kadambari Premaachi jaadu Part 23 in Marathi Fiction Stories by Arun V Deshpande books and stories PDF | कादंबरी - प्रेमाची जादू भाग -२३ वा

Featured Books
Categories
Share

कादंबरी - प्रेमाची जादू भाग -२३ वा

प्रेमाची कादंबरी – जादू

---------------------------------------------------

ऑफिसची वेळ संपून गेली होती ..तरी मधुरा घरी जाण्याची घाई करीत नसून ..ऑफिस मध्ये

काही उद्देशाने थांबली असावी का ?

हा प्रश्न म्यानेजर काकांच्या मनात कधी पासूनचा येत होता.

एरव्ही त्यांना विचारूनच ती ऑफिस सोडीत असते . तिचा आजचा हा मूड पाहून म्यानेजर काकांनी

मधुराला विचारलेच .

काय ,मधुरा ..

आज फारच निवांतपणे चालू आहे कामं ? घाई दिसत तुला नाहीये घरी जाण्याची ?

तुझ्या चेहेर्यावरील भाव पाहून मला असे वाटते आहे की.. तुला काही तरी विचारयचे असावे ..

पण ते मला की यशला विचारणार आहेस ? हे मात्र मला माहिती नाही ..

पण असे काही तरी नक्कीच आहे..

मधुरा म्हणाली ..

हो काका .

याच हेतू ने मी थांबले आहे इतका वेळ.

काका ,मानलं पाहिजे तुम्हाला ..

याला म्हणतात “अनुभवी नजर आणि अनुभवी माणूस ..

तुम्ही इथल्या प्रत्येक माणसाच्या मनातले अचूक ओळखता “ हे इथे जॉईन झाले त्या दिवसापासून

पाहते आहे . ग्रेट निरीक्षण आहे तुमचे .

म्यानेजर काका हसून म्हणाले ..

मधुरा ..

एक लक्षात असू दे . सोपी गोष्ट आहे ही , तुला सुद्धा हे सहज जमेल.

मधुर उत्सुकतेने म्हणाली ..हो का , मग तर

सांगा की काका तुमच्या अनुभवाचे बोल ,

मला काय किंवा माझ्या सारख्या तरुण पिढीला तुमचे शब्द ,मार्गदर्शक असणार.

काका सांगू लागले –

हे बघ मधुरा , माणसांच्या सहवासात आणि रोजच्या व्यवहारात

सगळ्यांच्या सोबत राहून , त्यांच्या बोलण्यातून ,वागण्यातून ..जर आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या

मनात काय चालू असेल ? याचा अंदाज घेणे जमू लागेल ,तर हा गुण आपल्या स्वभावातील एक

महत्वाचा आणि उपयोगी गुण होतो ..

ज्यामुळे आपले सार्वजनिक व्यक्तिमत्व व आपली ओळख एक मदत करणार माणूस आणि मित्र अशी होते.

मधुरा म्हणाली ..

काका ..तुमचे हे म्हत्वाचे अनुभवी बोल मी नेहमी लक्षात ठेवून ,तसे वागण्याचा

प्रयत्न करीन ..आणि हो..

नवे वर्ष सुरु झालेले आहेच ..त्या निमित्ताने ..

तुमचा हा संदेश ..मी माझ्यासाठी कृती –संकल्प म्हणून वागण्यात ,बोलण्यात येईल ..

याचा नक्की प्रयत्न करीन..

मला जमते आहे की नाही ? याचे उत्तर ..आपल्या रोजच्या भेटीत मला मिळणारच आहे.

मधुराच्या या बोलण्य्वर म्यानेजरकाका खुश होऊन म्हणाले..

खरे सांगू का मधुरा ..

या गोष्टी . ..यशच्या सह्व्सात आल्यावर मला शिकायला मिळाल्या .

यश काय आणि त्याची फमिली काय.. आमच्यासारख्या जनरल लोक्संठी आदर्श आहे.

तू आज माझी जी स्तुती केलीस ..त्याचे सगळे क्रेडीट ..यशला द्यावे लागेल ,

त्याच्या आई-बाबांनी ,आजी आजोबांनी ..गेल्या दहा वर्षात माझ्यात खूप सकरात्मक बदल घडवले आहेत .

मधुरा ..ऐकून तुला आश्चर्य वाटेल..

