Kashi - 5 in Marathi Moral Stories by Shobhana N. Karanth books and stories PDF | काशी - 5

Featured Books
Categories
Share

काशी - 5

प्रकरण ५

  सर आपल्या काशी विषयी विचार करत होते. तेवढ्यात राजू आला. " सर, आपल्याला कधी निघायचे आहे---? म्हणजे त्याप्रमाणे गाडी काढायला---"

 " आपण जेवलो कि लगेच निघूया---तू जाऊन रामला व मनोजला तसे सांगून ये---" सर म्हणाले.

 तरीसुद्धा राजू तिथेच घुटमळत राहिला होता हे बघून सरांनी विचारले " राजू तुला काही विचारायचे आहे कां---सरांनी शांतपणे विचारले.

 " स--र--" राजू जरा संकोच करूनच बोलायचा प्रयत्न करत होता.

" अरे राजू---तुला काय बोलायचे आहे ते निसंकोच बोल---माझ्याजवळ तुला कसली भीती---? मी कधी कोणावर रागावतो कां---? " सर हसत हसत म्हणाले.

 " सर, हल्ली तुम्ही कुठल्यातरी विचारात असल्यासारखे वाटतात. परंतु तितकेच आनंदी सुद्धा वाटतात. त्या आजी आल्यापासून तुम्ही त्यांची खूपच काळजी घेता---त्या कोणी तुमच्या ओळखीमधील आहेत कां---? " " राजू, काही काही नाती अशी असतात कि ती दुरूनही फार जवळची वाटतात तर काही नाती हि जवळ असूनही आपण त्यातील जवळीकता प्रत्यक्ष करू शकत नाही---आपल्या भावनाही व्यक्त करायला एक प्रकारचे भय वाटते. या जवळीकतेमध्ये पुन्हा विरहाचे धुकं तर दाटणार नाही---या विरहाच्या धुक्याला मी जपतो आहे. या धुक्यात लपलेली माझी स्वप्ननगरी मला बघायची आहे---" परंतु मला त्या स्वप्न नगरीची प्रतीक्षा करायची आहे---" 

 सर काय बोलतात याविषयी राजू काहीच समजू शकत नव्हता. हा विरह, हे नातं हे सारे राजुला समजण्याच्या पलीकडचे होते---परंतु सर आणि आजी यामध्ये कोणतं तरी नातं आहे हे उमजून आले होते. उदास राहणारे सर हल्ली मात्र आनंदात असल्याचे राजुने हेरले होते.

 " राजू, तुला कळणार नाही---जेव्हा तू एखाद्यावर प्रेम करशील तेव्हाच विरह म्हणजे काय हे तुला कळून येईल---" सर आपला चष्मा सावरत म्हणाले.

 " सर कधी दहा वर्षात कुठल्या बाईकडे सुद्धा वाईट नजरेने बघितले नाही. आश्रमातील सर्व अनाथांना समतेने प्रेम देऊन मायेने, आपुलकेने वागले आणि आज सर प्रेम, विरह या सारखे विचार व्यक्त करत आहेत---"  राजू संभ्रमात पडला होता.

 " राजू तू निघ आता---तू पण जेऊन घे आणि माझं जेवण पाठवून दे---असे म्हणून सर वर्तमानपत्र बाजूला ठेवून मोबाईल घेऊन आश्रमाच्या डॉक्टरांशी सर्व वृद्धांची, मुलांची तब्येतीविषयी विचारपूस केली. खास करून आजी विषयी त्यांना फार काळजी होती.

 " सर, आजीविषयी बोलायचे झाल्यास त्यांची शरीर प्रकृती फार नाजूक झाली आहे. खोकल्यामुळे त्यांची तब्येत अधिकच काळजी घेण्यासारखी आहे. वयोमानानुसार औषधंही लवकर काम करत नाही. जरा वेळ लागू शकतो. तरी आमच्या कडून प्रयत्न करतच आहोत. तरी सुद्धा त्यांना जेवढे आनंदी ठेवता येईल तेवढे तिच्यात सुधार होण्याची शक्यता आहे. त्यासाठी तिला रोज सकाळी व्हील चेअरवरून मोकळ्या हवेवर फिरायला न्यायला हवे. त्यांच्या जेवणा-खाण्याकडे लक्ष द्यायला हवे---त्यातून त्या आतून फार दुःखी असल्यासारख्या वाटतात. विचारही फार करत असतात---" असे मला नर्सनी सांगितले. नेहमी त्या ज्ञानूची फार आठवण काढत असतात. ज्ञानू हा त्यांचा मुलगा आहे कां---? त्यांच्या या जास्त विचार करण्यामुळे सुद्धा औषधं काम करत नाही. असे  वाटते कि त्या आजी एका मोठ्या आघातातून गेल्या आहेत. त्यासाठी त्यांना मनोसोपचाराची गरज आहे---" डॉक्टर गंभीरतेने बोलत होते. " ठीक आहे---डॉक्टर, आजींकडे मी जातीने स्वतः लक्ष देईन---धन्यवाद डॉक्टर---" असे म्हणून सरांनी फोन ठेवून दिला. तेवढ्यात राजुही सरांचे जेवण घेऊन आला.

