Lost love ........ # 44. - The last part in Marathi Moral Stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | हरवलेले प्रेम........#४४. - अंतिम भाग

Featured Books
Categories
Share

हरवलेले प्रेम........#४४. - अंतिम भाग






रेवा घरी जाते........

बाबा : "रेवा बेटा....ऋषी.. कुठेय तो...... आला नाही सोबत तुझ्या......😕😕"

ते मेन डोअरकडे डोळे लाऊन बसले असतात.....🥺 खरंच.....काय फॅमिली आहे ना..... एकमेकांची किती काळजी करतात.....त्यांचा रक्ताचा नव्हताच हो ऋषी..... पण, तरी त्यांनी स्वतःच्या रक्तमासांचा गोळा म्हणून जपले.....आज तर स्वतःचे मुलं जड होतात आई - बापांना टाकून देतात हो गटारात.....मीच स्वतः अस एक दृश्य बघून मनातून हालून गेले होतें..... जाऊद्या भरून आलं मलाच.....🥺🙏

रेवा : "बाबा, आई कुठेय आधी ते सांगा....🙄🙄"

बाबा : "ती देवघरात पूजा करतेय..... का??"

रेवा : "म्हणजे, अजून तरी त्यांना दीड तास वेळ आहे..... माझ्यासोबत या......चला...."

बाबा : ".....🤨🤨🤨🤨🤨"

बाबांना, रेवा तिच्या रूममध्ये घेऊन जाते....🙄🙄🤨🤨🤨 ती ऋषीचा पूर्ण वोड्रोब शोधते......तिला अस काहीही हाती लागत नाही.....ज्याने काही तरी क्लिक होईल...... बाबा आणि ते खूप वेळ शोधतात......रेवा कंटाळून शशांकला कॉल करते.....

रेवा : "यार इथ काहीच मिळत नाहीये..... त्याच्या ऑफिसच्या फाईल्स आणि काही हॉस्पिटलच्या फाईल्स आहेत.....आणि ढीगभर महागडे क्लॉथ......काय शोधू आता....😖😖😖"

शशांक : "अच्छा मला एक सांग.....🤨🤨 ज्या दिवशीपासून हा असा वागतोय तुम्ही दोघेच कुठे बाहेर गेला होतात का....?? दोघेच म्हणतोय मी....🧐"

रेवा : "...🙄🙄🙄🙄 हो....😲 हॉस्पिटल चेकअप साठी.....🙄पण, त्याचा आणि याच्या वागणुकीचा काय संबंध.....🙄🙄"

शशांक : "तू एक काम कर फक्त आता....ती फाईल जिथं कुठ मिळेल लगेच मला कॉल कर......त्याच्या वागणुकीचा रीजन तिथूनच आपल्याला मिळेल.........पटकन....hurry up....🤨"

रेवा : "हो शोधून आलेच.......आणि त्या सलीम शेखचे काय झाले....🤬"

शशांक : "घेतलय ताब्यात त्याला कोडे पडत आहेत..🤬🤬🤬🤬......त्याच मी बघतो....तू ती फाईल आण इकडे.....लवकर..."

रेवा : "शोधतेय अरे.....मिळाली की, लगेच येतोय....😣"

रेवा फोन ठेऊन फाईल शोधण्यात व्यस्त होते.......🧐🧐🧐🧐 तिला कुठेच ती मिळत नाही.... मात्र काही वेळाने बाबांना ती फाईल एका शर्टच्या आत लपवून ठेवल्याची भासते.....

बाबा : "अरे बेटा...त्या शर्टमध्ये बघ.....काय आहे..... अस लिफाफ्या सारखं बघ जरा....🧐"

रेवा : "कुठे बाबा...🧐🧐 तो निळा शर्ट.....🙄🙄🤨"

बाबा : "हो घे.....उचल....तीच ती....चल पटकन....इथे नको बघू काहीच.... उशीर होईल....चल..पटकन...."

रेवा : "थँक्यू बाबा.... तुमच्यामुळेच शक्य झालंय.....🙏🙏"

ती लगेच शशांकला कॉल करते......

रेवा : "शशांक, फाईल माझ्या जवळ आहे...कुठे स्टेशनला घेऊ का गाडी...🙄🙄?"

