lahan pn dega deva - 4 in Marathi Fiction Stories by Adv Pooja Kondhalkar books and stories PDF | लहान पण देगा देवा - 4

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

Categories
Share

लहान पण देगा देवा - 4

भाग ४

रमा- अहो फोन वाजतो आहे तुमचा बघा लवकर अथर्व असेल हो माझा!!!!!!

अगं हो ग हे बघ घेतला , अगदी बरोबर आहेस तू, अथर्व च आहे ग.

बोल रे पठ्या आलास का?

फोन वर अथर्व- हो आजोबा आलो आहे मी १५ मिनटात पोहचेल या लवकर बरं.

हो आलोच बघ .

चल ग येतो त्याला घेऊन.

रमा - अहो थांबा विसरलात का ? आपल्या ला लागलं आहे आराम करायचा आहे डॉक्टर काय म्हणाले विसरलात का? त्या शंभू ला घेऊन जा सोबत, तुम्ही गाडी नका चालवू.

हो ग जातो शंभू ला घेऊन.

ये शंभू कुठे आहेस रे गाडी कधी चल माझा नातू आला आहे त्याला आणायचं आहे.

शंभू- चला आजोबा, काढतो गाडी.

शंभू लवकर चल अथर्व येऊन थांबला असेल, त्याला अशी वाट पाहायची सवय नाही ये.

शंभू- मी अशीच गाडी चालवणार, आज्जी ओरडेल मला.

हो रे आज्जी चा चमचा.चल लवकर.

(गाडी पोहोचते तसा मी धावत अथर्व ला शोधात निघालो)

ये अथर्व !!!!!!!

अथर्व- आजोबा , (दोघे गळ्यात पटतात)

कसा आहेस रे माझा शेर .........

अथर्व- आजोबा मी एकदम मस्त, एक मिनिट हे काय लागलं आहे आणि कसं काय??????

शंभू- दादा तुमच्या येण्याच्या आनंदात पुढे येणारी गाडी पण पहिली नाही बघा आणि काय.......

अथर्व- तुम्ही असं कसं करू शकता? आज जर तुम्हाला काय झालं असत तर?

बस कर तुझी आज्जी आधीच खूप ओरडली आहे आता तू नको ओरडूस.

अथर्व- आजी ओरडली ना मग ठीक आहे. (हळूच हसत)

हो का पठ्या माझी गंमत करतोस. थांब आता.......

अथर्व- आता चला लवकर घरी, मला आज्जी ला भेटायचं आहे. कधी तिला भेटतो आहे असं झालं आहे.

हो रे चल घरी जाऊन मस्त गप्पा मारत बसू........

शंभू- हो आजोबा घेतो रे.

बरं ते सोड घरी सगळे कसे आहेत, माझा मुलगा आणि सून कशी आहेत? आणि त्यांचे काम सुरु झाले का रे?

अथर्व- अगदी चॅन आहेत दोघे हि, आणि त्यांचे काम हि सुरु झाले आहे. दोघांचं हि एकदम मस्त चालू आहे.

आणि मॉम ने तुमच्या साठी नवा कुर्ता आणि आणि आजी साठी साडी घेतली आहे गणपती साठी, आणि हो गणपती साठी नवीन दागिने देखील बनवले आहेत डॅड ने, घेऊन आलो आहे सोबत सगळं मी.

तू सोबत घेऊन आला आहेस म्हणजे? दोघे येणार नाही कि काय या वर्षी पण ?

अथर्व- आजोबा म्हणजे मॉम डॅड लास्ट इयर पण नव्हते आले.

ते सोड तुझं काम काय म्हणत आहे? आणि तिथे कोण भेटली कि नाही? कि फक्त तू देखील तुझ्या डॅड सारखा फक्त काम करतोस?

अथर्व - (हळूच हसून ) तुम्ही पण ना आजोबा...... भेटली असती तर घेऊन नसतो का आलो येताना ???

हो का म्हणजे भेटली असती तर घेऊन आला असता असं म्हणतोस काय ??? बरं

अथर्व- आता तुम्ही पण माझी खेचणार का ?

मी म्हणजे अजून कोण खेचत रे तुला?

अथर्व - ती तुमची लाडकी डॉक्टर साक्षी पण असच खेचते मला.

अच्छा म्हणजे बोलता तर तुम्ही दोघे???

अथर्व - हो काय करणार तुम्हा दोघांची तब्यत कशी आहे हे तुम्ही कुठे सांगता, मग तिलाच विचारतो.

खोटं कशाला बोलतोस रे, तिच्याशी बोलायचं असत असं म्हण कि .......

तुम्ही पण ना आजोबा, आम्ही छान friend आहोत.