Her struggle # 04 in Marathi Fiction Stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | संघर्षमय ती ची धडपड #०४

Featured Books
  • ઈર્ષા

      ईर्ष्यी घृणी न संतुष्टः क्रोधनो त्याशङ्कितः।  परभाग्योपजीव...

  • ફરે તે ફરફરે - 61

    ફરે તે ફરફરે - ૬૧   જુના જમાનાના લેખકો સવારનુ વર્ણન કરત...

  • રાય કરણ ઘેલો - ભાગ 10

    ૧૦ મહારાણીની પ્રેરણા   કાંધલે જે કહ્યું તે સાંભળીને કરણ...

  • ઇડરિયો ગઢ

    ઇડરિયો ગઢવર્ષોથી મનમાં તમન્ના હતી અને એક ગૂજરાતી ફિલ્મ પણ વા...

  • આકર્ષણ બન્યુ જીવનસાથી - 1

    મહિનાનો પહેલો દિવસ અને ઍ પણ સોમવાર. અમારી ઓફિસ મા કોઇ જોબ મા...

Categories
Share

संघर्षमय ती ची धडपड #०४

 

सगळे छान सुखी - समाधानी आयुष्य घालवत असतात...... असेच काही दिवस जातात..... परी चांगलीच रमली असते...... सहा महिने उलटले असतात..... सहज एकदा, शिवाजी आणि सविता बाहेर जाण्याचा प्लॅन करतात..... कुठेतरी फिरून येण्याचा तो प्लॅन असतो..... यशवंतला काही काम असल्याने अवंती आणि तो घरीच थांबणार असतात...... शिवाजी आणि सविताला प्रायव्हसी म्हणून, परीला अवंतीकडे सोडून ते जाणार असतात..... तसही ते जाऊन रात्री घरी परतणार असतात...... जायची तयारी पूर्ण झालेली असते...... त्यांना बाहेर यशवंत ड्रायव्हरला सांगून सोडणार असतो..... त्यामुळे, काहीच चिंता नसते..... गाडी बाहेर उभी असते.....

 

यशवंत : "शिवा तू वहिनीची काळजी घे इकडे आम्ही आहोच परीला सांभाळायला...... मी क्लाएंट ना घरीच बोलावून घेतलय..... ते काही डील साइन करायच्या आहेत..... खूप इंपॉर्टन्ट.... म्हणून, आम्ही सोबत नाही तुझ्या नाहीतरी, मी आणि अवु आलोच असतो......☺️☺️"

 

शिवाजी : "अरे भावा बर झाल असतं आला असतास...... आम्हाला बोर होईल...��"

 

यशवंत : "नाही अरे..... कसलं बोर..... इतक्या दिवसांपासून तुम्ही दोघं बाहेरून, फिरूनही आला नव्हता ना..... जा एन्जॉय करा......✌️��"

 

शिवाजी : "काय भावा मजा घेतोस...... आम्ही आल्यावर तू ही फिरून ये वहिनींना घेऊन.....��"

 

सविता : "आपणच करूया की प्लॅन नंतर सगळे जाऊयात.... तसही परी दीड वर्षांनी मामा कडे जाईल..... तर त्याआधी आपण तिची पार्टी ठेऊ.... पण, एका ठिकाणी जावून....☺️☺️"

 

अवंती : "अरे वाह... बेस्ट आहे हे..... मस्त मजा करू..... चालेल.... पण, ताई निघा आता.... उशीर होतोय.....� भाऊजी वाट बघताहेत....�"

 

शिवाजी : "काय हो वहिनी.....�"

 

यशवंत : "चला मी सोडतो बाहेर.....��"

 

ते दोघे निघून जातात..... इकडे यशवंत येऊन बसतो.....