शशांक : "एक काम कर आता ज्या डॉक्टरकडे चेक केलं तिकडे या आणि मला अड्रेस सेंड कर...... मी लगेच आलो....😎😎👍👍"

रेवा त्याला हॉस्पिटलचा पत्ता सेंड करते आणि बाबा सोबत पोहचते.....काही वेळानी शशांक तिथं पोहचतो.....सगळे डॉक्टरांच्या केबिनमध्ये जातात.....

डॉक्टर : "अरे.....Mrs. Patavardhan....... इकडे कस काय....🙄🤨🤨"

शशांक : "डॉक्टर आम्हाला.....ऋषी आणि रेवाचे जे रिपोर्ट्स आहेत त्यांच्याबद्दल डिटेल सांगा....प्लीज डॉक्टर......🙏 Begging you...."

डॉक्टर : ".....Hmmmmm...... It's very serious issue inspector...... ऋषी माझ्याकडे आलेला रिपोर्ट्स घ्यायला आणि त्याला मी रिपोर्ट्समध्ये जे काही होतं...... सांगितल्या पासून.....तो भानावर नव्हता..... इथून घाईतच गेला.....आता बराय का तो.....तुम्ही घेऊन का आला नाहीत, त्याला.....🙄"

शशांक : "तेच ना सर......अहो ऋषीच्या डोक्यावर खोलवर परिणाम झालाय......या सगळ्या गोष्टींचा....तो धड घरी येत नाही......धड रेवाशी नीट बोलत नाही..... डॉक्टर लवकर आम्हाला कळू द्या ना..... एक्झॅक्ट काय प्रॉब्लेम झालाय यांचा.....ज्याचा त्याने इतका डोक्यावर तान घेतलाय......😧😧"

डॉक्टर : "माफी असावी इन्स्पेक्टर हे सांगताना मला खूप दुःख होतय......😒😒"

रेवा : "सांगा ना डॉक्टर.....😩😩"

शशांक : "रेवा तू बस आधी...... खुर्चीवर....."

तो तिला खुर्चीत बसवतो.....कारण, आता जे काही डॉक्टर सांगतील ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हलणार......😲😲

डॉक्टर : "रेवा तुला कधीच ऋषी पासून पुत्रप्राप्ती होऊ शकत नाही....कारण, ऋषी ला......Low Sperm Production disorder आहे......आणि मी चेकअप करून बघितलं..... पण, बॉडी कसल्याही ट्रीटमेंट ला रिस्पॉन्स देण्याच्या स्थितीत नाही.....त्यामुळे.....😒ऋषी तुला कधीच बाळ होण्यात मदत करू शकत नाही....😒😒 I am extremely sorry Shashank...... मला हे सांगाव लागतंय....."

सगळे : "...😵😵😵😵😵"

रेवा : "....😭😭😭😭😭😭😭😭😭😭"

शशांक फोन करून लगेच अमायराला बोलावून घेतो....ती तिच्या Sweetuuuuuu ला सांभाळते......

अमायरा : "Don't cry baby.....🥺🥺🥺 Sweetuuuuuu......😘😘"

रेवा : "का ग...?? का माझ्याच नशिबातून, सगळं प्रेम देवाने हिरावून घेतलं.......ना मला धड माझ्या आई - बाबांचं प्रेम दिलं....ना धड मला मातृत्वाच सुख दिलं.....का हे असे वागतात.....😭😭😭😭😭"

अमायरा : "No....Baby..... Don't.... Sweetuuuuuu......😭😭😭😭Stop na yar...... Please.... Baby.....I don't want to see you in this condition.....Stop na yar.... Sweetuuuuuu."

शशांक ला कॉल येतो.....

अर्णव : "शशांक अरे हा ऋषी वेडा झालाय..... आत्महत्येचा प्रयत्न करतोय.....जिथे कुठे असशील लवकर....ये इकडे.... न्यू करवीर स्क्वेअर ला..... तिथल्या लेक जवळ मला हा उडी मारण्याच्या स्थितीत दिसला मी पोहचून त्याला ओढून घेतलय.....तू ये पटकन...प्लीज.....🥺🥺🥺 ताईला नको सांगुस....घरी कुणालाच नको सांगुस....ये ....."