मी आता जसा आहे, दिसतो आहे, तसा अजिबात नव्हतो ..

एक भांडखोर , उद्धट आणि संतापी अशी माझी इमेज सगळ्यांच्या परिचयाची होती..पण याच बरोबर

माझ्यात असलेले ..कामसूपणा , वेळेचे काटेकोरपणे पालन करणे , अचूक आणि चोख काम करण्याची

वृत्ती ,आणि प्रामाणिकपणा ..हे बिनकामाचे ठरवले जात होते .

या गुणांमुळे ..मी फार आग्रही होतो ..की माझ्या सारखेच काम प्रत्येकाने करावे .

पण असे कधीच व्हायचे नाही .मग .मी भांडायचो , संतापून तक्रारी करयचो , कारण

माझ्या आजूबाजूला माणसे होती ..जी सरसकट ..कामचलाऊ पद्धतीने काम करणारे ,

कामाच्या नावाखाली टिवल्या –बावल्या करणारे ,हुजुरीगिरी ,चमचेगिरी करण्यात धन्यता मानणारे असायचे .

अशीच माणसे मला माझ्या या आधीच्या प्रत्येक नोकरीच्या ठिकाणी भेटत गेली ..मग अशा

वातवरणात माझे कधी कुणाशी जमायचे नाही , पटायचे नाही .. लोकांनी नोकरी सोडून जायचा प्रश्नच

नसे, कारण

संतापाच्या भरात ..डोक्यात राख घालून घेत..राजीनामा देऊन मी बाहेर पडायचो.

माझ्या अशा वागण्याचे फटके आणि चटके ..माझ्या कुटुंबाला बसत असायचे .

अशातच एकदा ..यशच्या आजी-आजोबांची ओळख झाली , जवळच राहत असल्यामुळे ..बंगल्या समोरून

येता –जाता , थोडे थांबून ..गप्पा ,चहा-पाणी व्हायचे .

यशच्या आजोबांनी ..माझ्या अवगुणांकडे लक्ष न देता .. माझ्या स्वभावातील चांगले गुण मलाच

दाखवले ..आणि म्हणाले ..

अरे ..तू इतका लायक माणूस असून ..स्वतःवर अन्याय का करवून घेतो आहेस ?

तुझ्या अपेक्षा आजकालच्या दुनियेत पूर्ण होणे केवळ कठीण आहे ..तू तुझा त्रास का करून घेतोस ?.

कारण ..आजकाल ..नोकरी मालकांच्या मर्जी प्रमाणे करावी लागते ..आणि तसे वागणारे लोक

असल्यावर ..तुझ्या सारखा भावनिक..अशा वातवरणात ..काही उपयोगाचा नाही ..

यशच्या आजोबांच्या बोलण्यातला शब्द न शब्द मला पटला होता.

आजी मला म्हणाल्या ..

हे बघ ..तू आमच्या मुलासारखा आहेस , मी काय सांगते ते ऐक ..

तुझ्या वागण्याच्या फटका ,तुझ्या बायका –मुलांना या पुढे बसणार नाही याची काळजी घे .

यशच्या आजोबांनी ..माझ्याबद्दल ..यशच्या बाबांना सांगितले ..

माझा सरांशी जास्त परिचय नव्हता , पण..त्यांच्याच कॉलेजचा मी माजी विदाय्र्थी आहे, हे पुरेसे

होते.

यशच्या बाबांनी त्यांच्या ओळखीच्या पतपेढीत मला जोब दिला ..मीच अधिकारी , मीच क्लार्क ,

मीच कॅशियर , आणि चपराशी देखील मीच.

आजोबांच्या ,आजींच्या समोर माझ्या हातात पतपेढीच्या चाव्या देत सर म्हणाले ..

चौधरी –भाऊ ..ही नोकरी ..तुमची अग्निपरीक्षा आहे असे समजून करा ..कुणी तक्रार केली तर

दुसरे दिवशी तुमची ही नोकरी गेलीच समजा ..याचा फार गंभीर परिणाम तुम्हाला पुढील नोकरी

मिळवतांना होईल ..कारण..

आमच्या संस्थेशी ज्याचे पटले नाही..याचा अर्थ ..तुम्ही कसे आहात ..या प्रश्नाचे काही न बोलता

उत्तर मिळेल.

