बसल्या बसल्या कधी झोपलो मलाच समजल नाही पण डोळे उघडले ते केतनच्या आवाज देण्यामुळे "चला पुरे झाली झोप वरती जाऊन थोडा आराम करा निवांत" तसा दचकलो आणि उठलो पण आठवल की स्वरा मांडीवर डोकं ठेऊन झोपली होती पण नीट भानावर येऊन पाहिलं तर ती तिथे नव्हती. समान वगेरे काढून हॉटेल मध्ये गेलो पण इथे बुकिंग केली नव्हती आणि शिमल्यासाठी पैसे वाचवायचे होते म्हणुन २ च रूम घेतल्या आणि त्याच शेअर केल्या सर्व आवरून दुपारी १ ला जेवायला हॉटेला गेलो. हा आमचा शेवटचा थांबा होता आत्ता इथून उतरणार थेट शिमल्यात हा ३रा दिवस होता आणि २दिवस आधीच वाया गेले होते रात्री उशिराच निघणार होतो जेवण वगेरे करून पुरता आराम करून. दुपारी जेऊन सर्व झोपलो. मला ५.३० च्या सुमारास जाग आली ती महेश मुळे ट्रिप कशी जात आहे ते विचारण्यासाठी त्याने फोन केलेला त्यासोबत बोलून झाल्यावर मी केतनला उठवल आणि बाल्कनीत जाऊन सिगरेट पेटणार तोच मानसीची किकळ ऐकू आली आणि मी आणि केतन बाजूच्या खोलीत पळालो.
दरवाजा वाजवला पण कोणी उघडेना ना कोणता आतून आवाज ऐकू येईना केतन ने पटकन जाऊन रूम कीपर ला बोलावलं पण तो दरवाजा उघडणार तोच स्वराने दरवाजा उघडला आणि बोलली काय रे काय झालं "अरे सरक बाजूला काय झालं माऊ का ओरडली तू" अस विचारत केतन थेट आत शिरला त्यामागे स्वरा आणि मी. रूम किपरला मी जाण्यास सांगितलं होत तसा होत निघून गेला. केतन पुढे गेला होता मानसी त्याला बिलगून रडत होती आणि बोलत होती "अरे मी फ्रेश होण्यासाठी गेले आणि आणि तिथे तिथे एक एक मोठासा खूपच मोठा कॉक्रोच आहे आणि तो उडतो सुद्धा आहे तू कर काही तरी नाही तर घरी चल मला घेऊन मला नाही माहित काही" हे ऐकून मी तर सुटकेचा श्वास सोडला आणि केतन ने पण पण स्वरा मात्र चांगलीच गरम झाली होती कारण ती वाशरूम साठी गेली होती आणि हिच्या ओरडण्यामुळे तिला घाईत यावं लागलं आणि त्यात आम्ही दारावर ओरडत होतो. "अग ए मंद आहेस का तू? की जन्म घेताना डोक्यावर पडली होतीस? एवढ बोंबलायला काय झालं होत मग? एक शुल्लक जीवाला तुझ्यासारखा जीव घाबरतो म्हणजे नवल आहे आणि तुझ्या भोंग्यामुळे तो झुरळं सुद्धा बहिरा होऊन मेला असेल कशी मंद बाई आहेस तू" स्वराली चांगलीच गरम झाली होती. तिचा तो रूद्र अवतार पाहून मला काही बोलायचं सुचेनाच "अग ए गप ग तू बघ ती किती घाबरली आहे ए जा रे हिला घेऊन नाही तर ही माऊच (मानसीला केतन लाडाने माऊ बोलतो ही गोष्ट आत्ताच माहित झाली होती मला सुद्धा आणि स्वरालीला ही) डोकं फोडेल बघ कशी थरथरत आहे ही. हिला की नाही काही अक्कलच नाही नुसती बिनकामची डॉक्टर आहे. जा घेऊन हिला." केतन माझ्यावर गरम होत बोलला. मी स्वराचा हात धरला आणि तिला आमच्या खोलीत घेऊन आलो. माझी सिगारेट राहिली सर्वच राहील होत ह्यात. मी ती घेऊन बाल्कनीत गेलो आणि ती पेटवली की स्वराने जोरात दार बंद केल्याचा आवाज आला "ओयय कुटेस तू?". "इथे बाहेर बाल्कनीत आहे". "चल इथे दे एकटाच नको मारू आणि ऐक मी काय बोलते आत्ता फुल्ल ट्रिप वर आपण एका रूम मध्ये राहू आणि त्यांना राहू दे एकत्र नाही तर शप्पत सांगते मी ह्या केतनच्या माऊच डोकं फोडल्याशिवाय मी काही परत येत नाही बघ आणि तुला पण काही ओरडायच असेल तर सांग मी माझी वेगळ्या रूम मध्ये राहील पण अशी फुकटची कटकट नको घे". "अरे तू शांत हो आधी हवं तर अजून एक लाईट कर पण थोड शांत हो आणि मला काही प्रॉब्लम नाही पण मी काय बोलतो हा तिला माऊ कधी पासून बोलायला लागला? आधी तर नव्हता बोलत". "तुला ना नसत्या उठाठेवी असतात तुला काय करायचं आहे आणि हे सर्व सोड मी समान घेऊन येते इथे त्याच कुठे आहे ते तिथे घेऊन जाते आणि आवरा आत्ता ७ वाजायला आले आहेत". अस बोलत रागात बडबड करत केत्याच सामान घेऊन ती गेली आणि मी ही आवरायला सुरुवात केली.
