She __ and __ he - 15 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | ती__आणि__तो... - 15

Featured Books
  • ભાગવત રહસ્ય - 149

    ભાગવત રહસ્ય-૧૪૯   કર્મની નિંદા ભાગવતમાં નથી. પણ સકામ કર્મની...

  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

Categories
Share

ती__आणि__तो... - 15

भाग__१५

रोज सारखी सकाळी राधा उठते...तीच अंग थोड़ दुखत होत...म्हणून हळूहळू ती उठली आणि चालत पुढे जाऊ लागली...तिला अचानक गरगरायला लागल तिचा तोल जाणारच की समोरून येऊन रणजीत तिला सावरतो आणि बेडवर बसावतो....



रणजीत__ रेडिओ अग काय करतेस हे..बर नाही वाटत आहे का तुला...डॉक्टरला बोलवु का...चक्कर आली का....काय झाल...?



राधा__ ह अरे हो..श्वास तरी घे जरा...काही नाही थोड़ गरगरल मला...आणि अरे तस होणार आता अंग दुखतय म्हणून...अन हो बाय द वे मी सुद्धा डॉक्टरच आहे...सो चील...



रणजीत__ ठीके...बर मला सांग काय हवय तुला देतो मी...नाहीतर परत तुम्ही सगळे मलाच बोलणार की तुझी मदत नाही केली....(हळू आवाजात)....तुला आणि काय हव असत....😏😅



राधा__ हममम...काही बोलास का...



रणजीत__ नाही...आ तू सांग काय हवय...



राधा__ मला माझ्या बॅगमधुन जरा टूथब्रश आणि साड़ी वैगेरा काढून दे न...नाहितर असो मीच काढ़ते...



रणजीत__ थांब बॅग वरती आहे काढताना पडशील...मी काढ़तो...



रणजीत बॅग काढतो आणि त्यातून टूथब्रश काढतो...साड़ी,ब्लाउज काढतो...



रणजीत__ आणि काही हवय का....???



राधा__ आ हो...ते मला...मी ते.......(थोड़ी चाचरत)



रणजीत__ घाबरतेस का...सांग ना...



राधा__ अरे ते मी काढ़ते....तू नको......(बॅग खेचत)



रणजीत__ अग राधा दे ना...काढतो मी.......(बैग खेचुन)



राधा__ र....अरे..रणजीत....ऐक माझ....र....



बॅग खेचुन राधाला दम लागतो पण रणजीत काही बॅग सोडत नाही....आता राधा खुप भड़कते...



राधा__ (रागात)....अरे बटाटया..😠😡मला ब्रा हावी आहे माझी...हे देणार आहेस काढून...दे दे...



हे ऐकून आता रणजीतलाच लाज वाटू लागली...आणि त्याच्या हातून पटकन बॅग खाली पडली...



राधा__ बावलट...अर्धवट😠😡



रणजीतने बॅग बेडवर ठेवली आणि स्टडी रूममध्ये गेला...त्यांला आता कसतरी वाटत होत...राधाला ही नंतर समजल की आपण काय बोलून गेलो😅😅🤣राधा सगळ सामान काढ़ते आणि बॅग जागेवर ठेवते...तेवढ्यात रणजीत एक्सरसाइज करून बाहेर येतो...



रणजीत__ आंघोळ करायला चालीस का...चक्कर नाही येणार न...की मी येऊ....


राधा त्याच्याकडे रागात बघते तस तो हसन बंद करतो...



रणजीत__ अअअअअ येऊ म्हणजे अस येऊ का...बाथरूममध्ये येऊ का अस नाही..😅😅



राधा__(ओरडुन)......निघघ................



तसा रणजीत तिकडूंन काढता पाय घेतो...राधा ही फ्रेश व्हायला जाते....फ्रेश होऊन राधा बाहेर येते..रणजीत रूममध्ये नव्हता...म्हणून ती रेडी झाली...तेवढ्यात खोलीत रम्या नाश्ता घेऊन आली आणि रुता ज्यूस घेऊन आली...



रुता__ राधू काकी...



राधा__ अरे बबडू...तू कशाला आणला नाश्ता वरती मी खाली येत होते ना...



