कादंबरी – प्रेमाची जादू
भाग – २४ वा
------------------------------------------------------------------------------------------------
चौधरीकाकांच्या घरात शिफ्ट होऊन ..मधुरा आणि तिच्या तिघी मैत्रिणींना आता जवळपास महिना
होत होता . घराचा बिकट वाटणारा प्रश्न चौधरीकाकां मुळे इतक्या सहजपणाने सुटला होता की ,
मधुरा आणि मैत्रिणी यांच्या मनावरचे मोठेच ओझे उतरले होते.
कोलेज आणि ऑफिस , त्यात सेमिस्टर परीक्षा आलेली, मधुरा जाम बिझी होऊन गेली होती.
एवढ्या सगळ्या धावपळीत ..शिफ्ट होण्याच्या दोन –तीन दिवस आधी दीदी म्हणाली ..
मधुरा ..तू इथे आल्यापासून मी एकदा ही ..यशच्या आजोबा आणि आजींना भेटायला बोलायला
आलेले नाही , ते नक्कीच म्हणत असतील ..
पंडितजीची पोरगी मोठ्या शहरात आली की पार बदलून गेली आहे
लग्न व्हायच्या आधी ..गावाकडे असतांना ..सकाळ-संध्यकाळ विचारपूस करायला येणारी दीदी ..
आता मधुर आमच्याबरोबर आली तरी अजून एकदा ही आली नाहीये..
असे विचार मनात आले की ..मला फार अपराधी वाटे ग मधुरा ..
म्हणून म्हणते की -
आज तू कॉलेज मधून आलीस की ..अगोदर थोडावेळ का होईन जाऊ या , बसून बोलू या ..
तू तुझ्या मैत्रिणी सोबत राहायला गेलीस की ..माझे जाणे उगीचच लांबणीवर पडेल .
हे ऐकून मधुरा म्हणाली ..
ओके दीदी , जाऊ या आपण, तुला जे वाटते आहे, ते अगदी बरोबर आहे. आपण दोघी जाऊन
येणे महत्वाचे वाटते.
ठरल्याप्रमाणे ..दीदीला सोबत घेऊन मधुरा यशच्या घरी आली ..आणि त्याच वेळी .काही कामानिमित्त
बाहेर गेलेला यश ऑफिसला जाण्या अगोदर एक चक्कर सहजपणे टाकावी म्हणून घरी येत आहे हे दिसले .
या तिघांची एन्ट्री एकाच वेळी झाली होती
दीदीला पाहून ..यशला आनंद झाला ..तो म्हणाला -
काय हे ...! इतक्या जवळ जवळ राहत असून ..तुला आमच्याकडे येण्यास आज वेळ मिळाला दीदी ?
की या मधुराने आणले आग्रह करून ?
दीदी म्हणाली ..
काही ही म्हण बाबा , इथे येण्यास उशिर झाला ..हे खरे ...
माझी चुकी मला कबुल आहे ..
त्यामुळे सगळ्यांची बोलणी खाण्याच्या तयारीने आली आहे मी आज इथे.
सगळे हॉलमध्ये एकत्र बसले ..बापूआजोबा म्हणाले ..
आज फार दिवसांनी ..आपल्या होल मध्ये दुपारच्या निवांत वेळी हास्य विनोद रंगतो आहे ,
खूप छान वाटते आहे मला .
मधुराच्या दिदिकडे पाहत आजी म्हणाल्या ..
अहो, कधी नव्हे तो , इथे बसलेलो आपण सगळे गाववाले आहोत ..
ही मधुरा , तिची दीदी , आपण दोघे ..आणि हा आपला यश ..
जणू आपण आपल्या गावातल्या घरी आहोत असे वाटते आहे मला ..आज या दोन पोरी
आल्या पासून.
दीदीने विचारले ..आज यशचे आई आणि बाबा दिसत नाहीयेत ..
यश म्हणाला ..आज एक पुस्तक प्रकाशन समारंभ आहे..आणि लगेच कवीसंमेलन आहे ,
पुस्तक प्रकाशन बाबांच्या हस्ते ..आणि कवी संमेलनअध्यक्षा ..आई आहे “
म्हणून ते आज दिवसभर बाहेरच असणार ..
मधुरा म्हणाली ..दीदी याला म्हणवे अनुरूप जोडी ..बघ न,
सर आणि मैडम दोघेही साहित्य क्षेत्रात किती बिझी असतात .
मला अशा कार्यक्रमाला जाणे फार आवडते ..
पण , इथे फारशा ओळखी नाहीत ..मग कशी जाणार ? बिन बुलाई मेहमान बन कर.
