( भाग 2)
आज मी एक विद्यार्थी तर होतेच पण घरकाम करणारी मुलगी म्हणून जास्त होते. आईसाठी मी मोलकरीण म्हणून जगणे लाजास्पद होते पण त्या ही पेक्षा चिंताजनक होते. तिला माझं भविष्य तिच्यासारख नको होतं. ती वारंवार मला अभ्यास करायला लावी. पण तिला सुमा जाण्याचा धक्का जास्त लागला होता म्हणून तिला मी कामाला जाण्यासाठी मनाई केली होती. तिचा नाईलाज होता पण ती खचून गेली होती. मी सहा महिने शाळा आणि घरकाम व्यवस्थित पार पाडले. आईने स्वतःला पूर्णपणे सावरले होते फक्त माझ्यासाठी आणि मदनसाठी ! या सर्व मध्ये मी आता सातवीमध्ये गेले आणि आता मला शिष्यवृत्तीची परीक्षा हि होती. मी काहीही करून शिष्यवृत्तीची परीक्षा चांगल्या गूणांनी पास होण्याचे ठरवले. आई आता मला जास्त काम करून देत नसे. मी खूप मनलावून अभ्यास करत होते, हे बघून माझे वर्गशिक्षक मला खूपच मदत करत होते. शेवटी मी चांगल्या गुणांनीच नाहि तर राज्यामध्ये प्रथम आले. सर्वात जास्त माझी आई आणि माझे वर्गशिक्षक आनंदी होते, त्यांना पाहून मी! कारण खूप दिवसानंतर आई आनंदी होती तेव्हाच ठरवलं काहीही झालं तरी आईचं हसू कायम ठेवायचं आणि शिकून खूप मोठ व्हायचं !
आता मी सातवी आणि शिष्यवृत्तीची परीक्षा दोन्हीही चांगल्या गुणांनी यशस्वी झाले होते. आमच्या गावामध्ये फक्त सातवी पर्यंतच शाळा होती. आठवीसाठी मला दूस-या गावामध्ये जावं लागणार होते. ते गाव आमच्या गावापासून 3 किमी अंतरावर होतं. इतके अंतर असताना आई मला एकटीला पाठवणार हे शक्य नव्हते. सुमा बरोबर जे झालं होत त्या बद्दलची भिती, दुःख आम्हा दोघींसाठी कधीच विसर न पडणार होत ! सर्व कळत असून आईला दुस-या गावात शिक्षणासाठी जाण्यासाठी विचारणे म्हणजे आईला त्रास देणे होईल म्हणून मी शांतच होते.
काहि वेळात आईच माझ्याकडे आली आणि बोलू लागली, " काळजी नको करू, तुझं शिक्षण नाहि थांबणार ! " माझ्या चेह-याकडे बघून तिला समजत होतं मला किती प्रश्न पडलेत ते म्हणून कदाचित ती न थांबता बोलत होती. पूढे मला बोलली आपण गाव सोडून त्या गावात जाऊया, 'तुझ शिक्षण माझ्यासाठी महत्वाचे आहे ', मी माझी काम तिकडे शोधेल '. हे ऐकल्यावर मी खूप आनंदी होते पण आईला नवीन काम शोधायला खूप कठीण जाणार या चिंतेमध्ये जास्त होते. पण नकळत आईच्या सर्व बोलण्याला होकार देत गेले.
दुस-याच दिवशी आई आणि मी सर्व सामान घेवून निघालो. गावामध्ये पोहोचल्यानंतर आईने मला आणि मदनला शाळेच्या मैदानात बसवून ती आमची राहण्याची सोय कशी करता येईल हे बघण्यासाठी गेली. मी आणि झाडाच्या सावली मध्ये बसून आईची वाट पाहत होतो. मदनला तर वाट पाहून कंटाळा आला होता, मला ही आला होता पण मदनला सावरण्यासाठी मी तत्पर राहिले.
बराच वेळानंतर आई आली. तिच्याकडे बघून वाटत होतं, हि पूर्ण गाव फिरून आले. खूप थकलेली दिसत होती, उन्हामध्ये फिरून घामाने भिजली होती. तरीही आल्यावर आधी मदन आणि मला आम्ही ठिक आहोत ना ? कोणी काय बोलले नाहि ना ? असं विचारत होती.मीच तिला पाणी दिले. शांत सावलीमध्ये बसायला लावले.मग पुढे सर्व व्यवस्थित विचारपूस सुरू केली. आई सोबत बोलून समजल की सध्या तरी हिला एकच घर मिळाल आहे कामासाठी आणि त्याच घरात राहण्याची जागा सुध्दा ! आई आम्हाला दोघांना घेवून त्या घरी निघाली. घर बरेच मोठे होते, घरातील माणसे पण थोडेफार ठिक होते. घराच्या बाजूलाच एक छोटी खोली होती. ती आमच्यासाठी होती. खोली आम्हाला तिघांना पुरेसे होती पण बरीच साफ-सफाई करावी लागणार होती.म्हणून गेल्याबरोबर आई ने मदनला थोड खायला दिले आणि त्या घराच्या अंगणामध्ये बसवलं. मी आणि आईने साफ-सफाई साठी सुरूवात केली. साफ सफाई करून, सर्व सामान घरामध्ये व्यवस्थित लावण्यामध्ये आमचा उरलेला पूर्ण दिवस गेला.
आता रात्र झाली होती, आईने स्वयंपाक बनवलं. आम्ही इतके थकलो होतो की काही बोलण्याची क्षमता आमच्याकडे नव्हती म्हणून मी आणि मदन तर झोपी कधी गेलो कळलचं नाहि.