रम्या__ अग असुदे..आई आणि काकू बोल्या तुला नाश्ता वरती द्यायला...तुला एकतर बार नाही म्हणून...आता घे करून नाश्ता...



राधा__ पण...कशाला नाश्ता वरती आणला ताई..आज मी खाली आलेच असते ना



रम्या__ असुदे ग...☺️



रुता__ घे मी तुझ्यासाठी ज्यूस आणला...



राधा__ अरे वा...थांक्यु..
थैंक्यू ताई...




रम्या__ असुदे घे करून नाश्ता...मी आलेच ह्म्म्म...बबडू राधाला त्रास नको देऊ हं....नाहीतर मार खाशील...



रुता__ नाही मम्मा...


**********************************


मग राधा नाश्ता करते...आणि रुता सोबत खाली येते...खाली सगळे एकत्र बसले होते...



सुमन__ अरे राधा...खाली का आलीस आराम करायचा ना...



राधा__ आई आहो नको..आता मला खरच बर वाटतंय..एकतर अठवडे झाले आराम करते आता अजुन मी अस खोलीत झोपुन राहन बरोबर नाही वाटत...



माधवी__ राधा अग त्यात काय..आमच अस काही नाही ग तू ठीक होण महत्वाचे आहे...काय ग सुमन



सुमन__ हो ताई बरोबर...



राधा__ पण आई मला खरच बर वाटतंय....



रम्या__ बर डॉक्टर बाई...



राधा__ काय ताई तुम्ही😂😅😅
बर आई,काकू सॉरी...😢



माधवी__ का ग सॉरी..?



सुमन__ सॉरी का बोलतेयस राधा...



राधा__ आई,काकू...ते मी आजारी पाडले आणि इतके दिवस खोलीत होते मग त्यामुळे तुम्हला काही करता ही नाही आल..म्हणजे रसम वैगेरा...



माधवी__ अग त्यात काय तू बर होण जास्त इम्पोर्टेन्ट होत



सुमन__ हो ना...



रेवा__ तस ही वहिनी किसीने कहा है कि हमारे लिए रस्मे होती है,रस्मो के लिए हम नही...😉



रम्या__ अगदी बरोबर बोलीस रेवा😀



माधवी__ बर चला आवरु या...



राधा__ मी पन मदत करते आई....



सुमन__ बर चल



राधा__ मी काय म्हणते आई आज रात्री सगळा जेवन मी करू का...



सुमन__ अग एकटी कस करशील बाळा..



राधा__ (गोड़ चेहरा करून).....आई करते ना...प्लीज..



सुमन__ इतका गोड़ चेहरा केलास तर नाही कस बोलू मी...बनव तू हम्म



राधा__ थैंक्यू आई...



सुमन__ बर आता आपण सगळ्या मिळून बनवू चला



राधा__ हा....


सगळा महिला मंडळ त्यांच्या कामात गुंततात...रात्री सगळे जेवायला बसले...आजच्या जेवणाची चव सगळ्यांना वेगळीच जानवली...जेवन अप्रतिम झाल होत पन सगळ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की ही चव कुणाच्या हातची...?



राहुल__ आई..काकू कोणी जेवन बनवले आहे आजचे??



महेश__ हो कोणी बनवले जेवन..?



सुमन__ आजचा सगळ जेवन राधाने बनवले आहे...



रणजीतला तसा जोरात ठसका लागतो...😂🤣मग राधा त्यांला पानी देते...



रणजीत__ राधा..?????🙄 राधा तुला जेवन पन येत...



राधा__ हो मग...😁



रणजीत__ गुड़....
(मनात)....वा..! तर हिला जेवन पन येत...नशीब दुसऱ्यांच डोक जस करपवते तस चपाती नाही करपवली...😂..पन खरच भारी चव आहे हिच्या हाताला...मानल पाहिजे मॅडम ना ऑलराउंडर वाटते मला ही...



रेवा__वाव..! वहिनी अग खीर तर भारी झाले...मला खुप आवडली....अजुन दे ना ग...



राधा__ हो हो घे ना....
आ..जरा सगळे ऐकता का..?



