kadambari Premaachi jaadu Part 25 in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी - प्रेमाची जादू - भाग -२५ वा

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

कादंबरी - प्रेमाची जादू - भाग -२५ वा

कादंबरी – प्रेमाची जादू

भाग – २५ वा

---------------------------------------------------

यश तसा तर मधुराला त्याच्या ऑफिसमध्ये रोज पाहत होता , बोलत होता ,ऑफिस मध्ये सगळ्याच स्टाफ सोबत तो बोलायचा ,

त्यापेक्षा काही वेगळे असे तो बोलत नसे .

पण दिदिसोबत मधुरा त्याच्या आजी- आजोबांना भेटायला घरी येऊन गेल्यापासून

यशच्या मनात तिच्याविषयी अजून खूप काही वेगळे वाटण्यास सुरुवात झाली होती ..

अशी भावना मनाला किती छान वाटणारी आहे ..हे त्याने अनुभवले होते.

अजून तो त्याच संध्याकाळच्या आठवणीत हरवून जात होता ..

किती छान ,सुरेख क्षण होते ते ..

वाटते ..तो दिवस खूपच लहान होता, लगेच संपला .

यशला ते सारे पुन्हा पुन्हा आठवणे ..सुद्धा मनाला सुखद वाटणारे आहे हे जाणवत होते...

त्या दिवशी असे झाले होते ....

ऑफिसमध्ये आल्या आल्या तो चौधरीकाकांना म्हणाला ..

काका आज संध्याकाळी ऑफिसमधून तुम्ही घरी जातांना ..

रस्त्यात आमच्या घरी थांबून ..आजी-आजोबांना तुमच्या घरी घेऊन जा..

त्यांना तुमच्या घरी यायचे आहे..खूप दिवसापासून याचे ठरवत होते

मग मीच त्यांना म्हणालो ..मी बोलतो चौधरीकाकंना ..आज जमवून आणा हा योग.

यशचे बोलणे ऐकून चौधरीकाका आनंदित होऊन म्हणाले ..

अरे वा ..आमच्या गरीबाच्या घराचे आज भाग्यच उजळले म्हणयचे ..

यश , ज्यांच्यामुळे मला सुखाचे हे दिवस आले आहेत ..ती देवमाणसे आपण होऊन माझ्याकडे येत आहेत ,

याचा खूप आनंद झाला आहे मला .

तू लगेच निरोप दे त्यांना , मी येतो आहे त्यांना घायला संध्याकाळी , तयार राहा म्हणवे.

पण.. यश .अरे ऐकना ,

एक विनंती आणि परवानगी ..हवी आहे मला तुझ्याकडून ..

यश म्हणाला ..बोला न काका ,अहो ,

विनंती ,परवानगी ..या दोन्हींची गरज तुम्हाला नाहीच आहे.

हे बघ यश ..तुला तर माहिती आहे ..इथे घरी आम्ही दोघेच असतो , पोरं नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी ,

आणि सध्या तुझ्या काकू आजारी आहेत ..तरी जमेल तसे करते कामं ..

पण..आज तुझे आजी आजोबा येणार म्हणजे ..तिला टेन्शन येणार ..

कसे होईल ? फजिती नको न व्हायला तिची आणि आमची ..!

यश म्हणाला ..अहो..इतके गोंधळात नका टाकू मला ..

स्पष्ट शब्दात सांगा..काय म्हणायचे आहे ते

त्याचे असे आहे यश ..

तुझ्या आजी आजोबांना ..मी जातांना माझ्या गाडीत घेऊन जाईनच , पण.. त्यांच्या चहा-पाण्याचं .

आणि फराळाचे करणे ..एवढं सगळं तुझ्या काकुला एकटीला जमणारे नाही..

मला वाटते की तिच्या मदतीसाठी मधुराला आज लवकर घरी पाठवावे म्हणतो ..ती असली की

मग मी निश्चिंत होईन.ती आमच्या शेजारी आल्यापासून खूप मदत होते तिची , आधार आहे तिचा .

यासाठीच तर मला तुझी परवानगी हवी आहे .

यश , अरे , तसे तर मी देऊ शकतो परवानगी .

.पण, माझ्या घरीच जायचे.आहे मधुराला .म्हणून ..तुला विचारतोय ..

आणि महत्वाचे म्हणजे –मला खात्री आहे ,

की मधुरा व्यवस्थित करू शकेल , आजी आजोबांना काय लागते ..तिला माहिती आहे सगळ्या गोष्टींची .

काकांचा खुलासा ऐकून यशला हसू आले ..

अहो यासाठी माझी परवानगी कशाला हवी..?

मधुरचे बॉस तुम्हीच आहात ..मला काय आक्षेप असणार .