दुस-या दिवसापासून नवीन गावामध्ये नवीन सकाळ सुरू झाली. शाळा अजून सुरू नव्हती झाली पण अॅडमिशनच्या चौकशीसाठी आई, मी आणि मदन तिघेही गेलो. आई ने सर्व चौकशी केली, तिला सर्व आवडलेलं पण अॅडमिशन साठी पैसे जमा करावे लागणार होते. तिथून निघाल्यावर आईने मला आणि मदनला घरी सोडले, ती कामाच्या शोधात निघाली. पूर्ण गावामध्ये सर्वांना विचारत विचारत, विनंती करत दोन घरी काम मिळाल होतं. तिथे ऊद्यापासूनच जायच होतं. आई घरी आल्यावर तिने तिला मिळालेल्या कामाची माहिती दिली. मला आईची धडपड दिसत होती. मी तिला सहज बोलले, "मी पण मदत करू का ? तसही अजून शाळा सुरू नाही". आई बोलली जिथे गरज असेल तिथे डोक वापरत जा, नको तिथे नको ! मग पुन्हा मी शांत बसले.
आजपासून तिला घरातील काम,बाजुच्या घरातील काम, आणि नवीन दोन घरची कामे करायची होती. ती पहाटेच उठून मला आणि मदनला सर्व हातात देऊन निघून गेली. सकाळी आठ वाजता निघून गेलेली आई मला रात्री सातला घरी दिसायची.तिची हि धावपळ मला बघवत नव्हती. तरी मला सतत एक महिना नाईलाजाने ते पाहाव लागलं. आता माझी शाळा सुरू झाली. मी आनंदाने, उत्साहाने शाळेत जाऊ लागले. नवीन मैत्रिणी झाल्या होत्या. मी अभ्यासामध्ये हुशार होते म्हणून मैत्रिणी तर झाल्याच पण शिक्षक ही ओळखीचे झाले. सर्व मला आणि माझ्या परिस्थितिला समजून घेत होते. रोज सकाळी शाळा नंतर घरी आल्यानंतर अभ्यास अस व्यवस्थित चालु होत. आई तर थोडी ही मदत करून देत नव्हती. मला फक्त आईचे कष्ट दिसत होते म्हणून मी काहीही करून मन लावून अभ्यास करायच ठरवलं. या सर्व मध्ये आठवी आणि नववी कशी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले मला कळलचं नाहि.
आता मी दहावी मध्ये जाणार म्हटल्यावर माझ्या बरोबरच आईची जबाबदारी ही वाढली होती. यावर्षी मदनला पहिलीमध्ये घालायचे होते.आईला त्याची नवीन एक चिंता ! मग मी ठरवलं आईने किती ही नाहि म्हटलं तरी आता कामाला जायचं ! मी खुप हिम्मत करून आईला बोलले, " तुला थोडी मदत म्हणून मी सुद्धा कामाला जाणार आणि तु विरोध केलास तर शाळेमध्ये ही नाहि जाणार". आता तिचा नाईलाज होता तिला मला हो बोलाव लागलं.
मी पुन्हा एक विद्यार्थी आणि मोलकरीण म्हणून तयार झाले. दहावी असल्यामुळे माझी शाळा लवकर सूरू होईल आणि मग मदनची ! मदनच्या अॅडमिशनसाठी पैसे लागणार होते आणि माझ्या अॅडमिशनसाठी पण ! मग मी त्या नुसार तयार झाले. मी ठरवलं होत, आता यावेळेस आईला त्रास नाहि द्यायचा, जास्तीत जास्त प्रयत्न करत होते .
मी माझ्या शिक्षकांची आणि वर्गमैत्रिणींची मदत घ्यायचे ठरवले. मी सर्व प्रथम शिक्षकांना भेटले, त्यांना मी सर्व सांगितले, त्यांच्याकडे काही काम आहेत का याची विचारपूस केली. काहींनी माझ्याकडे अभिमानाने,तर काहींनी कौतुकास्पद, तर काहींनी दयेने बघितले नंतर मला दोन शिक्षकांनी त्यांच्या घरातील घरकाम करण्याची संधी दिली.पण एक विनंती हि केली की या सर्वामध्ये अभ्यासाकडे दुर्लक्ष होता कामा नये. मी सर्वांना त्यांच्या विनंतीचा मान ठेवेन असं वचन दिले. शेवटी माझी दिनचर्या सूरू झाली. मी सुद्धा आईबरोबर सकाळी लवकर आवरून मदनला बाजुच्या घरी सोडून घरकामासाठी निघाले. आई मला सतत समजावत होतो की काम कर पण अभ्यास कमी नको करूस.पण सर्वात महत्वाचे मी स्वतःच स्वतःला समजावत होते की आता मला दोन्ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडायचे आहेत.
मी काम संपवून वेळेवर शाळेमध्ये पोहचले. आज सरांनी एक कठीण गणित दिले होते, कोणालाच सुटत नव्हतं. मी खुप प्रयत्न केले, त्यानंतर माझं गणित सुटलं. मी सरांना दाखवले. सरांनी पुर्ण वर्गासमोर माझं कौतुक केले ते कौतुक करता करता मी त्यांच्या घरी काम करत असल्याचे बोलून गेले.
क्षणभरात सर्व वर्गात शांतता पसरली, सर्वांची नजर फक्त माझ्यावर होती.कदाचित माझ्याकडे बघण्याच सर्वांचा दृष्टिकोण बदलला होता. त्या क्षणापासून मी पूर्ण वर्गासमोर एक हुशार विद्यार्थीनी नव्हते तर सरांच्या घरी काम करणारी मुलगी होते !