सुमन__ ह बोल ना बाळा...



राधा__ आ मला विचारायच होत की,उदयापासुन मी हॉस्पिटल पुन्हा जॉइन करू का...? नाही म्हणजे ५-६ आठवड़े झालेत मी घरिच आहे...म्हणून...



सदाशिव__ हम्म...बरोबर आहे सुनबाई तुझ...तू ही सुरवात कर हॉस्पिटलला जायला...काय दादा...?



महेश__ हो हो..कर सुरवात...



राधा__ थैंक्यू बाबा..काका..
आ रणजीत मी....?



रणजीत__ हो..जॉइन हो तू राधा...



रेवा__ (चिडवत)....अरे वा...नवरयाची परमीशन घेतली जातेय इकडे...😂बर आहे बाबा....😂



राहुल__ हो ना बाबा...रम्या ने मला अस कधी विचारल नाही....😂😅😛



रम्या__ हो का....(कानाजवळ बोलात)...तू रूममध्ये चल दाखवते मग....🙄
आणि आ रेवा कशाला चिडवते ग जीतला...



रणजीत__ हम्म अजुन ओरड हिला वहिनी...या घरात ना माझे जास्त लाड़ आणि माझी बाजू फक्त माधवी काकू अन वहिंनीच घेते..😀



सुमन__ हो हो...आम्ही तर दुश्मन ना...😂



रेवा__ असुदे मला तर सुमन काकू आणि शिवा काका आवडतात😀



सदाशिव__ हो आमची लाडकी आहे हो रेवू...



सुमन__ हो मग...



माधवी__ खरच आपली मुल पन ना...😂 आणि रेवू तर वरचढ आहे बाई...



महेश__ बर चला आता झोपायला...गुड़ नाइट All...



रणजीत__ गुड़ नाइट...



राहुल__ गुड़ नाइट



सगळे मस्त जेवन आटोपतात...आणि आपापल्या खोलीत जातात....तर रणजीत बेडवर बसून त्याच काम करत होता...राधाला तिचे कपड़े कपाटात सेट करायचे होते म्हणून ती तिची बॅग उचलून बेडवर ठेवते...



रणजीत__ काय करतेस हे...???



राधा__ दिसत नाही वाटत...कपड़े बाहेर काढ़ते...



रणजीत__ का...? बॅगमध्ये आहेत तर चांगले नाही दिसत आहेत का...



राधा__ मग काय कपड़े आयुष्यभर बॅगेतच ठेवू का...कपाटात ठेवते...



रणजीत__ कपाटात कोणाच्या...माझ्या..??🙄 नाही ह...माझ्या कपाटात नको ठेवूस...माझ कपाट आहे ते..



राधा__ हो पन आता माझ ही कपाट आहे ते...आणि या कपाटात नाही तर कुठे लावू मी कपड़े...😡



रणजीत__ तू बग ते...



राधा__ ठीके आईना विचारते मी....आईईई.....



रणजीत__ ए ए शुशु...लाव बाई कपाटात कपड़े...विचित्र कुठली..🙏



राधा__ तूच....😏😏


रणजीत बड़बड़ करतच झोपतो...राधा कपाट आवरत बसते...


*****************************

सकाळी रणजीत उठला पन राधा त्यांला कुठेच दिसली नाही....त्यांला वाटल ती खाली गेली असेल..म्हणून तो वर्कआउट करून फ्रेश व्हायला गेला...अजूनही राधा खोलीत नव्हती आली...मग रणजीत कपड़े घेण्यासाठी कपाट उघड़तो...तर राधाने त्याचे कपड़े ही नीट सेट करून एका साइडला लावली होते...रणजीत हे सगळ बघून हळूच हसतो...


थोड्यावेलाने तो खाली येतो पन तिकडेही राधा नव्हती दिसत....



रणजीत__ आ...वहिनी...आई,काकू,काका,बाबा,दादा आणि रेवू कुठे आहेत...



रम्या__ आई आणि सुमन काकू मार्केटला गेलेत...काका,बाबा,राहुल ऑफिसला पन गेले आज तुला जरा लेट झाला ना म्हणून..आणि रेवू कॉलेजला...




