She __ and __ he - 13 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | ती__आणि__तो... - 13

Featured Books
Categories
Share

ती__आणि__तो... - 13

भाग__१३

आज लग्न होत....सगळे बरोबर मुहूर्तवर जमले....हॉल पाहुने मंडळीनी भरला होता....साखरपेकर फॅमिली समोर बसली होती....रणजीत मंडपात बसून विधि पूर्ण करत होता.....काहीवेळाने राधा आली....सगळ्यांच्या नजरा तिच्यावर होत्या....रणजीतची ही नजर तिच्यावर गेली....आज तो तिला निरखुन बघत होता...



आणि....काय दिसत होती ती अद्भुत...! तिच्या गव्हाळ रंगावर शोभुन दिसेल अशी लाल रंगाची नउवारी साड़ी...! पानीदार डोळे...! हलका मेकअप...! कोरीव भुवया...! नाकामध्ये नाज़ुकशी नथ...! ओठांवर लावलेल लाल रंगाच लिपस्टिक...! दोन भुवयांच्या मधोमध लावलेली चंद्रकोर टिकली...! आहाहा..! डोळ्यात असलेली तीं नशा रणजीतला पुन्हा वेड लावत होती...!😍♥️तिला पाहून रणजीतच हॄदय पुन्हा धड़धड़ करू लागल होत...




रणजीत__ (मनात).....का हिला पाहून माझ हृदय धड़धड़तय......का????? आता हिला पाहिले की सगळा राग का विसरतो मी???सगळ्यांची उत्तर कधी मिळतील मला....मला आता काहीच कळत नाही आहे.....



राधा आली....आणि लग्न कार्याला सुरवात झाली....गुरुजी मंत्र वाचु लागले....दोघानी एकमेकांच्या गळ्यात हार घातला....त्याने राधाच्या भांगेत कुंकु भरले...मंगलसूत्र घातले....आणि सप्तपदी चालू लागले....अशा प्रकारे लग्न सोहळा पार पडला....💐!!!


*******************************


मग राधा चेंज करून रिसेप्शनसाठी तयार होऊन आली....पन रणजीत अजुन आला नव्हता...वाट पाहून आपली नवरीबाई वैतागली...😂



राधा__ कुठे राहिला ह काय माहित....टाइम ची वेल्यू नाही..बटाटयाला...अर्धवट...बिजिनेसमैन असून पन अस वागतो...😏



वैदेही__ तायु....कुल...अग किती भड़कतेस....ते बग आलेच जीजू...



तशी राधा तिकडे बघते....समोरून रणजीत येत होता....त्याने मस्त शेरवानी घातली होती...त्याची ती बियर्ड मुळे तो खुप हैंडसम वाटत होता...आणि केसावरुन हात फिरवत तो येत होता....राधा का कुणास ठाऊक त्याच्याकडे पाहतच राहिली....आज पहिल्यांदा ती त्यांला एकटक बघत बसली होती....!!!!



वैदेही__ काय हॉट दिसतायत ना जीजू....



राधा__ हो ना.......



राधा पटकन बोलते म्हणून वैदेही हसू लागते....आणि राधा सुद्धा थोड़ी अस्वस्थ होते...मग रणजीत येऊन राधाच्या शेजारी उभा राहतो.....



वैदेही__ जीजू तुम्हला माहित आहे का...आता तुम्ही समोरून येत होता तेव्हा तायु काय बोली ते.....(तिला चिडवत)



रणजीत__ काय बोली.....?



वैदेही__ काय हॉट दिसतोय ना रणजीत अस बोली...😂😃



राधा__ (थोड़ लाजुन)..........अअअ वववव बबब वैदु काय बोलतेय हे....तू जा खाली जजेज जा..सम्या काका बोलावतोय बग..जज जा...



वैदेही हसतच खाली जाते....रणजीतला सुद्धा हसायला येत होत....



रणजीत__ ( तिच्या कानाजवळ).....काय रेडिओ मी हॉट दिसतोय का आज....बर तारीफ केल्याबद्दल Thanks....😂



राधा__ तू गप बस बटाटया.....लागेच हवेत उडु नकोस...तुला तर जरा काय बोलला की पार हवेत जातोस...



रणजीत__ अग रेडिओ काय ग तू अशी....चांगला बोलायला आल तरी कालिका मातेचा रूप घेतेस...जाउदे तुझ्याशी बोलन व्यर्थ....😏



राधा__ तुला मी बटाटया उगाच बोलते...तुला ना बटाटया नको बोलायला.....



रणजीत__ हो ना...तेच तर तुला मी किती महिन्यापासून सांगतोय😄🤦🏻‍♂️



राधा__ हो ना....उलटा तुला तर गब्बर बोलायला पाहीजे...😏



रणजीत__ हो...पन हे नाव तुला सूट करत....कारण तू आहेसच तशी....रागिट...ज्वालामुखी....खड़ूस...😏



राधा__ तू....मला.....