शशांक : "आलोच थांब तू........"

तो पटकन स्टेशनला कॉल करून अजून दोन कॉन्स्टेबलला तिकडे या अस सांगतो......एक डॉक्टर सुद्धा सोबत घेतो..... सगळे त्या ठीकणी पोहचतात......ऋषीला वेड लागल्यासारख फक्त तो.....

ऋषी : "मला नाही जगायचंय......करू देत मला.... आत्महत्या.....😵😵🙏"

शशांक त्याच्या कानाखाली एक वाजवतो तेव्हा.....तो भानावर येऊन रडायला लागतो.....😭😭😭😭😭 शशांक त्याला मिठीत घेऊन शांत करण्याचा प्रयत्न करतो....पण, तो काही शांत होतंच नाही......खूप तासांनी तो नॉर्मल होतो आणि त्याला घरी आणलं जातं......

😓😓😓😓😓😓😓

सगळे घरी आलेत......रेवाची तर पूर्ण अवस्था.....मलाच लिहायला जड जात आहे.....🥺🥺🥺 एका आईला तिचं मातृत्व न मिळणे..... कल्पनाही करवत नाही.....😭😭😭😭

सगळे हॉलमध्ये बसलेत...... ऋषी, रेवा जवळ जाऊन तिच्या पायांवर डोकं ठेवतो.....

ऋषी : "रेवू...तुझा सगळ्यात मोठा... गुन्हेगार आहे ग मी.......मी जसा वागलो....खरंच....त्याला माफी नाही....पण, रेवु......एका बाईला जेव्हा हा समाज, तिला मुलं - बाळ होणार नाही हे मान्य करून तिला छळतो.....तोच छळ मी गेल्या काही दिवसांपासून अनुभवला ग..... त्या बाईला तर कुणीच नसतो ना.... तिच्या पाठीशी कुणी न रहाता ती जगत असते....पण, एक पुरुष हे दुःख कधीच पचवू शकत नाही ग.....आज मी आत्महत्येचा प्रयत्न केला... खरं...तर....ते मूर्खपणाचे पाऊल मी का उचलले....हे माझं मलाच स्पष्ट नव्हतं.......अग मी तुला आपलं बाळ देऊ शकत नाही हे जेव्हा कळलं.......तेव्हा, काय माझी अवस्था.... हे मी शब्दातही सांगू शकत नाही ग.....एका बाईला काय - काय सहन करावं लागतं.....हे एक पुरुष कधीच समजू शकत नाही...... मुल नाही होत म्हणून किती सासवा सूनाचा छळ करतात.... तसं बघायला गेलं....तर....त्या ही आधी सूनाच असतात....पण, त्यांच्यावर अत्याचार झालेत म्हणून त्या आपल्या सूनावर करतात.... काय ग ती मानसिकता...... मुलगा किंवा मुलगी होण पुरुषांवर अवलंबून असूनही..... स्त्रियांना दोष दिला जातोय.....आज जर माझ्या ऐवजी रेवूचा हा प्रॉब्लेम असता तर याच समाजाने तिला स्वीकारले असते का.....?? हा माझा मूलभूत प्रश्न आज मी विचारू इच्छितो.....मी हे सगळं बोलतो आहे....कारण, आज एका स्त्रीला काय - काय सहन करावं लागू शकतं याची जाणीव मला मनातून झालीय.....🙏🙏🥺😭 माफ कर मला रेवू......तुझा सगळ्यात मोठा गुन्हेगार मी आहे......🙏🙏😭😭😭"

रेवा उठून रूममध्ये जाऊन खूप रडते.....😭😭😭😭😭







सकाळी.........

रेवू.... छान तयार होऊन...... पुजाघरात पूजा करत असते.... सगळे खाली येतात......आज ती खूप प्रसन्न वाटत असते..... बघुया अस का??

सगळ्यांना आरती आणि प्रसाद देऊन ती हॉलमध्ये बसायला सांगते......आणि स्वतः आई - बाबांचा आशिर्वाद घेऊन, जावून बसते.......