हे ऐकून काका खुश झाले ..थांक्यू यश.. आणखी एक कर ..

आजी आजोबांना ..मी घेऊन जातो माझ्याकडे ..

पण..त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी तू यावेस अशी माझी इच्छा आहे ..

या निमित्ताने तुझे येणे होईल आमच्या घरी .

शिवाय ..मधुरा आहेच त्यावेळी ..

आमच्या मोठ्या माणसात तुला तिची कंपनी असेल.

काकांनी हे सांगितल्यावर मनातून खुश होत ..यश म्हणाला ..

ठीक आहे काका ,येईन मी ..पण , मी येतो आहे.हे सिक्रेट असू द्या.

यशचे हे बोलणे ऐउन काकांना मनापासून हसू आले ..

ते म्हणाले ..

यश ..तुझ्या मनात काय आहे..अंदाज आला आहे मला ..

नाही सांगणार कुणालाच , मग तर झालं

आणि मग दिवसभर ..यश त्याच्या कामात बिझी होत गेला , रोजच्या कामा निमित्ताने त्याला

बाहेर पडावे लागले ..

*******

२...

******

रेल्वे स्टेशन परिसरात त्याचा एक जुना मित्र , त्याचे एक छोटेसे हॉटेल होते , गजबजलेला

परिसर , रेल्वे प्रवासी सतत ये-जा चालू , ..मित्राचे हे छोटसे हॉटेल ..पण मस्त चालायचे .

त्याला पैशाची अडचण भासली ..म्हणून यशला फोन करून सांगितले होते..

आणि यश म्हणजे अडचणीत हमखास मदतीला धावून येणारा माणूस .."

यामुळे मित्र वाटच पाहत होता .

हॉटेलमध्ये यशला आलेला पाहून मित्राला खूप धीर आला, त्याच्या चेहेर्यावर खिन्नता होती, त्या जागी

आधाराचा धीर उमटलेला यशने पाहीला.

हातातल्या बैगेतून ..पंचीवीस हजार रुपये काढून मित्राच्या हातात देत म्हणाला

अजून लागले तर संग मला ..गावाकडे तुझ्या म्हातार्या आई-बाबांना या पैशांची किती गरज असेल

समजू शकतो मी .

मित्र म्हणला ..

तू किती मोठ्या संकटात मला मदत करायला आलास ,देवच आहेस तू माझ्यासाठी ..

यश ,अरे पैश्याचे देणे मी फेडीन ही , पण, संकटाच्या वेळी केलेल्या मदतीचे तुझे हे उपकार मी

जन्मात फेडू शकणार नाही .

मित्राच्या पाठीवर हात ठेवीत यश म्हणाला ..

मदतीचे मोल ..कसे असते हे मी माझ्या घरातील मोठ्या माणसांनी केलेल्या मदतीच्या प्रसंगातून

शिकलो आहे , त्यांचा बोलण्यापेक्षा ..कृतीतून मदत करण्यावर भर असतो ..आणि ही अशी मदत

मानसला नव्याने उभारी देणारी असते .हे मी अनुभवत आलो आहे.

मित्रा ..मी फार वेगळे काही करीत नाही ..शक्य असेल ते नक्कीच करतो ..

यशच्या बोलण्याने मित्राचे मन भरून आले ..डोळ्यात आलेले पाणी पुसत म्हणाला ..

बस..थोडा वेळ यश .

.मी स्वतहा माझ्या हाताने ..तुझे आवडते कांदे –पोहे बनवून आणतोय ,

नाही म्हणू नकोस ..खाऊन मगच जा. मग, मित्र पोहे बनवायला गेला ,तो येईपर्यंत

यश एकटाच खुर्चीवर बसून सगळीकडे पाहत होता.

आणि तो एकदम कोपर्यातल्या खुर्चीत जाऊन बसला ..अंधार असल्यामुळे ..हॉटेलात आलेल्या

लोकांना सहजपणे दिसणार नव्हता .

त्याच्या वर्कशोप मधील काकांचा ..जावाई ..आलेला दिसला .. त्याच्या जवळ ..एक मोठी पिशवी

होती ..त्याच्या सोबत आलेल्या दुसर्या माणसाला त्याने ती भरलेली थैली दिली आणि मिळालेले

पैसे ..स्वतःच्या खिशात टाकले , बिड्या फुंकीत त्यांच्या गप्पा सुरु झाल्या .

यशची या माणसाची ओळख नव्हती की परिचय नव्हता ..पण.काकांनी या मानसला

मारामारीतून , लोकांच्या तावडीतून सोडवले आहे ..हे त्याने दोन-चार वेळा पाहिले होते .

हा इसम नेमके काय उद्योग करत असावा ? यशला अंदाज येत नव्हता .

