Sangharshmay ti chi dhadpad - 1 in Marathi Fiction Stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | संघर्षमय ती ची धडपड #०१.

Featured Books
Categories
Share

संघर्षमय ती ची धडपड #०१.

 

सविता : "आई ग...... अहो.... ऐकताय ना...... माझ्या पोटात कळ येत आहे..... जरा येता का इकडे.....आई ग.....������"

शिवाजी : "अग काय होतंय तुला..... रडू नको..... थांब, मी रामला बोलावून घेतो...... तो आपल्याला त्याच्या रिक्षातून घेऊन जाईल.....��"

राम शिवाजीचा  मित्र........ तो एक रिक्षा चालक असतो....... शिवाजी त्याला कॉल करतो.... राम मात्र पिऊन पडलेला........ फोन उचलत, तो नशेतच बोलतो....����

राम : "हं.... बोल.... शिवा काय म्हणतोस..... तुला माहिती ना आपण आता कुठे आणि कसा असतो... का फोन केलास..... भावा?�����"

 

शिवाजी : "अरे.... तुझ्या वहिनीच्या पोटात दुखतंय तुझी मदत झाली असती तर....� तिला घेऊन आताच निघाव लागतंय बघ... खूप रडतेय यार ती..... आणि मला बघवत नाहीये.... तू येतोस का पटकन......�"

 

राम नशेत.......��

 

राम : "हो येतो हे काय उठलो आलोच...... निघतोय..... अय.......�"

 

तो ढेकर देत उठतो खरा.....� पण, त्याचे पाय जागेवर नसतात.... अडखळत - अडखळत तो त्याच्या रिक्षापाशी जातो...... रिक्षा सुरू करतो आणि शिवाजीच्या घरासमोर येऊन थांबवतो......��

 

राम : "ये आलोय मी..... घेऊन ये वहिनीला..�"

 

त्याला सुध नव्हतीच....... थोड्याच वेळात शिवाजी सविताला रिक्ष्याच्या मागच्या सिटवर आडवी झोपवून, स्वतः तिचं डोकं आपल्या मांडीवर ठेवून बसतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो..... मात्र तिच्या पोटात इतक्या कळा त्रास देत असतात की...... बस.... असह्य....�

 

राम रिक्षा, नशेत चालवत असल्याने, खूप आडवी - तिडवी घेऊन जातो........मागे सविता जोर - जोरात ओरडते..����..... आणि शिवाजींच्या काळजात भीती आणखीच घर करून जाते...��...... त्याच वेळी त्याला  तो क्षण आठवतो.... ज्या आठवणींनी शिवाजी नेहमीच हादरून जातो........

 

आठवण....! त्याच्या एका जन्मतः मृत झालेल्या बाळाची.... रुग्णालयात सविताला घेऊन जायला उशीर झाल्याने, ती परिस्थिती त्याच्या समोर आली होती..... आणि आज जेव्हा ५ वर्षांनी त्यांना परत ते सुख मिळणार होते...... याही वेळी सारखीच परिस्थिती बघून त्याचा जीव भांड्यात नव्हता.....तो सारखा सविताला गोंजारत शांत तर करत होता...... पण, ती काही शांत होईना.... होणारही कशी एका बाळाला जन्म देणं सोपं नसतं.... बाईचं पुनर्जन्म असतं ते..... काही वेळ असाच गेला..... थोड्याच वेळात समोरून एक ट्रक येताना शिवाजीला दिसला आणि रामचं भान नसल्याचं शिवाजीला जाणवलं..... तो ट्रक वेगाने त्यांच्याच दिशेने येत होता...... काहीच अंतरावर त्यांची ट्रकला धडक होणार.... तोच शिवाजीने मागच्याच सिट वरून, रामला हाताने धरून रिक्षा बाजूला केली..... आणि मोठा अनर्थ टळला..... शिवाजी रागात रिक्षातून बाहेर आला.... आणि रामला ओढून बाहेर काढले....

