Bandh hrudayache hrudayashi - 5 in Marathi Love Stories by प्रिया... books and stories PDF | बंध हृदयाचे हृदयाशी...भाग - (5)

Featured Books
  • ખજાનો - 86

    " હા, તેને જોઈ શકાય છે. સામાન્ય રીતે રેડ કોલંબસ મંકી માનવ જા...

  • ફરે તે ફરફરે - 41

      "આજ ફિર જીનેકી તમન્ના હૈ ,આજ ફિર મરનેકા ઇરાદા હૈ "ખબર...

  • ભાગવત રહસ્ય - 119

    ભાગવત રહસ્ય-૧૧૯   વીરભદ્ર દક્ષના યજ્ઞ સ્થાને આવ્યો છે. મોટો...

  • પ્રેમ થાય કે કરાય? ભાગ - 21

    સગાઈ"મમ્મી હું મારા મિત્રો સાથે મોલમાં જાવ છું. તારે કંઈ લાવ...

  • ખજાનો - 85

    પોતાના ભાણેજ ઇબતિહાજના ખભે હાથ મૂકી તેને પ્રકૃતિ અને માનવ વચ...

Categories
Share

बंध हृदयाचे हृदयाशी...भाग - (5)










💞 बंध हृदयाचे हृदयाशी!...भाग(5)💞

आदित्य आणि मोना दोघेही ऋषी सरांकडे पाहत असतात,पण ऋषी मात्र कोणत्या विचारात असतो, हे त्यालाच ठाऊक?...

इतक्यात त्याला एक फोन येतो,तो उचलतो..." हो गं, किती काळजी करशील!...आता तर मी आलो ना घरून!...नक्की,व्यवस्थित करतो नाश्ता!...अजून 9.00 वाजले आहेत,नक्की करतो....हो,दुपारच्या जेवणाचा डब्बा पाठव,तुझ्या आवडीचं पाठवलं तरी खाईन मी नक्की!...वेळेवर जेवेन!...आणखी काही ऑर्डर?...ok, चल, byy....."

मोनाला फोन कोणाचा होता,असं त्याला विचारायचं असतं, पण विचारणार नक्की कसं?...तरी ती विचार करून बोलते.…" हम्म,ही मोठी माणसं पण ना,नुसती काळजी करतात!...मग ती आई असो की वहिनी!...हे खा,ते खा,वेळेवर खाल्लस का?..इकडे जा,नुसत्या सूचना!...संपतच नाहीत...."

" हो ना,आता हेच बघ,माझी वहिनी!...सारखं फोन करून विचारते,नाश्ता केलंस का?..जेवण वेळेवर कर....पण यात तिची काळजी आहे ना!..माझी आई गेल्यापासून तिने घराची जबाबदारी घेतली ....खुप काळजी करते ती माझी !..."ऋषी बोलताना जरा भावुक झाला....

ती फोनवाली मुलगी त्याची वहिनी आहे हे ऐकून मोनाला फार आनंद झाला...पण वातावरण भावुक झालेलं पाहून मोना म्हणते....," life में सब अपनी मर्जी से चलता तो कितना अच्छा होता,न किसीं को गम मिलता, न रहता उसका एहसांस!....."

आदित्य म्हणतो," अरे,इकडे कोणी कांदा कापला का?...की अश्रू धूर सोडला...कोणाच्यातरी डोळ्यातून पाणी यायला लागलंय!...असं झालं तर हॉस्पिटलला नगरपालिकेच्या पाण्याची गरजच नाही,डॉक्टर आणि पेशंटच्या रडण्याने पाण्याच्या टाक्या भरून निघतील!...😂😂😂

ऋषी आपले डोळे पूसतो आणि एक smile देऊन ऋषी म्हणतो," तुझा नंबर देऊन ठेव मोना,संध्याकाळी operation किंवा पेशंटच्या संदर्भातलं disscussion फोनवर करता येईल...चला आता,कामाला लागूंयात!..."

मोना ऋषीला तिचा नंबर देते आणि त्याचाही घेते...आता ते तिघेही आपआपल्या कामाला निघून जातात....आदित्य ऋषीला बाय करून मोना,तिच्या गाडीने तिच्या हॉस्पिटलला येते...तीच हॉस्पिटल छोटंसं असतं पण तिनं ते स्वतः च्या बळावर उभारलेलं असतं... मोना खूप स्वावलंबी असते,कोणाच्या तरी दुसऱ्याच्या मदतीने मोठं होणं तिला पसंत नसतं... यामुळेच मोना,तिच्या बाबांची लाडकी असते बरं का!....