मागे एका मित्रांने सावधगिरीची सूचना दिली होती ..की त्याच्या वर्क्शोप मध्ये काही गडबड

होते आहे ..लक्ष ठेव.

हे आठवून ..यशला वाटले ..एकदा या माणसाची झडती घेतली तर कळेल ,हा काय करतो ?

यश त्याच्या विचारात असतांना ..मित्र कांदे पोहे घेऊन येत म्हणाला ..

अरे यश ,असा अंधारात का बसला , चाल समोर , माझ्या खुर्ची जवळ बसू उजेडात.

मग, तिथे बसण्याचे कारण सांगत , मनातली शंका मित्र जवळ बोलन दाखवली ..

तेव्हा तो म्हणाला ,

अरेच्या असे आहे काय ..हा तर नेहमीच इथे येतो ..दरवेळी कुणी नवा इसम असतो याच्या सोबत.

काही तरी देवाण घेवाण होत असते .

आता आमच्या इथे बसून आपापल्या बिझिनेस नमित्त लोक बसतात ,बोलतात ,त्यातलाच हा एक.

तू सांगितलेस हे बरे केलेस , बारीक लक्ष ठेवतो या माणसावर.

आणि एक काम करतो मी ..

पुढच्या वेळेला हा आला की ..

मीच त्याला मोठी लालूच दाखवून ..मोठी डील करु या आपल्यात असे सांगतो ,

मग तो नक्कीच मला सांगेल ..तो नेमकी काय काय तो ते ते ..

हे चालू असतांना .. ऑफिसमधून काकांचा फोन आला ..

यश ..अरे मी निघालो ..तू ये ठरल्या प्रमाणे ..

यशने घड्याळात पाहिले .बाप रे .साडेसहा वाजत आलेले ..

तो मित्राला म्हणाला ..लक्षात ठेवून मला बोलाव पुढच्या वेळी ..

बाय ..

*********

३.

यश घरी आला तो काय ..

घरी कुणीच नाही ..अंजली वाहिनी ..आणि भाई येण्यास खूप वेळ होता.

पण आई-बाबा अचानक कुठे गेले ?

त्याने फोन लावला ..आई म्हणाली ..

यश ..अरे आम्ही अचानक चौधरीकडे आलोत , ते आजीआजोबांना त्यांच्या घरी घेऊन गेले ,

त्यावेळी आम्ही दोघे बाहेर होतो , तिथे चौधरी भाऊचा फोन आला ..म्हणाले..

वाहिनी आणि सर , तुम्ही दोघे कसे ही बाहेरच आहात ..

मग, घरी न जाता ..माझ्याकडेच या..!

मग काय ..आलो इकडे ..

यश , तू एकटा घरी बसून काय करणार .?

.ये तू पण इकडेच ..

चौधरीभाऊ कुणी परके थोडेच आहेत तुला ..

ते पण खुश होतील ..तू आल्याने .

आईच्या फोनने यश जाम खुश होऊन गेला ..

असे म्हणतेस तर येतो मी पण.. आलोच आई ,

फ्रेश होऊन..यश तयार होऊ लागला

मधुराला भेटण्याची ओढ ..आपल्याला तिच्या पासून दूर राहू देत नाहीये ..

मी तर आनंदाचे पंख लावून येतोय मधुरा ..

तुला आहे न ओढ माझ्या येण्याची ,मला भेटण्याची ?

हे कळू दे आता मला मधुरा ..!

ग्रीन कलरचा टी-शर्ट, डार्क ब्ल्यू जीन , भारी स्पोर्ट्स शूज, आवडता परफ्युम स्प्रे ..

यश त्याच्या मधुराला भेटण्यास निघाला ..

ओठ्वर गाणे येत होते त्याच्या ..

हुये है तुम पे आशिक हम ..भला मानो , बुरा मानो ..

आपल्याला जे वाटते ..तसे आणि तितकेच ..मधुराला वाटते आहे ..याची झलक

यशला तिच्या नजरेत दिसून आली होती ..तिच्या शब्दातून हे ऐकायला मिळावे

असे मनाला खूप वाटत होते .

त्याला ठरवता येईना ..

क्या याही प्यार है ...?

कधी नव्हे तो ..मधुराला भेटण्यासाठी , तिला डोळे भरून पाहण्यासाठी यश अधीर झाला होता ,

येतांना आजी आजोबा ..आता आई-बाबांच्या कारमध्ये येऊ शकतात ..

म्हणून यशने त्याची आवडती बाईक काढली ..आणि निघाला ..त्याच्या मधुराला भेटायला ..

यश गुणगुणत होता..

पहला पहला प्यार है ..पहली पहली बार है ...!

---------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात

भाग – २६ वा लवकरच येतो आहे..

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाची जादू

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

9850177342

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------