 

राम : "मला का बाहेर काढलं.... मी चालवतोय ना.....�"

 

शिवाजी : "आता तू काही वेळ इथ पड..... आता इथून पुढचा प्रवास मीच करतो... तुला काहीच जमत नाही.... आज माझ्या बाळाचा जीव घेतला असता तू....... ते मी सांभाळलं म्हणून.... नाहीतर, किती महागात पडलं असतं.... चल हो बाजूला...����.."

 

शिवाजी पटकन रिक्षात बसून निघून गेला.... इकडे राम एकटाच बरळत होता.....

 

राम : "समजतोस काय रे स्वतःला..... माझी मुलंच नाहीत का.... म्हणतोस जीव गेला असता असा कसा गेला असता...� हा राम आहे राम.... साक्षात मर्यादा पुरुषोत्तम......�� रिक्षावाला..... च्यामारी, आम्हाला समजत नाही बोलतो.....चल जाऊदे....� देवा चांगलं होऊ दे रे... चलो सोना मांगता अब.... अय.....����"

 

तो तिथेच पडल्या पडल्या झोपी गेला.....����� तिकडे शिवाजी, सविताला घेऊन रुग्णालयात गेला..... तिला नर्सने स्ट्रेचरवर टाकून, पटकन आत घेऊन गेली..... इकडे शिवाजीच्या जीवात - जीव नव्हता...... तो सतत त्याच रूमकडे बघत उभा होता..... काही वेळानी डॉक्टर बाहेर आले.... शिवाजी त्यांच्या जवळ गेला.... तर, डॉक्टरांनी अस काही सांगितल की, ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीन कधीचीच सरकली आणि आता आपण त्याच खड्ड्यात पडणार अशी अवस्था होणार होती.....�

 

डॉक्टर : "मिस्टर शिवाजी आम्ही त्यांना चेक केलंय त्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे..... आम्हाला बाहेरून डॉक्टरांची टीम बोलावून घ्यावी लागतेय तुम्ही काउंटरवर तोवर फिस भरून द्या..... येतो मी...."

 

अस बोलून डॉक्टर निघून गेले....आता मात्र शिवाजीच्या डोक्यात खूप काही सुरू झालं........ त्याने काउंटर वर फिस विचारली ती पन्नास हजार रोख त्वरित भरायची होती......तो विचार करतच बाहेर पडतो......

 

शिवाजी : "बाळाला मला वाचवायचे आहे.... मला काहीही करावं लागलं तरीही चालेल..... मी ते करेलच... पण, काहीही करून पैसे जमवावेच लागणार.....मला निघाव लागेल.... पैशांची सोय करावीच लागेल.....�����."

 

अस म्हणून तो हॉस्पिटल बाहेर पडतो... आणि रिक्षा घेऊन राम जवळ जातो..... तो मस्त घोरत पडला असतो.....��� शिवाजी त्याच्या जवळ जातो आणि त्याला हाताने हलवून उठवतो..... तो दचकून उठतो.....�

 

राम : "नाही मी काही नाही केलं..... नको मरुस मला... जाऊदे....���"

 

शिवाजी : "अरे मी आहे...... शिवा..... का इतका घाबरतोस.....तुझी सवय गेली नाही का अजून झोपेत ओरडायची....���"

 

राम : "तू आहेस तर.... किती घाबरलो मी..... मला वाटलं बायकोच असेल....�"

 

शिवाजी : "अरे ते सोड.......�� मला काही पैशांची गरज आहे.... तुझ्या वहिनीला ऑपरेशन सांगितलंय.... त्यासाठी बाहेरून टीम बोलावण्यात येईल.... ज्यासाठी कमीत - कमी पन्नास हजार तरी हवेत.....���� बघ ना कुठून जमतात का.....?? मला माहित आहे इतके कुणीच देणार नाही..... माझ्याकडे आहेत काही... बाहेरून पंचवीस जरी जमले ना बाकी मी करतो.....� प्लीज इतकी मदत कर....."