हॉस्पिटलमध्ये मोना 10 ते 2 या वेळेत काम करते...कधीतरी उशीर होतो...पण 4वाजेपर्यंत सगळं आटोपून ती घरी जाते...जेवण उरकून मग थोडा वेळ निवांत बसते....
तिला विचार येतो...ऋषी तर एकटाच आहे पण वहिनी त्याची खुप काळजी घेते...हे ठीक आहे पण तो इतका senti का होतो?...कोणी आहे का त्याच्या आयुष्यात अजून?...असेलही कदाचित!....त्याच्या poem वरून वाटतं की कोणीतरी आहे किंवा होतं त्याच्या आयुष्यात!...may be it possible!...असो!...तसा तो मला आवडायला लागलाय...एक माणूस म्हणून छान तर आहे शिवाय डॉक्टर म्हणून उत्कृष्ट आहे!...पुढचा विचार करायला हरकत नाही पण...त्याच मन आधी जाणायला हवं...मैत्री करून त्याच्याशी व्यवस्थित बोलायला हवं.....तोपर्यंत कुणाला काही कळता कामा नये!...

असा विचार करून ती फोन हातात घेते आणि ऋषीला good evening चा मेसेज टाकते...पण लगेचच रिप्लाय येत नाही....तो ही busy असावा बहुधा!...मग ती जरा rest करते...थोड्याच वेळात तिचा मोबाईल वाजतो...मेसेज आलेला असतो...ती बघते...ऋषीचा मेसेज असतो...

" Hi, good evening 🌹.."

" free आहात का?..जेवलात?..."मोनाचा रिप्लाय आणि प्रश्न....

" हम्मम,आता फ्री झालो,दोन operation झाले आताच,आता जेवतो..." ऋषी सांगतो...

" ok, जेवा, मग बोलू..."मोना म्हणते...

ऋषी जेवण आणि काही महत्त्वाची काम उरकतो आणि मग मोनाला मेसेज करतो...

" हम्म,बोला,तुम्ही फ्री झालात वाटतं?...मग आता काय प्रोग्राम?.."ऋषी म्हणतो...

" नाही काही,असंच, अ.... एक विचारू का?...म्हणजे सांगायचं असेल तर....आपण आता friend आहोत म्हणून विचारलं!...",मोना म्हणते....

" विचार ना!..." कदाचित ऋषीला माहीत आहे ती काय विचारणार ते!....

" तुमच्या आईला तूम्ही खूप miss करता ना?..आई असतेच तशी!...आपल्या आयुष्यात आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही...हे जीवन आहे त्यात मृत्यू ही अटळ गोष्ट आहे.... जन्माला येणारा प्रत्येक जण एक दिवस मरतोच!...पण आई गेल्याचं दुःख पचवायला वेळ तर लागणारच!..."मोना त्याला समजवते....

" नुसतं तेवढंच नाही ना!...आईसोबत माझ्या खुप आशा,आकांक्षा वाहून गेल्या....आणि खुप काही करायचं राहून गेलं...आपण ठरवतो एक आणि होतं दुसरंच!...म्हणून खुप राग येतो कधी कधी स्वतः चा!..."काही वेळ senti झाल्यामुळे तो शांत होतो ...

मग मोना म्हणते,"एक सांगू का?..मला वाटतं, तुम्ही ना छान एखादी कथा किंवा कवितासंग्रह लिहा,तुम्हाला ज्या विषयावर वाटेल तो विषय निवडा,एकदा तुम्ही लिहलत ना,की तुमच्या मनातला तणाव आणि दुःख,त्या भावना ज्यामुळे तुम्हाला त्रास होतो आहे तो कमी होईल!...म्हणजे असं मला वाटतं... बघा,तुम्हाला काय वाटत ते महत्त्वाचे!..."

" हम्म,बघतो,हे ही try करतो नक्की...मनातली मरगळ कमी झाली तर बरं!...पण तुला हे सगळं बोलून आज फ्रेश वाटतंय मला!....,ok, चल by, थोडं काम बाकी आहे ते करतो...."
ऋषी मनमोकळेपणाने बोलला....

हे सगळं बोलल्यावर तो विचारात पडतो...ही मोना,मला कालच भेटली..पण असं वाटतं की खुप दिवसांपासून मी तिला ओळखतो....तिच्याशी बोलून अगदी मन फ्रेश झालं....असं वाटलं की मी तीर्थशीच बोललो....हो आज पुन्हा तिची आठवण येते आहे.... पण आठवण यायला मी तिला विसरलो नाही ....पण तिच्याशी बोलल्यावर पण मला असंच फ्रेश वाटायचं,नाही का?...असो,पण ती आता या जगात नाही,आणि कधी परत येणार पण नाही....ओ, तीर्थ...I Miss You.... miss you so much!...
पण मोनाने सांगितले त्याप्रमाणे मला जीवनात पुढे जायला हवे...एखादा कवितासंग्रह वगैरे लिहतो,म्हणजे मनातली मरगळ कमी होईल....हम्म,लिहतो वेळ मिळाल्यावर!....

असं म्हणूनच तो आपल्या कामाला सुरुवात करतो....यातच रात्र कधी होते,ते कळत नाही....रात्री सगळं आटोपून त्याला काहीतरी सुचतं,तो लिहतो.....

( क्रमशः )

💞 सौ.प्रिया मनोज...💞

(आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा,आपला अभिप्राय माझ्यासाठी अमूल्य आहे,त्यामुळे कथा पुढे जाण्यास मदत होते....)