Little love is there in Marathi Fiction Stories by Dhanashree yashwant pisal books and stories PDF | थोडासा प्यार हुवा है थोडा है बाकी ......

Featured Books
Categories
Share

थोडासा प्यार हुवा है थोडा है बाकी ......

मित्रानो, मी आज पर्यंत खूप प्रेम कहाणी लिहिल्या .प्रत्येक वेळी नवीन प्रेम कहाणी घेऊन मी तुमच्या भेटीला आले . प्रत्येकाच्या अयुषात प्रेमाची प्रेममय झूलूक हावीच असते .ती काहीच्या आयुष्यात येते ही ......पण, आपल्याच काहीश्या चुकी मुळे त्या प्रेमाचा आनंद आपल्याला घेता येत नाही .अशीच काही आजची कहाणी आहे . आरोही आणि विनय ची ......
आरोही खूप हुशार, सुंदर .....स्वतःच्या हिंमतीवर ती शेवटच्या वर्षाला कॉलेज मधे पहिली आली होती . हातांत चांगले गुण आणि डोक्यात हुशारी असल्यामुळे आरोही ला लगेच नोकरी लागली .तिने ती जिद्दी ने टिकवली ही ......नोकरी लागताच तिने घरच्या जबाबदाऱ्या ही उचलल्या. सगळ कस मस्त चालले होते . अरोही... ही ...आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाची एक एक पायरी चढत होती . तीन वर्ष होऊन गेले होते, तिला ....ती नोकरी पकडून ....आता तिच्या लग्नाची चिंता तिच्या आई वडिलांना सतावत होती . तस, चिंता करण्याचे काहीच कारण नव्हते ....कारण तिला चांगल्या घरची स्थळ येत होती .पण, तिला श्रीमंत घरच, आई वडिलांच्या जीवा वर जगणाऱ्या मुलाचे, लग्ना नंतर बायकोनी फक्त चूल आणि मुल एवढच करावे ...ह्या विचाराचा नवरा च नको होता .उलट स्वताच्या कष्टावर मोठा झालेला .जगाचे भान ठेवून जगणारा .ह्या स्पर्धेच्या जगात स्वतःची जागा निर्माण करणारा ....बायको ला ही समानतेची वागणूक देणारा .....असा मुलगा तिला नवरा म्हणून पहिजे होता .पण, तिला पाहिजे अस स्थळ अजून तिला आले नव्हते . घरांतील लोकाना ही अरोही ही सठि चांगल, तिच्या मनासारखे स्थळ मिळावे ....अस, वाटत होत ....
तस ....अरोही ला कॉलेज मधे, ऑफीस मधे अनेक मुल आवडली होती . पण, तितकंसं तीच कोणाशी जुळून नाही आले. त्यामुळे चांगला नवरा मिळवण्याची तिची शोध मोहीम चालू च होती . म्हणतात ना .....बाई ची नजर ही प्रेमाच्या शोधात नेहमी धावती असते .पण, एकदा का तिच्या मनासारखा जोडीदार भेटला .की, त्या माणसांवर ती थांबते ....आणि अयुष्भर ती तिथेच खिलते. रावीच ही काहीस असच होत .तिला अनेक मुल आवडली .पण, जेव्हा तिला जाणवले .की हा आपला योग्य जोडीदार नाही होऊ शकत .तेव्हा तिची खूप चिडचिड होई. आपल्या नशिबात प्रेम नाहीच .अस, तिला जाणवत .तीच करीएर जरी जोरात चालले असले .तरी, तिची लव्ड लाईफ मात्र अजून ही अंधारात होती . आता तिचा प्रेमावरचा विश्वास उडाला होता . त्यामुळे प्रेमविवाह तिने डोक्यातून काढून टाकले होते .
दिवसेंदिवस अरोहीला जास्त च स्थळ येऊ लागली .पण, त्यातले एक ही स्थळ तिला आवडत नव्हते .तिच्या आई वडिलांना नक्की तिच्या मनात काय चालाय कळत नव्हते . योग्य जोडीदार म्हणून म्हणून अरोही येणारे प्रतेक स्थळ ला नकार देत होती .शेवटी तिच्या वडिलांनी तिच्या शी बोलायचे ठरवले . सुट्टी च्या दिवशी अरोही घरीच होती .तीच सगळ निवांत चालू होते .मूड ही चांगला होता .हीच संधी बघून अरोही चे बाबा अरोही शी बोलायला आले .सुरवातीला एक्ड्च्या तिकडच्या गप्पा चालू होत्या .हळु हळु त्यानी विषयाला हात घातला .त्यानी सरळ सरळ अरोही ला विचारले .की, तिच्या मनात कोणी मुलगा तर नाही ?अरोही नाही सरळ नाही ...संगितले .जोडिडराक्डुन तिच्या असणाऱ्या अपेक्षा ही सांगितल्या . येणारे कोणतेच स्थळ, तिला त्या पध्तीने योग्य वाटत नसल्या मुळे ...ती प्रत्येक स्थळ ला नकार देत होती .