सर्वांचं आवरून झाल्यानंतर जेऊन वगेरे आम्ही रात्री ९ दरम्यान पुढचा रस्ता धरला जेवताना सर्व गप्प होते आणि आत्ता सुध्धा मी गाडी चालवत होतो बाजूला केतन होता आणि मागे ह्या दोघी. "स्पीड वाढव जरा" केतन ने शेवटी आवाज काढला आणि मी त्याला फाटे फोडले आणि परत हळू हळू गाडी रुळावर आणली सर्वांची पण मानसी काही बोलत नव्हती. "बरं मी काय म्हणते ही माऊ कोण रे केतू" स्वराने खोचक सवाल केला तो ही टोमण्या आवाजात त्यात मी ही तिला साथ दिली "अरे हो कोण ही माऊ आपल्यात तर कोणी नाही माऊ वगेरे ही कोण नवीन भूत तर नाही ना दिसत तुला?"."तू तुझी समोर घाल नाही तर आपण सर्व भूत होऊन इथे तिथे हिंडत बसू आणि आहे आपल्यात एक माऊ जी तुझ्यामागे बसली आहे आणि तुझ्या बाजूला". माझ्याकडे आणि स्वराकडे बघत केत्या बोलला. "कोण माझ्या बाजूला तर मानसी आहे काय रे तुला कोण दिसते का माऊ?". "नाही माझ्या मागे तर मानसी आहे बाबा". "तो मलाच बोलतो आहे मंद बुद्धिनो अजून कोण ५ व आहे का कोण इथे?" शेवटी बोलली मानसी."काय बे कधी पासून तुमचं हे चिऊ माऊ चालू आहे आणि ह्या कानाच त्या कानाला सुद्धा नाही होऊ दिलं किती हरामखोर असाल तुम्ही". अरे बाबा आम्हाला बावाल नको होता म्हणूनच गुपित ठेवलेलं". "व्हा म्हणजे आम्ही परके ना?" स्वरा मध्येच बोलली. "गाडी थांबव अजय पुढे लवकर". "का ग माऊ काय झालं?" मी खोचकतेच बोललो "अरे थांबजरा मस्करी नको करू प्लीज". "बरं बरं थांब पुढे ढाबा आहे तिथे थांबवतो.
जशी मी गाडी धाब्यावर थांबवली तशी ती तिथल्या बाथरूम कडे धावली आणि बहुतेक जास्त जेवल्यामुुुुळेे काही पोटात गडबड झाली असेल. मी केतन आणि स्वरा गाडी जवळ उभे राहिलो आणि चहा घेतला. आमचा चहा सुद्धा झाला होता पण मानसी काही आली नव्हती मी स्वारा ला बोललो "अग बघ काय झाली तिला इथेच १२ वाजवणार का ही?" बरं बोलून स्वरा गेली आणि मी माझा मोबाईल घ्यायला गाडीत जाणारच की स्वरा मानसीला घेऊन आली मानसी ची हालत खराब वाटत होती आणि तिला उलट्या ही झाल्या होत्या मला आणि केतनला वाटल गाडी मुळे होत असेल असो. आम्ही पुढचा प्रवास चालू केला आत्ता केतन मागे मानसी जवळ बसला आणि स्वरा बाजूला मी आपला गाडी चालवण्याच्या धुंदीत तोच माझ्या हातावर स्वराली ने हात ठेवला आणि मी दचकलो आणि .....
क्रमशः