आजोबा म्हणाले ..अजून तशी नवीनच आहेस तू .., त्यात तुझा जॉब आणि कोलेज ,
जेव्हा जमायला लागेल तेव्हा कर तुझ्या आवडीच्या गोष्टींना सुरुवात .
आजोबांचे बोलणे ऐकून घेतांना ..मधुरा मनातल्या मनात चमकली ..
यशकडे जोब करतो आहोत हे आजोबांना मी तर नाही सांगितले ..
मग , यशने सांगितले आहे की काय या सगळ्यांना ?
अम्माआजी म्हणाल्या ..
दीदी ..मधुरा तिच्या मैत्रिणी सोबत चौधरीकाकांच्या घरी शिफ्ट झाली आहे ,
ही मधुरा यशच्या शो –रूम मध्ये जोब करते आणि शिकते आहे " या गोष्टी
तुम्ही दोघींनी जरी नाही सांगितले ..तरी ..सगळ्या बातम्या आम्हाला इथे
घरात बसून मिळत असतात ..
कारण ..आम्हाला आमच्या शेजार्याच्या ..पंडितजीच्या या दोन पोरींची काळजी असते ,
म्हणून ठेवीत असतो लक्ष ..
खुर्चीततून उठून उभी राहत दीदीने आजींच्या पायाना स्पर्श करीत नमस्कार केला
आणि म्हटले ..
आजी - आजोबा ..मधुरा तर लहान आहे, पण मोठी तिची बहिण म्हणून ..
मी या गोष्टी तुमच्याकडे येऊन तुम्हाला सांगायला पाहिजे होत्या .
खरेच चुकले मी ..!
माफ करा मला ..
मधुराला हे पाहून स्वताच्या चुकीच्या वागण्याची जाणीव झाली ..तिने उठून उभे राहत
आजी आजोबांच्या पाया पडत ..क्षमा मागितली.
हे सगळे झाल्यवर ..इतका वेळ गप्प बसलेला ..यश म्हणला ..
दीदी ,झाले ना आता ..अशा चुका पुन्हा नाही करायच्या .
मधुरा ..तू सुद्धा लक्षात ठेव.. सगळ्याच गोष्टी ऑफिसात सांगणे बरे दिसत नाही .
यशकडे पहात मधुरा म्हणाली ..
चुकी झालीच आहे, तेव्हा सांगितलेले ऐकून ..त्या प्रमाणे वागायचे कबुल करते .
आजोबा हसत हसत म्हणाले ..
पुरे करा बरं ..कोर्ट –मार्शल ..
यशच्या आजी .अहो ,आज .आपले शेजारी आले आहेत ..काही करा त्यांचा पाहुणचार ..
आजी म्हणाल्या ..किचनमध्ये कामवाल्या काकू आहेत .. त्यांचा स्वयपाक रेडी आहे,
आपला लंच आज या मुलींच्या सोबत , यशच्या सोबत आहे ..
आजोबा म्हणाले ..हो हा खरा बोनस आहे ..एरव्ही आपण चौघे .रिटायर माणसे असतो,
आज जरा ..तरुणाई आहे सोबत ..छान चेंज होईल आपल्याला .
दीदी यशला म्हणाली ..
अरे माझ्या आत्ता लक्षात येतंय ..की ..मी उशिरा आले, चुकले मी ..पण,
आमच्या बद्दल सगळ्या अपडेट घरी ..तू देतोस म्हण की ..
यश म्हणाला ..
होय दीदी ....मी माझ्या आई-बाबांशी , आजी-आजोबांशी सगळ्या गोष्टी शेअर करतो ,
त्यांचा सल्ला घेतो , मार्गदर्शन , मदत घेतो .. तुमच्या बद्दल डिटेल मी त्यांना देत असणार
हा तुझा अंदाज बरोबर आहे..
शिवाय ..गावाकडून तुमच्या आई-बाबांचे आजी - आजोबांना नेहमी सांगणे असते ..
बापूसाहेब ..आमच्या दोन्ही पोरींवर लक्ष असू द्या , तुमच्या जीवावर इकडे आम्ही
निश्चिंत असतो.
दिदिशी बोलणार्या यशकडे ..मधुरा पाहत होती ..
किती वेगळा आहे हा मुलगा , सगळीकडे सगळ्यांना फक्त देत राहतो ..आपलेपणा ,
जिव्हाळा ,
या परिवाराशी आपले पूर्वजन्मीची काही ऋणानुबंध नक्कीच असले पाहिजे ..
त्याशिवाय का हा इतका जिव्हाळा आहे आपल्या घरात आणि या परिवारात .
त्याच वेळी ..
यशच्या मनात विचार येत होते ..
तो लफंगा रुपेश ..मधुराच्या मागे लागलाय ..हे मित्रांनी सांगितल्या पासून किती
परेशान झालो होतो आपण , दुसरी कुणी मुलगी असती तर ..तिला ही आपण मदत केलीच
असती ..