ऋषी : "रेवू......तू मला माफ केलंस.....??😓😓"

रेवा : "ज्याची काहीच चूक नाही..... त्याचा राग धरून तरी काय अर्थ.....नाही का.....आणि.....एखाद्याची शारीरिक काय दुखापत असेल, हे आपण कस ठरवू शकतो ना..... आता ते तुझ्या हातात नाही ना.... विज्ञान वाचलंय मी....काही गोष्टी जन्मतःच असतात.....आणि काही आपल्या हातात नसतात.......मला तुझ्यावर, कोणताही राग किंवा द्वेष नाही ऋषी.....😊.....कदाचित....माझ्या बाबतीत ते घडलं असतं....तर,......मी ही तसाच रिअॅक्ट केला असता.....😒.....माझ्या मनात तुझ्याविषयी नेहमीच रिस्पेक्ट होती आणि राहील...🥰🥰....आणि इतकं सगळं......झाल्यावर तुझ्या मनाला, स्त्रियांच्या स्थितीची जाणीव झाली.....आणि जर..... स्त्रियांबाबतीत संवेदनशील असणारा पुरुष, माझा नवरा असेल ना ऋषी.....🥰 तर, माझ्यापेक्षा नशीबवान या जगात कुणीच नाही.....🥺🥺"

ऋषी धावतच जाऊन रेवाला मिठीत घेऊन कपाळावर एक किस करतो..😘😘😘😘....हा किस फक्त प्रेम नव्हे तर असतो आदराचा.....खरंच...ऋषी जसा वागला होऊ शकतं...तशी परिस्थिती आली की, आपणही कमकुवत होऊ....पण, त्या स्थितीतून बाहेर येऊन आपण, त्यातून काय शिकलो... याबाबत व्यक्त होणं, प्रत्येकालाच जमत नसतं.... ऋषीने ते केलंय....😎 आणि आज, मला सुद्धा त्याच्याविषयी आदर वाटतो....😎😎

बाबा : "रेवा बेटा आम्ही काय बोलावं हेच कळत नाही.....तू आमच्या घरची सून नाही पोरी.....एक मुलगी म्हणून पूर्ण घर सांभाळलं.....इतकी मोठी प्रशासकीय अधिकारी असूनही कधीही अहंकार बाळगला नाहीस....इतकं आपला व्यवसाय असून स्वहक्क कधीच गाजवला नाहीस....पोरी जिंकलस ग.....🥰🥰🥰🥰"

आई : "किती मोठ्या मनाची ग रेवू....नेहमीच खुश रहा पोरी.... माझ्या ऋषीला प्रत्येक वेळेस तूच सांभाळल..... पोरी.....🥺🥺 आम्हाला, तू आणि ऋषी हवेत ग.....मी स्वार्थी झालेले......नकोय ग आम्हाला नात.......तू असलीस ना की बास.....🥰🥰🥰"

रेवा : "अस कस नकोय नात....नात तर येणारच....☺️☺️"

सगळे : "म्हणजे...😲😲😲😲"

रेवा : "मी एक मुलगी दत्तक घेतेय......🥰"

सगळे : "....😘😘😘😘😘😘"

ऋषी : "रेवू.... रेवू......मी किती खुश आहे कस सांगू......😘😘"

रेवा : "तोंडाने....😅😅😅😂😂😂"

सगळे : "....🤣🤣🤣🤣"

ईशा : "माशी आपल्याकले....कोण येनाल आहे........🙄"

रेवा : "तुझ्या पेक्षा छोटू प्रिन्सेस.😘😘😘...."

ईशा : "मन मला कुणीच नाही पकलनाल....😓😒😒"

रेवा : "अग माझी इवलुशी पिल्लू....तुला नेहमीच मी माझी कुशी देईल ग बाळ....तू तर माझी पिनी पिणी आहे ना....😘"

ईशा : "आणि तू माझी निनी निणी आहे ना....😘😘"

दोघीही एकमेकींना नाकाला नाक घासून हसतात... सगळे रेवाच्या निर्णयाबद्दल खुश असतात...☺️☺️☺️🥰🥰🥰

बाबा : "चला मग सगळे.......आजच जाऊन आपल्या घरची खुशी ( मी नाही....त्यांची नात....तिच्या रुपात त्यांच्या घरात येईल ना खुशी....🤪🤭🤭🤭🤭) आणू या.....अरे पण, नाव काय ठेवायचं ठरलं का....??🙄🙄"

अमायरा : "Harinakshi ( ह्रिनाक्षी ) meaning...... A Precious....... Please Sweetuuuuuu, give this name to your baby....."