रम्या__ जीत राधा काय चालय एवढ बोलन....नंतर बोला ना....आता जरा शांत उभ राहा...आयुष्यभर आता तुम्हला सोबतच राहयच आहे😂😂



राधा__ हहहह हो....😅



रणजीत__ 😅



सगळे पाहुणे एक एक करून त्यांना शुभेच्छा देऊन जात असतात.....आणि आता राधाचा ग्रुप येतो....



सगळे__ (एका सुरात).........Happy Married Life Rajeet♥️😍😘



राधा आणि रणजीतला समजत नाही हे नक्की काय बोलतात....



राधा__ अग लग्न माझ आणि रणजीतच आहे...हा Rajeet कोन...?



पल्लवी__ (हसत).....😂अग खुळी...Radha Ranjeet= Rajeet ♥️



रणजीत__ बापरे....हे कोणी तयार केल...



विक्रम__ आम्ही मिळून केल😄



राधा__ वा!!! विकुड़ी नको तिकडे बरोबर डोक चालवतो...आणि तुम्ही सगळे पन खतरनाक आहात....😅🤦



जागृती__ मग असनारच....😂😂



रणजीत__ खरच तुमचा ग्रुप छान आहे...बर नाव काय आहे की नाही ग्रुपच...



सनम__ हो आहे ना...चमकते तारे.....😀



रणजीत__ वा!!! नाइस नेम...



पल्लवी__ हो...बर आम्ही खाली थांबतो...अमच्यामुळे भरपूर माणस खाली थांबलेत😂😂जर आता आम्ही खाली नाही उतरलो तर मारतीलच😂😂



राधा__ हो...😂😂



तसे सगळे खाली उतरतात....हळू हळू बाकीचे पाहुणे शुभेच्छा देऊन निघुन जातात....मग दोन्ही फॅमिली जेवायला बसतात....



रम्या__ एक मिनिट...जेवायच्या आधी तुम्ही एकमेकांना पहिला घास भरवा ते ही नाव घेऊन...



स्मिता__ हो नाव तर घ्यायला हव....



रणजीत__ नाव...म्हणजे उखाना



रेवा__ हो भाई....



रणजीत__मला नाही येत...



राहुल__ घ्याव तर लागणार...अरे यमक जुळव फक्त...😂भाजीत भाजी मेथीची राधा माझ्या प्रीतीची वैगेरा....😂😂



माधवी__ काय रे राहुल....😂😂



सुमन__ राहुल पण ना...😂



रणजीत__ ओके...बट पहिले उखाना रे.....(मधुन थांबत)........म्हणजे राधा...राधा घेईल पहिले नाव....



राधा__ आ..मी....ओके...घेते....
"पुण्याच्या तुळशी बागेत आहे श्रीरामाच मंदिर..
श्रीरामाच्या मंदिरात रामाची मूर्ती..
रामाच्या मूर्तीच्या बाजूला सीतेची मूर्ती..
सीतेच्या कमरेला सोन्याचा घडा..
सोन्याच्या घड्यात केशराच पाणी..
रणजीतराव माझे राजा आणि मी त्यांची राणी..!!"



सगळे टाळया वाजवतात....आणि राधा गुलाबजामचा घास त्यांला भरवते....



रणजीत__ (मनात)......बापरे रेडीयोने तर एवढा मोठा उखाना घेतला.....पूर्ण धड़ाच लिहिला....मुलींना कस जमत हे कुणास ठाऊक....आता मी काय करू....वाट लागली...सगळे हसतील माझ्यावर रेवा तर हा टोमना आयुष्यभर सुनवेल...एवढा मोठा बिजिनेस संभाळतो मी..पन एवढा घाम कधी फुटला नाही...तेवढा आज फुटला....



रेवा__ भाई....बोल ना...काय झाल...आठवत नाही वाटत उखाना....म्हणजे तुला आता उखाना पन नाही येत...😂



रणजीत__ घेतो थांब जरा....

(रणजीत जरावेळ विचार करतो....)



रणजीत__ ठीके ऐका....😀
"रस्त्यावर झाली भेट..बटाटया झालो भांडनात...
हॉस्पिटलमध्ये जुळले सुर..खळबळ झाली मनात...
हातात हात घेतला..सगळ्यांच्या साक्षीने...
आणि राधा माझी झाली कुटुंबाच्या आशीर्वादाने..!!"



आणि रणजीत राधाला घास भरवतो...सगळे रणजीतच्या या आगळ्या वेगळ्या उखान्यावर हसतात....😂टाळयाही वाजवतात....



रेवा__भाई खुप छान उखाना घेतलास....भाई...सगळ्यांच्या साक्षीने आणि कुटुबाच्या आशीर्वादाने...हे समजल पन बटाटया...भांडण...रोड.. यचा अर्थ समजला नाही.....



रणजीत__ अग...माझी आणि राधाची फस्ट भेट रस्त्यावर झाली....जेव्हा विन्या पडला त्या दिवशी...त्याच्याशी फ़ोनवर बोलायच्या नादात मी कार राधाच्या बाइकसमोर घेतली..पण चुकुन झाल होत...तेव्हा राधा आणि मी भांडलो होतो...मग भांडनाच्या त्यादिवसापासून तीं मला बटाटया नाहीतर Mr.Potato बोलते......😅😅😅आणि मी तिला डॉक्टर रेडिओ बोलतो....