मधुरा – तुला सांगतो ..या यशच्या आई-बाबांनी ..जमिनीवर पाय ठेवून वागणे म्हणजे काय ?

हेच त्या दिवशी शिकवले .

आणि मी त्या पतपेढीत यशच्या बाबांच्या शब्दाला कमीपणा येऊ न देता काम करीत गेलो.

पाच एक वर्षे झाली असावीत ..या नोकरीला .

यश इंजिनियर झाला ..पण या पोराने नोकरी करायची नाही असे ठरवले होते ..

याला वाहनांचे अपार वेड, दोन चाकी ,तीन चाकी , चार चाकी ..कोत्न्याही प्रकारची गाडी ,बाईक ,

कार , ट्रक , अगदी काही ही ..नादुरुस्त गाड्या दुरुस्त करण्यात यश अगदी जादुगार आहे.

याचा हात लागला की किती ही खराब वाहन असू दे ..ते यशचा हात लागताच ,

आजारी माणूस खडखडीत बरा होऊन जसा पाळतो ..तसे या गाड्या टकाटक होतात .

जणू वाहनाचे यांत्रिक आणि तांत्रिक नकाशे याच्या मनात आणि डोक्यात पक्के ठसलेले आहेत.

अशा यशने स्वताचे ग्यारेज , आणि वाहनांच्या सजावटीचे शो रूम सुरु करण्याचा निश्चय प्रत्यक्षात

आणला ..आणि

यशच्या बाबांनी ..मला बोलावून घेत म्हटले ..चौधरी भाऊ ..पतपेढी तुम्ही आमच्या अपेक्षेप्रमाणे

सांभाळीत , हे पुरे झाले आता ..

मी घाबरून गेलो ..उद्यापासून कसे होणार आपले ?

सर हसून म्हणाले ..अरे घाबरू नका चौधरी .. तुमची बदली केलीय आम्ही ..

या एक तारखेपासून ..तुम्ही आपल्या यशच्या शो-रूमचे , वर्क्शोप –ग्यारेज .या सगळ्या व्यापाचे

एकमेव म्यानेजर असणार आहात .

इतक्या वेगवेगळ्या जबाबदार्या तुम्हाला सांभाळणार आहात ,

त्यासाठी ..आता पर्यंत पतपेढीत जे नियम होते ..तेच जसेच्या तसे इथे ही तुम्हाला पाळायचे आहेत ..

यात बदल फक्त एका गोष्टीचा केलाय ..

तो म्हणजे ..यशच्या शो-रूमचे म्यानेजर ..त्यांचा पगार ..अगदी पोस्टला साजेसा असणार आहे.

मधुरा –

आनंदाने आकाश ठेंगणे वाटते “ म्हणजे नेमके कसे असते ? याचा अनुभव मी त्यादिवशी घेतला .

तुला सांगतो.. यशच्या आजी-आजोबांचे , त्यांच्या आई-बाबांचे माझ्यावर खूप उपकार आहेत .

यशने मला नोकरदार माणूस म्हणून कधीच वागवले नाही तो नेहमीच मला अहो –काका असे म्हणतो .

कधी नावाने किंवा आडनावाने ..बोलत नाही, बोलवत नाही.

म्हणून मी त्याला माझा मालक कमी आणि मुला समान जास्त मानतो .

मधुरा हे सगळं ऐकून खूपच प्रभावित झाली ..तिच्याकडे पाहत चौधरीकाका म्हणाले ..

मधुरा – तुला सुद्धा इथे नोकरी मिळाली ..

ती यशच्या आजी-आजोबांच्या ओळखीने , तू त्यांच्याच गावाची आहेस,

तुझे आई-बाबा देखील या सगळ्यांना खूप मानतात “ हे मला माहिती आहे .

आणि या सगळ्या गोष्टी ..तुझ्या फेवर मध्ये आहेत.

.म्हणूनच ..केवळ आणि केवळ ..तुझ्या शिक्षणास आर्थिक आधार देणारी ही नोकरी .

.तुला यशने दिली आहे ..तू याची नेहमी जाणीव ठेव असे मी म्हणेन ..

तुझे कोलेज , त्यातले वातावरण , तुझा मित्र -,मैत्रिणी ,परिवार ..यात वावरत असतांना

तुझ्या वागण्याने ..या फ्यामिलीला , आणि यशला कुणी नावे ठेवणार नाही “ याची काळजी

घेणे “हे तुझे कर्तव्य समजून वाग..असे वडिलकीच्या नात्याने मी सांगतो आहे.