बाबा : "Done....... Harinakshi's Welcome party.........😘😘🥰🎉🎊🎂🎈🎀🎁 चला मी सगळं अरेंज करतोय.....तुम्ही दोघे जाऊन सगळी फॉर्मलिटीज करून घ्या...... आजच तिची वेलकम पार्टी होईल...."

ईशा : "नानू मना विसलून जाशील ना..... छोतू बेबी आली की...☹️ सगले तीकले जानाल मना सोनुन.... मम्मा...😭😭😭"

ती खूपच क्यूट....😘😘😘😘😘😘😘 तिला इन्सेक्युरिटी फील होतेय.....😂😂

रेवा : "ईशु ऑल टाइम फेवरेट टू....😘😘"

ईशा : "लेवू माशी.....😘😘😂😂😂😂"

ती रेवाला बिलगून खूप हसते...😂😂😂😂🙆..सगळे विचार करतात....रेवा सारख्याच व्यक्तीच्या जीवनात का?? प्रेम हरवलं असेल....😒😓


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


पण, आता मी तुम्हाला माझ्या कथेविषयी काही सांगणार आहे..... तोपर्यंत त्यांची फॉर्मालिटी पूर्ण होईल.... मग आपण, सेलिब्रेशन करून कथेचा शेवट करतोय.....😭🙏लिहायला जमत नाही........ शेवट..😭😭😭😭 पण, लिहावा लागतो....✍️

वाचकहो आपण, सगळे आजपर्यंत सोबत होता....

मी कथेचे नाव हरवलेले प्रेम का ठेवले...?? खूप लोकांना प्रश्न पडू शकतो...स्वाभाविक आहे....आणि मी पूर्णतः त्याचे आज निरसन करणार आहे.....कारण, सांगताना अतिशय दुःख होतंय की, हा कथामालिकेचा शेवटचा भाग असणार आहे....😭🙏

एखादी कथा सुरू होते म्हणजे तिचा शेवट असणार हे निश्चित.....मी कधी विचारही नव्हता केला.... माझ्या कथेत मी इतके सगळे पात्र जिवंत ठेऊ शकेन....पण, वाचकांना ते आवडत गेले.....माझी favourite होती.....🤩🤩🤩🤩 अमो आणि शशांक ची जोडी.....ते काय आहे ना....माझं क्रश आहे पोलीस डीपार्टमेंट......काय राव तो युनिफॉर्म.....🤩🤩🤩🤩 आणि जसा, मी शशांक आपल्यासमोर सादर केला तसेच होतकरू अधिकारी माझे आवडते असतात..... नेहमीच....🤩🤩🤩🤩😘 आणि काय क्यूट तो शशांक.....😘😘😘😘

बरं, रेवा ही या कथेतील खरी हेरॉईन दाखवण्या मागचा हेतू हा होता....तिने जे काही प्रॉब्लेम्स फेस केले त्यातील काही मी सुद्धा फेस केलेय आणि मी ज्या प्रकारे हॅण्डल केले त्याचे वर्णन आपल्या कथेच्या माध्यमातून वाचकांना उपलब्ध करून दिलंय....

ऋषी हे पात्र तितकस प्रभावी मी मुद्दाम दाखवलं नाही..... कारण, रेवा कडे काही नसून ऋषी तिचा सर्वस्व झाला.....म्हणून ऋषीला मी कथेत रेवावर खूप प्रेम करणारा एक काळजीवाहू नवरा इतकंच दाखवलं याबद्दल क्षमा.....ते काय आहे ना लोकांना हीरो कडून अपेक्षा असतात...पण, माझ्या कथेत त्या हीरोइनने पूर्ण केल्या.....असो...आजच्या काळात खरतर, याची गरजही आहे म्हणा.....😎🙏