पण. मधुर विषयी या रुपेशच्या मनात असलेल्या भावना जाणवल्या “त्या वेळेपासून
“मधुर बद्दल काही वेगळेच असे आपल्या मनात सुरु झाले आहे “ असे जाणवले ..
आणि त्या रोमिओचा आपण बंदोबस्त करून टाकला ..
दीदी सोबत आलेली मधुरा .
हिरव्या –नारिंगी रंगाच्या ड्रेस मध्ये खूपच सुंदर दिसते आहे ..तिचे असे साधे असणे ,
साधे दिसणे ..त्यालाच काय ..आपल्या घरातील सगळ्यांना खूप आवडले आहे हे
गेल्या दोन तीन वेळा मधुरा आली तव्हा तिचे कौतुक त्याने ऐकले होतेच.
दीदी यशला बोलत आहे , त्याच वेळी ..मधुरा यशकडे भान विसरून पाहते आहे “,
या कडे अम्माआजींचे लक्ष वेधत बापू आजोबा म्हणले ..
आजीबाई ..बघा जरा तिकडे नीट..
यश आणि मधुराकडे पाहत आजी हळूच आजोबांना म्हणाल्या ..
तुम्हाला आठवते ..ज्या दिवशी मधुराला घेऊन पहिल्यांदा स्टेशनवर आपण उतरलो ,
तेव्हा ..कारमध्ये सामान ठेवतांना ..मधुरा आणि यश एकमेकाच्या इतके जवळ उभे
होते की ..पाहणार्याला वाटावे ..नवीन लग्न झालेले सुंदर जोडपे आलेले दिसतेय.
आजोबा म्हणाले ..असे व्हावे ही तर आपली इच्छा आहेच ..पण हीच इच्छा
“श्रींची इच्छा व्हावी “ अशी प्रार्थना आपण करू या.
बोलत बोलत खाणे आणि खाता खाता बोलणे “असे करीत लंच सुरु झाला ..
आजी आजोबा शेजारी खुर्चीवर , दीदी टेबलाच्या मध्यभागी असलेल्या खुर्चीवर बसली ,
आणि तिच्या बाजूच्या दोन खुर्च्यांवर यश आणि मधुरा बसले ..
त्यांना वाढताना दीदी त्यांच्याकडे पाहतांना मनातल्या मनात म्हणाली..
मेड फॉर इच आदर “ म्हणयला पाहिजे ..या जोडीला ..
किती हुशार , किती स्मार्ट आहे हा यश
आणि आपली मधुरा ..ती पण काही कमी नाहीये ..
सुंदर ,लोभस , हुशार , निपुण ..म्हणवे या पोरीला ..
किती छान होईल ना ..यश आणि मधुरा .एकमेकांचे झाले तर ?
पण ..कल्पना कितीही छान असली, आपल्या मनाला आवडणारी असली तरी
वास्तवाचे भान तर आपल्याला ,आपल्या आई-वडिलांना विसरून नाही जाता येणार .
यशचे आई-बाबा , आजी आजोबा , भैया आणि अंजलीदीदी ..
किती मोठी माणसे , मनाने श्रीमंत आहेतच ..पैशाने त्यापेक्षा श्रीमंत आहेत..
आणि हीच पैशाची श्रीमंती दोन घरातील फरक आहे , स्टेटस मधला फरक आहे ..
आपल्या मनात यश आणि मधुरा विषयी जी भावना आहे.. ती या घरातल्या माणसांच्या
मनात असेल “असे वाटून घेणे म्हणजे ..दिवा –स्वप्न आहे..” त्यापेक्षा ..
दीदीने हे सगळे विचार मनातून झटकून टाकले ..आणि ती जेवण करू लागली ..
किती गम्मत आहे पहा ..
या क्षणी एकमेकांच्या सोबत असलेल्या ..सगळ्यांच्या मनात विचार आणि कल्पना
एकाच चालू आहे.. यश आणि मधुराबद्दल ..
पण..यातल्या प्रत्येकाच्या मनातली शंका देखील सारखीच आणि एकच ..
मधुरा ..यशची होऊ शकेल का ?
आणि मधुराच्या मनात , यशच्या मनात काय आहे नेमके ?
यशला वाटते ..प्रेमाची जादू तर नसेल ना ही ?
---------------------------------------------------------------------------------------------------------------
बाकी पुढच्या भागात –
भाग -२५ वा लवकरच येतो आहे
----------------------------------------------------------------------------------------------------------------
कादंबरी – प्रेमाची जादू
ले- अरुण वि.देशपांडे – पुणे.
9850177342
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------