रणजीत__ हम्म...




रम्या__ चल ये नाश्ता कर जीत...
बबडू खा लवकर...



रणजीत__ आ वहिनी...राधा...????



रम्या__ ओह...राधा कुठे आहे हे विचारायच होत ना तुला पन फिरुन फिरून विचारतोस😂 अरे हॉस्पिटलला गेली राधा...रोज ६ ला जाते ना ती सो गेली...



रणजीत__ (हळूच बोलतो)....मला सांगून गेली असती तर काय झाल असत....😏



रम्या__ काही बोलास का...???



रणजीत__ नाही...बर भाभीजी में चलता हूं...नाश्ता नही करना मुझे...



रम्या__ अरे जीत का पन..



रणजीत__ असच नको...



रम्या__ हम्म...बर रुताला किंडगार्डनला सोड न...



रणजीत__ हो चालेल...बबडू चल..




रुता__ हा बाय मम्मा...



रम्या__ बाय बेटा...


******************************


रणजीत रुताला सोडतो..आणि त्याच्या मनात का कुणास ठाऊक अस होत की जाउन राधाला भेटून याव...२ मिनिट का असेना...बघून तरी याव..त्याच मन अस्वस्थ होत...आणि न राहून तो गाड़ी हॉस्पिटलकड़े वळवतो...



रणजीत__ एक्सक्यूज मी....



वनिता सिस्टर.__ यस बोला...अरे तुम्ही डॉक्टर राधाचे मिस्टर ना...त्यांना भेटायच आहे का...ते बघा तिकडे जा...ती केबिन...



रणजीत__ थैंक्यू....



रणजीत तिच्या केबिनकड़े जातो...आत जाणारच असतो की त्याला केबिनच्या काचेतुन दिसत...एका मुलाने तिला मीठी मारली होती...हे बघून रणजीतच डोक फिरत...जे काय रणजीत ऐकतो ते ऐकून तर तो खुप भड़कतो...रागातच केबिनमध्ये जातो..त्यांला बघून तो मुलगा..म्हणजे निशांत राधापासून दूर होतो...



रणजीत__ (त्याची कॉलर पकडून)....ए..कोन आहेस तू...आणि हिम्मत कशी झाली तुझी माझ्या बायकोला मीठी मारायची...😡😡😠😠



राधा__ (त्यांला अडवत)....ररर रणजीत ऐक..



रणजीत__ राधा तू गप्प बस...तू ही त्याच्या मिठित काय करत होतीस..😠😠 लग्न झालाय तुझ विसरलीस का..



राधा__ हो पन...



रणजीत__ चुप😠😠



निशांत__ राधू...हा तुझा नवरा आहे..



रणजीत__ ए तू तिला का विचारतो...मला विचार...हो ती माझी बायको राधा रणजीत साखरपेकर आहे...समजल..आणि राधू काय..राधू काय...😠😠
अरे तू तर तोच ना...नियती मोरे तिचा हसबेंड ना...तुझी मदत करण्यासाठी मी रात्री १ वाजता आलो होतो..अन त्या मदतीची तू अशी फेडनी करतोयस....बस आता😠



रणजीत निशांतला मारायला हात वरती करतो तर राधा त्याचा हात पकड़ते...आज राधाने रणजीतच्या डोळ्यात पहिल्यांदा एवढा राग पाहिला होता...त्याचे डोळे रागाने लाल झाले होते....राधा हे बघून खुप घाबरली होती...रणजीत त्याची कॉलर सोडतो आणि सरळ गाडीत बसून ऑफ़िसमध्ये निघुन जातो....


*****************************


{ऑफिसमध्ये..RS Group of Companies}



रणजीत रागातच केबिनमध्ये येतो...आल्या आल्या विनयला आत बोलावतो...(विनय तिकडेच काम करत असतो ना)



रणजीत__ (ओरडत).....विन्या...विन्या......विनययय😠



विनय__ (गोंधळत आत येत).....हा हा...कक काय झाल जीत...ओरडतो का आहेस..?



रणजीत__ (आवाज चढवून)...कोन ओरडतय...मी...😠



विनय__ जीत.....🙄



रणजीत__ (थोड़ शांत होत)....सॉरी...