सदाशिव__ (हसत).....अरे बापरे अस आहे का...😂



माधवी__ छान हः बटाटा आणि रेडिओची जोड़ी शोभते....😂



महेश__ हो😂



तसे सगळे हसतात....आणि त्यावेळच वातावरणच बदलून जातं.....जेवण होते...आता वेळ राधाच्या पाठवनीची आली....राधा खुप रडत होती...तिला जाऊ वाटत नव्हते....हा क्षण असतोच तसा....



मनोहर__ (भावुक होऊन)......😢 फुलपाखरा...बाळा नीट राहा...ह्म्म्म सगळ्यांची काळजी घे...जप सगळ्यांना...आणि आम्हाला फोन करत जा बाळा...



राधा__ (मीठी मारून...रडत).......हो बाबा.....बाबा मी खुप मिस करणार तुम्हला....😢😢😭



मनोहर__ ए फुलपाखरा शांत हो....😢



राधा__ ह्म्म्म....
आई....😭 काळजी घे ग तू ही....मिस यू खुप आई😭



मालती__ मिस यू टू सोनी....😭😭काळजी घे नीट रहा ह...



राधा__ हु....
सम्या काका....शालू काकू😭 काळजी घ्या...



समीर__ हो बाळा तू पन काळजी घे...



शालिनी__ राधाबाई नीट रहा ह...



राधा__ह्म्म्म



वैदेही__तायु....😭😭 आता माझ्यासोबत गप्पा कोन मारेल ग...मला सगळ्या गोष्टीत हेल्प कोन करेल....😭



राधा__ वैदु रडू नको ग....



रणजीत__ वैदेही तू रडू नको तुला वाटेल तेव्हा आणि किती ही दिवस बिंदस्त अमच्यकडे राहयला ये....



सुमन__ हो वैदेही...



रम्या__ हो आणि वैदेहीच कशाला सगळ्यानी या....



महेश__ हो आणि...राधाला ही कधी पन जाव वाटल घरी तर जाऊ शकते....



स्मिता__ हम्म राधा



मनोहर__ खुप आभारी आहे मी तुमचा माझ्या मुलीची काळजी घ्या...तिला संभालूंन घ्या....



सदाशिव__ हो तुम्ही काळजी नका करू...



रणजीत__ हो आई बाबा...तुम्हला आज वचन देतो मी राधाला आनंदी ठेवेंन नेहमी...तिला कधी एकट नाही सोड़नार....☺️



मनोहर__ धन्यवाद रणजीत राव....



मालती__ (मूर्ती देत)........सोने....हे घे तूझ्या कान्हाला इकडेच विसरून चालीस का....कान्हा तुझ्या सगळ्या इछा पुर्ण करेल....त्यांला सोबत ने...हम्म



राधा__ हो आई....



राधा रणजीतकड़े बघत बसते....तिला कळत नव्हतं की रणजीत हे बोलतोय.....मग सगळे निरोप घेऊन गाडीत बसून वाड्यावर जायला निघाले.....


**************************


काहीवेळाने सगळे सावली (वाड्यावर) पोहोचतात....वाडा अगदी सजवला होता....राधा आणि रणजीत दारासमोर येतात...उबरयावर माप ठेवले होते..समोर माधवी,रम्या,गंगाबाई(आजी) आणि रेवा होती...सगळ्या राधा आणि रणजीतला ओवळतात...



रेवा__ एक मिनिट नाव घ्या पहिले....



रणजीत__ पुन्हा उखाना....नॉट फियर...



माधवी__ जीत.....



रणजीत__ समजल काकू....



रम्या__ आईंच बरोबर एकतोस😂



रणजीत__😂



रेवा__ राधा वाहिनी घे नाव....



राधा__ हम्म....
"नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचा...
नवरोबांना शेवटी आहोच म्हणायचा..
साखरपेकरांच्या दुधावर आली घट्ट साय..
रणजीतरावाना जन्म देणारी धन्य तीं माय..."



सुमन__ वह! राधा नाव खुप छान घेतलास...
बाळराजे आता तुमची बारी....😂😂



रणजीत__ हो....आ ऐका..😂



रेवा__ एकतोय तू बोल तर.....😂😂



रणजीत__ आआ
"महाराजांनी युद्धे लढली शक्तिपेक्षा युक्तिने...
राधाच नाव घेतो, प्रेम,माया,विश्वास आणि शिवरायांवर असलेल्या भक्तिने..."☺️😊जय शिवराय🚩



सदाशिव__ वा जीत खुप छान....



राहुल__ हो ना....😀



आजी__ वा जीतू छान नाव घेतलास....



मग राधा माप ओलांडून आत येते....माधवी आणि सुमन तिची ओळख शितल, शिवा(रणजीतचा सीनियर बॉडीगार्ड), रामू काका,यांच्याशी करून देते....मग सगळे आपल्या रूममध्ये जातात...राधा रेवाच्या खोलीत जाते...आणि सगळे झोपेच्या स्वाधीन होतात...!!!




क्रमश:




©प्रतिक्षा__♥️