 

यशवंत : "काय म्हणताय परी बेबी...... जास्तच मस्तीखोर झालीय ही..... चावट...... बघ जीभ दाखवते....�.. जीभ दाखवणार आता.... हा..... आले आले..... माझी बेबी....��"

 

अवंती : "आपल्या नशिबात काहीच नाही का हो....��"

 

यशवंत : "अग नको ग निराश होऊ अवू..... आहे की आपली परी.... बाबांची परी.....हिलाच आता आपण मुलगी समजूत..... �"

 

अवंती : "ते आहे हो..... पण,....��"

 

त्यांचं बोलणं सुरु असतं आणि परी झोपी जाते...... अवंती तिला मांडीवर घेऊन बसते.....काही वेळाने क्लाएंट येतात....... अवंती आत रूममध्ये येऊन परीला घेऊन बेडवर पडते....... क्लाएंट सोबत खूप वेळ लागणार असल्याने, ती थोडी झोप घेण्याचे ठरवून झोपून जाते..... तिकडे घरचे नोकर खायची सगळी व्यवस्था करून ठेवतात...... क्लाएंट यशवंतच्या साईड बिझनेसमध्ये investment plan घेऊन आलेले असतात...... जो - तो आपला प्लॅन यशवंतला सांगतो.... पण, यशवंतला मात्र काही पटत नाही.... कारण, त्यांच्या प्लॅन्स नुसार त्याच्या बिझनेसचे रुल्स नसतात...... त्या प्लॅन्समुळे लाँग टर्म बेनिफिट मिळणार नसतो..... म्हणून, नवीन प्लॅन्स बनवायला सांगून, त्यांना तो परत यायला सांगतो...... ते सगळे निघून जातात....... यशवंत रूममध्ये जाऊन बघतो तर, अवंती आणि परी छान झोपल्या असतात.....☺️☺️

 

यशवंत जाऊन बेडच्या थोड्या अंतरावर गालावर एक हात ठेऊन कौतुकाने त्या दोघींना बघत असतो.....☺️☺️ तेवढ्यात अवांतीची झोप उघडते.... आणि ती यशवंतकडे बघते.... तो भानावर नसतो.... कारण, परी झोपेत खूप क्यूट दिसत असते....☺️ परी सगळ्यात जास्त त्याचीच लाडकी असते.....

 

अवंती : "अहो.... इतकं काय बघताय नजर लावणार काय आमच्या परीला.....��"

 

यशवंत : "काहीही काय बोलतेस.....� उलट तिला कुणी नजर लावली तर, गाठ माझ्याशी आहे.....���"

 

अवंती : "बसा मी कॉफी घेऊन आले....☺️☺️"

 

यशवंत तिच्या जवळ बसतो..... परी खूप वेळ झोपत असल्याने कुणालाच त्रास देत नाही.....☺️☺️ अवंती कॉफी घेऊन येते आणि यशवंत जवळ बसते....

 

अवंती : "काय मग केलीत फायनल डील.....�"

 

यशवंत : "नाही ग त्यांचे प्लॅन्स आपल्या बिझनेस साठी परफेक्ट नव्हते..... म्हणून, दुसरे प्लॅन्स बनवा आणि परत या अस सांगून, पाठवून दिलं....�"

 

अवंती : "बर बर..... होईल सर्व नीट...☺️☺️"

 

यशवंत : "हो ते तर आहेच....��"

 

अवंती : "चला हॉलमध्ये खाली परीला पाळण्यात ठेऊन देते.... तिची झोप काही आताच उघडणार नाहीये.....���"

 

यशवंत : "हो....��"

 

परीला पाळण्यात झोपवून, ते दोघं हॉलमध्ये येऊन बसतात..... काही वेळ गोष्टी रमतात.... त्यांच्या प्रेमाचे किस्से, लग्नाचे किस्से सुरू असतात..... तेवढ्यात त्यांच्या घरच्या माळी शांताराम काकांच्या जोरात किंचाळण्याच्या आवाजाने यशवंत आणि अवंती धावतच बाहेर येतात...... तर काय????!!!!������

 

समोर शांताराम काका रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले असतात..... आणि गेटच्या दिशेने चार पुरुष तोंडाला बांधून उभे असलेले दिसतात..... त्यांच्या हातात धारदार शस्त्र पाहून, अवंती पुरती घाबरली असते...... तिला काहीच सुचत नाही ती घरात शिरते..... आणि जाऊन हॉलच्या सोफ्यामागे लपते..... यशवंत फोन घेऊन पोलिसांना डायल करणार तोच त्यांतील एक जण त्याच्या हातावर वार करतो...... फोन खाली पडतो..... ते सगळं दृश्य बघून अवंती जोरात किंचाळत असते.... तिचा सुगावा लागल्याने दुसरा तिच्या जवळ जाऊन तिचे केस एका हाताने पकडुन तिला फरफटत, ओढत बाहेर घेऊन येतो..... दोघांना एकाच जागी ठेवलं जातं.... अवंती परी म्हणणार तोच यशवंत तिच्या तोंडावर हात ठेऊन, नकारार्थी मान हलवत तिला नाव न घेण्याचे खुणावतो..... कारण, आता हा त्यांचा अंत आहे हे त्याला कळून चुकले असतें.... पण, त्या लहान परीचा त्यात काय दोष नाही का...!! म्हणून, तिला सुखरूप ठेवण्यासाठी तिचं नाव न घेण्याचे तो तिला खुणावतो...�

 

ती माणसं त्या लोकांना निर्घृणपणे मारून टाकतात..... यशवंत अजूनही जिवंत आहे आणि त्याचे डोळे उघडे हे बघून त्यातील एक माणूस त्याच्या पुढे येऊन स्वतःचा चेहरा त्याला दाखवतो......

 

यशवंत : "तू..... निर्लज्ज माणसा.....����"

 

इतकं बोलून यशवंत शेवटचा श्वास घेतो.....� (निःशब्द)

 

सगळे तिथून पळून जातात.....

 

इकडे शिवाजी आणि सविता बाहेर आलेले आहेत..... सगळं फिरत असता, अचानक सविताच्या पोटात दुःखुन येतं.....

 

शिवाजी : "काय झालं.... तुला बर नाही का...��"

 

सविता : "अहो.... घरी चला मला पोटात दुखतंय....�"

 

शिवाजी : "हो... हो .... चल .....��"

 

शिवाजी आणि सविता घरी यायला निघतात....... तिथून अजून त्यांना अर्धा तास लागणार असतो..... तोपर्यंत यशवंत आणि अवंतीच्या खूनाचा सुगावा शेजार - पाजाऱ्याना लागलेला असतो.... पोलिस घटनास्थळी पोहचून सगळा तपास करत असतात.... कुठे काही मिळतं का...... तपास जोरात सुरू असतो...... पोलिसांच्या हाती काहीच लागत नाही...... थोड्याच वेळात शिवाजी आणि सविता येऊन पोहचतात आणि दृश्य पाहून दोघांच्या काळजात धस होते....... मृतदेह रुग्णवाहिकातून, शवविच्छेदनासाठी घेऊन गेल्याने, तिथे फक्त रक्त सांडलेले बघून सविताला भोवळ येते....... ती जागीच कोसळते..... तिला रूममध्ये घेऊन गेल्यावर शिवाजीला परी तिथेच सुखरूप दिसते..... कदाचित परीच्याच काळजीने सविता शुद्ध हरपून, कोसळली असेल...... असा विचार तो करतो....... शिवाजी, सविताला बेडवर झोपवून परीला आपल्या जवळ घेऊन खूप रडतो..... तिकडून उप - निरीक्षक रावसाहेब शिंदे येतात......