विनय__ काय झाल आहे...? सांग आता...



रणजीत सगळ विनयला सांगतो...विनयला ही ऐकुन त्यांला जरा धक्काच बसतो...



विनय__ हे कस शक्य आहे...म्हणजे राधा अस करन शक्य नाही...



रणजीत__ म्हणजे मी खोट बोलातोय का...😠



विनय__ नाही रे...ऐक मी काय सांगतो ..पन तू आधी शांत हो....



रणजीत__ हम्म्म्म



विनय__ हे बग जीतू...तू जे पाहीलस ते खर आहे पन तीं फक्त एक बाजू आहे...दूसरी बाजू काय हे आपल्याला माहित आहे का..?



रणजीत__ म्हणजे...???



विनय__ म्हणजे तू तिकडे गेलास ह्म्म्म त्या मुलाने राधाला मीठी मारली..राधाने मारली होती का??? आणि त्याने मीठी मारायच्या आधी तू तिकडे जायच्या आधी काय झाल तुला माहित आहे का??? का त्याने मीठी मारली..?? नाही माहित ना मग तू फक्त एकच बाजू बघून राधावर का चिड़तोस...



रणजीत__ हो विन्या..पन मग तो बोला राधाला I Love U म्हणून...ते काय होत..



विनय__ पन राधा नाही बोली ना...आणि ते नक्की काय होत हें तू राधाला शांतपणे विचारायला हव होत मगच काय ते करायच होत....समजल



रणजीत__ हम्म बरोबर बोलतोयस तू...राधा तस ही काहीतरी सांगत होतीच...पन माला खुप राग आला रे अचानक काय समजल नाही....



विनय__ हम्म्म्म...तुला हे ऐकुन वाइट वाटेल पन...राधा तुझी बायको नक्कीच आहे पण अजुन पर्यंत तिने तो हक्क तुला दिला नाही आहे...आणि नाही तू दिलायस तिला बायकोचा हक्क....समजतय का...सो ती काहीही करेल तू मधे पड़ता कामाच नये...आणि आता शांत हो...एवढा कधीपासुन विचार करायला लागलास तिचा...☺️



रणजीत__ हम्म्म्म....



विनय__ बर शांत हो आणि ५ मिनिट ने मीटिंग आहे हम्म



रणजीत__ ह्म्म्म...


विनय केबिन बाहेर जातो...रणजीतच डोक दुखायला लागत...अन मीटिंगही होती..त्याच्या कामामध्ये तो पर्सनल प्रॉब्लम अनात नाही म्हणून काहीवेळ सगळ बाजूला सारून तो काम करत बसतो....


*****************************


राधा हॉस्पिटलमधुन नेहमीच्या वेळेला येते...राधा ही जरा उदासच दिसत होती...हॉलमध्ये सगळे बसले होते..राधा अस गपचुप जाताना रेवाला दिसते...



रेवा__ राधा वहिनी....



राधा__ ह्म्म्म...बोल रेवू...



रम्या__ आलीस राधा...



राधा__ हो



माधवी__ काय झाल ग...चेहरा का पडलाय?



राधा__ काही नाही काकू दमले जरा...आज महिन्याभरानी हॉस्पिटलला गेले होते ना....सो..



सुमन__ बर राधा जा फ्रेश होऊन ये...



राधा__ ह्म्म्म


राधा खोलीत जाउन रणजीतच्या वागण्याचा विचार करत बसते...


******************************


रणजीत सुद्धा मीटिंग्स मधुन जरा फ्री झाला पन त्याच्या डोक्यातुन सकाळचा प्रकार जात नव्हता....



रणजीत__ विन्या बरोबर बोला मी विचार करायला पाहिजे होता अस चिडायच्या आधी....आपण इथेच चुकतो जे दिसताय त्यावर लागेच विश्वास ठेवतो...पन त्यामागे वेगळीच बाजू असते ती समजून नाही घेत अन आयुष्यभर गैरसमजात राहतो....बघू राधाशी मी आज बोलतोच...



विनय__ (दार नॉक करत)....जीत येऊ का??



रणजीत__ ये विन्या...