मग हसत हसत तिच्या वडिलांनी तिला समजावले . .... अग, प्रतेक स्थळ तुला असच वाटणार ....पण ,जेव्हा तू तिथे राहशील ....वावरशील ....तिथल्या माणसांना प्रेमाने, आपुलकीने जवळ करशील .....तेव्हा तुला तूझा नवरा योग्य जोडीदार वाटेल . अरोही ला ही बाबांचे म्हणे पटले ....शेवटी त्याचा संसारा विषयी, आणि माणसाचा अनुभव जास्त च आहे . बाबांनी तिला एका स्थळांचा फोटो दाखवला . मुलगा तसा चांगला होता . पण, अरोही च्या रूपाला साजेसा नव्हता . नोकरीला वरच्या पदांवर होता . पगार ही चांगला होता . स्वतःच्या हिंमतीवर त्याने घर बांधले होते . हा ....थोडस कर्ज होत घराचे .मुलगा मुंबईत नोकरीनिमित्त रहायला होता . घरी, आई आणि दोन बहिणी होत्या .बहिणीची लग्न जाहाली होती . मुंबईत त्याच घर भाड्याने होत . अरोही ला नोकरी करण्याची परवानगी होती .अरोहीला ड्रेस, वस्टेर्न कपडे घालायला खूप आवडत असे . ते घालण्याची परवानगी ही होती .स्थळ तस अरोही ला हवं तस होत .....पण, लग्ण्याच्या बाबतीत बाबांना अरोही वरती कोणतीच बळजबरी करायची नव्हती .तिच्या लग्नाचा निर्णय तिने विचार करून घ्यावा .अस त्यना वाटत होते . त्यामुळे त्यानी अरोही ला ह्या स्थळाविषयी विचार करयला वेळ दिला . अरोही ने ही ह्या स्थळाचा विचार करायचे ठरवले .
रात्र खूप जाहाली होती, अरोहीला सकाळी कामावर ही जायचे होते . वेळेच्या बाबतीत ती खूप पर्फेक्ट होती .रात्री लवकर झौप्ने , सकाळी लवकर उठणे ...उठल्या वर आपला डब्बा बनवणे . स्वताची उरलेली कामे स्वतः करणे . अशी शिस्तीच्या गोष्टी ती कटाक्षाने पाळत होती . तिला ते आवडायच. ऑफीस मधे ही ती तिच्या कामाच्या बाबतीत ती पर्फेक्ट होती .त्यामुळे तर ऐत्क्या कमी वेळात तिने एवढा मोठा टप्पा गाठला होता . पण ...काही जाहले, तरी ती लग्नाचा एवढा मोठा निर्णय घेऊ शकत नव्हती .रात्र जशी पुढेपुढे सरत होती ...तसे डोक्यात विचाराचे काहूर माजत होते. कॉलेज मधे ऑफीस मधे ती कितीतरी मुलांना ओळखत होती, त्याच्याशी तिची चांगली मैत्री जाहली .एका क्षणाला तिला असे ही वाटले, की हा मुलगा आपला योग्य जोडीदार बनू शकतो ...पण, हळु हळु त्याच खर रूप येत जाई. आणि मग अरोही ला त्याचा विचार सोडवा लागत असे . पण, आता तर ते ही नव्हते .एका अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवायचा .की, हा मुलगा आपल्याला सुखी ठेवेल, आपली आयुष्य भर साथ देईल . प्रेमविवाह काय? किवा ठरवून लग्न काय? कोणताच ऑप्शन चुकीचा नसतो ...फक्त तो आपल्याला किती सूट होतो .हे महत्वाचे असते .विचार करता करता अरोही ला कधी झौप लागली .तिला समजलेच नाही . मग काय, उशिरा झौप्ल्या मुळे, सकाळी उठायला तिला उशीर जाहला .शिवाय झौप ही पूर्ण जाहली नाही .उशीर झल्यामूले तिच्या आई ने तिचा डब्बा बनवून ठेवलेला .तिची रोज ची कामे ही तिला करता येत नाही .
कामावर थोडस उशिरा पोह्च्ल्यामूले तिच्या कामाचा गोंधळ उडाला .तिचा दिवस च बेकार गेला .त्या दिवशी तिला समजले .की, जर आपल्या अयुषत एक चुकी जाहाली . तर पुढे सगळ बिघडत च जात . त्या दिवशी तिने एक नवीन धडा शिकला . परत अशी चुकी करायची नाही हे तिने मनोमन ठरवले .
लग्नाच्या विषयी तिने सगळ्याच्या मनाचा आढावा घेतला . पण, सगळ्याचे वेगवेगळे मनाचा दाखला दिला .शेवटी लग्नाचा प्रश्न जसा होता ...अजून ही तसाच होता .अरोहीला कोणता निर्णय घ्यावा? ते अजून ही कळत नव्हते .बाबांनी विचार करयला दिलेले दोन दिवस ही आता संपत आले होते . तिला आतल्या दोन्ही मनाचा गोंधळ उडत होता . सोमवारी मुलगा बघायला येणार होता .अरोही ला कोणताच निर्णय घेता येत नव्हता .त्यामुळे निदान ह्या मुलगा बघून तरी घेऊ .म्हणून तिने हो म्हणले .