Suvarnamati - 2 in Marathi Fiction Stories by Mrs. Mrinmayee Shirgaonkar books and stories PDF | सुवर्णमती - 2

Featured Books
  • అరె ఏమైందీ? - 16

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 2

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • అరె ఏమైందీ? - 15

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 1

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • ధర్మ -వీర - 5

    వీర ఒక్కసారిగా వెనక్కి తిరిగి చూస్తాడు, చూసి "వీడా, వీడికి ఎ...

Categories
Share

सुवर्णमती - 2

2

राजवाड्यामधे सकाळपासूनच गडबड उडाली होती. महाराज आणि राणीसरकार जातीने सर्व तयारीवर बारीक नजर ठेवून होते. दिवाणजी परत परत सर्वांना सूचना देत होते. मुदपाकखान्यात मुख्य आचारी खास मेजवानीच्या तयारीला पहाटेपासूनच लागला होता. आज त्याच्यावरच्या मोठ्या जबाबदारीची त्याला पुरेपूर कल्पना होती. आणि म्हणूनच, मुदपाकखान्यातले आपले सर्व कसब, त्याने पणाला लावायचे ठरवले होते. प्रत्येक मसाल्याचा आणि इतर पदार्थ त्याने निवडून उत्तम प्रतिचा घेतला होता. खास उत्तमोत्तम आचारी आजच्या मेजवानीसाठी निवडले होते. त्याला कोणतीच त्रुटी राहू द्यायची नव्हती.

दरबार सजवण्यासाठी सुगंधी, रंगीत, लहानमोठी, सर्व प्रकारची फुले वेगवेगळ्या मळ्यातून निवडून, वेचून पाट्या भरभरून आणली जात होती. सेवक त्यांचे हार, माळा करण्यात गुंतले होते. वातावरणात मंद सुगंध भरून राहीला होता.

तलम रेशमी कशिद्याचे पडदे, महालांच्या मोठ मोठ्या खिडक्यांवर झुलत होते. त्यांच्यावर मोत्यांच्या माळा झुलत होत्या. चंदन कस्तुरी चा सुगंध पडद्यांबरोबर महालात पसरला होता.

मऊसूत रेशमी पायघड्या पसरल्या जात होत्या. रत्नजडित झुंबरं चमकवून, त्यात दीप प्रज्वलीत करण्यासाठी जय्यत तयार होते. सेवक, सेविका, आधीच्याच चमकणाऱ्या सुवर्ण, रुप्याच्या पात्रांना आणि चषकांना अधिक चमकवण्याच्या प्रयत्नात होते. निरनिराळे वादक, गायक, नृत्यांगनांना, आदरपूर्वक निमंत्रणे पाठवून बोलावून घेण्यात आले होते. सेवक, सेविकांची खास फौज, कलाकारांच्या तैनातीस हजर होती. बाहेर पन्नास हत्ती, अडीचशे अरबी घोडे, आणि निवडक सैनिक सलामी साठी तयार होते. सगळीकडे लगबग सुरू होती.

इकडे राजकन्या सुवर्णमतीदेखील आजच्या खास पाहुण्यांच्या स्वागतासाठी सजत होती. चंदन आणि गुलाब तेलाने सेविकांनी तिच्या सर्वांगाला सौम्य मर्दन करून दिले आणि नंतर सुगंधीजलाच्या कुंडात बराच वेळ सुगंधी उटण्याने सचैल स्नान करून ती कुंडातून बाहेर आली. सेविकांनी लगेच तिच्या नाजूक गौरांगाला तलम वस्त्रांनी लपेटून घेतले. लगोलग दुसऱ्या सेविकेने तिच्या लांबसडक केसांना सुगंधी धुरी देत सुकवण्यास आणि दुसरीने काही बटांना वळवण्यासाठी गुळगुळीत बांबूंच्या बारीक पुंगळ्यांभोवती गुंडाळण्यास सुरवात केली. तिची रेशमी वस्त्रे, आभूषणे, आधीच काढून तयार ठेवलेली होती.

सुवर्णमती रत्नजडीत पूर्ण उंचीच्या आईन्यासमोर, साजशृंगार करण्यासाठी येऊन, शिसवी मेजावर बसली आणि स्वत:च्याच आरस्पानी सैंदर्याकडे पाहत राहिली.

गुलाबी तेजस्वी आरस्पानी त्वचा, चाफेकळी नाक, गुलाबांच्या पाकळ्यांना लाजवतील असे नाजूक लालसर गुलाबी ओठ, धनुष्याकृती भुवयांच्या खाली रेखीव, निळसर झाक असलेले, काळे डोळे, आणि असंख्य स्वप्नांना आत अलगद दडवणाऱ्या लांबसडक पापण्या. सटवीने विनासायास भाग्य लिहावे असे तेजस्वी कपाळ, त्यावर खट्याळपणे उडणाऱ्या काळ्याभोर बटा. अतीयोग्य उंचीची बारीक मान . तितकीच योग्य तिची स्वत:ची उंची. अतिशय प्रमाणबद्ध बांधा. लांबसडक बोटांनी आधीच्याच सुंदर चेहऱ्याला अधिक उठावदार बनवण्यास सुवर्णमतीने सुरवात केली.