 

राम : "बस का भावा.... चल माझ्या मित्राकडे.... तो करेल मदत...��."

 

ते दोघे रामच्या मित्राकडे जायला निघतात..... रामचा मित्राचा बिअर बार असल्याने त्याच्याकडे पैशांची काहीच कमी नसते..... ते दोघे तिथे पोहचतात.... शिवाजींना काहीच शौक नसल्याने ते जाऊन बसतात.... मात्र, राम परत काउंटर वर जातो..... आणि एक पेग मारून शिवाजीच्या शेजारी येऊन बसतो.....�

 

शिवाजी : "तुला काय वाटतं रे मिळतील ना पैसे...??�"

 

राम : "हो रे माझा खूप चांगला मित्र हा.... आणि माझ्यामुळे त्याची कमाई ही होते ना...��� देईल मग तो पैसे..."

 

राम नेहमीच व्यंगात्मक बोलायचा...... म्हणूनच तर ते दोघे चांगले मित्र होते..... कारण, आपल्या आयुष्यात आपल्याला हसवणारे खूप कमी असतात..... म्हणून, त्यांची साथ आपल्याला आपल्या जीवनामध्ये हवी असणे हे एका आजारावरील औषध असते....�

 

काही वेळ दोघेही रामच्या मित्राची वाट बघत बसले असता, काही जण तोंड झाकून बारच्या आत संशयास्पद शिरताना शिवाजीला जाणवतं...... तो रामला याची कल्पना देतो..... पण, त्याला वाटतं अशी लोक येतच असतात आणि तो शिवाजीला लक्ष देऊ नकोस अस सांगतो..... ती लोकं काउंटर वर जाऊन बसतात.... त्यातील एकाच्या खिशातील बंदूक शिवाजीच्या नजरेला पडते..... तो लगेच ते रामच्या नजरेस आणून देतो..... ते दोघे सावध होतात..... तिकडून रामचा मित्र येत असतो.... आणि ज्या माणसाकडे बंदूक असते तो त्याच्या बंदुकीला बाहेर काढायला खिशात हात टाकणार.... तोच, शिवाजी त्याला मागून धरून ठेवतो..... आणि राम आपल्या मित्राला सगळ्या प्रकरणाची पूर्व कल्पना देऊन, सुखरूप त्याच्या प्रायव्हेट रूममध्ये घेऊन जातो..... इकडे शिवाजी..... खऱ्या शिवाजी महाराजांसारखा त्या गुंडांना पुरून उरतो....... पोलिसांना तक्रार करण्यात येते.... आणि ती लोकं कोठडीत असतात..... नंतर शिवाजी तिकडे रूममध्ये जातो..... रामचा मित्र यशवंत कदम शिवाजीच्या कर्तुत्वाने खुश होऊन त्याला पन्नास हजारांचा चेक देऊ करतो.... आणि काही समस्या असल्यास मला सांग मी नेहमी असेल अस सांगतो......

 

शिवाजी : "साहेब खर तर आज मी आपल्या समोर पैशांची मागणीच करायला आलो होतो.... पण, मला वाटतं देवाने माझी, माझ्या होणाऱ्या बाळावरची खरी माया बघून, मला हे देऊ केलंय..... साहेब मी आपले हे ऋण माझ्या पूर्ण आयुष्यात विसरणार नाही.... आणि हो माझ्याकडून जितकं जमेल मी ही रक्कम फेडू इच्छितो..... आता यासाठी तुम्ही नकार देऊ नये अस मला वाटतं.... प्लीज साहेब...��"

 

