेकिना हँन्ड शेक करत हॅपी फ्रेंडशिप डे विश केलं व हसून मिठी मारली .

अंजली : पणं तुला माहित आहे का ? हे आणायला गेल्यावर किती रामायण झालं ..

सरु : का काय झालं ? परत भांडली स का कोणा सोबत ?

अंजली ने थोड डोळे रोखून तिच्या कडे पाहिलं ..

अंजली : म्हणजे तुला काय म्हणायचं आहे ? मी भांडते का सर्वांन सोबत?

सरु : अग तस्स नाही ...म्हणजे मी असच म्हटलं बर सांग काय झालं ?

अंजली कालचा प्रकार सरु ला सांगते ..

सरु : बापरे किती नालायक मुलगा आहे ,हात धरला ? शी .. पणं अंजली तू कशाला त्याला मारल त्याने काही केलं तर पुन्हा ?

अंजली : अग मग काय त्याला हात धरायला देऊ ?

सरु :तू कशी ग इतकं डेअरिंग करते ? मला तर फार भीती वाटते असल्या सगळ्या प्रकाराची ..

अंजली : भिवून कसं चालेल पण सरु ? अस भित राहिलो तर लोक जगणं मुशकील करतील आपल ..

सरु थोडी चुळबुळ करत होती तिच्या हातात अजून काही तरी होत ते अंजली ला कळलं ..

अंजली : सरु काय झालं ? अजून काही आणल आहेस का ?

सरु : हो ते ..हे अजून एक ब्यांड आहे अस म्हणत सरु ने आपल्या हतातल ब्यांड अंजली ला दाखवलं ..

अंजली ते पाहून बोलली ..

अंजली : अग दोन दोन कशाला ? एक बस ना ?

आता सरु आपल्या एका हाताने कानाच्या मागे खाजवत व थोडी जीभ चावत च बोलली ...

सरु : अंजली... ते केशव ने दिलं आहे तुझ्या साठी त्याला.. तुझ्या सोबत फ्रेन्ड शिप करायची आहे

अंजली आता थोडी रागात तिच्या कडे पाहत होती व सरु आपली जीभ चावत होती .

अंजली : आणि तू घेऊन आलीस ?

सरु : अग त्याने खूप रिक्वेस्ट केली मग मला त्याची दया आली ..मग बोलले मी देते ..

अंजली : तू काय पोस्ट बॉक्स आहेस का ? की पोस्टमन ? बर जाऊ दे ..दे माझं मी बघते.

सरु ने ते अंजली ला दिलं ..नंतर दोघींनी मिळून गप्पा मारल्या व थोडा वेळ टीव्ही पाहिलं ..अंजली ची मम्मी शेजारी गेली होती ..त्यामुळे अंजली ने चहा बनवला सरु व तिने चहा पीत पितच फरसाण खाल्ला .

सरु : अंजली मी जाते आता मम्मी येईल ..शेजारच्या काकू च्या शेतात कामाला गेली आहे..

अंजली : बर पणं थांब मी ही येते तुझ्या सोबत जन्नत शॉप पर्यंत काल फक्त तुझ्या च साठी फ्रेंडशिप बॅंड घेतलं ..आता बाकी निशा.रेखा यांच्या साठी ही घ्यायला हवं ना ? नाही तर उद्या त्या माझं डोकं खातील ..सरु एकटी झाली म्हणजे झालं का म्हणून ?थांब ह मम्मी ला सांगून येते ..अंजली मम्मी ला सांगून येते व घराला कडी लावून सरु सोबत दुकानात जाते ..

सरु : अंजली काल भांडली स ना तिथे ..म्हणजे तिथला मुलगा चांगला नाही ना आज परत त्याच स्टोअर मध्ये कशाला जाते ? दुसरी कडे जाऊ चल..

अंजली : ये दुसरी कडे कशाला ? आणि माझी काही चूक नसताना मी का उगाच घाबरायच त्याला ? चल बघू काय खातो काय तो ?

शेवटी सरु ला घेऊन अंजली त्याचं स्टोअर मध्ये आली पणं आज तो मुलगा होता आणि रफिक भाई ही होते पणं त्या मुलाने अंजली ला पाहून जे मान खाली घातली ते पुन्हा वरच काढली नाही..

रफिक भाई : अरे दीदी ..माफ कर दिजिये कल की इस नालायक के बत्तमिजी के लिये ....मुझे बोह त बुरा लग राहा हैं दीदी..

अंजली : अरे रफिक भाई आपकी कोई गलती नाही थी आप माफी मत मांगिये ..जाणे दिजिये..

रफिक भाई : कल मैने इसकी आच्छी धुलाई की हैं आगे से ये कभी ऐसी हरकत नही क रेगा..

सरु हळूच अंजली च्या कानात बोलते ..

सरु : म्हणूनच याच थोबाड खाली आहे वाटत ..

अंजली तिला तोंडावर बोट ठेऊन शांत रहा बोलते मग त्या आपल्या इतर मैत्रीणीन साठी ही फ्रेंडशिप विकत घेतात..सरु तिथून च तिच्या घरी जाते व अंजली आपल्या घरी येते.