प्रत्येक वेळी मी माझ्या कथेतून चांगल्या गोष्टी देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय....तरीही काही समस्या असल्यास क्षमस्व....🙏

आता वळूया....आपल्या महत्त्वाच्या मूलभूत मुद्द्याकडे..... तो म्हणजे, नाव फक्त, हरवलेले प्रेमच का??????🙄

तर, एकदा सहज लिहायला बसली......मग आठवलं की, आपण हा विषय अश्या पद्धतीने वचकांपर्यंत पोहचवू.....की, तो वेगळा वाटायला हवा.....ते काय आहे ना..... दोघांत तिसरा नेहमीच येतो.......पण, माझ्या कथेच्या बाबतीत दोघांत कितीतरी लोक येऊन गेलेत....😂 आणि त्यांची व्यवस्था उत्तम केली गेली.....😎🙏😂😂🤪

हरवलेले प्रेम, या माझ्या कथेत.....आपण वाचकांनी अनुभवले असेल..... तर समजेल, फक्त रेवाचेच प्रेम हरवले होते का हो..???? मला हाच प्रश्न प्रत्येक वाचकाला विचारायचा होता.....आणि आज विचारते.....तर त्याच उत्तर नक्कीच, नाही असेच आहे....

ऋषी तर होताच आई - वडिलांच्या छत्राविना....😭😭😭💔💔💔

अर्णव बहिणीच प्रेम हरवून बसला....😭😭😭💔💔💔

ऋषी आणि शशांक यांचे बाबा आपल्या भावंडांच प्रेम हरवून बसले....😭😭😭💔💔💔

श्रीकांत जो एक हॅकर असतो, आपल्या पत्नीचे प्रेम हरवून बसलेला....😭😭😭💔💔💔

आजी - आई तिचा मुलगा - सून आणि नात हीचे प्रेम हरवून बसलेली....😭😭😭💔💔💔


तर, मित्रांनो आता मला नाही वाटत.....हा प्रश्न आपल्याला इतक्या स्पष्टीकरण नंतरही पडायला हवा.....

ही होती माझी कथामलिका, हरवलेले....प्रेम.....कस असतं प्रेम एकदा हरवले ना दुसऱ्यांदा मिळतं....आणि या सगळ्यांनी दुसऱ्यांदा मिळालेले प्रेम जपले.... त्याचं नात्यात रूपांतर केलं..💞........आणि आज सगळे खुश आहेत.... इतक्या सगळ्या प्रॉब्लेम्स आल्या आणि गेल्या..... आशा करते.....आपल्या सर्वांना कथा आवडली असेल........🎀

सेलिब्रेशन नंतर निरोप घेते.....🙏😭

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



तर, सगळी तयारी ऋषीच्या बाबांनी केलीय.....चला तर decorations बघुया.....🤩🤩


🤩🤩Decorations 🤩🤩












सगळ्यांना Harinakshi खूप खूप आवडली......मला तर....😘😘😘😘😘इतकी.....आणि आता सगळे लाड करण्यात झालेत व्यस्त......तर या अश्याच.......नवीन मिळालेल्या प्रेमाच्या सहवासात आज मी निरोप घेते प्रत्येक वाचकांचा.....✍️🙏

कधी भेट होईल सांगू नाही शकत.....कारण, इथून मी आता माझ्या व्ययक्तिक कामात व्यस्त होणार आहे.....पण, जेव्हा - कधी वेळ मिळतो मी लिहत असते....म्हणून माझे लेख असतातच...... यानंतर जर मी एखादी कथामालिका लीहलीच..... तर ती असेल, एका सामान्य स्त्रीची असामान्य गोष्ट.....
पण.....सध्या नाही....🙏😒

सध्या असंख्य प्रश्न आहेत माझ्या स्वतःच्या जीवनात जे मला स्वतः रेवा सारखे...... त्यांना तोंड देऊन, पार पडायचे आहेत......ही कथा जेव्हा सुरू होती.....मी स्वतः हरवून जायची लीहण्यात.....✍️🥰

भेटूया नंतर कधी.....अश्याच भन्नाट सामाजिक विषयाला धरून लिखाणासोबत..... तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा.....

आणि सगळ्या वाचकांचे मनःपूर्वक आभार.....🙏

😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