यशवंत : "बर बर.... मी तुझ्या स्वाभिमानाचा आदर करतो..... तू एक खरा माणूस आहेस... म्हणून, तू आजपासून माझ्या बारमध्ये कामाला असणार.... मला रामने सांगितली तुझी परिस्थिती काय.... त्यामुळे, तू काम कर आणि तुझ्या पगारातून ते पैसे चुकते कर.... आणि हो मला साहेब नको बोलुस.... मी रामचा आहे.... तसाच आता तुझाही मित्र आहे.... कारण, तुझ्यामुळेच आज माझा जीव वाचलाय.......��"

 

राम : "देख मैने बोला था ना तू टेन्शन ना ले.... अपना यार हैं ही दिल का बडा.....☺️"

 

यशवंत : "आणि तू कधी मोठ्या मनाने प्यायच थांबणार.....� याला इथे कामाला ठेऊन घ्यायचा मी विचार केला..... तर, हाच अर्धा स्टॉक खाली करायचा...� म्हणून, याला सांगितल नाही.... कधीच....पण, शिवाजी मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.... उद्यापासून तू लाग कामाला..... काळजी नको करुस मी नेहमी असेन....�"

 

शिवाजी : "बघा ना मी त्याला किती तरी वेळा सांगून झालं अरे प्रयत्न करून बघ सुटेल की..... पण, हा पठ्ठ्या नाव घेईल तरच नवल......� पण, काही नाही सुधारेल तो ही कधी तरी....☺️ आणि हो तू माझ्यावर विश्वास दाखवला..... याचा मी मनापासून आभारी आहे.....� खरंच आज तू देवासारखा भेटलास.... नाहीतर काय माहित माझ्या बाळाला मी वाचवू ही शकलो असतो का.....�� विचार करूनच मनात कस तरी होतं.....��"

 

यशवंत : "खर तर तुझे आभार मी मानले पाहिजे..... तूच आलास देवा सारखा....�☺️ आणि हो याची दारू सुटेलच एक दिवस बघच....फक्त त्याने ते मनावर घेतलं तर मिळवलं.....�.�"

 

राम : "हो म्हणजे सुटेल की.... आणि मी इथ कामही करेल बर का यश..... तुम्हाला मी वचन तर नाही देऊ शकत....�� पण, हो करेल मी प्रयत्न....�"

 

यशवंत : "बर बर.... या तुम्ही वहिनींना गरज असेल शिवाजीची... काळजी घे वहिनीची आणि बाळाला घेऊन ये हा घरी.... तुझ्या वहिनींना आवडेल.... आम्हाला अजूनही मुल - बाळ नाहीत.....� म्हणून, तिला लहान बाळांची जास्त आस आहे.....ये हा..... काय माहित तुझ्या बाळाच्या येण्याने आमची ओंजळ भरेल... आता हे देवच जाणे.....��"

 

शिवाजी : "नको रे यश निराश होऊ.... देव बघतोय ना.... चांगल्या माणसांसोबत चांगलंच होतं नेहमी बघ.....☺️ चल येतो आम्ही... तू पण, घे काळजी...... अरे पण, ती लोकं तुला मारायला आलीत ती कोण होती....���"

 

यशवंत : "ती स्टोरी खूप मोठी आहे नंतर सांगतो... आधी वहिनींना तुझी गरज आहे जा बाबा तिकडे.... इथे मलाच काळजी वाटतेय.... उद्या आम्ही येतो..... हॉस्पिटलला मला तेवढा मेसेज करा हॉस्पिटलचे नाव.... चालेल ना....काय राम...�"

 

राम : "चालतंय की....�"

 

शिवाजी : "येतो आम्ही......�"

 

दोघेही यशवंत सोबत शेक हँड्स करून, हॉस्पिटलमध्ये जायला निघतात.....�� शिवाजीची चिंताच मिटली असते..... कारण, आता तो त्याच्या बाळ आणि सविताला वाचवू शकणार असतो.... रामही खुश असतो....☺️☺️ कारण, त्याने जे देवाला मागणं केलं असतं ते पूर्ण होत असतं.....��

 

क्रमशः