 जेवण होताच राम व मनोज आले. राजुने गाडी काढून तो तयारच होता.चौघेजण नेहमी प्रमाणे निराधार वृद्ध व मुले तसेच बालमजदुर यांच्या शोधात निघाले. दिवसभर फिरूनही त्यांच्या तसे कोणीही नजरेत आले नाही. हे बघून सर म्हणाले " राम आता आपल्याला नवीन परिसरमध्ये फिरायला हवे. कारण या मुंबईत कुठे कारखाने असतील किंवा ढाबे असतील अशा ठिकाणी आपल्याला हे बालमजदुर नजरेस पडतील. आजपर्यंत आपण रस्त्यावरीलच वृद्ध व अनाथ मुले शोधून त्यांना आश्रय दिला. फिरता फिरता संध्याकाळचे सहा वाजले होते. म्हणून चहा पिण्याच्या निमित्ताने गाडी रस्त्याच्या साईडला घेतली. समोरच चहाच्या टपरीवर जाऊन त्यांनी चहा घेतला आणि गाडीकडे वळले. तेवढ्यात एक मुलगा समोर आला.

 " साब, दो दिन से मैं भुखा हू---तुम्हारी गाडी साफ करके दु क्या---? "

 " नहीं---नहीं , गाडी मत साफ कर---तुम्हारा नाम क्या है---?"

  " मुझे चंदू नामसे बुलाते है---" 

 " तुम्हारे माँ-बाप कहा है---? " 

 " वो तो अंधे थे ---रोड क्रॉस करते समय ट्रकके नीचे आ गये---असे बोलून चंदूच्या डोळ्यात पाणी आल्यासारखे दिसत होते.

 सरांनी लगेच मनोजला वडापाव आणायला पाठवले.

सरांनी वडापाव चंदूच्या हातात दिला. हातातला वडापाव बघून चंदू म्हणाला " साब, मुझे एक छोटी बहनभी है---"

 " तुम्हारी बहन कहा है---? उसका नाम क्या है---"

 " वो तो बाजारमे गजरा बेचने गयी है---उसका नाम लक्ष्मी है---"

 " ठीक है, मनोज और तीन वडापाव आणून चंदूला दे---"  

 " तुम दोनो हमारे साथ चालोगे---? तुम पढना चाहते है---? " सर म्हणाले.   

 " क्या साब, हम गरिबकी मजाक उडाते हो---? "

    " नहीं बेटा, हमारा आश्रम है---वहा तुम रह सकते हो, साथ साथ पढभी सकते हो---अब किसके साथ हो---?

 " अब हमारा कोई नहीं है---बाजूवाला एक चाचा है, बस वोही हमें देखता है---"

 " कल तुम आना चाहते हो तो तैयार रहो---हम तुम्हे चाचासे बात करके लेके जायेंगे---" सर म्हणाले. खुशीमध्ये चंदू धावत धावत दृष्टी आड झाला. चंदूच्या चेहऱ्यावरील ख़ुशी बघून सरांना काशी आणि ज्ञानूची आठवण झाली.त्या आठवणीने त्यांचे डोळे पाणावलेले होते. " दुनियेत असे कित्येक ज्ञानू आणि काशी आहेत. परंतु त्यांना आधार कोण देणार---? परिस्थिती अशा ज्ञानू व काशीला कशी वेगळे करते या गोष्टीचा सरांना चांगलाच अनुभव होता. म्हणूनच सरांनी निर्धार केला होता कि कुठलाही ज्ञानू मजदुरीच्या सापळ्यात अडकणार नाही किंवा कुठलीही काशी मंजुळा होणार नाही. मुबईतल्या मोठ्या बाजारासह, हॉटेल्सना मासळी पुरविणारा हा ससून डॉकमधला मासे लिलावाचा बाजार---समुद्रातून आणलेले ताजे मासे मीठ-बर्फामध्ये बंदोबस्तात भरून ठेवलेले असतात. सकाळी साडेचार पाच पासून पाटीवरून आलेल्या माशांची व्यवस्था केली जाते. खच्चून भरून आणलेले मासे वेगळे करण्याच्या, निवडण्याच्या कामाला जुंपलं जातं ते सात वर्षांपासून चौदा वर्षापर्यंतच्या लहान मुलींना---उकिडव्या बसून त्या मान मोडून मासे साफ करण्याचे काम त्या गपगुमान करत असतात. ब्रेक मध्ये त्याचं हाताने वडापाव खाऊन आपली भूक भागवतात. मूत्र विसर्जनाची कळ दाबून ठेवून त्या पाठीला पोक येईपर्यंत काम करत असतात. गावाकडून पैशाचे आमिष दाखवून दहा-बारा वर्षाच्या मुलांना घेऊन येतात. बांधकाम इमारतीवर, कधी हॉटेलमध्ये, सफाई कामगार म्हणून तर कधी कारखान्यात काम करायला लावतात.त्या मुलांचा पगार हे दलालच खातात. त्यांच्या पालकांना थोडा फार पैसा देतात आणि बाकी आपल्या खिशाची कमाई करून घेतात. काही जण तर इमिटेशन ज्वेलरीची कामे करायला जुंपून टाकतात. ज्वेलरीची  कामे करताना रासायनिक द्रवात हात बुडवून या मुलांची नखं आणि हात पिवळसर होऊन जातात. मुलांच्या अंगावर पुरळ उठले जातात---" सर आपल्याच विचारात गुंगून गेले होते. तेवढ्यात

  " सर, सर निघायचे नं---? राजू ड्राइव्हर म्हणाला आणि सर आपल्या बालपणीच्या आठवणीतून जागे झाले.