मधुर म्हणाली ..

मी तुम्हाला प्रोमीस करते काका ..

माझ्यामुळे या परिवाराला कमीपणा येईल, खाली मान घालण्याचा प्रसंग येईल “ असे कधीच

होणार नाही.

चौधरीकाका ..तुम्ही जसे यशच्या बाबांच्या अग्नी-परीक्षेत पास होऊन दाखवले ..तशीच

मी तुम्हाला तुमच्या परीक्षेत पास होऊन दाखवील .

काका म्हणाले ..बेस्ट लक मधुरा . माझ्या मनात आता या क्षणी तुझ्याविषयी खूप काही

येते आहे , ते पुन्हा सांगेन कधीतरी ..

मधुरा म्हणाली ..काका , मला एक मदत हवी आहे..

यशच्या कानावर घाला तुम्ही ,आणि या बाबतीत तुम्ही मदत केली तरी चालेल ..

काका म्हणाले –

अच्छ ..तू या साठी इतका वेळ थांबली आहेस तर , दुपारीच सांगायचे ना ?

मधुरा म्हणाली – तसे केले असते तर ..आता तुम्ही जे तुमच्याबद्दल सांगितले असते ..

ते कायमचे राहून गेले असते ना .

असो, काका ..मी माझ्या बहिणीकडे राहते आहे , पण..तिच्याकडे तिचीच माणसे भरपूर

असतांना माझे तिथे राहणे मला प्रशस्त वाटत नाही, आणि मी किती म्हटले तरी ..वेगळे

राहण्यास माझी दीदी आणि जिजाजी परवानगी देणार नाहीत ..हे ही तितकेच खरे ..

म्हणून.. मी आणि माझ्या ३ क्लासमेट मैत्रिणी मिळून एकत्र राहायचे ठरवले आहे ,

ऑफिस जमले पाहिजे आणि कोलेज फार दूर नको ..हे सगळे साधले पाहिजे

आणि या दृष्टीने , त्यात पुन्हा आम्ही विद्यार्थी –मुली ..जागा मिळण्यात अडचण येते आहे.

पण मैत्रीणीना या महिन्या अखेर आहे ती जागा सोडावी लागणार आहे. त्यामुळे अगदी

युध्द - पातळीवर जागा हवी ..त्यासाठी ..

यशने किंवा तुम्ही काही मदत केली तर माझा प्रोब्लेम सुटेल .

मधुराचा प्रोब्लेम ऐकून घेत चौधरी काका म्हणाले ..

मधुरा ..तू फारच लकी आहेस बघ ..

माझ्याच बंगल्यातला ..तीन रूमचा ब्लोक या महिन्यात रिकामा होतो आहे ,

आता जे राहतात त्यांची बदली झाली आहे. येत्या पंधरा तारखेला ब्लोक रिकामा होतो आहे .

आता तू एक काम कर..

एक तारखेची वाट न बघता ..तू आणि तुझ्या मैत्रिणी ..

सरळ माझ्या ब्लोक वर तुमचे सारे सामान घेऊन या.

सुटला की नाही बघ तुझा प्रोब्लेम ..

मधुरा उठून उभी राहिली ..चौधरी काकांच्या पायांना स्पर्श करीत म्हणाली ..

काका , मी या क्षणी एक शब्द बोलू शकत नाही !

..इतकेच म्हणेल ..यु आर ग्रेट ..!

काका म्हणाले ...मधुरा , मी नाही ..यश ग्रेट आहे,

त्याच्यामुळेच तर तू आहे , मी आहे .. हो न ?

यस काका ..मधुरा म्हणाली ..

पण मनातल्या मनात मात्र स्वतःला म्हणत होती ..

या यशबद्दल तर खूप काही वाटत असते माझ्या मनाला ! ..

आणि ग्रेटपेक्षा ते खूपच वेगळं आहे काही तरी ....खास आहे ते ....

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बाकी पुढच्या भागात ..

भाग – २४ वा लवकरच येतो आहे .

----------------------------------------------------------------------------------------------------------------

कादंबरी – प्रेमाची जादू

ले- अरुण वि.देशपांडे –पुणे.

९८५०१७७३४२

-------------------------------------------------------------------------------------------------------------------