सुवर्णमती.... राजा सुरजप्रतापसिंह आणि राणी चारुलतादेवी यांची एकुलतीएक लाडकी राजकन्या. संपूर्ण राज्याची एकमेव वारस. नुसतीच सौंदर्यवती नव्हे तर गुणवतीही. लहानपणापासूनच घोडसवारी, बंदूकबाजी, याचे धडे खास निपुणांकडून गिरवले होते तिने. मैदानी नैपुण्य तर होतेच पण त्याहूनही अधिक तल्लख होती बुद्धीमत्ता. राजा सुरजप्रताप सिंहांची मुत्सद्देगिरीची अनुवंशिक देणगी मिळाली होती तिला. चारुलतादेवींच्या खानदानी सौंदर्याबरोबरच राजघराण्यातील स्त्रियांचे पिढीदरपिढी चालत आलेले चातुर्य तिच्यात पुरेपूर उतरले होते. त्या काळात एकट्या राजकन्येने परदेशी जाऊन शिक्षण घेणे शक्य नव्हते, परंतु पिताजींकडून वारंवार होणारी विलायतेतली वर्णने तिच्या सक्षम बुद्धीने योग्य प्रकारे टिपली होती. एवढेच नव्हे तर परकीय भाषा शिकून तिथल्या कायद्यांचा, राजघराण्यांच्या इतिहासाचा, साहित्याचा, संस्कृतीचा अनौपचारीक अभ्यासही तिने सुरू ठेवला होता. वयाच्या विसाव्या वर्षीच एखाद्या सम्राज्ञीचा आब तिच्यात होता.

राजा सुरजप्रतापसिंहांबरोबर ती नेहमी राजदरबारातील खास स्त्रियांसाठीच्या दालनात हजार असे. तिथला राज्यकारभार, ते डावपेच, ती मुत्सदी धोरणं, तिथे होणारे निर्णय, हे तिला विलक्षण आवडत. राजा सुरजप्रतापसिंहांनीही तिची ही आवड आणि त्यातील गती ओळखून, तिला राजदरबाराचे कामकाज गोषाआडून का होईना अनुभवण्याची अनुमती दिली होती. पाहता पाहता ती राजाजींचे अधिकचे डोळे आणि कान बनली होती. राजदरबारात घडणाऱ्या कामकाजाविषयी रोज रात्री त्यांच्या चर्चा, हा राजांसाठी एक आनंददायी काळ बनून गेला होता. स्वत:च्या लेकीविषयी वाटणाऱ्या कौतुकाने लवकरच आदराची जागा घेतली होती. हळूहळू ते महत्वाच्या निर्णयाच्या वेळी तिचे मत विचारू लागले होते. राजदरबारी मात्र याविषयी पूर्ण अनभिज्ञ होते. एका स्त्रीने, तेही इतक्या लहान वयातील राजकन्येने, राजदरबाराजाच्या कामकाजात मत द्यावे हे त्या काळातील दरबारातील मंत्रीमंडळाला पचनी पडणे अवघड गेले असते याची कल्पना राजाना होती. ‘बेटी पराया धन’,या मताचेच ते असणार यात शंका नव्हती.

विणकाम, चित्रकला या सर्वसाधारणपणे त्या काळातील राजकन्यांच्या आवडीच्या विषयांमध्ये तिला विशेष रुची नव्हती. पण पद्धत म्हणून ती तेही शिकली होती.

राजाजींना अनेकदा सुचवूनही दत्तकविधान करण्यास त्यांनी कधीच होकार दिला नाही. त्या काळात अत्यंत प्रचलित असूनही, पुत्रप्राप्तीसाठी दुसरा विवाह करण्यासही त्यांनी ठाम विरोध केला होता. राणी चारुलतादेवी हे मनोमन जाणून होत्या.

राजकन्येचा विवाह झाला, की जमाईराजा आणि तदनंतर नातवाच्या रूपात राज्याला पुढील वारस मिळणार असे बोलले जाई. आणि आता ती वेळ आली होती. कन्या उपवर झाली होती.

पाहतापाहता सफाईदारपणे सौंदर्यप्रसाधनांचा वापर लक्षातही येणार नाही अशा पद्धतीने करत आधीच्याच सुंदर मुखावर तिने उठावदार कळा आणली. तितक्याच सफाईने रेशमी वस्त्र परिधान करून ती आभूषणांकडे वळली. तिच्या कपाळावर, एक कळतनकळत आठी उमटली. लतिके, ही कोणती आभूषणे काढलीस? आज काही विवाह समारंभ नाही.

लतिकेने भराभर भारी भक्कम सुवर्णलंकारांची पेटी बाजूला काढली आणि पुढच्या आज्ञेची वाट पाहू लागली. सुवर्णमतीने मोत्याच्या दागिन्यांची पेटी मागवली. महाराज विलायतेस गेले असता त्यानी खास विलायती पद्धतीचे अलंकार बनवून आणले होते सुवर्णमतीसाठी. तिने ते मोजके नाजूक अलंकार परिधान केले. गळ्यात नाजूक हिरेमोत्यांनी बनवलेला हार, कानात तशीच कर्णफुले, तिचे डावे नाजूक मनगटही तशाच नाजूक चापात कैद झाले. दुसऱ्या मनगटात मात्र तिने अत्यंत बारीक कलाकुसरीची सुवर्णकंकणे चढवली, इतकी नाजूक की त्यांची हाताच्या हालचालीबरोबर होणारी मधूर किणकिण नेत्रांबरोबर कर्णांनाही सुखावू लागली. केसात तसल्याच नक्षीचा चाप बसवून बाकी लांबसडक केशसंभार तिने मोकळा सोडला. चालताना हा पाठीवरून खाली नितंबांपर्यंत रुळणारा केशसंभार कसा परिणाम साधेल याची तिला चांगलीच जाणीव होती. सर्व जामानिमा झाल्यावर विलायती मंद सुगंधी अत्तर लावून ती आईन्यासमोर उभी राहिली, आणि स्वत:च्याच प्रतिमेवर बेहद्द खुश झाली. ही खुशी स्वत:च्या सौंदर्यापेक्षा आज होणाऱ्या अपेक्षित परिणामाची अधिक होती.

भाग २