दुसऱ्या दिवशी सगळेच शाळेत लवकर जमले होते .. आप आपले ग्रुप करून एक मेकांच्या हातात फ्रेंडशिप चे दोरे बांधण्याचे काम चालू होते ..सगळ्यांचे हात कलरफुल दोर्यानी भरले होते ..अंजली चा हात ही भरला होता तिला तर सर्वं च मुलींनी फ्रेंडशिप बांधले होते ..अगदी तिच्या क्लास मध्ये नसणाऱ्या छोट्या छोट्या मुलींनी ही ..तेवढ्यात अंजली ला केशव दिसला ...ती त्याच्या कडे गेली.

अंजली : केशव ? तू काय सरु ला पोस्ट मन समजतो का ? तिच्या कडून कशाला फ्रेन्ड शिप दिलंस ? तिला तर काही कळत नाही ती भोळी आहे ..पणं तुला कळत ना? अरे अस मुलीनं मागे फिरण्या पेक्षा अभ्यासा वर लक्ष दे ? गणित मध्ये तुला गेल्या सराव पेपर ला दोन मार्कस पडले होते .. सगळा वर्ग हसत होता तुझ्या वर ...इथे तिथे लक्ष घालण्या पेक्षा अभ्यासात घाल फायदा होईल... इतकं बोलून अंजली निघून जाते..

नसीर ला व त्याच्या मित्रांना ही अंजली ला फ्रेन्ड शिप द्यायचं होत पणं अंजली ने त्यांच्या कडे इतकं रागाने पाहिलं होत की त्यांनी तो विचार झटक्यात सोडून दिला ..पणं त्यांच्या पासून थोड दूर वर उभ्या असलेल्या सुमित ला अंजली ने आवाज दिला ..सुमित वर्गात सर्वात शांत मुलगा होता तो कधीच कोणाशी भांडत नसे ..मुलींच्या मागे पुढे करत नसे आपला आभ्यास भला आणि आपण असा त्याचा स्वभाव होता..अंजली ने बोलवल्या वर सुमित तिच्या कडे आला..

सुमित : काय ग ?

अंजली : हात पुढे कर..

अंजली ने त्याच्या हातावर फ्रेन्ड शिप बांधले .. व एक स्माईल दिली ..त्याने हसून अंजली कडे पाहिलं व बोलला.

सुमित : पणं अंजली मी नाही आणल ? म्हणजे माझ्या कडचे संपले आहेत ..

अंजली : असू दे रे ..चालत आणि हे त्या दिवशी तू सरु ला हेल्प केलीस त्या साठी होत ..

तस्स सुमित ला तो दिवस आठवला ..कोणी तरी मुद्दाम केळ्याची साल दरवाज्याच्या बाहेर ठेवली होती ..त्यावरून मुलींनी घसरून पडावं म्हणून आणि नेमकी सरु वर्गात पळत येत होती आणि तिचं लक्ष नव्हत तेव्हा सुमित ने च तिला ओरडून सांगितलं होत सरु पडता पडता वाचली होती.

सुमित ने हसून उत्तर दिलं .

सुमित : तिच्या जागी कोणी ही असत तरी ही मी हेल्प केली असती ..

अंजली नंतर तिथून वर्गात निघून गेली .. व सुमित ही पणं नसीर व त्याचे फ्रेण्ड्स फारच चिडले होते ..अख्ख्या शाळेत अंजली ने फक्त सुमित ला फ्रेंडशिप बॅंड बांधलं यांचा त्यांना खूप राग आला...

नसीर चा मित्र : आयला सुम्या ची तर हवा आहे अंजली ने स्वतः त्याला फ्रेन्ड शिप बांधलं ..

नसीर : खूप आकडते ना ती अंजली.. अब देख कल मैं क्या करता हू..

नसीर चे मित्र : ये बाबा चूप बैठ तू तो उस दीन तो शेख मॅडम ने भी तुझे ही झुटा ठेहराया ..

नसीर : अरे कुछ नही होगा किसी को पता नहीं चलेगा ..

दुसऱ्या दिवशी अंजली व सरु शाळेत आल्या तर सगळे अंजली ला विचित्र च नजरेने पाहत होते ..

अंजली : ये सरु माझ्या चेहर्या वर काही लागलं आहे का ? सगळे असे का पाहत आहेत ?

सरु ने तिचा चेहरा निरखून पाहिला व बोलली ..

सरु : नाही ग ठीक तर आहे ..
तो पर्यंत सरु च लक्ष शाळेच्या बोर्ड च्या मागे गेलं त्यावर ..

अंजली सुमित = love

अस खडू ने लिह ल होत त्याच्या साईड च्या झाडांवर ही खडूने 💓 च शेप काढून त्यात A..S लिहल होत..

सरु ने अंजली ला ते बोटाने दाखवलं अंजली ला ते सर्व पाहून थोडा धक्का च बसला .

क्रमशः