रावसाहेब : "सर, आम्हाला सांगताना अतिशय दुःख होत आहे की, दोघांचा मृत्यू आम्ही पोहचण्याचा आधीच झाला होता आणि आता मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत....... पण, अजून तरी गुन्हेगार हाती आलेले नाही.... एका शेजाऱ्याने एका गुंडाचे तोंड बघितल्याचे सांगितले...... त्यानुसार, त्याची आम्ही विचारणा करून स्केच बनवून, शोध घेण्याचे ऑर्डर्स कंट्रोल रूमला दिले आहेत..... लवकरच ते आमच्या तावडीत असतील..... तुम्ही काळजी करू नका.... आणि तुमची मुलगी सुखरूप आहे.... ही गोष्ट कुठल्याही चमत्कारा पेक्षा कमी नाही....."

 

शिवाजी : "सर माझ्या माहितीप्रमाणे, हे करण्यामागे यशचा सावत्र भाऊ असावा अस मला वाटतं.... कारण, त्याने एकदा मला तो त्याच्या मागावर असल्याची कल्पना दिली होती.....��"

 

रावसाहेब : "आम्ही त्यालाच आधी ताब्यात घेऊन विचारणा केलीय.... कारण, याआधी यशवंत साहेबांनी त्याची तक्रार नोंदवून ठेवली असल्याने, आम्ही संशय म्हणून, त्याला विचारणा करण्यासाठी ताब्यात घेतलं होतं...... पण, साहेब मला नाही वाटत त्याने काही केलं आहे...... कारण, आम्ही त्याच्या सगळ्या टेस्ट करून बघितल्या त्या नॉर्मल आहेत...... त्यावरून तो खरच बोलतोय अस वाटतंय..... पण, यामागे नक्की कोण हे लवकरच कळेल..... येतो आम्ही.... आम्हाला अजून तपास करावा लागणार आहे.....� काळजी असू द्या...."

 

शिवाजी : "हो साहेब.... काही मदत लागल्यास, मला कॉल करू शकता....."

 

पोलिस तपासासाठी निघून जातात..... सविता हळूहळू शुध्दीवर येऊन, उठून बसते....... शिवाजी परीला पाळण्यात ठेऊन तिच्या शेजारी जाऊन बसतो.....

 

सविता : "काय होतं हो ते बाहेर सगळं रक्त आणि ते.... ���"

 

शिवाजी : "इकडे बघ....... तू आधी शांत हो..... मी तुला आता जे काही सांगणार ना ते नीट ऐक..... घाबरु नकोस.....�"

 

सविता : "...�����"

 

शिवाजी तिचे दोन्ही हात - हातात घेतो....... आणि तिला सांगायला सुरुवात करतो.....

 

शिवाजी : "हे बघ यश आणि अवांतीचा खून झालाय..... आता यामागे कोण आहे हे, अजून तरी समजलेलं नाहीये.... पण, लवकरच ते कोडही सुटेल...... इथून पुढं आपल्याला न खचता, परीला सांभाळलं पाहिजे..... समजतेस ना.....��"

 

सविता : "काय हो..... काय वाकडं केलं भाऊजीनी कुणाचं....� देव माणूस होते ते...... लोकांना चांगली माणसं नको असतात का हो...... आपल्या परीवर किती जीव होता त्यांचा......���� गुन्हेगारांना चांगली शिक्षा झाली पाहिजे आता.....������"

 

शिवाजी : "सांभाळ स्वतःला...... होईल त्यांनाही शिक्षा......☝️ देव बघतोय सर्व.....�"

 

आता मात्र शिवाजीच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं होतं.....�..... दोघेही एकमेकांना मिठीत घेत जिवाच्या आकांताने रडू लागले.......������

 

आज त्यांना कुणीही कस थांबवणार...... त्यांच्या परी वर जीवापाड प्रेम करणारा देवमाणूस आज त्यांना असाच एकटा सोडून गेला होता........�� कस वाटत असेल त्यांना, ज्यांची काळजी करणारा कुणी त्यांना सोडुन जात असेल.......(निःशब्द)

 

क्रमशः