विनय__ आता मी घरी निघनार होतो पन एक प्रश्न स्पष्टपने तुला विचारु????



रणजीत__ हो विचार न



विनय__ First...तुझ्यात आणि राधामध्ये Physical relations झालेत का??? Second...तुला राधा आवडत नव्हती राग येतो न तिचा...मग आजच्या वागण्याचा अर्थ काय??? इतका राग का आला????सांग ते ही खर खर...



रणजीत__(थोड़ विचार करून).....ह्म्म्म हो यार विन्या..मला तर तिचा राग होता आणि तुला चांगल माहित आहे ज्यांच्यावर माझा राग असतो मी त्यांच्याशी नीट बोलात पन नाही...आणि आज मी.....



विनय__ तेच यार...



रणजीत__ मला ना विन्या त्यावेळी फक्त त्या मुलाचा राग येत होता काऱण त्याने माझ्या राधाला मीठी मारली आणि लव्ह यू बोला...मला त्यावेळी काही समजलच नाही...



विनय__ काय बोलास तू....



रणजीत__ काय...?



विनय__ माझ्या राधाला बोलास तू....🙄



रणजीत__ मी कधी....(आठवण)...हो रे...नाही म्हणजे ते



विनय__ (हसत)....समजल😂



रणजीत__ हसतोयस का



विनय__ सॉरी...अजुन सांग काय काय होत तुला...



रणजीत__ अरे का माहित पन साखरपुडयाच्या थोड्या आधिपसुन ती दिसली न की माझ हॄदय जोरात धड़धड़ करायचा...आणि त्या क्षणी मी तिच्यात हरवायचो तीच मनातच कौतुक करायचो....अजुन ही तस होत...डोन्ट नो का...आधी सुरुवातीला अस नव्हतं झाल...



विनय__ एक बोलू..I think You are Falling in love with Radha....😊



रणजीत__ कस काय....खर प्रेम एकदाच होत...ते आधी झालाय मला...तुला सगळ माहित आहे...सो मग मी



विनय__ हो पन दोन्ही बाजूने प्रेम,विश्वास असेल तर ते खर प्रेम ना..तुझ खर प्रेम होत तीच नव्हतं अस तर मला वाटत...यात तुझा काय दोष...आणि तू मूव ऑन करतोयस न आता..आणि अरे तुझ मन गुंतत आहे राधामध्ये...यात चुकीचा काय आहे...बायकोच आहे न तुझी....मग...आणि दूसर प्रेम होऊ शकत समजल...



रणजीत__ सोड...ते काय नको आता....निघ तू ही..मी ही निघतो...



विनय__ हम....बाय...



रणजीत__ ह्म्म्म


****************************


रणजीत घरी येतो...तर सगळे खाली डायनिंग टेबल वर जेवायला बसले होते...राधा तिकडेच उभी होती...रणजीत मात्र शांतपणे आत गेला...



रणजीत__ (तिच्याकडे न बघता)....राधा...रूममध्ये ये...आता लवकर..बोलायच आहे मला जरा...



राधा__ ह...



रेवा__ (बोलन मधे तोडत)....अरे भाई इतकी काय घाई लागले जेवून मग घेऊन जा वहिनीला...😂



रणजीत__(रागात).....रेवू...😡😡😠 जेवन कर ना गप...तुला सगळ्यांच्या मधे बोलायलाच हव का ग त्याशिवाय जेवन नाही जात का तुला...आता एक शब्द बोलवु नकोस ह...😠😠राधा चल...



राधा__(घाबरत)....आआ ह...



दोघे वरती खोलीत निघुन जातात....त्याच्या ओरडन्याच्या आवाजाने रुता रडू लागते....



माधवी__ काय झाल जीतला...



सुमन__ कदाचित ऑफिसमध्ये काहीतरी बिनसलय...



सदाशिव__ ऑफिस मधील काही असेल तर मी बोलतो नतर त्याच्याशी बघू काय झालाय...तुम्ही जेवन करा चला...



रम्या__ ह...
(तिला शांत करत)...बबडू शांत हो...नाही गप...


*********************************



क्रमशः



©प्रतिक्षा__🌸